माझी प्रार्थना
तन मंदिर, मन मंदिर
एक माझी प्रार्थना
नित्य सुंदर कसरतींची
जोडूया आराधना॥धृ.॥१८
पीडितांची पीडा जावो
हीच माझी कामना
वेदना जाणावयाला
जागवू संवेदना॥1॥
आनंद माझा अभंग राहो
हीच माझी भावना
स्वास्थ्याच्या रक्षणाला
शिवाम्बूचीच साधना ॥2॥
नियम लाभो, संयम लाभो
स्वास्थ्याच्या संशोधना
स्वावलंबी वेध लागो
मानवाच्या जीवना॥3॥
रक्त आम्ही फक्त मानू
बंधुतेच्या बंधना
नियम आम्ही सक्त मानू
हनुमानी ज्या धारणा॥4॥
व्यसन सारे मावळू द्या
स्वैर सार्या ज्या वासना
मानवाच्या आरोग्याची
पूर्ण होवो त्या कल्पना॥5॥