दूध त्याज्य का?

दूध आहे प्राणिजन्यच

का कोणी प्याला प्रौढ अन्यच

स्तन भरले ममतेने

बाळास पर्याय म्हणुनी

पान्हा अर्भकासाठी फुटला

बाळ युवा होताच जो आटला

पुरे दूध संकेत समजण्या

विवेक तुज कितीसा हवा?

ठरला माणूस बुद्धिमानी

का नसेल समजला गप्पगुमानी

रेड्याचे वा सांडाचे

दूध त्याच्या बायकोचे

बळ त्याच्याच बीजाचे

दूध त्याच्याच गुणाचे

वाफ्यात जे पेरता

तेच उगवते

देहात जे सोडता

तेच जाणवते

टोपडे बाळाचे

कुमारास यावे कैसे?

इंधन विमानाचे

समईस खपावे कैसे?

तरी प्यायचे का दूध तुम्हाला?

 प्या दूध दात दुधी जोवरी

प्या दूध वाढे उंची तोवरी

वाढ थांबताच दूध थांबवा

अन्यथा हृदय तुमचे थांबत असे...

      तरी प्यायचे का दूध तुम्हाला?

दूध वापरा तुपासारखे

तूप वापरा अत्तरासारखे

ताक वापरा पाण्यासारखे

तोंड दुधाने पोळता

ताक फुुंकुनी प्या म्हणता

सूर्य तेजाने डोळे दिपता

मधुचंद्र तो डोळ्यांनी पाहावा

Previous Post Next Post