डिटॉक्झिफिकेशन म्हणजे शरीरातील अंतर्गत संस्थामध्ये साचलेली विषारी द्रव्ये बाहेर फेकणे. आपण खाल्लेल्या अन्नाद्वारे हे विषारी पदार्थ आपल्या शरीरामध्ये जातात. यासाठी तज्ञांच्या सल्ल्याने महिन्यातुन एक वेळा तीन ते चार दिवस आपण डिटॉक्झिफिकेशन करून घेणे गरजेचे आहे. डिटॉक्झिफिकेशन किंवा डिटॉक्झ आहार बराच लोकप्रिय असला तरी हा वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित केला गेलेला नाही. आयुर्वेद आणि चायनिज औषध-प्रणालीसोबतच कित्येक देशात अनेक वर्षे ही औषधे प्रचलित आहेत.
आहाराचे नियोजन
मद्यपान, कॉफी, सिगारेट, साखर आणि सॅच्यरेटेड फॅट या सर्वांमुळे शरीरामध्ये विषारी द्रव्ये तयार होतात. या विषारी द्रव्यांमुळे शरीरातील अंतर्गत यंत्रणेत बिघाड निर्माण होतो. त्यामुळे या आहाराचे सेवन टाळणे उत्तम.
शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर निघुन जाण्यासाठी 60 टक्के पातळ पदार्थ आणि 40 टक्के घन पदार्थ घेणे गरजेचे आहे. डिटॉक्झिफिकेशनसाठी आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कायम राखणे गरजेचे आहे.
टरबूज, पपई यासारख्या फळांचा रस घेणे चांगले असते. द्राक्षांचा रस घेऊ नये, कारण यामुळे डिटॉक्झिफिकेशन कार्यात अडथळे निर्माण होतात.
हिरव्या पालेभाज्या, कोबी, फ्लॉवर आणि ब्रोकोली खावीत. याव्यतिरिक्त कांद्यामुळे ही विषद्रव्ये साफ होण्यास मदत होते. विशेषतः यकृतातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी याचा फायदा होतो. तसेच सुर्यफूल, तीळ यांच्या बियांचादेखील फायदा होतो.
कधी आणि केंव्हा?
तीन महिन्यातुन एकदा डिटॉक्झ आहार घेणे गरजेचे असते. तुम्ही स्थुल
असाल तर, दर महिन्याला डिटॉक्झ आहार घेऊ शकता. तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असेल किंवा तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचा त्रास असेल तर तुम्ही दोन महिन्यातुन एकदा डिटॉक्झ आहार घेणे चांगले. तुम्ही तणावग्रस्त असाल तर दर पंधरा दिवसांतुन एकदा अवश्य डिटॉक्झ आहार घ्या. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आठवड्यातुन एकदा डिटॉक्झ आहार जरूर घ्या. डिटॉक्झ आहार घेत असताना प्रिझर्व्हेटिव्ह घातलेले असतील, असे पदार्थ आजिबात घेऊ नका. साखर आणि जास्त चरबीयुक्त आहार, जंक फूड देखील वर्ज्य करा. खुप दिवसांसाठी डिटॉक्झ आहार घेणेही शरीराला अपायकारक ठरू शकते. कारण, यामुळे शरीरातील खनिजद्रव्ये आणि जीवनसत्वे कमी होतात.
विषद्रव्ये तयार होण्याचे संकेत
आधुनिक जीवनशैली, धकाधकीचे जीवन आणि पर्यावरणातील वाढते प्रदूषण यामुळे आपल्या शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम वाढत आहे. शरीरातील विषद्रव्यांचे प्रमाणही वाढत आहे. शरीरातील विषद्रव्यांचे प्रमाण वाढल्यावर खालील लक्षणे दिसून येतात.
* थकवा येणे, अशक्तपणा जाणवणे. * संप्रेरकांसंबधी समस्या, स्वभावदोष निर्माण होतात. * एकाग्रता कमी होते. * डोकेदुखी, अंगदुखी जाणवते.
* त्वचाविकार उद्भवतात.
* पचनक्रिया बिघडते.
डिटॉक्झिफिकेशनची प्रक्रिया
* उपवासाद्वारे अवयवांना विश्रांती देणे.
* शरीरातील विषद्रव्ये बाहेर फेकण्यासाठी यकृतातला चेतना दिल जाते.
* फुफ्फुसे, आतडी आणि त्वचेद्वारे विषद्रव्ये बाहेर फेकली जाण्याच्या क्रियेत वेग आणणे.
डिटॉक्झिफिकेशनची प्रक्रिया
* उपवासाद्वारे अवयवांना विश्रांती देणे.
* शरीरातील विषद्रव्ये बाहेर फेकण्यासाठी यकृतातला चेतना दिल जाते.
* फुफ्फुसे, आतडी आणि त्वचेद्वारे विषद्रव्ये बाहेर फेकली जाण्याच्या क्रियेत वेग आणणे.
डिटॉक्झ करण्याचे फायदे
* रक्ताभिसरण सुधारते. * शरीरातील पोषणद्रव्यांची झिज भरून काढते. * रोगप्रतिकार शक्ति आणि उर्जा वाढते. * पचनसंस्थेची स्वच्छता होते. * रक्त शुद्ध होते * त्वचेचा तजेला वाढतो * उती नष्ट करणार्या फ्री रॉडीकल्स शरीराबाहेर फेकण्यास मदत करते. * कॅन्सर सारख्या आजाराचा धोका टळतो. * यकृत आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.
या गोष्टींची विशेष काळजी घ्या
* डिटॉक्स आहार हा आहातज्ज्ञांच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्यांनी दिलेल्या सुचनेनुसारच होणे गरजेचे आहे. * डिटॉक्झ आहार घेत असताना, उपाशी राहणे टाळा. * आपल्या आहामध्ये ताजी फळे आणि ताज्या पालेभाज्या, ज्युस, लिंबुपाणी, नारळपाणी, दही, ताक, मोड आलेली कडधान्ये यांचा अवश्य समावेश करावा. भरपूर पाणी प्यावे. * गर्भवती महिला, स्तनपान करणार्या महिला, थॉइरॉइड, यकृत आणि किडनी संबधित तक्रारी असणार्या रूग्णांनी डिटॉक्झ आहार पद्धतीचा वापर करू नये. मल्टिव्हिटॅमिनचे सेवन करणार्या व्यक्तिंनी डिटॉक्झ दरम्यान हे सेवन बंद करावे. मधुमेह, उच्च रक्तदाब, थॉयरॉइड आणि हृदयविकार असणार्या रूग्णांनी डिटॉक्झ सोबत मल्टिव्हिटॅमीन औषधाचे सेवन केल्यास चालेल. ज्यांचे, अवयव प्रत्यारोपण झालेले आहे, अशा व्यक्तींनी डिटॉक्झ आहार घेऊ नये. वृद्ध आणि लहान मुलांना देखील हा आहार देऊ नये.