‘शिवाम्बू’ : उपाय-उपचार

मुलांनो, ज्या गोष्टीबद्दल मी आता बोलेन, ज्यावर मी पन्नास वर्षे मेहनत घेतली. जिने मला प्रारंभी बदनामही केलं व अस्पृश्य ठरवलं व आज मी त्यानेच ख्यातनामही झालो, ती ही गोष्ट जीवनाच्या बाराखडीत गुंफणे मला अनिष्ट वाटत नाही, तर ती मला मेरूमणी वाटते. ती आहे ‘शिवाम्बू’.

आपले स्वत:चे ‘मूत्र’ मित्र कसे? ढाल कशी, खराटा कसा व अमृतही कसे?

हे सारे मला इथेच, याच वयात समजावणे योग्य वाटते, जी गोष्ट समजायला माझ्यासारख्याला आयुष्याची उणीपुरी चाळीस-पन्नास वर्षे गमवावी लागली. तुमच्या जीवनाच्या प्रारंभीच शिवाम्बू हेही काय ‘आयुध’ आहे, हे माहीत व्हायलाच हवे. 

मुलांनो, जीवन एक संघर्ष आहे. जीवन एक युद्ध आहेच. आपला पहिला शत्रू आळस आहे, दुसरा शत्रू अज्ञान आहे, तिसरा शत्रू गैरसमज आहे.

निसर्गाने तुम्हाला तुमच्या देहाबरोबरच टूल बॉक्सही दिला आहे, ज्यात भक्कम अशी ढाल ठेवली आहे. रोगाचे, वातावरणाचे,विषबाधेचे, हिंस्र-प्राण्यांच्या चाव्यांचे प्रहार परतवून लावण्यासाठी तुम्हाबरोबरच एक नामी अस्त्र निसर्गाने उपलब्ध करून दिले आहे, तेच आहे तुमचे स्वमूत्र.

स्वमूत्र जखमेचे वर्मी मलम आहे.

स्वमूत्र देहाचा खराटा आहे.

स्वमूत्र देहाचा डॉक्टर आहे.

स्वमूत्र देहाचा सर्जन आहे.

स्वमूत्र देहाची माउली आहे.

स्वमूत्र देहाचा सखाही आहे.

स्वमूत्र वर्मी मलम कसे?

तर कोणत्याही नव्या-जुन्या जखमा, मग त्या काहीही स्वरूपाच्या असोत, ठेच लागण्यापासून जळण्या-भाजण्याच्या जखमांपर्यंत. करटं-केसतूड जखमांपासून कॅन्सर-ट्युमरपर्यंत. जितकी औषधे काम करणार नाहीत त्याहून जास्त त्या जखमा वाळवण्यासाठी केवळ याचाच उपयोग होतो, असा माझा पस्तीस वर्षांचा, हजारो रुग्णांवर केलेल्या प्रयोगाचा अनुभव आहे. म्हणजे स्वमूत्र हे अ‍ॅन्टीसेप्टिक मलमाचे, इंजेक्शनचे काम करते.

स्वमूत्र, डॉक्टर कसा?

स्वमूत्र केवळ जखमाच दुरुस्त करीत नाही, तर तुम्ही तापात असा, खोकल्यात असा, विषबाधेत असा, कॉलरा असो, कावीळ असो, काही ज्ञात-अज्ञात कोणताही रोग असो, शास्त्रशुद्ध प्रयोगांनी तो पूर्णत: नाहीसा करण्यासाठी, कुठल्याही डॉक्टरांकडे न जाता, निदानासाठी काहीही न करता तुमच्या पीडा नामशेष होऊ शकतात.

शिवाम्बू ‘सर्जन’ कसा?

आपल्या देहात अल्सर आहे, हृदयातील धमन्यांत अडथळा आहे. धाप असो, कुठलीही गाठ असो, त्याला सर्जनकडे जाऊन तोडण्या, फोडण्या, कापण्याची गरज नाही. पद्धतशीर उपचार काही दिवस घेतले की, सर्जरी झालीच समजा.

आता शिवाम्बू ‘माउली’ कशी?

माउली बाळाची, पायापासून डोक्याच्या टाळूवर तेल जिरवण्यापर्यंत काळजी वाहत असते. अंगचे दूध पाजण्यापासून कुडतं-टोपडं चढवण्यापर्यंत पाहत असते. अगदी तसे तुमचे स्वमूत्र तुमच्या देहातील, पोटातील, धमन्यांतील असेल-नसेल तो मळ बाजूला करून, उत्सर्जन संस्थेच्या वेगवेगळ्या अवयवांतून बाहेर लोटीत असते. अंतर्बाह्य साफ करून तुम्हाला झकपक ठेवते. तुमच्या हाता-तोंडावरून माउलीचा हात फिरावा तसे, चेहर्‍यावर ‘पाणी’ आणते, ‘तेज’ आणते.

मूत्र खराटा, झाडू कसे?

देहातल्या कोणत्याही विजातीय द्रव्यास, मग ते मेंदूत असो की फुफ्फुसांत, कातड्यावर असो, त्याला आतड्यात लोटून बाहेर फेकते, म्हणून स्वमूत्र खराटासुद्धा आहे.

स्वमूत्र सखा कसा?

‘मित्र’ आपल्याबरोबर कुठेही, केव्हाही मदतीसाठी उभा राहतो, धावून येतो. सोबतच्या मित्रामुळे आपण निर्भय असतो. बेफिकीर राहतो. आपण जर रोज या स्वमूत्राचे उपासक असू तर चिंता करण्याचे कारणच नाही. आरोग्याची घसरण होणारच नाही. कोणतीही देहपीडा तुम्हाकडे वाकड्या नजरेने पाहणारच नाही.

म्हणजे, एक लघवीसारखी सामान्य गोष्ट, ती खराटा, डॉक्टर, सर्जन, माउली व सखा इतक्या भूमिका बजावते, ही काय भानगड आहे? तुम्हाला साहजिकच वाटेल.

शिवाय शास्त्रपुराणांतील पूजापाठाचे ‘पावित्र्य’ गुरुजी-आईवडील यांनी आजपर्यंत तुम्हावर केलेले ‘संस्कार’ याचे काय? विज्ञानाच्या टोकावर चढलेल्या जगाचे तुम्ही तर नागरिक, तेव्हा हे सर्व काय गौडबंगाल आहे? इत्यादी वाटून तुम्ही संभ्रमात पडू नका.

मुलांनो, थोडक्यात इथे मला इतकेच मुद्याचे सांगावे वाटते की, भगवान शंकर, पार्वती, गणपती यांच्या परिवारातील सर्वांनी अनुभवलेली-सुचवलेली, डामरतंत्र ग्रंथांचा आधार असलेली, मी स्वत: पस्तीस वर्षे स्वत:च्या आरोग्यासाठी व अन्य जीर्ण रुग्णांसाठी अनेक प्रयोग करून पाहिलेली, अशी ही ‘विद्या’ तुम्हासमोर ठेवित आहे. ती एवढ्याचकरिता, विज्ञान जिथे मूठभर तब्बेतीचे रहस्य वदायला थांबले आहे, ते रहस्य आजही तुमचे मूत्र वदते आहे. हजारो डॉक्टर, हजारो शास्त्रज्ञ याचे उपासक असून शास्त्रीय पुरावा ते आज देत आहेत. जीवनाच्या बाराखडीत आनंदाचा, स्वास्थ्याचा, उत्साहाचा, मुक्तीचा मार्ग चोखाळणार्‍यांना अजूनही तो एक दीपस्तंभ आहे.

अन् पहा काय घडते ते...

बाकीच्या तपशिलात तुम्हाला मी आताच नेत नाही. तुम्ही तूर्त इतकेच करावे :

  • रोज सकाळी उठल्यावर जे पहिल्यांदा मूत्र विसर्जन कराल, त्यातील रोज दोन कप मूत्र आपण प्राशन करा, त्यावर कपभर पाणी प्या, चूळ भरा.

  • एक म्हणजे सर्दीपासून कॅन्सरपर्यंत कुठलेच रोग जवळ येणार नाहीत. आलेच तर, एक-दोन दिवस सर्व उपलब्ध शिवाम्बू पीत उपवास करा.

  • सप्ताहातून एक दिवस उपवास, शिवाम्बू पीत केल्यास अधिकच उत्तम. सुट्टीच्या दिवशी, स्नानाच्या आधी सर्व अंगाला शिळ्या मूत्राने मुद्दाम मॉलिश करा. 2/4 पावशेर तुमचेच मूत्र, अंग-अंगात रगडा व सूर्यस्नान घ्या. कोवळ्या उन्हाच्या किरणांत पहुडा, डावी-उजवी बाजू, छाती-पाठ यांवर किरणे समान पडतील असे झोपून कोवळी किरणे घ्या अन् पहा काय घडते ते ! एक वेगळ्याच दिमाखाचे, चार-चौघांत ठळक, आकर्षक, बुद्धीचातुर्याचे विलक्षण व्यक्तिमत्त्वाचे, ‘चाणाक्ष विद्यार्थी’ म्हणून तुमची वाखाणणी जिथे तिथे होत राहील.

मुलांनो, अधिक माहितीसाठी आमच्या केंद्रात तुम्ही अवश्य यावं. तुम्ही उद्याच्या जगाचे आधारस्तंभ आहात. जगातून आम्हाकडे आलेली पत्रे, पुस्तके, वाचावीत; रुग्णांचे अभिप्राय वाचावेत व जीवनाची नवी घडी उत्तमरीत्या बसवावी. विद्यार्थि दशेत सतावणारे छोटे-मोठे रोग जवळ तर येणारच नाहीत. काही लागले-खुपले, खरचटले तरी त्वरित बरे होणारच अशी देहाची स्वास्थ्यानुकूल बैठक राहील.

ध्यान व प्रार्थना

मुलांनो, ध्यान व प्रार्थनेबाबत धर्म काय म्हणतो हा माझा विषय नाही; तर निसर्ग काय म्हणतो, निसर्गाचे संकेत काय आहेत ते पाहूया...

जीवनाच्या बाराखडीतले शेवटचे पुष्प ध्यान व प्रार्थना. ध्यान कोणाचे व प्रार्थना कोणाची? आणि कशासाठी?

ज्या अज्ञात निसर्गशक्तीकडून आपल्याला हा जन्म मिळाला, प्रसाद म्हणून हा पंचमहाभूतात्मक देह  लाभला, अनुकूल परिवार लाभला, योग्य परिसराची जुळवाजुळव झाली, योग्य शाळेत दाखला मिळाला, हे सारं कोणी ठरवलं? ज्या नैसर्गिक शक्तीमुळे या सर्व घडामोडी अनुकूल घडल्या, त्या शक्तीस कृतज्ञतेने धन्यवाद द्यायचे, बस्स इतकेच...!

तुम्ही जसे मोठे व्हाल, तसे सायन्स तुम्हाला मोठा दृष्टिकोन देईलच. प्रत्येक वस्तुमात्र, गोष्ट, ऊर्जेचाच समूह आहे. इथवर तुम्ही पोचलात की संपले.

एक वस्तू सतत दुसर्‍यामध्ये परिवर्तित होत आहे. नित्यनूतन हा निसर्गाचा अबाधित पाठ आहे.

ज्यांचा म्हणून, आपल्याला उभे राहण्यास सहयोग मिळाला, मग आई-वडील आहेत, गुरुजन आहेत, आप्तेष्ट आहेत, इष्टमित्र आहेत, ज्यांचा आधार घेऊन आपण उभे झालात, स्वावलंबी झालात, त्या संपूर्ण यंत्रणेला थोडे डोळे बंद करून, हात जोडून, कृतार्थतेनं मस्तक झुकवलंत, की मनाला व तनाला एक वेगळी उभारी येते. विनम्रता हा गुण आगेकूच करायला अत्यंत सहयोगाचा असतो.

माझे गुरू मला इतकंसुद्धा म्हणायचे, “तुझा भार व पायांचा ताण, ज्या पायताणांनी झेलला, कृतज्ञतेने त्या पायताणांनाही मनातून धन्यवाद द्यायचे बरे...!’

यामुळे मग काय होते? तुमच्यात एक शिस्त येते. तुम्ही त्यांना ठाकठीक ठेवता. मग अंथरूण-पांघरूण आहे, कपडेलत्ते आहेत, पुस्तके आहेत, पेन आहे, कागद आहे. त्यामुळे तुमच्याभोवतीचा पसारा सतत सावरत राहाल. तुम्ही दुसर्‍याला भार बनून राहणार नाही. आदर्श नागरिक किंवा आदर्श विद्यार्थी यातूनच उभा होईल. या क्षणाला या बाबतीत इतकेच पुरे आहे.

इथल्या संयोजकांनी, तुम्हा नवविद्यार्थ्यांंसमोर, मला माझा अनुभव मांडण्याची मौलिक संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. वेळप्रसंगी तुमच्या भावी जीवनात, हा प्रसंग सतत तुमच्या आठवणीत राहिला तरी, माझे आजचे कार्य संपन्न झाले असे मी समजेन. तुमच्या कोणत्याही पडत्या काळात सावरायला हे माझे शब्दनशब्द आधार देतील, ही अपेक्षा करून मी रजा घेतो.

चला, आपण सर्वजण, मी म्हणतो तसे माझ्याबरोबर मागे, म्हणायला लागा...

सदगुरु वामनराव पैं ची विश्‍वप्रार्थना म्हणूया,

हे ईश्‍वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,

सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्‍वर्यात ठेव.

सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.

आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे...

हरी ओम तत्सत्, जय गुरुदेव..!

क्रमश:

डॉ. शशी पाटील  समाजातील  प्रत्येक घटकासाठी  स्वास्थ्य  मार्गदर्शन करायचे. त्यांचा सेवा-संपर्क लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप मोठा होता. त्यांनी अनेक शाळा कॉलेजातून लहान मुलांसाठी व तरुणांसाठी स्वास्थ्य जागरणाचे विविध उपक्रम राबविले.  त्यांनी 'जीवनाच्या बाराखड्या' या नावाचा उपक्रम लहान मुलांसाठी  अनेक वर्षे राबवला, जो मोठ्यांसाठी ही खूप उपयुक्त आहे.  त्यांनी या उपक्रमातून हजारो  बालकांना व तरुणांना समाजामध्ये 'स्वास्थ्य रक्षक' म्हणून कार्य करण्यास प्रेरित केले.  प्रस्तुत लेखस्तंभातून, 'जीवनाच्या बाराखड्या' या त्यांच्या उपक्रमातील व्याख्यानांचे संकलन, आम्ही क्रमश: प्रकाशित करीत आहोत..

Previous Post Next Post