चला जाऊ कोल्हापूरला
चला जाऊ कोल्हापूरला
आरोग्य दर्शनाला
शिवाम्बूचा भरुनी पेला
करू प्राशनाला ॥धृ.॥
सकाळीच उठुनिया
काढू प्रभात फेरी
तेथूनच येता पुनः
व्यायामाची सुरसुरी
मसाज झाले, भूगर्भ झाले
झाले बाष्पस्नान
पायापासून डोक्यापर्यंत
शुद्ध पंचप्राण ॥1॥
अॅक्युप्रेशर होता पूर्ण
शरीरात चैतन्य
जणू कुलस्वामिनी
पाजे आपलेच स्तन्य॥2॥
चला चला सत्संगाला
मुहूर्त का पाहता
समूहासवे येउनिया
आनंद तो घेतला
एकमेका उतरता वजन
संतोष जाहला
इडा पीडा निघुनिया
देह उभा झाला
सुदृढ त्या आरोग्याच्या
करू स्वागताला॥3॥
गावाला जाता सर्व
माहिती ती देऊ
स्वरूप आपुले दिसता
त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ
माउलीच्या तळमळीला
प्रतिसाद देऊ
आमरोली क्रियेची सर्वा
माहिती ही देऊ ॥4॥