कुठे शोधीसी
कुठे शोधीसी औषध
अन् कुठे शोधीसी पैसा
हाय आभाग्या कळसा काखेत
दुनियाला रे का वळसा॥धृ.॥
देतो कचरा रोग उभारून
तू न पाहिले डोळे उघडून
सायंकाळी घामा धारा
तुला न दिसला त्यात इशारा
अवतीभंवती असून दिसेना
दुवा देणारा दवा कसा॥1॥
एक्स-रे रिपोर्ट का हवे उशाला
स्ट्रेचर, सलाईन हवेच कशाला
कधी ना हाती जे कष्ट ना घेती
नयनांतुनी तयांच्या धारा येती
काय खुळ्या अधीर होऊन
घर डोईवर घेतोस कसा॥2॥
तुझे तर आहे तुजपाशी
परी तू अगा जागा चुकलाशी
देव पाहतो देउनी सारे
हात पसरुनी तरी बी-का रे
अबू्र गब्रूची घेतेास कसा॥3॥