लवकर झोपणे व लवकर उठणे

आपला बॉस ऑफिसमध्ये पोहोचण्याआधी आपण पोहोचणे. बॉस आहे सूर्य. साधारण चार ते पाचपर्यंत बिछाना सोडावयाचा आहे.

शिवाम्बुपान

उपलब्ध, प्राप्त शिवाम्बू प्यावयाची आहे.

उष:पान

उष:पान म्हणून दोन ग्लास कोमट पाणी प्यावयाचेे आहे.

प्रातर्विधी

प्रातर्विधी अर्थात मलमूत्र निकोप विसर्जन करावयाचेे आहे.

मॉर्निंग वॉक

मॉर्निंग वॉकसाठी सुरक्षित जागेत अनवाणी एक तास पायांना चालवायचे आहे.

लूजनिंग एक्सरसाईज

त्यानंतर प्रत्येक अवयवाला, त्याचा त्याचा ठरलेला हालचालींचा खुराक देण्यासाठी लूजनिंग एक्सरसाईज करावयाचा आहे.

प्राणायामाचा पाठ

प्राणायामाचा पाठ - कपालभाती, अनुलोम-विलोम, भस्रिका, शीतली, भ्रामरी वगैरे वगैरे करावयाचा आहे.

व्यायाम कशासाठी?

वर्दळ, वहिवाट, शरीरावर. शरीर मालकाचे राहावे म्हणून.

मग वर्दळ कशासाठी?

जर कसेल त्याची जमीन, राहील त्याचे घर, घासेल त्याची भांडी, हे फक्त बाहेरच नाही, तर शरीरातसुद्धा.

सूर्यस्नान

उघड्या अंगाने झोपूनच, डोक्याला साईबाबांप्रमाणे, कमरेला रामदासी लंगोट बांधून चारी बाजूंना समान उन्हाची किरणे मिळतील असे सूर्यस्नान घ्यायचे आहे.

मॉलिश

चार दिवसांपासून तीन महिन्यांपर्यंत, उन्हात पक्व झालेले असे शिळे मूत्र अंगांगात, पार्ट बाय पार्ट जिरवावयाचे आहे. एक तिळाइतकी जागासुद्धा दुर्लक्षित होऊ  द्यायची नाही. 

स्नान

साबणाशिवाय, ताज्या, स्वच्छ, थंड  किंवा गरम पाण्याने घर्षणस्नान करावयाचे आहे.

आहार

भुकेनुसार अर्थात भूक लागेल तेव्हाच दोन घास खावयाचा आहे. भूक थांबताच जेवण थांबवायचे आहे. भुकेच्या ऐंशी टक्के आहार नैसर्गिक म्हणजेच मंकी डाएट व वीस टक्के पारंपरिक घ्यावयाचा आहे.

उपवास

सप्ताहातून एक दिवस उपवास केवळ शिवाम्बू व पाणी पिऊन करावयाचा आहे.

पथ्यं

वर्ज्य म्हणाल तर प्राणिजन्य सर्व, मैदा, साखर, तांदूळ, मीठ व दूध, तिखट, मसाले, तळके, भाजके, इ., दारू, तंबाखू, चहा, मटण, तडस आहार, इत्यादी बंद.

पथ्यं कशासाठी?

रोगाची जी म्हणून आवड असेल, ती रोखण्यासाठी. जसं आम्हाला पोट आहे, तसंच रोगालाही पोट आहे. जे रोगाला आवडतं, बहुधा तेच जिभेला आवडतं. रोगाला व जिभेला जे आवडतं, ते भुतालाही आवडताना दिसतं. दुश्मनाच्या मायबापाला, थारा मिळू नये म्हणून.

विशेष सूचना

निद्रा, भूक व शौच यांचा अवरोध होऊ  द्यायचा नाही. पाणी दर वीस मिनिटांनी मुख भरून (ठिबक योजना) पीत राहायचे आहे.

क्रमश:

डॉ. शशी पाटील यांनी अनेको वर्षे मोठ्या जोमाने स्वास्थ्य जनजागृतीचे कार्य केले आहे. त्यांनी अनेक शहरातून, गावोगावातून. खेडोपाड्यातून  'शिवांबू, योग व निसर्गोपचाराच्या ' प्रचारार्थ महाराष्ट्रातील गावोगावी फिरून स्वास्थ्य मोहीम राबवली. त्यांनी  या मोहिमेतून शकडो स्वास्थ्य सेवक व स्वास्थ्य प्रचारक निर्माण केले. प्रस्तुत लेख स्तंभातून, 'धडे धडाचे - गुद्दे मुद्द्याचे - आरोग्याचे ' या त्यांच्या मोहिमेतील व्याख्यानांचे संकलन, आम्ही क्रमश: प्रकाशित करीत आहोत.. 

Previous Post Next Post