जीवन
जीवनात काही
करणार झाला
मग मनाला मारून
काय...उपयोग?
पुढे पुढे धावायचे तर...
हिंमत खचवुनी काय उपयोग...? ॥धृ.॥
चाल चाललेलाच पोचत असतो
बसलेला तो मागे राहतो
थांबले पाणी सडू लागते
वाहते जे.. ते निर्मळ असते.
पाय मिळाले चालण्यासाठी
पसरुनी पाय, काय उपयोग ॥1॥
धाव धावलेला ससा, पण तो
चालून थोडाच आहारी गेला
हळू... हळू कासव, पण ते
पायला की नाय पहिला आला॥2॥
चला पावलाबरोबर
पावले टाकीत
कडेला दूर बसून काय उपयोग॥3॥
धरती चालली खालती
तारे चालले वरती
चालला चांदोबा रात्रभर
रवी तर आला, किरण वाटण्या
हवा तर आली ओझोन घेऊन
तू तरी राजा, बसतो कशाला?॥4॥