अस्थमा म्हणजे दमा. अस्थमा हा यूनानी शब्द आहे. ज्याचा अर्थ आहे, श्‍वास घेण्यासाठी जोर लावणे. अस्थमा हा असा आजार आहे, जो मनुष्याच्या फुफ्फुसांच्या एखाद्या अ‍ॅलर्जिक पदार्थ अथवा हवामान प्रति आति संवेदनशील होण्याच्या कारणाने होतो. हा एक अ‍ॅलर्जिक आजार आहे. याने पीडित व्यक्तिच्या श्‍वासनलिकांच्या आतील भिंतींवर सूज येते. या संकुचनाच्या कारणाने श्‍वास घेण्याचा त्रास होतो. कारण फुफ्फुसांपर्यंत भरपूर ऑक्सिजन पोहचू शकत नाही.

ज्या लोकांना हा आजार असतो. त्यांत हिवाळ्याच्या दिवसामध्ये त्रास वाढतो. हिवाळ्यात धुके वाढते. अ‍ॅलर्जीचे तत्त्व ह्या ॠतुमध्ये धुक्याच्या कारणाने आसपास राहतात. घरातील धूळ, (भिंती-फरशीवरील धूळ, कांबळ, रजई, गाद्यांवरील परिवर्तन तसेच फ्लु चे संक्रमण याने दम्याच्या आवेगांची सुरूवात होऊ शकते. दाट धुक्यामध्ये फिरण्याने याचे आवेग येऊ शकतात. या तत्त्वांनी अस्थमाच्या रोग्यांना अधिक त्रास होतो. यामुळे खोकला, छाती कठीण होणे, रात्री आणि सकाळी श्‍वास घेण्यास त्रास होणे इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात. घाईने श्‍वास घेणे, श्‍वास घेण्यास त्रास होणे, खोकल्याच्या करणाने झोपेमध्ये अडथळा होणे, छातीमध्ये अडकल्यासारखे वाटणे, अथवा जड वाटणे, श्‍वास घेताना दम लागणे आणि पूर्ण शरीरात ताण जाणवणे यांसारखी लक्षणे अस्थमाची आहेत. रोगाच्या आधारावर दम्याच्या रोग्यांना औषधे अथवा इन्टेलरचा उपयोग करण्याचा सल्ला दिला जातो.

दम्याचे एक कारण अनुवंशिकता हे ही असू शकते. डॉक्टर तनवीर फरीदी यांच्या अनुसार, अशा मुलांमध्ये अस्थमाची तक्रार अधिक असते. ज्यांच्या कुटुंबामध्ये अगोदर पासून एखाद्याला ही समस्या असेल. याचे मनोवैज्ञानिक कारणही असते.

नेहमी घाबरणार्‍या मुलांमध्ये भीतीची एक प्रवृत्ती विकसित होते, जी पुढे जाऊन श्‍वासामध्ये अडचण येण्यात बदलते. अस्थमाचे औषध घेणार्‍या रोग्यांना सल्ला आहे की, ते नियमित रूपात घ्यावे, कोणतेही औषण चुकवू नये. कारण अशात एलर्जेंट अ‍ॅटॅक करू शकतात.

 


Previous Post Next Post