डॉ. शशी पाटील: एक संपूर्ण यशस्वी जीवन


खर जीवन

जीवन एक सुंदर प्रवास आहे. या सुंदर प्रवासात, एखाद्या व्यक्तीला बर्‍याच प्रकारच्या घटनांमधून जाऊन अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कटू-गोड अनुभवांना सामोरे जावे लागते. या घटना आणि अनुभवांचे उद्दीष्ट एखाद्या व्यक्तीला खाली पाडणे हे नसते तर, त्याला उभे करणे हेच असते. आपण सर्वजण मानवी जीवनातील काही धडे शिकण्यासाठी आणि आपला सर्वोत्तम विकास करता-करता, जीवनाचे अंतिम सत्य जाणून घेण्यासाठी या पृथ्वीवर आलो आहोत.

या प्रवासात जन्म आणि मृत्यू हे दोन असे महत्त्वपूर्ण टप्पे आहेत जे दृश्यमान आहेत, म्हणूनच मनुष्याला असे वाटते की जन्मापासून मृत्यूपर्यंतच जीवन आहे. परंतु जीवन तर, जन्मापूर्वी आणि मृत्यूनंतरही अस्तित्वात आहे, उपलब्ध आहे.

जीवनाचे हे कोडे सोडवण्यासाठीच मनुष्य पृथ्वीवर येतो. जीवनाचा खरा अर्थ, जीवनच आहे. परंतु मनुष्य, जगाच्या माया बाजारामध्ये इतका गुराफटलेला आहे की, तो जीवनाचा खरा हेतू विसरला आहे. जीवनाचे खरे ध्येय, ‘जीवन जगणे’ हेच आहे. खरेतर जीवनाचा हा प्रवास म्हणजे 'सत्' मार्गाचीच यात्रा आहे. जीवनाचे खरे रहस्य हे जीवनाच्या जिवंतपनाताच आहे.

म्हणुनच तर प्रश्न असा आहे की, हे जीवन कोणत्या प्रकारचे कोडे आहे? संपूर्ण यशस्वी जीवन म्हणजे काय? लोक सहसा यशस्वी जीवन कशाला म्हणतात? यशाबद्दल मानवाची काय मान्यता आहे? अधिकतर लोक, आयुष्यात बरेच पैसे कमावणे, कीर्ती मिळवणे, जमीन मिळवणे, संसार स्थिर करने आणि मुला बाळांचा सांभाळ करणे यालाच जीवनाचे ध्येय मानतात किंवा या सर्व गोष्टी जो कोणी साध्य करतो, त्यालाच ‘यशस्वी मनुष्य’ म्हणतात. परंतु मानवी जीवनाचे पाच महत्त्वपूर्ण भाग आहेत - शारीरिक, मानसिक (भावनिक), सामाजिक (कौटुंबिक), आर्थिक, (भौतिक) आणि आध्यात्मिक. यापैकी कोणत्याही एक किंवा दोन आयामावर यश मिळवणे म्हणजे संपूर्ण यश नाही. मानवांला, आपल्या या मानवी जीवनाच्या पाचही भागांमध्ये संतुलित व सम्पूर्ण विकास करण्याच्या हेतुनेच हे मानवी जीवन मिळाले आहे. या पाचही आयामांची रहस्ये शोधण्यासाठी आपल्याला हे जीवन मिळाले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आयुष्याच्या या पाचही आयामना समान महत्त्व देऊन, त्यांच्यावर कार्य करते, तेंव्हा त्याला, ‘संपूर्ण यशस्वी जीवन’ म्हणता येईल.

प्रेरणादायक जीवन

डॉ. शशी पाटीलजी यांचेही जीवन असेच एक संपूर्ण आणि यशस्वी आयुष्य होते जे, आपल्याला आपले जीवन पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देत राहील.  बालपणापासूनच त्यांना पोलिओ असूनसुद्धा, शेवटपर्यंत ते निरोगी होते, त्यांना इतर कोणताही शारीरिक आजार नव्हता. त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता. पण ते मनाने खुपच दृढनिश्चयी व निर्मळ होते.  नवीन ज्ञान समजण्यासाठी, ते नेहमीच ग्रहणशील (ओपन) असायचे आणि त्यांची बुद्धिही खुपच तल्लख होती. सामाजिकदृष्ट्या, त्यांचा जनसंपर्क खूप मोठा होता. गोड आवाज आणि स्वच्छ भावनांमुळे, त्याचे सर्वांशीचे प्रेमपूर्ण संबंध होते. क्षमा साधना करण्याने ते पूर्ण समर्पित झाले होते. कौटुंबिक स्तरावर, त्यांनी आपल्या मुलांना, सुनांना, जीवनाचे वास्तविक लक्ष्य देवून त्यांना सुसंस्कृत बनविले. वैयक्तिक पातळीवर, त्यांनी शून्यापासून प्रारंभ करून, आनंद्कुंज सारख्या अव्यक्तिगत प्रकल्पाची निर्मिती केली.  ते आध्यात्मिक पातळीवर प्रामाणिक साधक होते. त्यानी प्रत्येक धर्माचा अभ्यास केला, त्यांच्या तत्त्वांचा आदर केला, अनेक आध्यात्मिक पंथांमध्ये, संस्थांमध्ये जाऊन विविध पद्धतींचे पालन केले. शेवटी ते, तेजगुरु सरश्रींच्या ‘हैप्पी थॉटस जीवन  प्रणालीवर’ स्थिर राहिले. आपल्या जीवनासह, आपला मृत्यू सुद्धा त्यांनी यशस्वी केला.

जन्म

डॉ. शशी पाटील यांचा जन्म २ जून 1945 रोजी जयसिंगपूर येथील जैन कुळात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जनगोंडा पाटील होते आणि पेशाने ते शेतकरी व व्यापारी होते. त्यांच्या आईचे नाव ताराबाई होते. दोघेही पालक अतिशय आध्यात्मिक आणि धार्मिक स्वभावाचे होते. त्यांना 4 भाऊ आणि 4 बहिणी होत्या. सर्व भावंडांशी त्याचे अत्यंत प्रेमळ नाते होते.

बालपण

डॉ. शशी पाटील यांचा जन्म ‘मूळ नक्षत्रावर’ झाला, म्हणून त्या काळातील लोकांच्या समजुतीमुळे, त्यांच्या जीवनात लहानपणापासूनच प्रतिकूलता होती, जी नंतर त्यांच्या विकासाचे कारण बनली. लहान असताना त्यांच्या डाव्या पायाला पोलिओ झाला होता. त्यांचे बालपण कुंभोज व उदगाव येथे गेले. त्यांची त्यांच्या आजोबांशी खूपच जवळीक होती. लहानपणापासूनच ते स्वच्छताप्रिय आणि स्वावलंबी होते.

बालपणतील एक किस्सा

एकदा घरात सर्व भाऊ व बहिणी खेळत असताना, घरातील एक महत्वाची गोष्ट तुटली. हा आवाज ऐकून वडील घरात येताच सर्व मुले पळून गेली, पण यांच्या पायाला पोलिओ असल्याने ते तेथून पळून जाऊ शकले नाहीत. पण वडिलांना रागाच्या भरात येताना पाहून त्यांनी आपले हात जोडले आणि ते एका ध्यान मुद्रेमध्ये बसले. हे दृश्य पाहून त्यांचे वडील त्यावेळी रागाऊ शकले नाहीत.

अभ्यास आणि शिक्षण

लहानपणी त्यांनी बाहुबली ब्रम्हचर्य आश्रमात शिक्षण घेतले. तेथे त्यांनी जैन शास्त्र आणि परंपरा शिकल्या. लहानपणापासूनच ते खूप उत्साही आणि पहाटे लवकर उठणारे बालक होते. लहानपणापासूनच (वयाच्या 70 व्या वर्षापर्यंत) ते स्वत: चे कपडे, स्वत:च धुवायचे, स्वत:च इस्त्री करायचे. ते नेहमीच आपल्या शरीराची, मनाची आणि आरोग्याची काळजी घेत असत. लहानपणापासूनच ते खूप कष्टाळू होते. मूळ नक्षत्र आणि पोलिओमुळे त्यांच्या बालपणाच्या जीवनात  त्यांना खुप प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. म्हणून ते आपल्या मित्रांना म्हणायचे, “मला माझ्या आयुष्यात असे स्थान मिळेल का्य, जेथून मला कोणीही उठवणार नाही, जी जागा माझी स्वतःची असेल!”

त्यांना लहानपणापासूनच लिखाणात रस होता. त्यांच्या आजोबांनी त्यांना पुस्तके वाचताना शिकवाविल्याप्रमाणेच, आपली भाषा, शब्द उच्चार, योग्य आणि सुस्पष्ट असावेत, याकडे त्यांचे विशेष लक्ष असायचे.

बालपणात त्यांनी काही काळ आपल्या आजोळी, उदगाव आणि जयसिंगपूर येथे घालवला. त्यांनी त्यांचे मॅट्रिकचे शिक्षण जयसिंगपूर हायस्कुल येथून पूर्ण केले. जेंव्हा ते आठवी-नववीच्या वर्गामध्ये असतानाची एक घटना आहे, जेंव्हा जेंव्हा सर्व मुले धावण्याची शर्यत लावत होते, तेंव्हा ते नेहमीच मागे राहत असत. मग सर्व मुलं त्यांना ‘पांगळया’ म्हणून चिडवत असत. त्यावेळी ते आपल्या मित्रांना म्हणत असत, “मी शरीराने नक्कीच अपंग आहे, परंतु माझे मन, माझा आत्मा अपंग नाही.”

वैद्यकीय प्रशिक्षण

त्यांचे मोठे भाऊ डॉ. एन. जे. पाटील हे सुप्रसिद्ध ई. एन. टी. सर्जन होते. जेंव्हा त्यांचे हे मोठे भाऊ पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेत होते, तेंव्हा यांचा अपंग पाय दुरुस्त करण्यासाठी, त्यांनी यांना पुण्यामधे बोलावून घेतले आणि पायाची शस्त्रक्रिया करवून घेतली. त्यामुळे त्यांनी तिथेच, त्यांच्या वसतिगृहाच्या खोलीत आश्रय घेतला. त्याच्याबरोबर ते त्यांच्यासोबत राहून वैद्यकीय ज्ञान घेत गेले. पुढे त्यांनी आपल्या भावाला शस्त्रक्रियेमध्ये साहाय्यक म्हणून मदत करता-करता विविध प्रकारचे वैद्यकीय कौशल्यही प्राप्त केले. पुण्याचे प्रख्यात डॉक्टर, डॉ. अनिल गांधी यांच्याकडूनही त्यांनी प्रशिक्षण व ज्ञान घेतले. पेनलेस इंजेक्शन टोचणे, आय. व्ही. लावणे, मोठ-मोठ्या शास्त्रक्रियांमध्ये टाके घालणे, आणि जुन्या जखमांना त्वरित बरे करणे अशा वैद्यकीय कामांमध्ये त्यांनी प्रभुत्व मिळवले. त्यानंतर काही वर्षे त्यांनी मोठ्या भावाला, कोल्हापुरातील त्यांच्या नवीन रुग्णालयात सहाय्यक म्हणून मदत केली.

लग्न

त्यानंतर वडिलांच्या सांगण्यावरून त्यांनी कुंभोज या आपल्या पूर्वजांच्या गावात एक छोटा दवाखाना उघडला, त्याठिकाणी काही काळ त्यांनी यशस्वीपणे प्रैक्टिस केली. त्याच दरम्यान त्यांचे दि. 6 डिसेंबर 1968 रोजी सरोजिनी बा. पाटील यांच्याशी त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर लगेचच ते कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेस ग्रामीण भागात राहायला गेले. याठिकाणच्या आरे, सडोली या गावात वैद्यकीय प्रैक्टिस केली. गोर-गरीब लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांनी, त्यांना वैद्यकीय सेवा दिली. त्याच्या पाय पोलिओग्रस्त असूनही, पहिल्यापासुनच ते लेडीज सायकल चालवत होते, त्यानंतर त्त्यांनी लाम्रेट्टा-लक्ष्मी ते यजदी-जावा बुलेट सारखी वाहनेही चालविली. त्या वेळी, दिवसरात्र ते, बूट घालूनच झोपायचे, कारण कोणत्याही वेळी कोणीही रुग्ण त्यांना उठवण्यासाठी येत असत. त्यावेळी ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सुविधा नगण्य होती. 

छायाचित्रण

लग्नाच्या दोन वर्षानंतर 2 मार्च 1971 रोजी त्यांना पहिला मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी ‘नि३’ ठेवले. त्याचबरोबर संसार चालवण्यासाठी त्यांनी वैद्यकीय सेवेबरोबरच, फोटोग्राफीचा व्यवसायही सुरु केला. त्याची सुरुवात ‘नि३ फोटो स्टुडिओ’ ने केली. गावोगावी जाऊन हजारो लोकांवर उपचार केले आणि त्यांच्या आनंदाच्या क्षणी त्यांनी लग्नात-कार्यक्रमात फोटोग्राफी करूं त्या आनंदी क्षणांचे फोटो काढले. फोटोग्राफीमध्येही ते खूप कुशल होते. ते डबल रोल-ट्रिपल रोल फोटोग्राफी करत असत. आजही त्या गावातील लोक, त्यांनी काढलेले फोटोग्राफ्स दाखवण्यासाठी ते येतात. त्यानंतर ९ जानेवारी १९७३ रोजी त्यांना दुसरा मुलगा झाला. त्याचे नाव त्याने ‘६रंग’ ठेवले. ते प्रत्येक गोष्टीकडे नव्या दृष्टीने पाहत असत आणि त्यांचा दृष्टिकोण हा नेहमीच क्रिएटिव असायचा.

रामबाण-शिवाम्बु

ग्रामीण भागात अ‍ॅलोपॅथीची प्रैक्टिस करत असताना त्यांना नेहमी असे वाटायचे की, आपल्याकडे असा काही उपचार (औषध) असायला पाहिजे, जो प्रत्येक रोगावर रामबाण सारखे प्रभावी कम करेल. त्यांच्या या आंतरिक प्रार्थनेचे फळ त्यांना लवकरच मिळाले. ते सडोली या गावात भाड्याच्या घरात राहत होते. त्या घराच्या मालकांना मुले नव्हती. त्या दोघां नवरा-बयकोंनी बरेच उपचारं केले होती, पण काहीच उपयोग होत नव्हता. या जन्मामध्ये त्यांना मूल होण्याची शक्यता नसल्याचे तज्ञ डॉक्टरांनी सांगितले होते. काही दिवसांनंतर त्यांनी पाहिले की घराची मालकिन गर्भवती आहे. म्हणून त्यांनी त्या जोडप्यास विचारले, मग त्यांनी सांगितले की, त्यांना एका महाराजांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी शिवाम्बुचा वापर केल्यामुले, त्यांना हे यश मिळाले आहे. ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी तातडीने महाराजांचा पत्ता घेतला आणि थेट कनेरीमठ गाठले. त्या महाराजांचे नाव होते, ‘अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज.’ ते खूप प्रेमळ आणि दयाळू होते. त्यांना त्यांची उत्सुकता समजली आणि त्यांनी शिवाम्बुच्या उपचार पद्धतीबद्दल संपूर्ण माहिती त्यांना दिली. मग डॉ शशी पाटील यांचे त्यांच्याशी असलेले आपुलकीचे नाते आणखी दृढ़ होत गेले. ते त्यांना पुन्हा पुन्हा भेटायला जायचे. त्यावेळी महाराजांनी त्यांना पुराण ग्रंथातील पुस्तकांचे संदर्भ दाखविले. त्यांना त्यांच्या अनुभवांचे ज्ञान दिले. मग गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी स्वत: शिवंबुपान सुरू केले आणि त्यामुळे, त्यांच्या आरोग्यामध्ये, उत्साहात आणि उर्जेमध्ये खूप चांगला परिणाम दिसला. त्यांनी असे ठरवले की, अशा सोप्या आणि स्वस्त औषधाची माहिती मी सर्वांना द्यायलाच हवी. महाराजांनी ही सांगितले की, “या त्याज्य पण दिव्य अशा औषधीचा प्रचार-प्रसार करण्यासाठीच तुझा जन्म झाला आहे.”

मग तेथून प्रत्येक, गरीब आणि गरजू रुग्णांला, रोगमुक्त करण्यासाठी या शिवाम्बु उपचाराचा वापर सुरू केला. अनेक कुष्ठरोग्यांच्या जखमा त्यांनी  शिवाम्बु उपचाराने ठीक केल्या. अर्धांगवायू, संधिवात, किडनीस्टोन वंध्यत्व, अल्सर, कर्करोग, त्वचेचे रोग, अशक्तपणा, कुष्ठरोग यासारख्या असाध्य आजारांनी ग्रस्त अशा लोकांना या दैवी औषधाच्या अमूल्य उपचाराने त्यांनी ठीक केले आणि त्यामुळच त्यांचा आत्मविश्वास आणखीन दृढ़ झाला.

 शिवाम्बु भवन का निर्माण

तोपर्यंत मुले हळूहळू मोठी होत गेली. मुलांचे अभ्यासाचे ठिकाण चांगले हवे, म्हणून त्यांनी कोल्हापूर शहराच्या पश्चिमेस, रंकाळा तलावाशेजारी, राधानागरी मेन रोडवरील सानेगुरुजी हाउसिंग सोसायटीमध्ये एक भूखंड विकत घेतला आणि त्याठिकाणी त्यांचे घर (बंगला) बांधले. त्या घरात त्यांनी ध्यान करण्यासाठी तळघरामध्ये एक खोली (मेडिटेशन हॉल) बनविली. त्यांनी एक सुंदर घर त्याठिकाणी बनविले आणि घराचे नाव, ‘नि३ - ६रंग’ असे ठेवले.

असाध्य रोगांवर शिवाम्बु उपचार इतका प्रभावी होता की शिवाम्बुच्या उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली. घराची ड्राइंग रूम कंसल्टिंग रूम बनली. मग त्यांनी घराच्या वरच्या मजल्यावर, एक मोठा हॉल आणि काही खोल्या बांधून रुग्णांना घरातच ठेऊन त्यांच्यावर शिवाम्बु उपचार सुरू केले. दरम्यानच्या काळात त्यांनी ‘योग आणि निसर्गोपचाराचा’ आभ्यास केला.

त्यांनी शिवाम्बु सोबतच योगासने, प्राणायाम, कटिस्नान, एनिमा, उपवास, सूर्यस्नान, मृतिकस्नान, बाष्पस्नान इत्यादी उपचारांची जोड़ देऊन विविध आजारांवर प्रभावी उपचार पद्धती शोधून काढली. आपत्कालीन परिस्थितीत अ‍ॅलोपॅथी वापरणे सुरू ठेवले. अशा प्रकारे, त्यांचे घर यापुढे, घर राहिले नव्हते, तर ते ‘बहुजन हिताय-शिवाम्बु भवन’ झाले होते.

पत्नी सरोजिनीचा ही त्यांना चांगला आधार मिळाला. त्यांनी महिला उपचार विभाग सांभाळण्यास सुरवात केली. रुग्णांचे पौष्टिक आहारही घरीच देण्यात येत होता.

शिवाम्बु संशोधन मंडळ

शिवाम्बु उपचारांच्या उपयोगितेची प्रसिद्धी हळूहळू संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात पसरु लागली. संपूर्ण महाराष्ट्रातून विविध रोगांनी त्रस्त, अनेक रुग्ण येऊ लागले. म्हणून त्यांनी अनेक विचारवंतांच्या सल्ल्यानुसार ‘शिवाम्बु संशोधन मंडळ’ स्थापन केले. जागो-जागी जाऊन या अदभुत अशा उपचार पद्धतीचा प्रचार-प्रसार त्यांनी केला.

पंतप्रधानांची भेट

भारताचे माजी पंतप्रधान, मा. श्री. मोरारजी देसाईजी, एक निर्भय शिवाम्बु साधक होते. १ डिसेंबर, १९८१ रोजी, डॉ. शशी पाटील यांचे कार्य पाहण्यासाठी त्यांनी शिवाम्बु भवनला भेट दिली. जेंव्हा हे माजी पंतप्रधान कोल्हापूर दौर्‍यावर होते तेंव्हा शिवाम्बु भवनला भेट हे त्यांच्या अजेंड्यात अग्रस्थानी होते. शिवाम्बु भवनाच्या भेटीदरम्यान त्यांनी संपूर्ण भवन पाहिले, येथील रूग्णांशी चर्चा केली व डॉ. शशी पाटील जी यांना विचारले, “शशीभाई आपले कार्य तर खुपच उत्कृष्ट आहे. तुम्ही इतक्या समर्पित भावनेने गरिबांची सेवा करीत आहात - हे नक्कीच कौतुकास्पद आहे. शिवाम्बु उपचाराच्या उपयुक्ततेबद्दल, माझा स्वत:चा ही खूप विश्वास आहे, पण शशी भाई, तुम्ही आपल्यासारख्या किती लोकांना हे कार्य पुढे नेण्यासाठी तयार केले आहे?”

हे लक्षात घेऊन डॉ. शशि पाटील यांनी त्यांच्याकडे येणार्‍या प्रत्येक रूग्णाला इतर रुग्णांच्या सेवेसाठी प्रवृत्त केले. ‘रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा!’ हे त्यांच्या जीवनाचे ब्रिद वाक्य होते. या भेटी नंतरही, डॉ. शशी पाटील जी यांचे मोरारजी देसाई यांच्याशी जवळचे संबंध राहिले. ते नेहमीच मुंबईला जाऊन मोरारजीभाईंना एक्युप्रेशर आणि मसाज करायाचे, त्यांच्याशी सल्ला-मसलत करायचे. परंतु या जवळच्या संबंधांचा त्यांनी कधीही आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी उपयोग करून घेतला नाही.

आध्यात्मिक तहान

डॉ. शशी पाटील यांना लहानपणापासूनच अध्यात्मात रस होता. त्यांच्याकडे येणारे बहुतांश रुग्ण हे अंतिम स्थितीमध्ये आलेले असायचे, त्यांच्यापैकी बरेच जण त्यांच्यासमोरच उपचार करताना मरण पावायचे.  त्यामुळेच जीवन-मृत्यू आणि अध्यात्माशी संबंधित, असे बरेच प्रश्न त्यांच्या मनात येत असत. यामुळे काही काळ ते, प्रजापिता ब्रह्माकुमारी या माउंटआबु येथील संघटने मध्ये सामील झाले. तेथे त्यांना प्रार्थनेचे महत्त्व समजले. त्यानंतर, काही वर्ष ते ओशोंच्या ध्यान प्रणालीमध्ये सामील झाले. त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांनी काही काळ येथील शिवंबू भवन येथे ‘प्रेम-प्रदीप रजनीश ध्यान केंद्र’ सुरू केले. त्यांच्या कॅसेट आणि पुस्तकांची विनामूल्य लायब्ररी चालवली. त्याच वेळी, त्यांनी शिवाम्बु भवन पासून जवळच असलेल्या, पुईखडी नावाच्या छोट्या डोंगरावर, अडीच एकर जमीन घेऊन, पूर्णपणे नैसर्गिक पद्धतिचे, शंभर बेडचे ‘आंतरराष्ट्रीय शिवाम्बु उपचार केंद्र’ उभारण्याची योजना आखली. परंतु नंतर कोल्हापूर शहराच्या जलसाठवण प्रकल्पासाठी शासनाने ती जमीन अधिकृत केली. त्यामुले त्यांचे ते स्वप्न अपूर्ण राहिले.

सुरुवातीला त्यांनी त्याठिकाणी ‘इग्लुच्या आकाराचे’ ध्यान मंदिर बांधले होते, जिथे ते दिवसा तासन्तास ध्यानस्थ बसायचे. मग जेंव्हा ओशो अमेरिकेत गेले तेंव्हा त्यांचा, त्यांच्याशी संपर्क कमी होत गेला.

त्यानंतर ते विपश्यना ध्यानपद्धतीमध्ये सामील झाले. त्यांनी इगतपुरीला जाऊन अनेक शिबिरे केली. कोल्हापूर जवळील, मजले गावात ‘दख्खन विपश्यना केंद्र’ उभारण्यासाठीही त्यांनी मोठे योगदान दिले. कोल्हापूरच्या कलंबा कारागृहातील कैद्यांसाठी विशेष विपश्यना शिबीर आयोजनामध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर ते अनेक अध्यात्मिक केंद्रांमध्ये जात राहिले. त्यांनी सिद्ध समाधी योग (एस. एस. वाय.) चे सुध्दा अनेक कोर्सेस स्वत: ही केले आणि त्यांच्या आयोजनतही सहभाग घेतला.

ते वैचारिक दृष्टीने खुप प्रगल्भ होते. म्हणून, निसर्गाच्या जवळ असलेली विचारसरणी त्यांना तत्काळ आकर्षित करत होती. त्यानी सर्व धर्म आणि पंथांचा अभ्यास केला होता. लहानपणापासूनच त्यांनी सर्व जैन परंपरा पाहिल्या होत्या आणि त्यांचे अनुसरण केले होते. प्रभु येशुंनी तयार केलेल्या प्रार्थनेची पद्धत शिकण्यासाठी ते ख्रिश्चन धर्मस्थळांनाही भेट देत असत.

रूमानिया व्हीजीट

दुसरीकडे, त्यांचे रुणसेवेचे कार्य सतत पसरत होते. शिवाम्बु थेरपीद्वारे बरे झालेल्या रूग्णांच्या यशोगाथांची माहितीचा प्रसार सात समुद्र पार झाला. त्यांना नोव्हेंबर १९९० मध्ये रुमानियन सरकारने विशेष व्यवस्था करून तातडीने बुखारेस्ट येथे बोलावले. रोमानियन राष्ट्रगीताच्या लेखिका, श्रीमती मारिया पालिगोरा यांच्या उपचारांसाठी त्यांना आमंत्रित केले गेले होते. मारिया यांना कर्करोगाचा आजार होता. त्यांनी रुमानियामध्ये राहून त्यांच्यावर 40 दिवस यशस्वी उपचार केले.

शिवाम्बु समाचार

ते नेहमीच शिवाम्बुच्या प्रसार-प्रचारसाठी अनेक वर्तमानपत्रांत लेख आणि बरे झालेल्या रुग्णांच्या यशोगाथा प्रसिद्धीसाठी पठावित असत. पण शिवाम्बुचा अखंड प्रचार-प्रसार सुरूच रहावा म्हणून त्यांनी ‘शिवाम्बु समाचार’ नावाचे मासिक प्रकाशित करण्यास सुरूवात केली. सुरुवातीला त्या मासिकाचे सर्व लेखन, दुरुस्ती, मुद्रण, पोस्टिंग इत्यादी सर्व कामे ते स्वत: उत्साहाने करीत असत.

ते खूप चांगले लेखक आणि कवी होते. मुळातच ते एक रसिक व्यक्ति होते. विविध विषयांची व्यावहारिक उदाहरणे देऊन कोणत्याही विषयाचे स्पष्टीकरण देण्याची त्यांची पद्धत वाचकांच्या नेहमीच पसंतीस पडली. त्यांनी शिवाम्बु  आणि आरोग्य या विषयांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या अनेक आरोग्यविषयक कविता खूपच प्रेरणादाई आहेत. ते शब्दांची निवड फारच खास पद्धतीने करायचे. त्यांची अशी ही विशेष लेखनशैली आरोग्य वाचकांना नेहमीच आकर्षित करती राहिली आहे.

आंतरराष्ट्रीय शिवाम्बु परिषद

डॉ. शशी पाटील यांना त्यांच्या अथक सेवाकार्यासाठी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांकडून, विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे प्रत्येक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधकांशी, डॉक्टर्स तसेच शिवाम्बु प्रचारकांशी चांगले संबंध होते. बरेच लोक त्यांच्या या अदभुत उपचार प्रणालिंच्या बारकाव्यांचे शिक्षण घेण्यासाठी शिवाम्बु भवन येथे येत असत. गोवा, मुंबई, नाशिक, वडोदरा, कोल्हापूर, ग्रेसफिल्ड (जर्मनी) यासारख्या प्रमुख शहरांमध्ये डॉ. शशी पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिवाम्बु परिषदांचे आयोजन करण्यात आले होते.

शिवाम्बुप्रती असलेले त्यांचे समर्पण पाहून प्रत्येकजण त्यांना आदरयुक्त भावनेने ‘शिवाम्बु महर्षि’ या नावाने संबोधित करायचे.

 आनंदकुंज निर्माण

‘आनंद’ हीच सर्वांची मूलभूत इच्छा आहे. जीवन आनंद आहे आणि आनंद हे जीवनाचे ध्येय आहे. म्हणूनच डॉ. शशी पाटील यांनी आपल्या नवीन आंतरराष्ट्रीय स्वास्थ्य संकुलाचे नाव ‘आनंदकुंज’ ठेवले.

2006 मध्ये, बर्‍याच स्वस्थ्याप्रेमी मित्रांच्या मदतीने, आपल्या दोन्ही मुलांना आपल्या अव्यक्तिगत जीवन-लक्ष्याध्ये सहभागी बनवून; मोठ्या विश्वासाने आणि उत्साहाने ‘आनंदकुंज’ निर्माणाचे कार्य सुरू केले. तसेच 26 जानेवारी 2008 या राष्ट्रीय उत्सवाच्या दिवशीच ‘आनंदकुंज’ चा शुभारंभ केला. आज आनंदकुंजमध्ये एकाच वेळेला ऐंशी ते शंभर रुग्णांना ठेवून उत्तम उपचार सेवा देण्यासाठी एक व्यवस्था तयार केली गेली आहे.

रोगापासून आरोग्यापर्यंत, मानसिक विकारांपासून मन-शांतीपर्यंत, मानसिक शांततेपासून आध्यात्मिक प्रगतीपर्यंत; माणूस आणि सर्व समाजाचा संपूर्ण विकास घडविणाऱ्या सर्व मार्गांचा, धर्मग्रंथांचा आदर आणि अभ्यास,  आनंदकुंजमध्ये होत रहो, हेच त्यांचे विश्वासू बीज होते.

कोल्हापूर शहराच्या पश्चिमेला शाहूवाडी तहसीलमधील करंजफेन या गावात ‘आनंदकुंज’ हे एका निसर्गरम्य टेकडीवर वसलेले आहे. आनंदकुंजचा 30 एकर परिसर कासारी नावाच्या नदीला लागून आहे. हे स्थान शुद्ध पाणी, सुंदर स्वच्छ सूर्यप्रकाश, प्रदूषण मुक्त हवा, नैसर्गिक वनस्पती आणि पक्ष्यांनी सुशोभित आहे.

आनंदकुंज प्रार्थना

त्यांनी आनंदकुंजसाठी एक प्रार्थना निवडली होती. दररोज सर्व साधक आणि सेवक ही प्रार्थना गाऊनच आनंदकुंजमध्ये दिवसाची सुरुवात करतात.

आनंदकुंज स्वास्थ्य विचार

क्रांति अभियान

इसको करने दे

युग निर्माण

हर मनुज देवता बने

बने यह पहाड, स्वर्ग समान

यही संकल्प हमारा ॥धृ.॥

द्वेष, दंभ, छल मिटे यहाँ पर

ना कोई भ्रष्टाचारी हो,

सभी सुखी हो, सबका हित हो,

जन जन पर उपकारी हो

मिल जुल कर सब रहे प्रेम से

प्रेम से दे, सबको सम्मान ॥1॥

भेद भाव हो दूर यहाँ

ना कोई मजदूर, ना कोई मालिक,

ना कोई वैद्य, ना कोई मरीज,

परमपिता के पुत्र सभी हम

नाता है, भाई भाई का

सब ही है एक समान

सभी जन ईश्‍वर के संतान॥2॥

सदाचार अपनाए सब जन

बनें प्रभु का साजदार

अनाचार से नाता तोडें

नैतिक बने, उदार बनें

सादा बने जीवन सभी का

फैले फिर सज्ञान ॥3॥

आनंदकुंज शांति पाठ

प्रभुजी, शांति कीजिए... शांति कीजिए... शांति कीजिए...

प्रभुजी, त्रिभुवन में शांति कीजिए ॥धृ.॥

जल में, स्थल में और गगन में

अंतरिक्ष में, अग्नि और पवन में

औषधी, वनस्पति और उपवन में

सकल-विकल, जड - चेतन में

शांति कीजिए... शांति कीजिए... शांति कीजिए...

प्रभुजी, त्रिभुवन में शांति कीजिए ॥1॥

शांति विश्‍व निर्माण सर्जन में

नगर ग्राम और भवन में

आनंदकुंज, शिवाम्बू माहौल में

जीव मात्र के तन मन में

और जगत के हर कण कण में

शांति कीजिए... शांति कीजिए

प्रभुजी, त्रिभुवन में शांति कीजिए ॥धृ॥


स्वास्थ्य दिंडी

डॉ. शशी पाटीलजींचे असे म्हणने होते की, ‘निसर्गाची शक्ती आणि त्याचे नियम’ हे सर्वोपरि आहेत. निसर्गात काहीही अशक्य नाही. निसर्गातील प्रत्येक गोष्ट प्रत्येकासाठी समान संधीसह फ्री मध्ये उपलब्ध आहे. म्हणूनच, प्रत्येक रोगाचा उपचार करणे शक्य आहे. आपल्या ‘आरोग्याचे बजेट’ झिरो व्हायला हवे, असे ते नेहमी म्हणत.

नैसर्गिक वातावरणामध्ये चालणे, सायकल चालविणे, या गोष्टींची त्यांना खूप आवड होती. त्यांनी स्वत:साठी, आपल्या कार (गाडी) मध्ये ठेवता येईल अशी फोल्डिंगची सायकलही बनवली होती. त्यांना जंगलात, शेतात तंबू (टेन्ट) लावून निसर्गात रहायची आवड होती. सायकलवरून गावो-गावी जाऊन, ‘शिवाम्बु योग द्वारे झिरो बजेट आरोग्य’ ची स्वास्थ्य दिंडी काढण्याची त्यांची इच्छा होती. अशा प्रकारच्या अनेक बैठका, उपक्रम त्यांनी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात आयोजित केल्या आहेत.

मंकी डायट

मानवाचे बाह्य शरीर अन्नापासून बनलेले आहे, म्हणूनच, ‘स्वस्थ्याचा आधार-नैसर्गिक आहार’ आहे, असे ते म्हणने होते. त्यांच्या मते, निसर्गात राहणारे सर्व प्राणी, पशु, पक्षी हे निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या अन्न, जसे आहे तसेच खातात, परन्तु मनुष्यच असा एक प्राणी आहे जो अन्न, भाजून, शिजवून, चिरुण, तळउन अशा पद्धतीने प्रक्रिया करून खातो. म्हणूनच, या पृथ्वीवर सर्वात आजारी, भयग्रस्त आणि चिंताग्रस्त प्राणी म्हणजे मनवच आहे.

ते नैसर्गिक आणि सात्विक आहाराचे समर्थन करायचे. ते नैसर्गिक आहाराच्या या प्रणालीचा उल्लेख, ‘मंकी डाएट’ म्हणून करायचे. ते म्हणायचे, “तुम्हाला तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल, तुम्हाला तुमचे शरीर, मन्कीसारखे मजबूत आणि लवचिक बनवायचे असेल, जर तुम्हाला तुमचे मन हनुमानाप्रमाणे शुद्ध आणि समर्पित बनवायचे असेल तर, ‘मंकी डाएट’ घ्या आणि हनुमानाच्या गुणांची पूजा करा. हनुमानाप्रमाणेच शाकाहाराचा स्वीकार करा.

पोहणे

डॉ. शशी पाटील हे पोहन्यामध्ये तरबेज होते. लहानपणा पासूनच त्यांना पोलिओ असल्याने ते पोहायला शिकू शकले नव्हते. पण वयाच्या 40 व्या वर्षानंतर ते स्वत:च पोहायला शिकले. ते तासनतास पोहत असत. ते एक निर्भय मनुष्य होते आणि जर रात्री, कधीही इच्छा झाली की ते पोहायला जात होते. त्यांच्याबरोबर पोहणारे लोक म्हणतात, “ते पाण्यामध्ये, हात-पाय न मारता तासनतास पडून रहायचे.”

दु:ख वेशीला टांगावे

ही एक मराठी म्हण आहे. ते म्हणायचे, “जेंव्हा जेंव्हा आपल्याला एखादा आजार होतो तेंव्हा त्याला लपवू नका, जेणेकरून निसर्ग आपल्याला त्यावरील उपचारांचा कोणता तरी मार्ग पाठवेल”. ते मनाने खूपच निरागस होते. ते त्यांचे अज्ञान कधीही लपवत नसत. ते त्यांचे अज्ञान सहज स्वीकारू शकत होते. कोणाकडूनही सहजपणे नवीन माहिती घेण्यास ते अजिबात संकोच करत नसत. ते नेहमी म्हणायचे, “आपण आपले अज्ञान इतरांना सांगू, तरच सत्याचे खरे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचू शकेल.”

गुरुजींचा योगा

ते आनंदकुंज आणि शिवाम्बु भवन येथे सकाळचा योग वर्ग घेत असत, मग सर्व साधक त्यांना ‘गुरुजी’ म्हणायचे. दररोज, पहाटे तीन वाजता स्पिकरवर आपले निवडक ऑडिओ स्तोत्र लावून, ते सर्वांना उठवायचे. ते खुप आत्मियतेने सर्वांची हजेरी घेत असत. ते प्रत्येकाला श्वासोच्छवासाच्या तालावर मॉर्निंग वॉक करायला लावायचे.  श्वासोच्छवासाच्या तालावर लूझनिंग एक्ससाईज करणे, हा त्यांचा विशेष शोध होता. दररोज सकाळी 4 ते 8 या वेळेत प्रत्येकावर बारीक नजर ठेवून, त्यांच्या चुका ते सुधारत असत. ते प्रत्येक व्यायामाचा प्रकार वेगळी-वेगळी उदाहरणे देऊन समजावून सांगत असत. त्याचा  4 तासांचा योग वर्ग, म्हणजे ‘व्यायाम-कम-सत्संग-कम-व्याख्यान-कम-ध्यान’, असे एक सुंदर पॅकेज असायचे, जे कोणताही साधक कधीही चुकवत नसे. त्यांचे व्यक्तिमत्व हे भारदस्त आणि प्रभावी होते.

प्रयोगवीर

गुरुजी एक प्रयोगशील व्यक्ती होते. त्यांचे ‘टेकनीकल- सहज ज्ञान’ खूपच खोल आणि क्रिएटीव्ह होते. त्यांच्या प्रत्येक गोष्टी खास होत्या. त्यांचे कपडे, पेन, चप्पल, शिलाई मशीन, टॉर्च, थर्मॉस, पाण्याचा फोल्डिंग ग्लास, मोबाईल, शौचालय, ब्रश कॉट, बेड या सर्व वस्तूंमध्ये त्याच्या तांत्रिक ज्ञानाची छाप दिसूनयेत होता. ते एक स्किलफुल व्यक्ती होते. ते घरातील सर्व कामे करू शकत होते. आपले कपडे धुणे, इस्त्री करणे, स्वयंपाक करणे, कपडे शिवणे, घर स्वच्छ करणे. ते सर्व काम सहजतेने करीत असत. ते स्वतः प्लंबिग, दुरुस्ती, लहान-मोठे वायरिंग, टायपिंग, लहान गवंडी (मेसनरी) काम देखील करु शकत होते. ते प्रत्येक कौशल्य, फक्त पाहूनच शिकत असत. ते म्हणत, “प्रत्येक कामाची कला काळजीपूर्वक निरीक्षणाद्वारे शिकली जाऊ शकते.” ते बर्‍याचदा सौर कुकरमध्ये आपले अन्न शिजवत असत. बर्‍याच नैसर्गिक आणि सात्विक आहाराच्या रेसिपीज त्यांनी शोधल्या आहेत. त्यांची, प्रत्येक फळ खाण्याची पद्धत ही विशेष होती.

शेवटी काय झालं

डॉ. शशी पाटील यांचे आरोग्य हे नेहमीच चांगले होते. शेवटपर्यंत त्यांना कोणताही शारीरिक आजार किंवा वेदना नव्हत्या. २०१४ मध्ये एकदा, आनंदकुंजमध्ये फिरत असताना, पाय घसरून पडल्याने, त्यांच्या उजव्या पायाच्या ‘टीबीया हाडामध्ये’ फ्रॅक्चर झाले होते. म्हणून, त्यांच्या पायाला प्लास्टर केले होते.  प्लास्टरनंतर, त्याचे हाड त्वरित जोडले जाऊन बरे झाले, परंतु त्याच्या दोन्ही पायांची नैसर्गिक संरचना बिघडली. ज्यामुळे, त्यांचे पूर्वीप्रमाणेच विनाधार चालने अशक्य झाले. त्यामुळे, हळू हळू त्यांनी आपली सामाजिक क्रियाशीलता आणि संपर्क कमी केला. त्यामुळे, ते घरातच आपल्या आध्यात्मिक श्रवण आणि ध्यानामध्ये आनंदी असायचे.  एक वर्षानंतर, बाथरूममध्येच पुन्हा पडल्यामुळे, त्यांच्या पोलिओच्या डाव्या पायाच्या हिप जॉइंटमध्ये फ्रैक्चर झाले, ज्यामुळे त्याचे ऑपरेशन करावे लागले. त्या ऑपरेशननंतर त्याचे फ्रॅक्चर त्वरित दुरुस्त झाले परंतु इतरांवरील त्याचे परवलम्बत्व वाढतच गेले. स्नायू कमकुवत झाले होते, त्यामुळे, त्यांनी सर्व सामाजिक आणि कौटुंबिक नात्यांपासून स्वत: ला दूर केले होते.

मुळात, गुरुजी आध्यात्मिक साधक होते. ते काही वर्षांपासून तेजगुरू सरश्री जी यांच्या मार्गदर्शनाखाली हॅप्पी थॉट्सच्या जीवनशैलीचे अनुसरण करीत होते. ते जीवनातील प्रत्येक प्रसंग आणि टप्पा सहज स्वीकारून, एक समर्पित जीवन जगत होते. त्यांनी ‘क्षमा साधना’ वर खूप खोलवर कार्य केले होते. त्यांनी आयुष्यातील सर्व मित्र आणि नातेवाईकांची मनापासून क्षमा मागितली आणि सर्वांना क्षमा केली! दररोज सकाळी आणि संध्याकाळी क्षमा साधना करायचे.

त्यांचा, ‘मृत्यू आणि मृत्यू नंतरचे जीवन’ या विषयावर सखोल अभ्यास होता. ते नेहमी म्हणायचे, ‘अंतीम मती, सो सदगती’- म्हणजेच, ‘मृत्यूच्या वेळी आपण जागरूक राहून शुद्ध व प्रबुद्ध मनाची स्थिती राखण्यास सक्षम झालो तर आपल्याला तीच मुक्त स्थिती व सुव्यवस्था प्राप्त होते. म्हणून त्यांना ‘समाधी मरण’ हवे होते. त्यानी नेहमीच त्यांची ही शुभेच्छा आपल्या जवळच्या लोकांसमोर व्यक्त केली होती.

जैन धर्म आणि योग परंपरेनुसार त्यांनी स्वेच्छेने, ‘नियम सल्लेखना व्रत’ धारण केले. ज्यामध्ये साधक आपल्या सर्व मूळ सांसारिक इच्छा, आकांक्षांपासून अलिप्त होऊन, शरीराच्या पंच इंद्रियांच्या इच्छेपासूनही अलिप्त होण्यास सुरवात करतो आणि निरंतर आपल्या नीज स्वरूपाचे (मूलस्थान) ध्यान करतो. म्हणूनच, गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून त्यांनी आपला आहार कमी केला होता. ज्यामुळे त्यांचे शरीर कमकुवत व अशक्त झाले होते, परंतु त्याची स्मरणशक्ती व जागरूकता पूर्वीसारखेच सतर्क होते.

रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांनी आपल्या सर्व बहिणी, भाऊ, पत्नी आणि कुटुंबातील प्रत्येक लहान-मोठ्या सदस्यांना समोर बोलावून, त्यांचे आभार मानले आणि प्रत्यक्ष भावपूर्ण क्षमा साधना केली आणि रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व बंधनातुन मुक्त झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या डोळ्यांसमोर सुबक-भगवान महावीरांची मूर्ती ठेवण्यास सांगितले, जेणेकरून त्यांच्यातील दिव्य गुण धारण करता येतील. त्यानंतर, त्यांनी मंदिरात जाऊन, देव दर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली. (जरी ते आयुष्यभर कधीच कर्मकांडात गुंतले नव्हते) त्यानुसार ते मंदिरात जाऊन आले त्यानंतर तो खूप खूष होते. दररोज संध्याकाळी, आम्ही सर्व त्यांच्याबरोबर बसुन ध्यान, प्रार्थना आणि भजन करत होतो. आपल्या इच्छा मरणाच्या तीन दिवस आधीपासून, त्यांनी आपला संकल्प स्वेच्छेने अधिक मजबूत करताना, पाणी पीने थांबविले. चेहर्यावर सतत हास्य ठेवून पाणी पिण्यासही ते नकार देत होते. शरीरात कोणताही त्रास किंवा अस्वस्थता नव्हती. खरतर, आदल्या दिवशी संध्याकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत त्यांनी आमच्या सर्वांबरोबर ध्यान आणि प्रार्थना केली होती. रात्री 12 वाजेपर्यंत त्यांनी क्षमा ध्यान केले होते. दुसर्‍या दिवशी (20 ऑगस्ट 2017) सकाळी उठून आंघोळ केली, त्यानंतर बसून काही काळ ध्यान करुन प्रार्थना केली. ‘तुम्ही खूप उशीरपासून बसला आहात, तुम्हाला थकवा येईल’, असे सांगुन आम्ही त्यांना झोपवाले. त्यावेळी ते वारंवार घड्याळाकडे पहात होते. तो खूपच शांत होते. त्यांचे डोळे विस्फारलेले होते, परंतु आतून ते कोणत्यातरी दुसर्या जगाशी ट्यून होत होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास, कोणतीही त्रास न होता, सहजपणे, समतेने डोळे मिटवून, उच्छवासासह शरीराचा त्याग केला.

तथापि, मागील तिन दिवसांपासून स्वाध्यायच्या वेळी, घराच्या दोन्ही सुनांना, ‘आता फक्त तीन दिवसच आहे, असे बोटांनी सूचित करत ​​होते.’ अशा प्रकारे, त्यांनी केवळ आपला जन्म आणि जीवन तर पूर्णपणे यशस्वी केलेच, पण सोबतच नाही तर आपण यशासाठी मृत्यूला देखील पूर्णपणे यशस्वी केले. 

आम्हा सर्वांनाच त्यांच्याबरोबर राहणेची, त्यांची सेवा करणेची, मिलालेली ही एक उत्तम व भाग्यशाली संधी होती. आता त्यांचे स्थूलशरीर आपल्या मध्ये नाही, याचे आपण सर्वांनाच दुःखतर झालेच आहे, थोडेसे असहाय्य, अनाथ असल्याचे ही वाटते, पण आपण सर्वजण या गोष्टीने आनंदी आहोत की, त्यांनी मोठ्या समाधानाने व समतेने ही शेवटची घटना साधली.  आम्हाला विश्वास आहे की, ते त्यांच्या मनोमय शरीराने आम्हाला यापुढेही मार्गदर्शन करीत राहतील.

आमची प्रार्थना

आपण सर्वजण, त्यांच्यासाठी प्रार्थना करुया की, प्रिय गुरुजी, तुम्ही आमच्या जीवनात होता आणि आहात, यासाठी धन्यवाद! आपण एक खरे आणि प्रेमळ व्यक्ती होता, आपले बोलणे आणि वागणे यांच्यात काहीच फरक नव्हता. आपले जीवन आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायक ठरेल. थज्जतें धनजन ! आमची प्रार्थना आहे की, आपला पुढचा प्रवास सर्वोत्तम व्हावा, तेथे ही तुम्हाला सर्वोच्च मार्गदर्शन मिळावे, आपले अज्ञान आणि मान्यता दूर होवोत. आपण नेहमीच ग्रहणशील राहून, मोक्षाच्या अवस्थेत स्थपित व्हावे. आपण सर्वांना क्षमा करा, सर्वांकडून आपल्याला क्षमा मिलो. सर्वांना शांतता लाभो.

- श्रीमती सरोजिनी श्री. पाटील व सर्व पाटील व आनंदकुंज परिवार


Previous Post Next Post