तू जिवंत आहेस तर
तू जिवंत आहेस तर
जीवनाच्या यशावर
अरे जरा विश्वास कर
असेलच कुुठे स्वर्ग तर
आणू ओढून पृथ्वीवर
आ-आ-आ, ओ-ओ-ओ॥धृ.॥
अरे सुखाचे ते चार दिवस
अरे दुःखाचे रे चार दिवस
हे सगळेच दिवस गेले, जातील
जसे पळाले दिवस हजार
असेलच कुठे हरी तर
करीलच कृपा कर्तृत्वावर॥1॥
रोज पहाटे व संध्याकाळी
रंग तरंग आकाशी
वसुंधरा तर सुंदर गाते
वार्याच्या त्या झुळकीशी
आ-आ-आ, ओ-ओ-ओ
म्हणते कशी...
तू तरी मला शृंगार कर
जरा येऊन गुदगुल्या कर
आ-आ-आ, ओ-ओ-ओ ॥2॥
हजारो सोंगे धारण करुनी
आला मृत्यू दारावर
तुला न देता धक्का त्याने
कशी घेतली माघार
आ-आ-आ, ओ-ओ-ओ॥3॥
तू ऐक - 2
रोजच सकाळ संगे घेऊनी
वाढवितो वय हा उपचार
आमच्या कर्तृत्वाना तर अपेक्षा
यशाची हो यशाची - 2
त्या तर स्वार पथ्यावर
आ-आ-आ, ओ-ओ-ओ
घे धडे तू धडाचे - 3
टाक पाऊल पावलावर ॥4॥