निसर्ग प्रार्थना
हे निसर्गदेवी,
हे माते,
आज नाते तुझे कळाले
दौलत माझी मला मिळाली॥धृ.॥
मी तुझ्याच बरोबर राहीन
मी तुझ्याच कुशीन बसीन
मी तुझ्याच नियमात जगीन ॥1॥
घालीन गं लोटांगण
वंदीन गं चरण
डोळ्यांनी गं पाहीन
रुप तुझे... 3 ॥2॥
प्रेमे ग आलिंगन
आनंदे ग पुजीन
भावे ग ओवाळीन
गुण तुझे... 3 ॥3॥
विश्वप्रार्थना
हे ईश्वरा,
सर्वांना चांगली बुद्धी दे,
आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात,
ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर,
रक्षण कर.
आणि तुझे गोड नाम
मुखात अखंड राहू दे ! - 3
- वामनराव पै -