आपण शेतातला ऊस उपसला की, थोडा शेंडा-बुडखा छाटून मधला स्वीकारतो, तसे स्वास्थ्यप्रेमींनी दोन्हींचा अतिरेक टाळून मधल्या मार्गाने निघायचे आहे.
साधारण पाच वाजता सकाळी बिछाना सोडावा.
उपलब्ध शिवाम्बू प्यावी.
दोन-तीन ग्लास पाणी पिऊन उष:पान करावे.
निकोप मलनि:सारण करायला संधी द्यावी.
प्रभातफेरी म्हणून पायांच्या हालचालींचा खुराक एक तासभर तरी पायांना द्यावा.
निर्मळ जागेत दहा-बारा सूर्यनमस्कार करून प्राणायाम करावा.
घर्षणस्नान म्हणून विनासाबण थंड, ताज्या पाण्याने स्नान करावं.
साबणाच्या ठिकाणी, अंघोळीच्या मध्येच, शिळ्या मूत्राला लिक्विड साबण समजून मसाज कम अंघोळ करावी.
सप्ताहातून दोन-चार वेळा सूर्यस्नान घ्यावे.
सप्ताहातून एक दिवस संपूर्ण शारीरिक यंत्रणेला विश्रामाखातर उपवास करावा. दरम्यान चोवीस तास उपलब्ध शिवाम्बू प्यावी.
एकंदर नेहमीच तहान, भूक, झोप व शौच यांचं भान ठेवावं. मलमूत्राचा अवरोध टाळावा. थकवा वाटल्यास, धाप लागल्यास दरम्यान शवासन करावं.
आहाराबाबत म्हणाल तर, हलकंफुलकं अन्न सहज पचणारं, सहज पळत राहणारं अन्न आपल्यालाही पळवत ठेवतं. ‘अति खाशी मसनात जाशी,’ ‘अन्न तारी व अन्न मारी’ या उक्तीकडे लक्ष ठेवून आहार स्वीकारावा.
भुकेशिवाय आहार स्वीकारायचा नाही. तंतुमय आहाराची विशेष योजना असावी. भाकरीपेक्षा भाज्या अधिक खाव्यात. चंद्र ढगाच्या आडोशाला जातो, तशी भाकर भाज्यांच्या आडोशाला जावी. भाकर कोंडा-मांड्याची असावी. उसळी मोडांच्या असाव्यात. जे खायचं ते चर्वण करूनच. जेवताना अधेमधे पाणी प्यायचेच नाही. पाण्याच्या ठिकाणी अदमुर्या गोड दह्याचे ताक हवे तर घेत राहावे. सदाचार, शिष्टाचार म्हणून पिण्या-पाजण्याला चहाला पर्याय सोया चहा द्यावा व घ्यावा. एकूण सहज पचणार्या अन्नपदार्थांची निवड असावी. तडस पोट भरू नये, याची काळजी घ्यावी. भुकेची आबाळ होऊ देऊ नये.
ज्या त्या वेळी नखं काढावीत. सफाई उत्तम ठेवावी. दात घासतानाही, हिरड्यांना मुद्दाम आतून बाहेरून, हाताच्या बोटानं कौशल्याने मालिश करावं. सप्ताहातून एक दिवस तरी, उपवासाच्या दिवशी सर्वही अंगाला मालिश करून, प्रेम शाबित करावं. मालिशही शिळ्या शिवाम्बूचे अर्थात उन्हात बाटल्या आडव्या ठेवून, चार दिवसांपासून तीन महिन्यांपर्यंत असे खास मूत्र ब्यूटी केअरचे काम करील.
ज्या दिवशी मूड नसेल, त्या काळात मुद्दाम ताज्या शिवाम्बूने एनिमा घ्यायचा आहे. जेव्हा जेव्हा शरीराची कुरबुर जाणवत असेल तर, देशी गाईचे गोमूत्र प्रत्येक तीस किलोला एक कप, याप्रमाणे आपल्या एकूण वजनाच्या हिशेबाने, अनशापोटी प्यावयाचे आहे.
ध्यानासाठी पाठ, मान, डोके बैठकीच्या नियमांत सरळ ठेवून बसायचे आहे व डोळे सताड बंद करून, नैसर्गिक श्वासाची, मनाच्या माध्यमातून चाहूल घ्यायची आहे. साक्षीभाव, समताभाव व स्थिरता यांत महत्त्वाची असेल. ट्रॅफिक पोलीस चौकामध्ये शांतपणे ट्रॅफिक निरखीत उभा असतो. त्याप्रमाणे श्वास निरखत राहायचं आहे. यामुळे संयम वाढेल, जिद्द वाढेल. मन तीक्ष्ण होईल. जिद्दच स्वास्थ्याच्या हद्दीत रोगाला प्रवेश देणार नाही.
आयुष्याच्या चढउतारामध्ये आरोग्याला धक्का पोहोचलाच तर, या एकूण प्रयोगाला शेवटी सामोरे जाण्यापेक्षा प्रथमच हा प्रयोग स्वीकारूया. प्रथम चरण या अंतिम शरण.
प्रत्येक व्यक्तीने, परिवाराने, समाजाने या वाटेने चालावयाचे झाल्यास, देशाचा उद्धार खचीतच नाही का होणार ?
क्रमश: