ध्वनीची सर्वश्रेष्ठ व मुलभूत अवस्था म्हणजे ओंकार होय. ओंकार हे ध्वनीचे मूळ रुप आहे. प्राचीन ग्रंथानुसार ॐ शब्दाची निर्मिनी ब्रम्हदेवाकडून झाली. ब्रम्हदेवाचा जन्म विष्णूच्या नाभीतून (बेंबीतून) झाला. जेव्हा ब्रम्हाला आपण एकटेच या सृष्टीत आहोत याची जाणीव झाली, तेव्हा त्यांनी विश्‍वाची निर्मिती केली. त्यावेळी त्यांच्या मुखातून प्रथम ओम हा शब्द बाहेर पडला.

मओमफ या शब्दामध्ये मअफ, मउफ, आणि ममफ यांचा समावेश होतो. म्हणजे त्यात दोन स्वर व एक व्यंजन आहे. ओंकार साधनेवेळी मअफ व मउफ चा उच्चार तोंड उघडे ठेवून करावा आणि ममफ चा उच्चार तोंड मिटून करताना नाकातून आवाज काढावा, ज्यामुळे डोक्यामध्ये (मेंदूमध्ये) कंपने होत असल्याची जाणीव होते.

ओंकारसाधना करताना पद्मासनात बसणे चांगले. तसे न जमल्यास मांडी घालून बसावे. या साधनेसाठी पहाटेची वेळ योग्य असते आणि योग्य स्थळ हे शांत व स्वच्छ असावे, ज्यामुळे मन एकाग्र होऊ शकेल. ओंकारसाधना करण्यापूर्वी आपल्या आराध्य देवतेचे स्मरण करुन ती शक्ती आपल्या पाठीशी आहे, असे समजून शांत चित्ताने, एकाग्रतेने व तल्लिन होऊन ओंकारजप करावा. मओमफ चा उच्चार अंदाजे चार सेकंद, मउफ चा उच्चार अंदाजे पाच सेकंद करावा आणि तोंड मिटून ममफ चा उच्चार नाकातून करुन तो लांबवत न्यावा, त्यावेळी मेंदूत निर्माण होणारी कंपने मनोविकारांसाठी हितकर असतात.

ओंकारसाधनेवेळी डोळे मिटलेले असावेत. मिटलेल्या डोळयांपुढे ओेंकाराचे रुप आणावे. त्यावर मन एकाग्र करावे. एकाग्रता एवढी असावी कि डोळयांसमोर ॐ शिवाय काहीच दिसू नये.

ओंकारसाधनेचे फायदे

योग्य प्रकारे ओंकारसाधना केल्यास बुद्धीचा विकास होतो, मेंदू कार्यक्षम होतो, ग्रहणशक्ती, आकलनशक्ती व स्मरणशक्ती वाढते. मनाची एकाग्रता वाढते. त्यामुळे बुद्धिजीवी वर्गासाठी (डॉक्टर, वकील, संशोधक विद्यार्थी इ.) ओंकारसाधना फायदेशीर ठरते. लहान मुलांची चंचलता, हट्टीपणा, तापटपणा ओंकारसाधनेमुळे कमी होऊ शकतो.

ओंकारसाधनेमुळे मन शुद्ध, सात्विक आणि संयमी होते. तसेच मनाची खंबीरता वाढते. या साधनेमुळे मनाच्या त्रिगुणांपैकी रज व तम या वाईट गुणांचा क्षय होतो. तर सत्व गुणाची वृद्धी होते. त्यामुळे षड्रिपूंवर (काम, क्रोध, मोह इ.) विजय मिळवता येतो व अनेक मनोरोग टाळले जातात.

मानसिक स्वास्थ्य हे मनाच्या शांततेवर व संयमावर अवलंबून असते. मन अशांत होते ते रोजच्या ताणतणावाने, सुखदुःखाच्या आणि मानापमानाच्या प्रसंगाने, अशावेळी मन शांत व संयमित करण्यासाठी ओंकार साधना आवश्यक ठरते. ज्यामुळे चिडचिड, तापटपणा कमी होण्यास मदत मिळते. मन, बुद्धी, स्मृती व संज्ञा (चेतना) यांच्या शुद्धीसाठी, विकासासाठी ओंकारसाधना श्रेयस्कर ठरते

रोगांचे वर्गीकरण शारीरिक व मानसिक असे केले जाते. आयुर्वेदानुसार शारीरिक रोग त्रिदोषांच्या (वात, पित्त, कफ) असंतुलनामुळे होतात तर मानसिक रोग हे मनाच्या त्रिगुणांच्या (सत्व, रज व तम) असंतुलनामुळे होतात. निरनिराळया मनोविकारात मनाबरोबर बुद्धीही दूषित झालेली असते, कारण मनावर अंकुश ठेवणारी, काय करावे, काय करु नये हे सांगणारी बुद्धी असते. बुद्धीच्या शुद्धीसाठी ओंकारसाधना हितकर ठरते.

मनोविकारांना मनात उठणारे सततचे तरंग, चंचलपणा, कुविचार इत्यादी घटक कारणीभूत असू शकतात. अशावेळी मन शांत व स्थिर बनविण्यासाठी ही साधना उपयोगी ठरते.

पतंजलीप्रणित अष्टांगयोगातील यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार यामुळे शारीरिक रोग दूर राहतात तर ध्यानधारणा (ओंकारध्यान), समाधी यामुळे मानसिक रोग दूर राहतात. या ओंकारध्यानामुळे मनाची खंबीरता वाढते.

मनोविकारांना वासना, इच्छा, आकांक्षा, लोभ, राग, मोह, क्षोभ इ. गोष्टी कारणीभूत असतात. मनोविकारामध्ये निराशा, खिन्नता (डिप्रेशन), चिडचिड, निद्रानाश, उन्माद इत्यादींचा समावेश होतो. त्यासाठी ओंकारसाधना हितकर ठरते. झोपेच्या तक्रारींसाठी सकाळी व रात्री झोपताना ओंकारसाधना केल्यास फायदा होतो.

उच्चरक्तदाबाच्या रुग्णांनी नियमितपणे ओंकारसाधना केल्यास मन शांत व स्थिर होते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो तसेच हृदयाचे आरोग्यही सुधारते. अशाप्रकारे योग्य रितीने ओंकारसाधना करुन त्याला सात्विक आहार, सदाचार व योग्य औषधोपचार यांची जोड दिल्यास मानसिक स्वास्थ्य मिळते. बुद्धी विकसित होते आणि अनेक मनोविकार, मनोकायिक विकार दूर होतात.


 

Previous Post Next Post