आंधळा खेळ हा

आंधळा खेळ हा

खेळसी कुठवरी

स्वास्थ्य तू शोधतोस

दव्यातूनच अजुनी ॥धृ.॥

थांबला का कर्करोग

काट-छाट करुनी

मेमो - केमो करीत

घालशील किती येरझारी॥1॥

टाटा तर राहिली

दूर ती मुंबई

काटा तर उभारिला

अंगांगात शिरशिरी॥2॥

भेटले का स्वास्थ्य

गोळ्या या खाउनी

दाटला रोग हा

कोठुनी अंतरी॥3॥

थांबला का मधुमेह

गोळ्या दवा टोचूनी

साखर-वाकर करीत

टांग ना त्या तलवारी॥4॥

वाढले वजन का?

जीभ मोकाट सोडूनी

कुपी बीपी करीत

हा हृदयरोग दरबारी॥5॥

शोध ती दिव्यता

आपुल्याच जीवनी

नोंदली तर दिव्यता

आपुल्याच अंतरी॥6॥

गंगा तर वाहिली

किडनी थेंबातुनी

प्या पाजा नारा हा

जाऊ दे ना दिगंतरी॥7॥

Previous Post Next Post