बजरंग तरंग
हनुमंता हनुमंता, शक्ती
तुमची कधी देता?-3॥धृ.॥
तुम्ही म्हणाल तर
जंगलात मीही राहीन
फळे, कंदमुळे खाईन
जंगलीच होऊन जाईन
चाहे कोई मुझे जंगली कहे॥1॥
तुम्ही म्हणाल तर
रामदास मी होईन
ना उदास कधी मी राहीन
ब्रह्मचर्यही पाळीन
कसरत तर विसरत नाही॥2॥
पिढी माझी
घसरत घसरत आली
महिमा तुझा
विसरत विसरत गेली
रोग पीडा ही
पसरत पसरत आली
प्रतिकारशक्ती
गदा तुमच्या हातातली
हाती माझ्या कधी देता?-3 ॥3॥
यासाठीच वंदीन मी माथा
गाईन मी गाथा
ही निश्चयाची
फुले सुमने वाहता
नाथा, अजूनी
स्तब्ध का बरे राहता?॥4॥