वंदनीय स्वास्थ्यप्रेरकांचे विचार

    “आताच मी 'दि वॉटर ऑफ लाईफ' नावाचं पुस्तक वाचलं. यामध्ये लेखकानं, ‘मानव-मूत्रालाच’ 'वॉटर ऑफ लाईफ' म्हटलं आहे. तसं पाहिलं तर जनावरंचं मूत्रही “वॉटर ऑफ लाईफ' आहे; म्हणजेच सजीव शरीरानं निर्माण केलेलं पाणी आहे. मूत्रोपचार नामक पद्धतीनं असा दावा केला आहे की, मानवमूत्रानं माणसाचे पुष्कळ रोग बरे होऊ शकतात. वैष्णवांना हे ऐकून धक्का बसेल व ते विचारतील की, मानवमूत्र ही काय पिण्याची वस्तू आहे? परंतु त्या लेखकानं लिहिलं आहे की, माणसं एका बाजूनं औषधावर लाखो रुपये खर्च करतात व दुसर्‍या बाजूनं या सर्वोत्तम औषधाचा फायदा घेण्याबाबत बेफिकीर असतात.

    प्रत्येकानं स्वमूत्र प्यावं, असा माझा सल्ला आहे. भिन्न भिन्न रोगांवर तो एक रामबाण उपाय आहे. ज्यांना ते पुस्तक पाहायचं आहे, त्यांनी माझ्याकडे येऊन पाहावं. गांधीजींच्या बरोबर दक्षिण आफ्रिकेत असणारे श्री. रावजीभाई पटेल यांनी त्या पुस्तकावर आधारित 'मानवमूत्र' नावाचं पुस्तक लिहिलं आहे. हा विषय आता शास्त्रीय झाला आहे. म्हणून कमीत कमी पुढचं पाऊल या दृष्टीनं आता मल-मूत्राची घृणा करता कामा नये.''

पूज्य श्री. विनोबा भावे यांचे प्रवचन

(४/४/१९५९)


Previous Post Next Post