वंदनीय स्वास्थ्यप्रेरकांचे विचार

        'व्हिटॅमिन बी-१ हे, दूध व मांस यामधून शरीराला मिळत असतं. लघवीतून १५ टक्के व्हिटॅमिन बी-१ जात असतं. पॉलिन्युरायटिस या विकारात लघवीतून व्हिटॅमिन बी-१ कमी प्रमाणात जातं; परंतु गर्भारपणात आणि मूल अंगावर पीत असेपर्यंत लघवीतून व्हिटॅमिन बी-१ जाण्याचं प्रमाण वाढलेलं असतं म्हणून अशा अवस्थेत शिवाम्बू चिकित्सा सुरू करणं श्रेयस्कर असतं.'

वैद्यराज दादासाहेब भोगे

    ‘स्वीस गिर्यारोहकांनी हिमालय मोहिमेवर जाताना बरोबर शिवाम्बूपासून बनविलेल्या गोळ्या नेल्या होत्या. या गोळ्यांमुळे त्यांचा उत्साह व जोम कायम राहिला.'

डॉ. के. के. दाते, मुंबई (हृदयरोग तज्ञ)

    ‘स्वमूत्रामुळे वांझ स्त्रियांचं वांझपण नाहीसं होतं. मासिक विटाळातील लोह अवरोध नाहीसे करता येतात. पुरुषांचं नपुसंकत्व नाहीसं होतं. त्याचप्रमाणे अनियमित मासिक पाळीमुळे गर्भ राहत नसल्यास, पुरुषवीर्यात जिवंत शुक्राणूंचा अभाव असल्यास, इतर अनेक दोषांसाठी 'स्वमूत्र' घेणे उत्तम. मूत्रातील ह्यूमन कोरिऑनिक गोनाडोट्रफिन (एच.सी.जी.) या हार्मोनमुळे गर्भवतीच्या गर्भाचं जतन होतं, शिवाय रोगावाचून बालकाचा विकास नैसर्गिक रीतीनं होतो.'

'लोकमत साहित्य 'जत्रा' (बंगाली महिलेच्या लेखाद्वारे)

    'मूत्रचिकित्सा हे निसर्गोपचाराचं एक महत्त्वाचं अंग आहे. स्वावलंबनाचं अमोल साधन आहे.'

श्री. बाळकोबा भावे (संचालक), निसर्गोपचार आश्रम, उरळी कांचन (पुणे)

    '..मात्र रोज शिवाम्बू घेतो. शिवाम्बूच्या उपचारामुळे पन्क्रियाज कार्यक्षम झाला. मी नॉर्मल आहे. शिवाम्बू उपचार पद्धतीवर माझा पूर्ण विश्वास आहे. या पद्धतीत आपणच औषध निर्माते असतो. त्यामुळे औषधाचा खर्च नाही. अनेक डॉक्टर मंडळीही माझा सल्ला घेऊ लागली आहेत.'

लीलाधर हेगडे, साने गुरुजी आरोग्य मंदिर, सांताक्रूझ.

    'मला आज ९४ वर्षे पूर्ण होत असून, दररोज शिवाम्बुपान, मालिश, एकभुक्त आहार व योगासनं यावर भर दिला आहे. कोणतंही व्यसन नाही. मांसाहार नाही. तीन-चार वेळा स्वमूत्रपान करतो. भरपूर पाणी, सात्त्विक आहार आणि आध्यात्मिक परिशीलन चालविले आहे. या सर्व योगबळानं कुंभक करून स्वत:ची नाडी वाटेल तेंव्हा क्षणभर बंद करतो.'

डॉ. रा. सी. कापडी, MBBS, ‘साईप्रसाद', राजारामपुरी, कोल्हापूर

     “पोटदुखी, अँमेबिक डिसेन्ट्री, जुनाट मलावरोध व अग्निमांद्य, अपेंडिसायटिस, मूळव्याध, भगंदर, मूतखडा, नैराश्य, हृदयाचा अशक्तपणा इत्यादी विकारांना पंधरा वर्षे तोंड दिले. सर्व प्रकारच्या औषधी उपाययोजना निष्फळ होऊन ‘आपुले मरण पाहिले म्यां डोळा' अशी अवस्था झाली. ईश्वरकृपेने शिवाम्बू चिकित्सेचा परिचय झाला. धीराने व श्रद्धेने शिवाम्बूचे प्रयोग केल्यावर काही आठवड्यांतच सर्व विकार आश्चर्यकारकपणे नाहीसे झाले. पाच वर्षें परिश्रमपूर्वक संशोधन करून ग्रंथ पूर्ण केला....सेन्ट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन इंडियन मेडिसन आणि होमिओपॅथी, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी शिवाम्बू-चिकित्सेचे मूल्यमापन आणि संशोधन करण्यासाठी कार्यवाही सुरू केली असून, माझ्याकडून जरूर त्या माहितीची नोंद घेतली आहे."

बा. ल. नलवडे, लेखक, शिवाम्बू-चिकित्सा प्रचारक मंडळ, पुणे

     “पुणे, मिरज, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या शहरांना मी दिलेल्या भेटींमध्ये अनेक आजारी पेशंट्स शिवाम्बूबद्दल सल्ला विचारण्यासाठी आले होते. यावरून असे दिसून येते की, महाराष्ट्रामध्ये शिवाम्बूथेरपी खूप लोकमान्य झाली आहे.”

डॉ. परागजी डी. देसाई, ! MBBS, President of the Grant Medical College, Bombay & Indian Medical Association, Bulsar

     “मूत्राबद्दल आपलं मत काय?” हा प्रश्‍न मला अनेक ठिकाणी विचारला जातो. तेंव्हा मूत्रातील क्षार, हार्मोन्स, एन्झाइम् अँटिबॉडीज, अँटोजिन्स लक्षात घेता व माझ्या संपर्कात आलेले स्वमूत्राने बरे झालेले लोक पाहता, मी इतकंच म्हणेन की, “हा स्वास्थ्य मिळवण्याचा सर्वांत नजीकचा मार्ग आहे."

डॉ. जयनारायण जयस्वाल, निसर्गोपचार तज्ञ कोथरूड, पुणे

     "गेली सुमारे १० वर्षे, मी शिवाम्बू चिकित्सा आणि होमिओ औषधांचे संयुक्त व स्वतंत्र उपचार अनेक रुग्णांवर केले असून, त्यांची फलनिष्पत्ती उदबोधक आहे. आधुनिक वैज्ञानिक संशोधनाचे निकष लावून असंख्य रुग्णांवर केलेल्या शाखीय रुग्ण चिकित्सेवरून (Clinical Research) शिवाम्बूची गुणकारिता नि:संशयपणे सिद्ध झाल्याचे आढळलेले आहे."

डॉ. सी. द. धर्माधिकारी, गोल्ड मेडॅलिस्ट, पुणे

     "मूत्राचा बाह्य वातावरणाशी संबंध येत नसल्यानं निरोगी माणसाच्या मूत्रात जंतू आढळत नाहीत. मूत्रात पाणी व इलेक्ट्रोलाइट्स म्हणजेच प्रोस्टॅटिक फल्यूइड विपुल असतात. त्याचबरोबर शरीराच्या सर्व भागातून येणारी उपयुक्त द्रव्यं वाजवी होताच मूत्रात उतरतात."

डॉ. के. सी. कुरुविला, .M.S. चीफ नेफ्रॉलॉजिस्ट जसलोक हॉस्पिटल, मुंबई

“काही विकारांत शरीरास उपयुक्त असणारी घटकद्रव्य मूत्रपिंडातून मोठ्या प्रमाणात बाहेर टाकली जातात. प्रोटीनपासून तयार होणारा युरिया हा पदार्थही मूत्रात अधिक असतोच. शिवाम्बुपानानं मूत्राच्या प्रमाणात जी वाढ होते ती यूरियामुळेच, शरीरात तयार होणारे हार्मोन्स व क्षार मूत्रपिंड साठवितात व जरूर तेंव्हा उपयोगात आणतात; परंतु ही उपयुक्त द्रव्यं साठविण्याची मूत्रपिंडाची ग्रहणशक्ती संपल्यावर ती मूत्रातून बाहेर टाकली जातात."

डॉ. व्ही. जे. आचार्य, कॅन्सर सर्जन, मुंबई

     "या अद्‌भुत उपचाराच्या सल्ल्यासाठी आमच्याकडे दोनशे ते अडीचशे पत्रं रोज येत असतात. सर्वांच्या अपेक्षेनुसार योग्य मार्गदर्शन दिलं जातं. हे इथं नमूद करणं मला आवश्यक वाटतं की, अँलोपॅथिक, आयुर्वेदिक, इत्यादी उपचारांनी बऱ्या न होणाऱ्या रुग्णांनी सरळ, पण विनामूल्य चिकित्सेनं आरोग्य मिळविलं आहे."

पन्नालाल झवेरी (अध्यक्ष), भारत सेवक समाज, अहमदाबाद


Previous Post Next Post