Amaroli Yogi


अमरोली योगी

डॉ. शशी पाटील (1945 ते 2016), यांना पूर्वी लोक आदराने 'शिवांबू महर्षी' व 'अमरोली योगी' असे संबोधित असत. कारण त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवनच योगमय-अध्यात्मिक साधनेसाठी व रुग्ण सेवेसाठी समर्पित केले होते.

जीवनातील 40 वर्षे त्यांनी अथकपणे, दीन दुबळ्या गरजू रुग्णांवर, शिवांबु योग व निसर्गोपचार यासारख्या प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धतींच्या माध्यमातून यशस्वी उपचार केले. ते एक स्वतः प्रयोग वीर होते. त्यांनी आपल्या जीवनामध्ये निसर्गाला व निसर्ग नियमांना सर्वोच्च स्थान दिले होते. ते स्वतः नेहमी निसर्ग संकेतानुसार जीवन जगायचे.
मानवामध्ये व्याधी ची उत्पत्ती कशी होते व नैसर्गिक रित्या त्या व्याधी, सहजपणे कशाप्रकारे दुरुस्त होऊ शकतात - या विषयावर त्यांचे चिंतन व मनन मूलगामी होते. त्यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवातून साध्या सर्दी पासून ते कॅन्सर पर्यंतच्या अनेक असाध्य-दुर्धर रोगांवर, यशस्वीपणे कशी मात करता येईल, यासाठी विविध उपचार विकल्प - संशोधित केले होते. 

त्यांनी त्यांच्या जीवन कालावधीमध्ये - दमा, मधुमेह, संधिवात, हृदयविकार, पोट विकार, त्वचाविकार, स्थूलपणा, लकवा, अल्सर, कॅन्सर, महारोग, एड्स यासारख्या असंख्य व्याधींनी रोगग्रस्त हजारो रुग्णां, आपल्या उपचारांनी रोगमुक्त केले, त्यांनी त्यांना नवजीवन प्राप्त करून दिले. ते नेहमी म्हणायचे, 

'माणसाला निसर्गाने, हे शरीर फ्री मध्ये गिफ्ट स्वरूपात दिली आहे, त्याला आरोग्य ही मोफत व स्वभावतः दिले आहे, तर मग रोग मुक्तीसाठी त्याला पैसे का बरे पडावेत..!?' 

प्रस्तुत 'अमरोली योगी' हा ब्लॉग 'विनाऔषध स्वास्थ्य' या त्यांच्या स्वास्थ्य मोहिमेला, प्रत्येक गरजवंतापर्यंत सहज व मोफत पणे पोहोचविण्याच्या दृष्टीने आरंभलेला एक उपक्रम आहे. अमरोली योगी या ब्लॉग च्या माध्यमातून डॉ. शशी पाटील यांचे स्वास्थ विचार व त्यांनी विविध रोगांवर संशोधन केलेले उपचार कार्यक्रम, सर्वसामान्य गरजू स्वास्थ्य प्रेमिंपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. 

अमरोली योगी या ब्लॉग चे सर्व संकलन, संपादन तथा संचालन डॉ. शशी पाटील यांच्या द्वारे स्थापिलेल्या शिवांबू हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूट व आनंदकुंज योग निसर्गोपचार योग आश्रमाच्या माध्यमातून केले जात आहे.