वंदनीय स्वास्थ्यप्रेरकांचे विचार
भारताचा आत्मा ग्रामीण भागात निवास करून आहे. आमच्या देशाच्या परिस्थितीनुसार जर कोणती चिकित्सापद्धती असेल, तर ती निसर्गोपचार ही आहे. रोगग्रस्तांना असे सरळ उपाय सांगायला हवेत, जे त्यांना सहज समजू शकतील व कोणाच्याही मदतीशिवाय ते सहज करू शकतील.
असंख्य लोक आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या व्याधीनं ग्रस्त राहतात आणि एकानंतर दुसऱ्या औषधाला शरण जात राहतात. अर्थात डॉक्टर व वैद्य बदलत राहतात. रोग हटवणाऱ्या डॉक्टरांच्या शोधात स्वत:च त्रासून, दुसऱ्यांना त्रास देऊन मरून जातात.
मी माझा स्वातंत्र्यानंतरचा काळ निसर्गोपचाराच्या प्रचारार्थ व्यतीत करीन.
पूज्य म. गांधी