मुळनक्षत्री : एक प्रेरणादाई जीवनधारा : भाग - 8

नवीन अ‍ॅडमीट झालेल्या रूग्णांसाठी केले जाणारे संपूर्ण मार्गदर्शन

नेहमीच कोल्हापूर मुक्कामी उपचार केंद्र असताना रात्री तीन वाजता स्वास्थ्य साधकांना उठवून रंकाळयाला मॉर्निंग वॉकला नेत असायचो. हनुमंताच्या मंदिरासमोर पद उद्यानात इतक्या पहाटे चार वाजेपर्यंत मॉर्निंग वॉक आटोपून विश्रामासाठी यायचो. नवीनच अ‍ॅडमिट झालेल्या रोग्यांना उद्देशून मी बोलत होतो. उपचाराबद्दल प्रास्ताविक देत होतो. त्या पद उद्यानात टाकलेल्या एका बाकावर या समूहाच्या मागे हे आनंदकुंजचे शिल्पकार श्री. केशुभाई शहा व जगदीशभाई शहा, ज्या दोन शहा मंडळींनी आनंदकुंजला बादशहा बनवलं आहे. आनंदकुंजला आता शहेनशहा व्हायला अवघड नाही. ही मंडळी बाकावर बसून प्रास्ताविक ऐकत होती. मी नव्या बॅचसमोर बोलत होतो.

प्रथम मी आपल्या सगळयांचं स्वागत करतो. यासाठी की, तुमच्यामध्ये रोगाकडून आरोग्याकडे जाण्याची जी धडपड, तळमळ दिसते. औषधाच्या शिवाय या उपेक्षिलेल्या या उपचाराकडे तुम्ही वळालेले आहात. याचाच अर्थ तुम्ही तहानलेले आहात. सौभाग्य आहे तुमच्या लोकांचे. जे आरोग्यासाठी तहानलेले आहेत. पुष्कळ लोक तयार होतात. पण फार थोडे-थोडके पोहचतात. थोडयाच लोकांना पूर्ण आरोग्य भेटते. आरोग्य प्राप्त होणं हे मात्र नक्की सौभाग्यच आहे. आरोग्याची इच्छा ठेवणं हेच खरं सौभाग्य आहे.

आज आरोग्य हि साधी गोष्ट राहिलेली नाही. जरी आरोग्य नाही मिळाले तरी इच्छा होती ना! आम्ही आरोग्याची अपेक्षा केली होती पण मिळालं नाही तरी हरकत नाही. आम्ही श्रम केले होते, आकांक्षा केली होती, आम्ही संकल्प केला होता आणि तो मिळविण्यासाठी प्रयत्न पण केला होता. त्या दिशेने वाटचाल केली होती त्यातूनही आरोग्य मिळालं नाही असं झालं तरीही काही हरकत नाही.

पण आरोग्याची तहानच नसेल तर जीवन दुर्भागी होतं, अभागी होतं आणि मी तुम्हाला हे पण सांगतो, आरोग्य मिळवणं इतकं महत्त्वाचं नाही. जे ठीक अर्थाने तुम्ही स्वास्थ्यासाठी तहानलेले आहात. हाही झाला तरी एक आनंदच आहे.

जे क्षुद्र गोष्टीसाठी तहानलेले असतात ते क्षुद्राला मिळवूनही आनंदी होऊ शकत नाही. जे निरामयतेच्या आरोग्यासाठी तहानलेले आहेत. ते निरामयता न मिळवता सुद्धा आनंदी होऊ शकतात. ज्या अर्थाने आम्ही श्रेष्ठाची कामना करतो. त्याच अर्थाने आपल्यामध्ये श्रेष्ठ निर्माण होऊ लागतो. कोणीही धन्वंतरी, कोणीही डॉक्टर, आरोग्य तुम्हाला बाहेरून देऊ शकत नाही.

त्याचं बीज शरीरातच असतं आणि ते आतूनच विकसित होतं. ते कंपित होतं व अंकुरू लागतं. ते तेव्हाच विकसित होईल जेव्हा तुम्ही त्या दिशेला वाटचाल करायला तयार व्हालं, जेव्हा तुमच्या मनामध्ये आरोग्य मिळालचं पाहिजे हा विचार घट्ट होईल, तेव्हाच तुमच्यातले बीज अंकुरित व्हायला उत्सुक झालेले असेल. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तेव्हाच तुमच्यात लपलेली इच्छा उद्युक्त झालेली असेल हेही तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या शरीरात आंदोलन व्हायला सुरू झालेलं आहे. त्या आंदोलनाला आपल्याला सांभाळायला हवं. त्या आंदोलनाला आधार द्यायला हवा, न्याय द्यायला हवा कारण की एकटे बीज अंकुरित होऊच शकत नाहीत. अजूनही काही सुरक्षितता हवी आहे. त्यास काही सुविधाही आवश्यक आहे.

जमिनीवरती खूप बीजे पडत असतात पण सगळेच कुठे वृक्ष होतात. खूपच थोडे बीज वृक्ष होतात. ज्यांच्यामध्ये क्षमता असते ते विकसित झालेले असतात व एका बीजामध्ये खरं तर जंगल तयार करण्याची क्षमता आहे. सगळयाच पृथ्वीवरती झाडं तयार होतील अशी क्षमता एका बीजामध्ये आहे. इतकं असताना ते बीज अंकुरत का नाही? एक बीजाची जर ही ताकद असेल मग मनुष्याकडे अशी काय ताकद असेल, जर एका बीजाकडून एवढा विकास होत असेल तर मनुष्याला अवघड काय आहे? एका दगडाच्या कणाच्या अणूचा विस्फोट केला तर महान ऊर्जा निर्माण होते. मनुष्याच्या मनाकडे आणि चेतनेकडे जी शक्ती आहे. त्याचा विकास आणि विस्फोट जर होऊ शकला. त्यातून जे निर्माण होतं त्याचचं नाव ‘आरोग्य’ आहे. आरोग्य असचं काही आपसूक मिळत नाही. त्या शक्तीचचं नाव, अनुभवाचं नाव आरोग्य आहे.

त्याची तहान तुमच्यामध्ये मी पाहतो आणि म्हणूनच मी तुमचे स्वागत करीत आहे. परंतु असं कोणी समजू नका, आपण एकत्र झाला आहात, इथपर्यंत आला आहात, त्याअर्थी तहानलेलेच आहात. यात्रेमध्ये कसे हौसे, नवसे, गवसे येतात, तसेच बघ्याची भूमिका घ्यायला काही लोक आले असतील, तर काही लोक आले असतील जिज्ञासेच्या पोटी आणि काही लोक कुतूहलासाठीपण आले असतील. परंतु कुतूहलाने कुठला दरवाजा उघडत नाही. आणि जे बघ्याची भूमिका घेऊन आलेले आहेत त्यांच्या पदरात काही पडणार नाही.

या जगामध्ये काही मिळवायचे असेल तर काही गमवावं लागेल. कुतूहल काहीच गमवू शकत नाही आणि मिळवूही शकत नाही. कुतूहलाने उपचारात भाग घेता येत नाही. एकटया जिज्ञासेतून रोगमुक्तीसाठी   तुम्ही तर तहानावलेले असाल, तरच ते शक्य होणार, तरच तुम्ही तृप्त होणार. तुमची आकांक्षा व जिज्ञासा आतल्या रोग बीजेच्या कवचाला तोडत असते.

बीज असचं तुटू शकत नाही. त्याच्या वरती हा दबाव लागतो. कठीण अशा कवचासाठी या शिवाय पर्याय नाही. हे कुतूहलानं शक्यचं नाही होणार, हे तुम्ही लक्षात ठेवा. जे-जे कुतूहलापोटी आलेले आहेत, त्यांच्या हाती काहीच लागणार नाही. यासाठी प्रत्येकामध्ये तहान किती आहे? याची पाहणी करावी.

जे प्रसन्नतेला, शांतीला, स्वास्थ्याला उत्सुक आहेत, त्या प्रत्येकाने स्पष्टपणे पहावं संपूर्ण स्वास्थ्याची किती आपल्याला तहान आहे. तेंव्हाच तुम्ही प्रसन्नता, शांती, उत्साह, आनंद, याला उपलब्ध व्हाल. जर हे नसेल तर तुमच्या उपचारात प्राण असणार नाही, तथ्य असणार नाही. याला तुम्हीच जबाबदार आहात. उपचार जबाबदार असणार नाही. यासाठी प्रथम गोष्ट प्रत्येकाने आपआपल्यामध्ये तहानेची खोली पहावी. प्रत्येकाला या उपचाराने गुण येतो ही गोष्ट खरी आहे पण ती तेव्हाच जेव्हा त्याची तहान व आकांक्षा तीव्र असते.

स्वास्थ्य प्रत्येकाला मिळू शकते हे मी सांगतो. पण प्रत्येकाची अपेक्षा स्वास्थ्याची असेल हे मी सांगू शकत नाही. जर तुम्ही मिळवू इच्छित असाल तर या पृथ्वीवर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. आणि मिळवायची इच्छा मुळी नसेल तर या पृथ्वीवर तुम्हाला ते कोणीच देऊ पण शकत नाही. आपली तहानच आपल्यासाठी रस्ता आहे.

खूप वेळेला आम्ही तहानलेले असतो. पण आशेने भरलेले नसतो. ही फार महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणावी लागेल. शक्यता आहे. आम्ही तहानलेले असून निराश असू शकतो. ज्यांचं पहिल पाऊल निराशेतच असते. शेवटचे पाऊल यशस्वी व्हायचं असेल तर पहिल पाऊल आशेतून उचलायला हवं. हे दहाच दिवसांसाठी नाही तर अख्ख्या जीवनासाठी आहे. आशेने भरलेला दृष्टिकोन चित्ताची जागा भरून काढतो. तुम्ही कोणतेही काम करताना आशेने भरून कामाला लागत असाल तरच अर्थ आहे. जर तुम्ही निराशेने कामाला लागला असाल तर तुम्ही त्या फांदीवर उभे आहात तीचं फांदी तोडत आहात.

या उपचारासाठी आशा महत्त्वाची आहे. जर या उपचाराने एखादा मनुष्य जरी बरा झाला असेल तर मी का नाही बरा होणार? हीच ती आशा. ज्या लाख लोकांचे जीवन अंधकारमय आहे त्यांच्याकडे तुम्ही बघूच नका! त्याचं लोकांना, त्याचं किरणांना तुम्ही पाहा जे गुणांनी संपन्न झालेले आहेत.

ज्यांचे झाडात रूपांतर होऊ शकले नाही अशा बीजांना तुम्ही बघू नका. तुम्ही लक्षात ठेवा एका बीजाकडून जे शक्य आहे ते तुम्हालाही शक्य आहे. या उपचाराचा शोध घेणार्‍या महादेवाकडे जी शक्ती आहे तीच शक्ती तुमच्याकडेही आहे. या निसर्गाच्या जगामध्ये कुठेच पार्सलिटी नाही, अन्याय नाही. आपण संभावनेच्या गोष्टी वास्तविकतेमध्ये रूपांतर करत नाही. डाव कसाला लावत नाही.

या उपचाराने एखाद्याला आरोग्य मिळालं नसेल तर मीही त्यासाठी पात्र आहे. तुम्ही त्यासाठी निराश होऊन स्वतःच अपमान करू नका. निराशा स्वतःचा फार मोठा अपमान आहे. आपण योग्यच आहात हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो बघा, तुम्ही निराशेतून वाट काढलेली आहात. आता दहा दिवसांसाठी आशा करून पाहू या. इतक्या  आशा पदरी घेऊन काम करू या. ज्यामुळे आम्ही यशस्वी होणारच.

या मायाबाजारात आशेने काम करून देखील पूर्ण झाली नसतील. पण तुमच्या मनाच्या आंतर जगतात आशेला फार महत्त्व आहे. आशेला फारच मोठा रस्ता आहे. जेव्हा तुम्ही आशेने भरलेले असता, तेव्हा तुमच्या शरीरातील अणू-परमाणू आशेने भरलेले असतात, रोम-रोम आशेने भरलेला असतो. तुमचा श्‍वासही आशेने भरलेला असतो. आशेच्या प्रकाशाने विचारही प्रकाशित झालेले असतात. तुमचं सारचं व्यक्तित्व असं आशेने जेव्हा भरलेलं असतं, तरच तुम्ही काही करू शकता.

जेंव्हा तुमच्या शरीरातील कण-कण रडतो आहे, उदास आहे, थकलेले आहात, अंधार आहे, बुडालेले आहेत, चैतन्य नाही असा मनुष्य नाममात्रच जिवंत आहे. अशा मनुष्याने जर कुठल्या मोहिमेत, चळवळीत भाग घेतला तर काय मिळवू शकेल आणि आरोग्यासाठी असलेली चळवळ ही फारच महत्त्वाची चळवळ आहे. याच्यापेक्षा कोणतचं मोठ शिखर नाही. काही चांगल व्हायचं झालं तर आरोग्य हवचं. आरोग्य हे जंक्शनच म्हणायला हवं. आरोग्यासारखी श्रीमंती नाही.

तुम्ही आज रात्राीसुद्धा खूप आशेनेच झोपा, या विश्‍वासाने झोपा की सकाळी काही होऊन जाईल. आपल्या संस्कृतीमध्ये निराशा इतकी खोल शिरलेली आहे. तिला विसरा.

एक व्यक्ती माझ्याकडे येत होती. म्हणत होती,  “मला भिती वाटते, मला झोप लागत नाही. भूक लागत नाही, शौचास होत नाही. थकवा वाटतो.” म्हटलं ठीक आहे. ‘दहा दिवस उपचार घे काय होतयं बघ!’ त्याने उपचार घेण्यास सुरूवात केली. पाचव्या सहाव्या दिवशी म्हणू लागला,  “मला झोप तरी लागते, पण भिती कमी नाही, काही विशेष नाही.” आणखीन दोन दिवसांनी मी त्याला विचारलं,  “किती फरक आहे.”  “भिती कमी झाली पण भूक नाही. मला काही विशेष गुण नाही.”  असं तो म्हणाला. पुन्हा विचारले तेव्हा म्हणाला,  “थकवा कमी झाला पण काही विशेष नाही” म्हणत म्हणतच उपचार घेत होता. मी यालाच निराशेची दृष्टी म्हणतोय. अशा माणसाला आशा मिळायची झाली तरी मिळू शकणार नाही.

या दहा दिवसांमध्ये जे यश येत त्यालाच लक्षात ठेवा. जे येत नाही ते लक्षात घेऊच नका. थोडासा जरी शांतीचा कण सापडला तरी त्याला पकडून धरा. तो तुम्हाला आशा लावेल व गतिमान करेल. जो काही थोडा गुण आला आहे त्यालाच आधार बनवा जो तुम्हाला आधार देईल. मनुष्य आयुष्यभर अशाच दुःखात खितपत पडला आहे, जे त्याला मिळतं, तो ते विसरून जातो आणि जे नाही मिळाल ते आठवत राहतो. हा मनुष्य चुकीच्या ठिकाणी उभा आहे.

एक मनुष्य माझ्याकडे काहीच नाही म्हणत होता. मी दरिद्री आहे म्हणत होता. दुसरी व्यक्ती म्हणाली,  “तू एक काम कर. तुझा डावा डोळा विकावास अशी मी अपेक्षा करतो, त्यासाठी मी पाच लाख देतो.”  तो म्हणाला  “अवघड आहे, मी डावा डोळा देऊ शकणार नाही.” मग मी म्हणालो,  “मी दहा लाख देतो, दोन्ही डोळे देऊन टाक.”  तो म्हणाला,  “दहा लाख दिले तरी मी देऊ शकत नाही.”  मग पन्नास लाख देतो तुझा प्राण मला देऊन टाक असं म्हटल्यावर तो म्हणाला,  “हे असंभव मी देऊ शकत नाही.”  याचा अर्थ  “अरे! तू किती मोठा श्रीमंत आहेस! तू स्वतःला दरिद्री कसे म्हणतोस आणि तू काहीच नाही कसे म्हणतोस?”

तात्पर्य जे तुमच्याजवळ आहे तेच फक्त लक्षात ठेवा. जे तुमच्याजवळ नाही ते विसरून जा. जे उपचारामधून तिळाइतकं जर मिळालं त्याचाच विचार करा, त्याचीच चर्चा करा.

त्याचबरोबर आशेची वाढ होईल. त्यामुळेच रस्ता सापडेल, आधार मिळेल नाहीतर आणखी एक वेगळा अनुभव असा की, एक रूग्ण माझ्याकडे आला होता. मी प्रत्येक दिवशी उपचाराच्या काळात विचारात होतो.  “काय बर वाटलं की नाही? काय पदरात पडलं की नाही?”  असं विचारल्यावर पेशंट म्हणायचा,  “क्षमा करा, आहे तसं आहे, काहीच फरक नाही. उपवासामुळे हलके वाटत असेल, भूक लागली असेल. मॉलिशमुळे हायस वाटत असेल. उन्हाच्या किरणांमुळेच उब आली असेल.”

निसर्ग आपल्या प्रॉडक्टवर खरं तर कोरीव काम करत असतो. दुरूस्ती-तंदुरूस्ती आणत असतो. पण तुम्ही जमेलाच घ्यायचं नाही ठरविल्यावर गुण येणारचं कसा? हे गुण उधळवण आहे. यांना काय अपेक्षा होती कोणास ठाऊक. इतकं का तूप खाल्यावर लगेच रूप हवं असेल! तर ते कदापि शक्य नाही.

समय सुद्धा आवश्यक आहे. काही अवधी जाऊ द्या. ‘पी हळद नि हो गोरी’ असा विचार करणं चुकीचचं नाही तर मूर्खपणाचं लक्षण आहे. नव्यान्नव डिग्रीला पाणी उकळत असेल, त्याआधी अठठ्यान्नव पर्यंत सुद्धा अपेक्षा करणं चुकीचं आहे. मी तुम्हाला हेच सांगतो. थोडं जरी पाण्याला वाफ येत असेल तर त्याची नोंद घ्यायचीच. 99 ला ते उकळणारचं. त्याचा आधार घेऊन तुम्ही 99 पर्यंत पोहचू शकता. माझ्यासारखा मनुष्य, अंधकार असलेल्या खोलीमध्ये बसला असेल तर उदबत्तीसारखा उन्हाचा कवडसा, त्याचा आधार घेऊन मी सूर्यापर्यंत पोहोचू शकतो. पण हे लक्षात न घेता मी अंधकार असलेल्या खोलीचे वर्णन करीत असेन, तर तेजःपुंज असलेला सूर्य मला भेटेलच कसा? ही आशेची दृष्टी आहे.

आपलं जीवनचं कसं उलट आहे. जर समजा मी तुम्हाला गुलाबाच्या झाडाजवळ नेलं, पण दोन-चार फुलं आहेत, तर तुम्ही म्हणाल हजारो काटे आहेत. पण दुसरी एक दृष्टी ही आहे की, भगवान कसा न्यायी आहे, अद्भुत आहे. हजारो काटयामध्ये पण कोमल फुल उमलवली आहेत. काटयाच्या झाडाला फुलं उमलवणे किती आश्‍चर्यकारक आहे. या दहा दिवसांमध्ये अशा प्रकारचा दृष्टीकोन प्रत्येक दुर्धर रोग्याने ठेवला पाहिजे. उपचारामध्ये थोडा जरी तुम्हाला गुण आला असेल तर त्याची चर्चा व्हायला हवी. त्याचे गुणगाण व्हायला हवे.

तिसरी गोष्ट उपचाराच्या दहा दिवसांमध्ये, तुम्हाला तसं जगायचं नाही. जसं आतापर्यंत जगला आहात. माणूस सवयीचा गुलाम आहे. जर मनुष्य पूर्वीच्या सवयीप्रमाणे पुढे जाणार असेल तर उपचाराच्या गुणात्मक प्रभावात तुम्ही हरवून जालं. तेव्हा थोडसं परिवर्तन करण्याची गरज आहे.

रूपांतरणाचा पहिला पाठ मी असा देईन, या दहा दिवसांमध्ये मौन पाळा. आपल्या देशात बडबड करणे हाच मोठा रोग आहे. आपल्याला माहीत नाही आपण किती बडबड करीत असतो. जोपर्यंत तुम्ही जागे असता तोपर्यंत बडबड तुमची चालूच असते. एक तर रूम मधल्या शेजार्‍याशी करत असता, नाहीतर स्वतःशी करत असता.

या दहा दिवसात मोबाईलशी (कर्ण पिशाच्चाशी) संपर्क ठेवूच नका. आपल्या काही चुकीच्या सवयी आहेत. चुकी चे पॅटर्न्स, हेच असतात रोगाची कारणं. रोग हा त्या कारणांचा इफेक्ट (परिणाम) असतो. या दहा दिवसांत मौन पाळलेलच बरं. विना औषधाने तुम्हाला तुमचा रोग तोडायचा असेल, तर आधी सवयी (रूटीन) तोडायला हव्यात. तुम्ही किती बडबड करीत आहात! तीच आधी थांबवायला हवी.

उपचाराच्या संदर्भातील शंका शब्दात विचारण्यास काही हरकत नाही. तेही बोलणे दहा दिवसांसाठी नाही केलात तर फार उत्तम, निदान गप्पा-गोष्टी तरी करू नका. यामुळे व्यर्थ शक्तीचा क्षय थांबेल आणि त्या शक्तीचा उपयोग उपचार काळात रोगमुक्तीसाठी होईल.

मौन पाळण्याचा दुसरा लाभ म्हणाल तर असा होईल, तुम्ही दुसर्‍यांशी संपर्क कमी कराल व स्वतःशी संपर्क वाढेल. इतक्या  निसर्गाच्या शांत जागेत येऊन, तुम्हाला तेव्हाच लाभ होईल. निसर्गही तुमच्याशी कानगोष्टी, गुजगोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्याकडे पण कान जातील. तुम्ही गलबल्यात रहाल तर, तो उद्देश्य सफल कसा होईल? समजा या डोंगरावरती तुम्ही एकटेच आहात. तुमचे बोलणे निसर्गाशीच होईल.

तुम्ही अशा रीतीने एकटेच आलात असे समजायचे आणि उपचार घ्यायचे. चारचौघे मिळून तुम्ही कुठे जाऊच नका. एकटे-एकटे जा. गर्दीमध्ये खरतर सत्याचं दर्शन होतच नाही. गर्दीला, रोगाला, एकूण सिमेंटच्या जंगलाला कंटाळून इथे  तुम्ही आलेले आहात. आरोग्य योग्य शांतीच्या काळात प्रविष्ठ होईल. जेंव्हा तुम्ही दुसर्‍यांशी बोलणार नाही, चूप होऊन जाल, हा निसर्ग स्वर्ग-सुख देताना दिसेल. तो कदाचित एक सारखा सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या सनईचा आवाज धनगरी ढोलामुळे ऐकू यावाच कसा? आम्ही आमचा सारा आवाजच बंद केला पाहिजे.

शरीरही तुमच्याशी बोलते आहे संवेदनेच्या रूपाने, मनही तुमच्याशी बोलते आहे विचारांच्या रूपाने, आणि रोगही तुमच्याशी तडजोड करतो आहे. वेदनेच्या रूपाने. तेव्हा आठवणीने बोलायचं थांबवा. शांत व्हा. उपचार गांभीर्याने घ्या. पूर्वीच्या सवयीनुसार बोलणं झालचं तर जोडीदाराशी क्षमा मागा व गालावर हात ठेवऊन तोबा-तोबा करा. मग कुठे मोठया दगडा शेजारी बसा,झाडाखाली बसा, उद्यानात बसा.

प्रकृतीशी आपलं काही नातं आहे, हे आपण विसरून गेलो आहोत. प्रकृतीच, प्राकृतिक उपचारामध्ये आरोग्याच्या शिखरावर पोचवते. या अद्भुत दहा दिवसांच्या उपचाराचा लाभ उठवा. आपण जरी समूहाने उपचार घेत असलो तरी प्रत्येक जण वैयक्तिक उपचार आतमध्ये शोधत आहे. तुम्ही डोळेही बंद केलेत तर त्यामध्ये जाऊ शकता. तुम्ही तुमच्या बरोबरच असाल.

सामुदायिक कधी उपचार होतो? कधी प्रार्थना होते? कधी ध्यान होऊ शकते? त्याचसाठी एकांताची आवश्यकता असते. तुम्ही आत-बाहेर एकटेच रहावे. बर्‍याच वेळेला आपल्या मनाशी तुम्ही बकवास करीत असता. तेही थांबवायला हवं. तरीसुद्धा आतून आवेग येत असेल. मनाला सक्त ताकीद द्या. बकवास बंद करा. पुरे झाली बकवास. उपचारासाठी मनावरती ताबा असण्याची गरज असते. मला हे बिल्कुल पसंद नाही, असा आदेशच द्या. तुम्ही मनाला आदेश देताच तो थांबेल. दहा दिवसांचा उपचारच उपकारक होऊ देत.

उपचाराच्या सान्निध्यात स्त्रवलेला थेंब-थेंब शिवाम्बूचे पाणी पित गुजराण करा. भूक सतावित असेल तर पाण्याने पोट भरा. जरूर तर ठिंबक सिंचन अवलंबा अर्थात प्रत्येक वीस मिनिटाला तोंडात मावेल इतके पाणी चॉकलेटसारखे घोळून लाळेसह हळू-हळू घशात आत उतरू  द्या. उपचार नियमांचे कडक पालन करा. उपवास हा काळ, वजनाच्या हिशोबावरती प्रत्येक दहा किलोस चोवीस तास याप्रमाणे धरा. समजा वजन पन्नास किलो असेल, तर पाच दिवस पाच रात्री उपवास धरा. याच्यामध्ये तो कमी करून सवलत घ्याल तर मॅच फिक्सिंग होईल.

तरच उपचाराच्या काळात उत्सर्जन संस्था सक्षमतेने चालतील. त्यामुळे उत्सर्जन संस्थेचा प्रतिनिधी म्हणजेच शौच अर्थात मल विसर्जन अनेकदा होईल. त्याचे स्वागत होऊ द्या. कारण हा तुमच्या शरीर शुद्धीसाठी अपेक्षित असेल. गुर्‍हाळाच्या काळात गुळवी अनेकदा मळी झारीत झेलून सतत बाहेर टाकत असतो. उत्तम कोल्हापूरी गूळ तयार करण्यासाठी. तसचं शिवाम्बू उत्तम प्रकृती करण्यासाठी, शुद्ध करण्यासाठी मळी तो बाहेर उपसत आहे. त्याचं काळात, पाणी मळमळ-खळबळ करीत, शरीरांतर्गत भाग आतडयापासून कातडयांपर्यत घासून-पूूसून स्वच्छ करतो आहे.

बाळाचं दर्शन होण्यासाठी नऊ महिने नऊ दिवस जगाच्या सर्वच स्त्रियांकरिता लागतात. इथे निरामय स्वास्थ्याचे दर्शन होण्यासाठी केवळ नऊ दिवस व नऊ तास पुरे आहेत. रोग इथून तेथून केवळ कचरा आहे. शरीरांतर्गत भागात निव्वळ एक अडथळा आहे. तो दाही दरवाज्यातून दरम्यान बाहेर निघण्याचा प्रयत्न करील, ते दरवाजे जर पुरले नाहीत, तर रंध्रारंध्रातून बाहेर पडेल. त्यालाच आम्ही केशतोड किंवा फोड म्हणतो. मुखामार्गे वांतीपण होईल. बिचारी महिला बाळाचं दर्शन होण्यासाठी प्रसव पीडा झेलते. डोहाळयांना दाद देते. त्याचप्रमाणे तुम्हाला निरामय स्वास्थ्याचे बाळ तुमच्या मांडीवरती यावे म्हणून, तुम्ही हे निमूटपणे सहन करावयाचे आहे.

बाळाच्या डिलीव्हरीसाठी ज्या यातना आहेत, त्याच यातना रोगाच्या डिलीव्हरीसाठी पण आहेत. एका रोगासाठी तुम्ही आला असाल, या मोहिमेमध्ये, या चळवळीमध्ये, या उपचारामध्ये एकच रोग बरा होतो असे नव्हे. ज्ञात-अज्ञात रोगाची पाळेमुळेच उचकटली जातात. यालाच आम्ही ‘लादेन पॉलिसी’ म्हणतो. एका मजल्याला धडक देऊन, रोगाच्या 110 मजल्यांना धक्का पोहचतो. कारण सगळेच रोग कचरा आहेत, अडथळा आहेत, अवरोध आहेत, स्पीडब्रेकर आहेत. यासाठी उपचार प्रामाणिक आहे, निसर्ग प्रामाणिक आहे, शरीरही प्रामाणिक आहे, आता फक्त तुम्ही प्रमाणिक असण्याची गरज वाटते. आपण औषध म्हणून उत्सर्जन संस्थेतलाच एक द्रव, औषध म्हणून निवडलयं याचा अर्थ काटयानेच काटा काढावयाचा आहे. आधीच प्रत्येकाची शिवाम्बू ही त्याच्याच रोगाशी झुंज देऊन आलेली असते. व्हॅक्सिन इन्युक्युलेशन (लस) होऊन आलेली असते.

सरकारने चंदन तस्कर वीरप्पनला न मारता राजकारणात घेतलं असतं व शाही इतमानाने गृहमंत्री बनवलं असतं. तर मला नाही वाटत त्या वीरप्पनने आपल्या भारतामध्ये तस्करी चालू दिली असती. सेम याच धर्तीवर औषध म्हणून, संजीवनी म्हणून, एक आरोग्य मंत्री म्हणून आम्ही शिवाम्बूला (स्वमूत्र) निवडलं आहे. तो बिचारा तेच काम करतो आहे.

पृथ्वीच्या पोटात सापडणार्‍या क्रूड तेलातून डांबर, अ‍ॅटोमोबाइल, डिझेल, रॉकेल  पेट्रोल असा क्रम क्रमशः हातात आलेला आहे. म्हणूनच डांबराचा डाग रॉकेलने पुसता येतो. हे एकाच परिवारातले सदस्य असल्याने एकसंघपणा आहे. सेम याच प्रकारे अ‍ॅटोमोबाइल मधल्या मशीनर्‍यांना रॉकेल, पेट्रोल व डिझेलने साफ करतात. तरच त्यांची सफाई उत्तम होते. सफाई हीच रोगावरती कारवाई करते. सेम असेच शरीरांतर्गत असलेले रोग व उत्सर्जित शिवाम्बू हे एकाच शरीर परिवाराचे सदस्य आहेत. त्यामुळे सर्दीपासून कॅन्सरपर्यंत, लकव्यापासून एड्सपर्यंत सगळयाच साध्य-असाध्य रोगांना, साध्य-असाध्य डागांना, डागायचं काम एकटे शिवाम्बूच करू शकते.

रफूवाला, ज्या कापडाला रफू करावयाचा, त्याच कापडातला धागा काढून घेऊन, त्या कापडाचा फाटलेला भाग बेमालूमपणे जोडतो. ते छिद्र बेमालूपमणे बुजवतो. तसेच शरीरातले अभाव-विभावातून तसेच असंतुलनातून झालेले सर्व रोग बेमालूमपणे तुमच्या शरीरातल्या शिवाम्बूकडून बुजवता येतात.

सुरूवातीचे तीन दिवस मी इथं कशाला आलो? असं वाटेल. अर्थात तुम्हाला त्रास होईल. तुमचं रूटीन ब्रेक झाल्यामुळे मन थोडसं उद्विग्न झालेले असतं. या उपचारासाठी अ‍ॅडजस्ट व्हायला पाहिले तीन दिवस लागतातच.

उपचाराच्या काळात जे-जे तुम्हाला तुमची प्रसन्नता वाढवायला मदत करेल, त्याला धन्यवाद द्यायला हवेत. मग उपचाराला धन्यवाद, उपचार देणार्‍याला धन्यवाद. या आनंदकुंजला धन्यवाद. या व्यवस्थेला धन्यवाद. ज्याच्यातून लाभ होतो त्याला धन्यवाद. या भूमिकेमुळे तुमचे उद्दिष्ट सफल होईल. यांच्यामुळे निश्‍चिंतता निर्माण होईल आणि एक सरळपणा येईल. धन्यवाद.

प्रत्येक मनुष्य स्वभावतः चांगल्यात चांगल्या गोष्टींचा धनी होण्याचा प्रयत्न करीत असतो. तसं मी चांगल्यात चांगली उपचार पद्धती शोधण्याच्या प्रयत्नातून शिवाम्बूकडे वळालो. आडवा माणूस उभा झालाच पाहिजे हा मी माझा छंदाचा विषय समजला. मग तो कोणत्याही पद्धतीने होऊ द्या, हेच माझं कौशल्य, हेच माझं ब्रीद. मनुष्य उभा होण्यामध्ये चांगलं वाईट पाहायचं नाही. गंध, दुर्गंध बघायचा नाही. भलं, बुरं जाणायचं नाही. लाभ-तोटा समजायचा नाही, सुख-दुःख जाणायचं नाही. ‘अशुभातही असे शुभाचा अंश, मंथन करूनी शोध तो अवशेष’ औषधाच्या मध्ये औषध म्हणून जगातल्या कुठल्याही प्राप्त गोष्टीचा समावेश करायला बंधन नाही. आधी त्याचा क्रम, जी गोष्ट नजीक असेल, जी गोष्ट स्वस्त असेल, जी गोष्ट सहज सुलभ असेल आणि जी गोष्ट दूरगामी असेल. त्या गोष्टीला पहिला क्रम ज्याला कळालं तो हुशार, तो चाणाक्ष, तोच तत्पर.

मूळनक्षत्री मनुष्य मुळात, तळात जाण्याचा प्रयत्न करतो. त्या दृष्टिकोनातून शरीराला रोग म्हणजे काय? तर माझ्या दृष्टीने पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांपर्यंत जैव रासायनिक प्रक्रियांचा प्रवाह जो कि इकडून तिकडे वाहतो आहे आणि तिकडून इकडे पुन्हा सरकतो आहे. त्या त्याच्या मार्गामध्ये रोग हा एक अडथळा आहे, अवरोध आहे. बाकी दुसरं-तिसरं काहीच नाही. मग जंतू असो, की व्हायरस असो, की असो अडथळा दगड धोंडयांचा. मुळात अडथळाच आहे एक प्रकारचा रोग, अडथळाच आहे अडसर, अडसरचं आहे व्यत्यय. तो अडथळा दूर करणे म्हणजेच उपचार. मग तो अडथळा मळाचा असो, मेदाचा असो, पू रक्ताचा असो, बेडक्याचा असो, शेंबडाचा असो, म्यूकसचा असो, बुडबुडयाचा हवेचा असो, तो-तो अडथळा दूर करणे हाच आहे. एकमेव उपचार सगळेच रोग जीवनाच्या प्रगतीपथावरील स्पीड ब्रेकर्स आहेत. आणि हे स्पीडब्रेकर्स उचकटणे हाच आहे इलाज.

थोडक्यात लादेन पॉलिसी तर काय होती. इमारत अमेरिकेची, विमानही अमेरिकेचं, त्याचं इंजिनही अमेरिकेचं. फक्त डोके व वैमानिक हुशार लोकांचा. तसचं समस्या तुमची आणि औषधही तुमचचं. मी रोग्यांना काही प्रश्‍न विचारतो. तुम्हाला कुणी पाठवलं? तुम्ही कोठून आलातं? तुम्ही रोगाला बोलवलतं की कोणी रोगाला तुमच्या पत्त्यावरती धाडलं? तुमच्या रोगाला तुम्ही मागवलतं का? पेशंट हा विचार करतो आणि हुशार असेल तर अचूक उत्तर देतो. आमचे शब्दच या वेळेला औषध झालेली असतात. तीच औषध परिणाम करीत असतात. रूग्ण कानांनी तीक्ष्ण असणं हे आमच्यासाठी शर्त आहे. म्हणूनच बहिरी व मुकी माणसे आमच्याकडील गुण घेऊ शकत नाही. ‘समज’ नावाचं औषध, नावातूनच काम करत असतं. अमेरिकेची वर्ल्ड ट्रेडची नाकं असलेली इमारत, त्याचंच बॉम्ब सदृश विमान, केवळ त्यात आपला वैमानिक बसवून एकशे दहा मजली इमारत जमीनदोस्त केली. रोगही तसेच तुमचे शरीरातील एकशे दहा प्रकारचे, अनंत रोग त्याच शरीरातल्या उत्सर्जित द्रव्याने जर जमीनदोस्त होत असतील तर तुम्ही त्याला लादेन पॉलिसी का नाही म्हणणारं?

एकूण निसर्ग उपचारामध्ये उत्सर्जन-क्रिया ही सक्षम करावयाची असते. उत्सर्जन क्रियाच शरीराला साफ ठेवत असते. या ना त्या कारणाने ती मंद किंवा थांबली असेल तरच ‘रोग’ नावाची गोष्ट जन्माला येते. आणि सगळेच रोग उत्सर्जन क्रियेचं संतुलन बिघडवून शरीरात प्रवेश करत असतात. ‘उत्सर्जन’ म्हणजेच ‘जावक !’ अन्न, पाणी, हवा आणि विचार या आवक गोष्टी असून मैला, मूत्र, घाम, थुंकी, बेडका, दुर्गंध, उच्छवास हे सगळेच जावक आहेत. आवकापेक्षा जावक महत्त्वाचा. तुमची समृद्धी, दोन्ही गेटवर वॉचमन म्हणून कमांडो ठेवत असेल तर तुम्ही हुशार ठरता, शहाणे ठरता. निदान एका जावक गेटवर तरी कमांडो वॉचमन म्हणून राहिला तरी पुरेसा आहे आणि यासाठीच उपचार म्हणून उपवास करणे, तसेच केवळ पाणी प्राशन करणे, बस्ती प्रयोग (एनिमा), प्राणायामं, ध्यान योगा इत्यादी करून निसर्गोपचार साधता येतो. निसर्ग उपचारात हेच करवलं जातं.

म्हणूनच अन्न ‘तारी व मारी’ म्हणत असतात. एखादी व्यक्ती जर खाऊन-खाऊन आजारी पडली असेल, तर निसर्ग उपचारामध्ये पहिलं औषध ‘उपवास’ असतं. जो धावून-धावून आजारी पडला असेल तर त्याला ‘थांबवणं’ हे पहिलं औषध आहे. जो बोलून बोंबलून आजारी पडला असेल, त्याला ‘मौन धरण’ हे पहिलं औषध आहे. शोध दिनक्रमातच घ्यायचा. सुई सांडलेली असते एका ठिकाणी, आम्ही शोधतो भलतीकडेच. ती शोधा म्हणजे सापडेल. मागा म्हणजे मिळेल. मागणीनुसार पुरवठा करायला ब्रम्हांड बसलेला आहे. रोग हा परिणाम आहे, चुकीचा दिनक्रम हे कारण आहे. तुम्हाला परिणाम तोडायचा असेल तर चुकीचा दिनक्रमच तोडला पाहिजे. दिनक्रम सुधारला की स्वास्थ्य उगवणारचं. ‘स्व’ म्हणजे स्वतः आणि ‘स्थ म्हणजे स्थिर’. एकूण आरोग्य म्हणजे काय? या वरील सर्व योग्य गोष्टींचा मेळ म्हणजेच आरोग्य. रोग आपल्यापेक्षा मोठा असूच शकत नाही कारण रोगाच्या आधी आपण जन्मलेले आहोत. रोग आपल्यानंतर जन्मला आहे.

आपल्यासारखंच रोगालाही पोट असतं. अगदी आपल्यासारखंच. त्याचही अन्न असतं. त्याच्या पोटाला मिळाल्याशिवाय त्याचा विकास होत नाही. निसर्ग उपचारातला उपवास, रोगाची उपासमार करवतो की त्यामुळे रोग मरू लागतो. बहुधा आपला आळस आणि अज्ञान रोगाचे मिष्ठान्न आहे.

माणूस जिथे-जिथे  पोहचला आहे, तेथून निसर्ग पळाला आहे. निसर्गाला माणूस व्हायरल वाटतो की काय कळत नाही. मनुष्य जिथे    पोहोचत आहे, तेथून निसर्ग बाजूला जातोय. माणसाची गर्दी निसर्गाला प्रदूषित करत आहे. मूळच्या धान्यातलं बळ त्याच्या पीठात असतं नाही. पिठातलं बळ पोळया-भाकरीत असतं नाही. म्हणजेच प्रासेसे केल्याच्या नंतर संस्कारीत अन्न, जितके संस्कार तितके निकृष्ट, जिभेने मंजूरी दिली, स्वाद वाढला की झालं, असं न करता सदृढ शरीराची मंजुरी महत्त्वाची. जिभेच्या कुशीवर स्वास्थ्य अवलंबून असते. आजही मोठया-मोठया रोगांमध्ये ओरिजनल अन्न देऊन ओरिजनालिटी आणलेली आहे.

रोगप्रतिकारक शक्ती आजही आजमावयाची असेल, तर शेठजीपेक्षा शेतक र्‍याकडे तुम्हाला ती अधिक दिसेल. शेठजी कडे, गाडी-घोडा, माडी, औषध-पाणी, नर्स-डॉक्टर, सुबत्ता नावाची गोष्ट मुबलक असतानाही प्रतिकारशक्ती मात्र शेतकर्‍याकडे दिसते. शेतकर्‍यापेक्षाही ती धनगराकडे जास्त दिसेल. जो बकरी चारायला जनावरांबरोबर जनावर होतोय, धावतोय, पळतोय, त्या धनगरापेक्षाही जास्त प्रतिकारशक्ती नंग-धडंग असणार्‍या निसर्गाशी एकरूप झालेल्या कळपातील शेळी, मेंढी, बकर्‍यांकडे अधिक दिसेल. त्याच्यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो. ज्याच्या वाटयाला आकाश, त्यालाच इथे  अवकाश. ज्याच्या हाती काठी, त्याचीच बाकी म्हैस. गारूडयाच्या बुट्टीतला साप व रानोमाळी दिसणारा सळसळता साप, डब्यातली भाकर व शिबडयातली भाकर, यामध्ये आयुष्य कोणाचं अधिक?

जे भाकरीचं ते भाकर खाणार्‍या माणसाचही. तुम्ही निरीक्षण करा. जंगलात राहणारा चंदन तस्कर करणारा एकटया वीरप्पनने सरकारी फौजेला वेठीस धरलं, त्यांच्यावरून इंडियन पोलीस कमीशनरपेक्षा रोगप्रतिकारक शक्ती तुम्ही वीरप्पनकडे पाहालं. यावरून माणसाची व्यवस्था सुविधा जितकी जास्त, तितकी रोगप्रतिकारक शक्ती क्षीण होते. बंगल्यात, शहरात पोसणार्‍या मुलांपेक्षा, तीन दगडावर स्वयंपाक करणार्‍यांची मुलं रोग प्रतिकारक शक्तीनं समृद्ध असतात. वस्तुस्थिती निर्माण होण्यासाठी नैसर्गिक परिस्थिती असावी लागते. मनुष्य हा सस्तन प्राण्यांपैकीच एक प्राणी असताना आता पूर्णपणे फॅक्टरी स्वरूपाचा झाला आहे. फॅक्टरीच्या मालाशीच त्याचं नातं वाढलं आहे. त्यामुळेच तो आज दुःखी आहे, कष्टी आहे, ग्रस्त आहे, व्यस्त आहे.

       माझ्या प्रदीर्घ वैद्यकीय अनुभवात कॅन्सर, एड्स, महारोग इत्यादी अशा प्रकारच्या असाध्य ठरलेल्या रोगांना कमीत कमी दिवसात, जास्तीत जास्त गुण येण्यासाठी नैसर्गिक अन्न सामग्रीने मला हात दिला. झाडाची पानं, फुलं, फळं, मूळ व खोड ही झाडाची पाच अंगेच माणसाचे रोग झाडू शकतात. शरीररूपी घरं झाडू शकतात म्हणूनच या झाडांना ‘झाडं’ म्हटलं असावं की काय! पती म्हणजे नवरा, वनात राहणार्‍यांचा पती म्हणजेच वनस्पती हा राष्ट्रपतीपेक्षा प्राण्यांसाठी मोठा नायक      नाही काय!

उत्क्रांतीवाद सांगतो अमिबापासून ओसामा-ओबामापर्यंत जी माणसाने मजल मारली, जो आज माणूस घडला, हा माणसाचा नमुना उत्क्रांतीवादाचा अखेरचा नमुना आहे. आणि तो निसर्गाचा लाडका आहे. हे ओळखूनच त्याने चोचीनुसार चारा निर्मित केला. काय पाहिजे, काय नाही याचा विचार केला आणि नेमकं ते-ते पानांत, फुलांत, फळांत घातलं. मगं क्षार असोत, ग्लुकोज असोत, मिनरल्स असोत, एन्झाइम्स् असोत, जे हवं ते नेमकं त्यात भरलं त्या डिझायनरला, तुम्ही जेव्हा प्रोसेस करून बदलता, मुळच्या फायद्याच्या कायद्याला धक्का देता, जो कायदा हातात घेतो, त्याची मग गय केली जात नाही. ब्लडप्रेशर, मधुमेह, वजनसमस्या, हृदयरोग इत्यादी हे माणसांना माणसाळलेले रोग सतावीत असतात. हाच तो दंड आहे. तुमचा दंड, दंडांना इन्जेक्शन करून थांबत नाही, तर दंड हे केवळ इंंजेक्शन सहन करण्यासाठीच आहेत ही समज होऊन बसली आहे.

मॉडर्न टेक्नॉलॉजी माणसाच्या शरीरातील प्रतिकारशक्ती घटण्यास कारणीभूत आहे. माकडापेक्षा मनुष्य सुधारला म्हणतात, असे आपण तेव्हाच म्हटले असते जेव्हा मनुष्याने माकडापेक्षा उंच उडी घेतली असती. तेव्हा आपण मानलं असतं कि ही टेक्नॉलॉजी फायद्याची आहे. म्हणूनचं आपल्या पूर्वजांनी मात्र हे ओळखूनच कि काय शक्तीचं संपादन करणारा मल्ल, जय हनुमान म्हणून शक्ती मिळवत होता, दंड थोपटत होता. हनुमानाचे मुख माकडाचे ठेवण्यातही औचित्य आहे. त्याचा आहार शाकाहार ठेवण्यात आला. हा वनात राहणारा नर, वानर. कंदमुळ, फुलं, पान, फळं खाऊन त्यानं गुजराण केली. त्याच्या मर्कट-लीला शक्तीचं प्रतीक म्हणून पुढे आणल्या. एकूण प्रतिकार शक्तीचा आदर केला. यापेक्षाही मॉडर्न टेक्नॉलॉजी पुढे जायला हवी होती. मॉडर्न टेक्नॉलॉजीचे लोक कॉम्प्युटर, टी.व्ही. समोर रांगू लागले.

हळू-हळू पुन्हा ते सरपटतील व पुन्हा अमिबाकडे जातील व पुन्हा लोळा-गोळा होऊन पडतील. हे तुम्हाला मंजूर आहे का? तुम्ही जी अवयवं वापरता त्याचाच विकास होतो. या न्यायाने अनेक प्रकारचा स्वाद अर्थात जगातले विविध संस्कारित अन्न पोटात घालून पोटाची साइज विकसित करत आहात.

पोटालाच फक्त काम देत आहात. हातापायांना काम न मिळाल्याने ते छोटे-छोटे होत आहेत. ते तोकडे होत आहेत. बालमृत्यूचे प्रमाण वाढत आहे. काळया केसांचे तरूण एडस्ग्रस्त होत आहेत. वीस-वीस मुलं होणारी क्षमता असणार्‍या स्त्रिया एखाद्या अप्रूप बाळाला जन्म देताना सिझरिंग करून घेतायेत. मगं हे मॉडर्न टेक्नॉलॉजीचे लक्षण काय?

आपण निसर्गाचे आहोत, आपण आई-वडिलांचे आहोत, समाजाचे आहोत, या शरीराचेही आहोत. ज्यांचे-ज्यांचे आपण आहोत, त्यांचे-त्यांचे आपण देणे लागतो. निसर्गाचही देणं असतं. तसेच या शरीराचही देणं असतं, हे देणं देण्यामध्येच जीवन हरपत असतं. हे देणं दिल गेलं नाही तर समस्यांच्या नोटिसा येतात. देणेकरी उंबरठयावर बसतात. तुम्ही एकदा जनावरं बांधलीत, की तुम्ही त्यांच्या चारा-पाण्याची जबाबदारी घेता. वेळच्या-वेळी चारा पाणी देता तेव्हाच ती जनावरं पुष्ठ होतात. आपल्या शरीराला हात-पाय, खांदे-सांधे, मान-गळा असे अवयव बांधले आहेत म्हटल्यानंतर त्यांच्या हालचालींचा कोठा त्यांना द्यायला नको काय?

पायाला चालवायलाचं हवं, हातांना हालवायलाचं हवं, बोटांना पळवायलाचं हवं, सांध्यांना फिरवायलाचं हवं, त्यांचा-त्यांचा खाना-दाना द्यायलाच हवा. नाहीतर हे देणेकरी तुमच्या उंबरठयावर बसणार! तुम्हाला नोटिसा देणार. त्याची सूजं, फूग हा त्यांचा रूसवाच आहे. वाहणं-गळणं हे त्याचं रडण आहे. रंग बदलणं हे काळवंडणं आहे. घामाला दुर्गंध येणं हा त्यांचा राग आहे. तुम्ही यांची बोली, भाषा समजत नाही. ज्या बाळाची आई समजत नाही अशी आई असत नाही. शरीराचा काना नी कोपरा मालकाशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो.

संकेत ओळखता आले पाहिजेत. संकेत ओळखणार्‍यालाच हुशार म्हणतात, मालक म्हणतात. तुम्ही मालक आहात की भाडेकरू ते तुम्हीच ठरवायचं. भाडेकरूच असाल तर तो भाडयाचं बघेलचं की? असे   लोक म्हणतात.

कचरा नावाची गोष्ट उपचारानिमित्ताने बाहेर काढत असताना स्वास्थ्याला घातक असणार्‍या गोष्टी आपण आत ढकलतं असू तर हेचं आपले अज्ञान आहे. हीच आपली व्यसनं आहेत. वैद्यकीय प्रदीर्घ अनुभवानंतर एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली. स्वतःच्या बरोबर जनावरांना, यंत्र सामुग्रीला विश्रांती म्हणत म्हणत, विंरंगुळा या सदरात तंबाखू खातो, गुटखा खातो, पान खातो, कधी दारू पितो, या निमित्ताने आपण शरीरात कचराच फेकतो.

मी माझ्या रोग्यांना रोगरूपी नऊ दरवाजे बंद करायला सांगतो, त्यामध्ये दारू, मटण, तंबाखू, चहा आणि मैदा, साखर, तांदूळ, मीठ व दूध सुद्धा. काही दिवस सक्तीने बंद केल्याच्या नंतरच मी त्यांच्यात स्वास्थ्यरूपी सूर्यप्रकाश टाकू शकतो. परिणाम असाध्य ते साध्य     होऊ लागते.

माझ्या मते प्रत्येक वस्तूला उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव असे दोन पोल असतात. सेम तसचं सेंटरला विषं असतं आणि कडेला त्याचा उतार असतो. गव्हाचा सेंटर मैदा, उसाचा सेंटर हे साखर, भाताचा सेंटर आहे पॉलिश तांदूळ, म्हशीचा सेंटर दूध आणि पृथ्वीचा सेंटर मीठ. हे सगळेच सेंटर आपल्या सेंटरला धक्का देतात. माणूस जिथवर पोहोचला आहे तिथून निसर्ग बाजूला सरकाला आहे. म्हणून निसर्ग उपचारामध्ये या गोष्टी व्हाइट स्लो पॉयझन मध्ये गणल्या आहेत. ऋषी प्रभाकर यांच्या ‘सिद्ध समाधी योग’ या विशेष स्वास्थ्याच्या कार्यप्रणालीत सदरील गोष्टींचा निषेध केला आहे. निषिद्ध मानला आहे. कोंडा-मांडा खाऊन लोकं धोंडयासारखी राहतात, हा अनुभव आहे. धान्याचा मधला भाग शरीराच्या मधल्याच भागाला डेव्हलप करतो. म्हणूनच ढेर पोट, नितंबाची वाढ एकूणच शरीराचा समतोल ढळतो.

माझ्या पेशंट लोकांना निदान काही दिवसासाठी तरी काय खावं याचे पर्याय सुचविलेले असतात. सूर्याकडे पाहण्यामध्ये डोळे दिपत असले तरी चंद्राकडे पाहणे सहज सुलभ होते. सेम तसेच पठया आहारामध्ये साखरेऐवजी गूळ, पॉलिश तांदळाऐवजी हातसडीचे तांदूळ, दुधाच्या ऐवजी पाच तासांपूर्वी मुरवण लावलेल्या अधमुर्‍या दह्या-ताकाचा वापर सुचविलेला असतो. कोणते पदार्थ कुठे वापरायचे हीच चिकित्सकाची हुशारी असते, अशा रीतीने आहाराच्या तोंडाला जर कमांडो उभा केला तर रोगाच्या पार्टीचे पदार्थ आत उतरणार नाहीत आणि रोगाची निवड होणार नाही, जे पदार्थ उत्सर्जन संस्थेला सक्षम करू शकतात. त्यांचा कौशल्याने समावेश करवून स्वास्थ्याच्या शिखरावर जाता येते.

थोडक्यात मलःनिस्सारण होण्याला व पचायला सुपाचक असणार्‍या पदार्थांची वर्णी लावायची असते. अन्नालाचं औषध बनवायचं असतं. जेवणाच्या पानातले नको त्या गोष्टी बाहेर ठेवून, स्वास्थानुकूल हव्या त्या गोष्टी एकत्र करणं महत्त्वाचं आहे.

औषध नाइलाज म्हणून मी हातात घेतो. औषधानांही हा उपचार शस्त्र मानतो. आपण शस्त्र हातात कधी घेतो. समजुतीनं प्रश्‍न सुटत नसतील, तडजोड होत नसेल मगचं बळाचा, शस्त्राचा वापर केला जातो. मी तर पाहात आहे, कॅन्सर, एड्स, महारोग असे मोठाले रोग केवळ आहारात बदल करून, दिनक्रमात बदल करून बाजूला झाले आहेत.

उपचार म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून सफाई आहे. शरीरातील अडथळे बाजूला काढणे आणि अडथळयाला अनुकूल असणारे पदार्थ बाहेरच थांबवणे हेच ते कौशल्य आहे. हाच निसर्गउपचार आहे. चोचीला अनुरूप आहार निवडणें, वापर व भूक पाहून इंधन भरणे, योग्य आहे, उचित आहे.

रस्त्यामध्ये खाच खळगे, खड्डे एवढेच अडथळे असतात असे नाही. रस्त्यात कसेही आडवी-तिडवी वाहने, बेशिस्तीची वर्दळ हा सुद्धा यात्रेंकरू, वाहनांना अडथळाच आहे. म्हणून भूकेची भावना नसताना आहार स्वीकारणे अयोग्य होईल.

आजचा माणूस कधी नव्हता इतका स्वास्थ्य या विषयावर मात्र चिंता करतोच आहे. जी गोष्ट दुर्मीळ होत जाते. किंवा कष्ट साध्य बनतेे त्यालाच हळूहळू मोल प्राप्त होते. तसे आजचे स्वास्थ्य दुर्मीळ होत चालले आहे. म्हणून मौलिकही झाले आहे.

भौतिक सुखाची परिपूर्णता इतक्या अभ्यदयाच्या शिखरावर जाऊनही मानवाची केविलवाणी स्थिती का बरे? हा आजच्या सर्वसामांन्यांचा प्रश्‍न आहे.

एकीकडे प्रचंड जनसंख्या व स्वास्थ्यानुकूल नैसर्गिक तत्त्वांचा अभाव अर्थात शुद्ध पाणी व शुद्ध हवा यांचे दुर्भिक्ष, यानेच तणावग्रस्त मस्तिष्क व तणावग्रस्त पोट यासह माणूस आडवा होत आहे. अशा दुस्सह अवस्थेत हवालदिल झालेल्या मानवापुढे नाना जाहिराती व नाना विलोभनीय आकर्षणे आज वाकुल्या दाखवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहेत.

दिशाभूल झालेल्या मानवापुढे, काय करावे व काय करू नये, काय योग्य व काय अयोग्य, काय श्रेयस्कर व काय अश्रेयस्कर, काय पथ्यकर व काय अपथ्यकर? याचा गंध चांगल्या पदवीधरांना देखील समजवावा लागतो आहे. हा असा प्रयत्न मानवेतवर, पशू-प्राण्यात केव्हाही करावा लागला नव्हता. ते नेहमीच आपल्या चोचीला अनुसरून अनुरूप चारा निवडीत आले आहेत. हेच त्यांच्या आरोग्याचे रहस्य असावे.

भारतीय संस्कृतीचे नेहमीच कौतुक व्हावयास हवे कारण, भारतीय संस्कृतीने शक्तीचे व स्वास्थ्याचे प्रतीक म्हणून हनुमानाला दैवत स्वरूपात निवडले आहे, आणि या हनुमानाच्या मानेवरील हिस्सा, पूर्णतः माकडाचा ठेवला असून त्यास शेपूटही जोडले आहे. म्हणजे आरोग्य व शक्तीचा संबंध माकडाच्या खानपान-विहाराशी तो नक्कीच कुठेतरी निगडीत असावा... आणि तो तसा आहे ही... पाने, फुले, फळे व अंकुरित धाग्यांनी आज वाटेल तसले रोग काबूत ेयेऊ लागले आहेत. यालाच आम्ही आता, ‘मंकी डाएट’ म्हणून संबोधित आहोत. या पर्यायी हनुमान आहारांनी शिवाम्बूतील विशिष्ट घटक द्रव्यात वाढ होऊन स्वास्थ्याला अर्थात रोग-मुक्तीला पोषक वातावरण तयार होते. भरपूर जीवनसत्त्वे जीवंत स्वरूपात आपल्याला लाभतात. यातूनच जैविक ऊर्जा प्रसवते.

मला राहून-राहून प्रश्‍न पडत राहतो तो याचा की, लोक हनुमानाचा दिवस म्हणून शनिवार हा मटण-मच्छी न खाण्याचा दिवस मानतात व इतर वेळी मात्र खायला मोकळे होतात. यात कोण कोणाला फसवितो आहे? मांजर-नीती, डोळे झाकून दूध पिण्याची व बडगा चुकविण्याची ही केवळ कल्पनाच असेल का? की काही तथ्य आहे, ही कल्पनाच केलेली केवळ बरी होईल?

मी जवळ-जवळ 1965 पासून वैद्यकीय क्षेत्रात वावरतो आहे. काही दिवस औषधासह ग्रामीण रूग्णांना सेवा दिली व आता 1975 नंतर आजपर्यंत औषधाशिवाय शहरी पांढरपेशा सुशिक्षितांच्या पर्यंत सेवा रूजू करतोच आहे व आता मुंबई सारख्या मेट्रोपोलिक शहराशी संबंध जोडून आहे... एकंदर काय? लोकांची दिशाविहीन धावाधाव, विविध रोगांसह जीवनप्रवास, अकाली सहज मृत्यू, कण्हण्या-कुंथण्याचा कर्ण-कर्कश आवाज, दवा-पाण्यासाठी चाललेली धडपड व दवा-पाणी खाऊनही चाललेली तडफड पाहिली म्हणजे मन उदास होते. मानवापुढील आदर्श संपल्याची खंत निर्माण होते. मानवी बुद्धीची कीव येते.

आजचा माणूस तक्या-गाद्यांना, टेबल-खूर्चीला व कॉटला बांधला गेला आहे. त्यामुळेच त्याचा लोळा-गोळा होतो आहे. आजचा माणूस खावयाला कमी पडले म्हणून तो रोगग्रस्त नाहीये, तर तो बहुधा अवाजवी अन्न ग्रहण करण्यातून रोगग्रस्त आहे. तेव्हा आताची रोगराई ही गरिबीतून नाही, तर ती समृद्धीतून आहे.

जिभेचे चोचले पुरविणार्‍या पावलागणिक व्यवस्थेने, समाजाला, या स्थितीला आणून ठेवले आहे. एका समूहाने एका समूहासाठी जे काही केले पाहिजे ते करण्यासाठी ही आमची संस्था कार्यान्वित आहे.

मानवी उगमाकडून उदयाला आलेली, पण... मधल्या काही बेगडया संस्कृतीकडून उपेक्षिलेली अशी ही ‘शिवाम्बू-संहिता’ या एकविसाव्या शतकातही आज संजीवनी ठरलीच आहे. या अशा संजीवनीची प्रतिस्थापना किंवा जिर्णोद्धार जगाच्या पाठीवर अनेक शहरातून चालूच आहे. तशी ती आज कोल्हापूरातही मल्ल पोसणार्‍या वातावरणात स्वास्थ्य पोसवत आहे.

या विषयीच्या समाजातील प्रचलित समजूती व गैर समजूती दूर करून, त्याच्या सत्य वस्तुस्थितीचे प्रतिपादन अनुभवलेल्या जाणकाराकडून मुक्तपणे ते होत रहावे. म्हणून ‘शिवाम्बू हेल्थ रिसर्च इस्टिट्युट’ ची स्थापना केली आहे. याकरिता अशा सहृदयी निसर्गप्रेमी समूहांनी तरी ही जबाबदारी ओळखून, अशा मंडळींनी एकत्र यावे.

ज्या जीवनपद्धतीकडून आपणाला चार क्षण सुखाचे मिळाले आहेत. त्यातले दोन क्षण शेजार्‍या गरजूंना देण्याचा हा प्रयत्न आहे. ही खरी पाहता सहृदयी माणसाची स्वयंस्फूर्त उर्मी म्हणावी लागेल. शिवाम्बूपान करणारी प्रत्येक व्यक्ती याच उर्मीत जगत असते, गुर्मीत नाही.

आजच्या विज्ञानाला आवाहन असणारी व्याधी, म्हणजे मधुमेह, कॅन्सर, दमा, हृदय दौर्बल्य, संधिवात, लकवा, एड्स इ. पर्यंतच्या रोगांच्या विविध मालिकेत, या उपचार पॅथीने आपला प्रभाव दाखवला आहे. याचा अनुभव गेली तीस वर्षे अनेकांबरोबर सतत मी घेतोच आहे.

आमचा शिवाम्बू समाचार अंक वाचून, हजारो महाराष्ट्रातील स्वास्थ्यप्रेमी व रूग्ण पत्राद्वारे व फोनद्वारे धन्योद्गाराबरोबरच आपआपल्या देह-क्लेशावर उपाय विचारत आहे. त्यासाठी सामुदायिकरित्या काढलेल्या शिवाम्बू समाचार पत्रिकेस वाचून     बर्‍याचा सुस्कारा सोडलेली अनेक पत्रे माझ्याकडे पुन्हा संग्रहित होऊ लागली आहेत.

शिवाम्बू निसर्गोपचार ही पॅथी, सहजपणे घरी-दारी सुलभपणे राबविता येणारी सुरक्षित पॅथी आहे. बिनखर्ची स्वावलंबी आहे. स्वयंपूर्ण नैसर्गिक उपाययोजना, जी आरंभापासून मानवी देहातच आहे. याची जाणीव जुन्या ज्येष्ठ संघटनेमार्फत जर होत राहील तर... समूहाचा समुहावर परिणाम होईल. याने लोकमान्यतेबरोबरच राजमान्यताही प्राप्त होईल.

ठिकठिकाणी समूहामार्फत उपचार प्रात्यक्षिके घेऊन समाजासमोर हा जयद्रथ व हा सूर्य, याप्रमाणे हा रोग व ही रोगमुक्ती अशी त्याची फारकत दाखवता येईल.

या महागडया जीवनप्रवासातून देखील, काही श्‍वास मुक्तपणे व स्वस्थपणे कसे घेणे शक्य आहे? याची प्रात्यक्षिके दाखवता येतील.

वेळोवेळी नामांकितांच्या अनुभूतीची व्याख्याने आयोजायला हवीत. मोठी-मोठी होर्डिंंग, पोस्टर्स, उभारून समूहाकडून विना औषध स्वास्थ्याची जनजागृती करता आली पाहिजे.

ज्या कुटुंबीयांच्या मध्ये शिवाम्बूने प्रवेश मिळवला आहे. त्यांचे महागडया औषध द्रव्यांशी नाते संपले आहे. या उरलेल्या पैशातील काही भाग या मंडळींनी या ट्रस्टसाठी राखून ठेवायचा केला तरी, मला वाटते पुष्कळ आहे. या करिता आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनातून, कृर्पाशीर्वादातून, आर्थिक सहयोगातून, आजची शिवाम्बू स्वास्थ्य संघटना स्वतः तर तरेलच व इतरांनादेखील तरवणार आहे.

सर्वांना उत्तम स्वास्थ्याचे रहस्य समजो. सर्वजण आपआपल्या निसर्ग तरतुदींना समजोत व आपल्या सर्वांचे उर्वरीत आयुष्य प्रसन्न सृजित करोत ही निसर्गदेवतेकडे अभिलाषा ठेऊन मी माझी लेखणी   थोडी उचलतो.

एकविसाव्या शतकाच्या अतिप्रगत चालू वर्तमानात सुद्धा, अति प्राचीन पण प्रभावी उपचार पद्धतीची कास धरून, ती चिकाटीने राबवून, हजारो दिशाविहीन लोकांना नैसर्गिक स्वास्थ्याचे धडे देणारे, निसर्गाचे प्रतिनिधित्व करणारे, पर्यावरणाची गरज समजावून देणारे, आपले नेमके चुकले कुठे? याची योग्य प्रचिती देणारी, काया-माया-मने अविरत राबणारी संस्था म्हणजेच ‘आनंदकुंज’.

आपल्या देशात, तेही महाराष्ट्रात सतत पन्नास वर्षे मी आज खपतो आहे. माझा संपूर्ण परिवार जनस्वास्थ्याकरिता झुंजतो आहे. दुसरे चिरंजीव. ‘विनाऔषध स्वास्थ्य’ या सामाजिक आंदोलनात आपल्या पालकांच्या व्यासंगात सहभागी झालेत.

मधुमेह, सांधेवाई, लकवा, हृदयदौर्बल्य, वजन समस्या व महारोगापासून सर्दीपर्यंत कोणत्याही मानवी रोगाच्या मुक्तीची हमी देणारा विनाऔषध स्वास्थ्य प्रकल्प समोर ठेऊन, त्याद्वारे मानसिक शारीरिक व बौद्धिक परिवर्तन घडविण्याचे काम कोल्हापूर सारख्या ऐतिहासिक शहरात अहोरात्र चालू आहे. हे कोल्हापूरच्या भूषणापैकी एक नक्कीच म्हणावे वाटते.

आपोआप आलेल्या रोगांवर आपोआप उपचारही कसा होऊ शकतो? याचे प्रात्यक्षिक पुणे, मुंबई, रत्नागिरी, गोवा, पंढरपूर, सोलापूर, लातूर, नाशिक, औरंगाबाद, परभणी, बीड, फलटण, वसमत येथे सर्वत्र शिबिराद्वारे मार्मिक जन प्रबोधन करीत आलो आहे.

लाखो रूपये खर्चून स्वास्थ्याची परिसीमा ओलांडलेले दुर्दैवी हवालदिल विश्‍वभरातील लोक, या कोल्हापूर येथील निवासी जागेत आश्रय घेत असताना दिसतात.

कुंथणार्‍या स्थितीत विव्हळणार्‍या, रांगणार्‍या, आडव्या माणसाला सहानुभूतीवर, काम होतयं....? म्हणून विचारण्याची देखील इथे सोय राहिलेली नाही. मग तो वाटसरू असो किंवा घरातला एखादा सदस्य. तो जे काय वर्तवेल त्याच्या पुढयात औषध टाकणं किंवा त्याला अनुभव उपाय कथन करणं, आणखी महाग झालयं. आतून रोगाचं बुक्कलनं आणि वरून महागाईचा आघात...डॉक्टर, औषधं, त्या तपासण्या, त्या रांगा कसं सारचं अगदी कठोर... कुठं थोडाही नाही माणुसकीचा ओलावा... काय कसले आलेत हे दिवस...? आधीच तुमच्या रोजच्या रडगाण्याची कोणीच दाद घेत नाही म्हणता... घरचे-दारचे सारेच ऐकून थकलेत म्हणता... आणि म्हणून आत्महत्या...? मग तर... मुळीच नको. हा कागदच पुनःपुन्हा वाचा तकदीर देखील लाजून आपलं पान पालटेल म्हटलं!

उपचारकर्तेही रूग्णाच्या खिशाला अशक्य व्हावीत अशीच औषधं जणू निवडायची स्पर्धा खेळताहेत. प्रगतीचे स्तोम उभे करणार्‍या समाजाने औषधं आणखी महाग करायचे ठरवली आहेत. आधीच रोगानं आंबून गेलेल्या तोंडाना, महागाईनं आणखीन द्राक्षे आंबट म्हणायची वेळ नाही का आली? काय औषधं निर्मात्यापासून वितरण करणार्‍यापर्यंत कोणा एकालाही रूग्णाच्या जीवितव्याची फिकीर म्हणून वाटू नये? अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली मी म्हणतो अक्षरशः लूट चालली आहे. मग तुम्हीच सांगा, दवाखान्याच्या पायर्‍या चढण्यास बळ रूग्णांमध्ये येणार तरी कसे? तरीसुद्धा, मी माझ्यापरीनं, अनुभवानं या जीवनचक्राला काही अंशाने तरी, निश्‍चित गती देऊ शकतो. अख्खी मनुष्य जात आपला खरा दागिना, आरोग्यालाच तर मानीत आली आहे. अधूनमधून बिघडणार्‍या आरोग्याला सावरता यावं, याच करिता आयुष्यभर तो कनवटीला पैसा बांधतोय. उणीपुरी कुटुंंब व्यवस्था याच चिंतेतून उभी करतोय.

मनस्थिती, वस्तुस्थिती आणि परिस्थिती यांचा परस्पराशी मेळ बसला की, तुमचं आरोग्य जन्मू लागतं. यांचा मेळ विस्कटला की, रोग गिळायला लागतो.

प्रत्येकाचं पोट वेगळं, त्याच्या भरपाईकरिता कष्ट घेणारे त्याचे हातपाय वेगळे, त्याची बुद्धी, त्याचं भाग्य... सारं सारं वेगळं, त्याला कुठचचं काही कमी पडू नये याची काळाने चांगलीच काळजी घेतली आहे. तुम्ही जन्मण्याआधी मातेच्या स्तनात दूधाची निर्मिती तुम्ही नव्हती केली. हे सारं जणू कसं निसर्गाचे अगदी पुर्वदक्ष नियोजन दिसतयं.

बरेच विचारवंत भाग्यवान या उघडया निसर्गाचं इंगित ओळखूनच, ‘तेरी चुप मेरी चुप’ करीत काही चुप्पीचा मार्ग अनुसरताना दिसताहेत, आम्हीच वेडे, मोरारजी सारख्यांना नावे ठेवली, पण जेव्हा समाजात नजर टाकली, बरेच छुपे मोरारजी कानात बोळे घालून, डोळयांवर चामडे ओढून सुस्थितीत आपले आयुष्यमान वाढविताना दिसताहेत. या अभाग्यांनाही हा मार्ग माहीत झाला तर... आपला खरा दागिना म्हणजे आरोग्य, तेही सांभाळू शकणार नाहीत का?

महागाईवर ढासळलेल्या मानवी नीतिमूल्यांना मुठमाती देऊन, ज्याचं त्यानं आपलं आरोग्य जरी सांभाळले तरी, थोडं थोडकं नाही.

सुरज न बन पाये, तो बनके दिपक जलता चल...

फुल मिले या अंगारे, सच की राहोंपे चलता चल...

दिलकी पुकार सुनता चल... जीना है तो औरों को जीवन देता चल...

निसर्ग जितका कठोर तितकाच दयाळूपण दिसतोय, रोगाच्या निर्मिती बरोबरच किंबहुना त्याच्या इर्दगिर्द औषधही उधळवून तयार ठेवतोय असं दिसतयं. रोग्याला जणू धावाधाव करण्याचं कारण उरू नये.

जिथे कोमल फुल आहे, तिथेच जवळपास कठोर काटा पण आहे. जिथं दिवस आहे तिथचं जवळपास अंधारी रात्र नाही का? मग जिथे घोडयाची लिद पडलीये, तिथूनच कुठे जवळपास घोडा नाही मिळायचा? मग जिथवर रोग पीडा या मूलभूत समस्या आहेत, तिथूनच कुठेतरी जवळपास शिवाम्बूसारख्या संजीवनीच उत्तर, नाही हाती लागायचं? त्याचं तसं नवल वाटायचं तरी काय कारण आहे? सारं विश्‍वच चंद्र आहे. विश्‍वाच्या काठीच्या एका टोकाला विळा तर दुसर्‍या टोकाला भोपळा टांगलेला नाही दिसत. मी म्हणतो निसर्गाचं सांकेतिक इंगित ओळखायलाही प्रौढत्व हवं.

कुणी विचारवंतानी जीवनालाच प्रवास म्हटले. एसटी बसमध्ये, प्रवासी हितोपदेश या नियमाखाली मागील बाजूस छोटया खिडकीच्यावर चक्क, संकटकाळचा मार्ग म्हणून लिहिलेलं तुम्ही पाहिलं असेल. अपघातग्रस्त बसमध्ये, प्रवासी सहीसलामत व सत्वर बाहेर पडण्यास ही पुर्वदक्ष खिडकी जशी निश्‍चित उपयोगाची ठरते. तसे रोगग्रस्त स्थितीमध्ये सहीसलामत सुटका करून घेता यावी म्हणून, ही छोटेखानी लिंग योजना तर नसेल?

मधल्या काही बेगडी संस्कृतीनं लिंग आणि इर्दगिर्द वस्तुस्थितीलाच अस्पृश्य करून ठेवलं. खरेतर जे दोन पायाच्या ढेंगेमध्ये स्वतःच लोंबकळत राहून, तुम्ही मात्र कुठेच लोंबकळू नये म्हणून ज्याने स्वतःकडे क्षमता बाळगली. ज्याने तुमची काळजी वाहिली. या बहुगुणी सेफ्टिव्हॉल्वलाच अस्पृश्य करून सोडलतं.

लिंगज्ञान किंवा लैंगिक शिक्षण आवश्यक म्हणून कलकल करणार्‍यांनी तरी, आम्ही म्हणतो त्याच्या नोंदी किती घेतल्या आहेत, कोणास ठावूक? लिंगास जरा बोलतं कराल... तर तो बरच इंगित बोलेल सुद्धा. कसं ते बघा-

लिंग उवाच ः

मित्रहो! मी लहान तोंडी मोठा घास घेतो म्हणाल, तुम्ही तुमच्या गत काळाकडे पाहिलात, तर आजही उचकटलेल्या आरोग्याची घडी बसवायला अगदी महागाईतून दारिद्रयातून सुद्धा, सहीसलामत ठेवण्याच्या किमये करिता पुन्हा मीच समर्थ कसा असू शकतो? थोडं स्पष्टचं करू इच्छितो. खर तरं मला तुम्ही अस्पृश्य समजून शुद्र मानायचं कारण नव्हतं. तथापि देवाधिदेव, तुमच्या महादेवांनी, म्हणजे शंकर भगवान यांनी जे मला ओळखलं, आणि त्यांनी माझी जी प्राणप्रतिष्ठा प्रस्थापित केली. तसा आदर, तसा परिचय आजपावेतो कुणीच करून दिलेला दिसत नाही.

महादेव पिंड, महादेव लिंग सदरात जे म्हणून पुज्यनीय दैवत, दगड रूपात मानीत आलात, हे दैवत आहे तरी काय? ही माझीच खरी तर प्रतिकृती आहे. माझाचं मुखडा आहे म्हटलं तर, माझं अस्तित्व आहे. माझेच माहात्म्य आहे. तुम्हाकडे मुळी दृष्टीच नाही, मग दूरदृष्टी तरी कोठून येणार? तुम्हाकडे समता नाही, मग विवेक तरी कोठून येणार? एकाच देहाच्या भिन्न भिन्न अवयवांना, तुम्ही भिन्न भिन्न वागणूक देता. सर्वांची निर्मिती एकाच घटक द्रव्यापासून होऊनही, महत्त्व देताना पार्सेलिटी करता. वर्णभेद करता. मी म्हणतो तुम्ही ठीक मूल्यांकन करताच कुठे. आपण जितकी स्वच्छता नाका डोळयांची ठेवतो, तितकी हातापायांची कुठे ठेवता माझी तर मुळीच नाही ठेवीत. माशी नाकावर बसली तर ते नाही ठेवीत खपवून घेतलं जातं. अन्यत्र कुठेही घाण केली तर ते मात्र तुम्हाला खपतं. यामुळे तुमच्यातला मत्सर माझ्या लक्षात येतोय.

ऐका! हाताच्याच अंतरावर माझा निवास दोन घणघणीत अशा, मांडयांच्यामध्ये सुरक्षित जागेत आहे. कधीही कसेही पडलात आदळलात, तरी मी सेफ राहू शकतो. पण... एक गोष्ट तुम्हाला माहीत नाही की मी तुम्हाला सेफ ठेवूही शकतो.

तुमच्या सर्वांगीण शरीराची योग्य निगा ठेवणार्‍या निष्णात कौटुंबिक वैद्याची सेवा, मी देऊ शकतो म्हटलं. तसा माझा उपयोग तुम्हाला काय तो, एकतफीर्र्च माहीत आहे. जननेंद्रिय, वारसदार, प्रजनन, एन्जॉयमेंट इ. शब्दप्रयोगात समूहपती म्हणून माझा परिचय करून देण्याचं कारणआता राहिलेलं नाही. हा परिचय होईपर्यंतच काय ते तुम्ही कुमार असता, अन्यथा प्रौढ समजले जाता. पण मी म्हणतो, जे प्राणी माझा उपयोग, सक्षम आरोग्य राखण्याकरिता करतात, यांना तुम्ही काय म्हणता? वास्तविक यांना तुम्ही महाप्रौढ किंवा महामानव म्हणायला पाहिजे. हीच ती मानवाची उत्क्रांती सुद्धा ठरेल.

मला हे कळत नाही कि तुमची संस्कृती नेहमीच मला विकारांची शिरोमणी मानते? मला बंदोबस्तीत ठेवीत आलात. माझ्या सद्गुणांकडे डोळेझाक करीत आलात. तुमच्या मायाबाजाराच्या केंद्रस्थानी मलाच उभे केलात. तुमची सारी मूल्यांकन, सौंदर्य, संगीत, विनोद सुखाच्या कल्पना माझ्याच भोवती पिंगा घालीत ठेवलीत. तुमच्या समाजानी परत मला नजरकैद करून बंदोबस्तीत ठेवलं आहे. म्हणे भलत्याच ठिकाणी तुमच्या मनातली घालमेल माझ्या लुडबुडीनं स्पष्ट होईल आणि तुमच्या एकंदर बेगडी व्यक्तिमत्त्वाला तडा जाईल.

खर तर तुमचं मनच वासना वडाळ आहे. खापर मात्र माझ्यावर फोडता, मन तुमच्या देहाचा प्रेसिडेंट असून मी सेक्रेटरी आहे इतकचं! बर्‍याच वेळा प्रेसिडेंटच्या तालावर सेक्रेटरीला हलावं लागतं, नाचावं लागतं. मन हे कारण असून मी हा त्याचा परिणाम आहे. डोळ व मी आम्ही दोघे कारस्थानी मनाचे प्रक्षेपक आहोत. म्हणून तरी गुन्हा अन्वेषक मंडळी गुन्हेगाराच्या बोलक्या डोळयांनाचं प्रमाण मानतात. सगळे सायक्यॉट्रिक व मेंदूचे विशेषज्ञ आपल्या रोग निदानात डोळयांच्या इर्दगिर्द आपली यंत्रणा उभी करतात. मनच, जाऊ नये तिथेंच जातं, खाऊ नये तेच खातं, करू नये ते करतं, वैरी ना चिंती ते चिंतत आणि म्हणून म्हणतो, साप साप म्हणून मला कासर्‍यालाचं अजूनी किती दिवसं धोपटणार आहात? महाशय खरं सांगतोय.... आम्ही तुमच्या देहात दोन इंद्रिये अशी काही आहोत म्हणता, अगदी मधोमध आणि मदनमस्त सरळ लंब रेषेत, बिन हाडांची छोटी रूपं, पैकी एकाला जीभ म्हणतात आणि एकाला लिंग. ही दोनही इंद्रिये आम्ही तुमच्याच मनाचे प्रक्षेपक आहोत, मनाचे प्रामाणिक सेवक आहोत. मनाला मोकाट सोडलं तर, ही आम्ही बिन हाडाची इंद्रिये तुमची हाड आणि हाड ढिली करू शकतो म्हटलं!

खरं सांगू ,तसं पहाल तर, मी तुमचा बाप आहे. तुम्ही माझे पाल्य आहात. तुमचे रक्षण करणं माझे कर्तव्य आहे. तुम्ही मळलात तर मी झाडू बनेन. कारण घाण हाच रोग असून सफाई हा वैद्य आहे. मला का कुणास ठाऊक, तुमची दयनीय स्थिती पाहवत नाही.

मी सांगितलंं तर तुम्हाला पटणार नाही, पण तरीही सांगतो. पिकतं तिथं विकत नाही. तुमच्या आरोग्याचा सर्व खजाना माझ्या स्वाधीन आहे. निसर्ग आणि तुम्ही यामधला मी दुवा आहे. पुल आहे. काही   चाणाक्ष प्रौढ चिकित्सक मला ‘सेफ्टीव्हॉल्व’ म्हणताहेत आणि ते अगदी रास्तही आहे.

याशिवाय गाफिलतेनं अनावश्यक असं तुम्ही जे गिळता, ते सर्व पदार्थ व ती घटक द्रव्ये, माझ्या मार्गानी मूत्ररूपाने बाहेर टाकले जाणारे पदार्थ, मूत्रातून शोधूनच, अमूक-तमूक रोग म्हणून तुमचे फॅमिली डॉक्टर दोषारोपाची घोषणा करू लागतात. काय गंमत आहे नाही....?

तुम्ही नजीकच्या काळात काय खाल्लं आहात यावर, तर कधी किती श्रम घेतलात, कधी अती जुलाब किंवा मधुमेह सदृश रोग पिडेच्या कमी-अधिक तीव्रतेनुसार, तहान लागणं अवलंबून राहतं. अवाजवी आयात झालेलं पाणी, माझ्याद्वारे मूत्ररूपात बाहेर पडतं. त्या-त्या क्षणाला देहात अवाजवी झालेली घटक द्रव्ये, किडण्या मूत्रात समाविष्ट करून टाकतात. एकंदर काय खाल्लात व त्यावर पाणी किती प्यालात यावर सर्वस्वी मूत्राची घनता, उग्रता, तीव्रता, कटुता इ. स्वादमुक्त गोष्टी अवलंबून राहतात. देहांतर्गत एखादा ग्रंथी किंवा अवयव चुकारपणा करत असेल किंवा टाळेबंदी संप पुकारत असेल किंवा त्याचा कामाच्या प्रसंगी बोजा वाढला असेल, तर त्याचा परिणाम संबंधित घटकद्रव्ये वाढून, मूत्रात समाविष्ट होतात. तेव्हाच तुमचे शहाणे फॅमिली डॉक्टर, मूत्र परीक्षणाच्या द्वारे नाना प्रकाराने त्याच पदार्थांना शोधून, हेरून, संबंधित ग्रंथी किती टक्के नाकाम झाले आहे, रिपोर्टद्वारे नोंद करतात.

तुम्ही संपादन केलेला साडेतीन हाती मातीचा पुतळा इतका म्हणून जटील आहे, की काही विचारू नका! सर्वांना सर्व कळेलच असं नाही. बरच डोक्यावरून जाईल. केवळ याच करिता मुद्याचं कथन करावं म्हणतोय. तुमचं रांगणं, कुंथणं, कण्हणं दूर होऊन, सक्षम असं दमदार, संयमी, आनंदी असचं तुम्हाला पाहावं. याच करिता ही थोडी यातायात मी चालवलेली आहे.

मित्रहो! माझ्यामार्गे बाहेर पडणारं पाणी खारं असलं तरी, यात खूप रहस्ये दडून आहेत. सार्‍या धर्तीची दौलत दर्यात दडली म्हणतात. तसं सार्‍या जीवनाची, देहाची दौलत मी माझ्या खार्‍या पाण्यात सांभाळून आहे. आपल्या संस्कृतीत काय ते केवळ दुर्मीळतेला महत्त्व दिसतयं, मी बाहेर मुबलक पाणी फेकतो. याकरिता माझ्यातल्या पाण्याची किंमत कवडी मोलाची केलीत तुम्ही. तुमच्या खर्‍या दागिन्याचे मौलिक ऐवज त्यातून तुम्ही रोज दवडत आहात. माझ्यातल्या पाण्याची खोली, उंची तुमच्यातल्या बहुसंख्य लोकांनी जाणलीच कुठे?

किती मी अभागी? काय माझं नशीब? भूत काळात अशी मी किती माणकं आजवर दडवली बरं?

कोणाला मित्र म्हणावं कोणाला शत्रू याच देखील साधं भान असू नये. मित्रांना शत्रू आणि शत्रूना मित्र समजलात, तर जो गोंधळ होईल, तेच इथं नेमकं मी पाहतोय. तुम्ही मित्र तरी यानाच म्हणता ना... कि जे संकटकाळी धावून येतात व यथा शक्ती मदत करतात, महाशत्रूची चाहूल देतात.

कोण म्हणून आपल्याच बुरूजावरच्या खबर्‍या शिवाय गबर्‍या अशा, आपल्याच प्रामाणिक शिपायांना गोळया घालून ठार करवेल?

चोर पावलांनी आत प्रवेशलेल्या अज्ञात चोराची खबर ज्ञात करणार्‍या यंत्रणेला कोणी समजूनच घेतलं नाही. या संपूर्ण यंत्रणेलाच अ‍ॅनासिन, आयस्प्रो, व्हिक्स आणखीन काय काय म्हणून सांगू तोफगोळयांच्या समोर उभे करता. धनी..धनी.. म्हणत कानी खबर देणार्‍याचाच कानाखाली असं काही ठेऊन देता...की काही विचारू नका. वारंवार हे असचं चालू राहतं, अनं मग एकनिष्ठ सेवकाला फितुरी करावीशी वाटते. धन्याशी द्रोह करावा वाटू लागतो. चोरच त्याला आपलासा वाटू लागतो.

मानवप्राण्याचे अन्न म्हणजे केवळ भक्षण करतो. इतक्याच त्याच्या मर्यादा नसून, क्षणाक्षणाला स्विकारली जाणारी हवा, पाणी, क्षणोक्षणी विचारांचे निर्माण होणारे तरंग, या सर्व इंधनावर त्याची प्राणज्योत झेपावत असते. यात हवामान, पाण्यातील बदल, आहाराचा दर्जा इ. तनाच्या व्यवहारात, तर विचारांच्या उगमात म्हणजेच मनाच्या इंधनात एकूण ऊर्जा निर्माण करण्याच्या क्षेत्रात कुठेही, थोडाही प्रक्षोभक अशी प्रवेशलेली गोष्ट, त्याच्या प्रमाणानुसार परिणामास पात्र होणारच! मग तुम्ही कुणीही असा, स्वतःला काहीही समजत असा हा कुदरती कानूनचा रिवाज आहे. या तुमच्या जगात, विनाकारण झाडाच पानही हालत नाही म्हणतात.

मी म्हणतो तुमच्या देहावर तिळा इतका फोडदेखील कारणाशिवाय नसतोच मुळी! जिथे सुई हरवली तिथेच शोधा! सुई हरवलेल्या जागेत कदाचित अंधार आहे. म्हणून प्रकाशात बाहेर शोधतो म्हणाल, तर तुम्हीच सांगा काय उपयोग होणार? आपलं सारंविज्ञान परिणामावर उपाय करताना दिसतयं. काय ही आंधळी वाटचाल नाही?

जसं चुलीत शिगार राख असेल तर धूर होईलचं. धूर हा परिणाम आहे, कारण दूर करताच परिणाम दूर होईल. कोठयात मलसंचय असेल, पोट अशुद्ध असेल तर त्याचा परिणाम डोके दुखेल, रक्तदूषित होईल, पण तुमच्या स्वास्थ्याचे ठेकेदार कारण मुळावर औषधं देणारच नाहीत. कारणांना न हुसकता परिणामांना हकलायला जातात. ‘डोकं दुखतयं तर लावा बाम मग होऊ द्या बोम’, ‘फोड आलाय तर लावा मलम,’ लागेल तर करूया कलम, ‘पोट दुखतय तर फाडा पोट होऊ द्या खोट’ काय हा उपचार झाला? हा माथेफिरूचा उपद्वयाप नव्हे? घरा शेजारचा उकीरडा उपसलात तर दुर्गंध दूर होईलच..., की उदबत्ती लाऊन, अत्तर लाऊन, फेस पाऊडर लाऊन, जी हातसफाई करता, काय ही दिशाभूल नव्हे...? तमाम हमाम लाऊन तरी काय उपयोगाचे होणार? यानेच विविध रोगात अडकला आहात, तुमचं अज्ञानचं रोगांना पोसतं, वाढवतं.

आपल्या मूत्रात तुम्हाला जो दुर्गंध येतो हा आत साठून राहणार्‍या उकिरडयाचाच परिणाम आहे म्हटलं! जशी ती आहे ती तशीच स्वीकारा. घेऊन तरी पहा... आणि काय आश्‍चर्य, आपोआपच स्वच्छ निरगंध शिवाम्बू अगदी नारळ पाण्यासारखी बाहेर धावू लागेल. शिवाम्बू प्राशनाच्या आरंभी त्याची चाचणी नका करू. त्यात पाहातही नका थांबू. तुम्ही त्याक्षणी कसे असणारं त्याचेच ते प्रतिबिंब आहे.

देहात निमिष मात्रात रॉकेल पेट्रोल टपकल्याप्रमाणे सर्वत्र ते पसरतं व देहातल्या खतरनाक अतिरेक्यांना गच्यांडी देत मलाशयात हजर करत. प्रथम स्थूल अतिरेकी नंतर सूक्ष्म अतिरेकी, तद्नंतर सूक्ष्मतम अतिरेकी असा क्रम चालू राहतो. हे अतिरेकी जाता-जाता गप्प जात नाहीत. खोडया करणं व करतचं राहणं हेच त्यांना प्रशिक्षण असावं, कारण त्या काळात बहुतेकाचं गुद्द्वार भगभगून जातं. मुरडा येणं, मळमळून उलटया होणं, थोडी बेचैनी होणं यापैकी काहीही शक्य आहे. नाकातील शेंबूड, घश्यातील बेडका, ठसका या सार्‍या घटना प्रवेशलेल्या विषाणूंना बाहेर ढकलण्यासाठीच असतात.

क्रमश:


डॉ. शशी पाटील एक महान सेवाभावी चिकित्सक होते. 'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' हे त्यांच्या जीवनाचे ब्रीद होते. ते नेहमी निस्वार्थ व निर्मळ भावनेतून रुग्ण उपचार करायचे, त्यामुळे त्यांच्या फक्त हातालाच नव्हे तर त्यांच्या वाणीला ही गुण होता. त्यांच्या अनुभवसिद्ध उपचारांमुळे अनेक रुग्ण दुर्धर रोगातून मुक्त व्हायचे. मूलतः डॉ. शशी पाटील हे एक आध्यात्मिक साधक होते. प्रत्येक औषधोपचाराचा प्रयोग, ते प्रथम स्वतःवर करून पाहायचे. त्यांचा शिवांबू, योग, निसर्गोपचार व आयुर्वेदाचा फक्त प्रगाढ अभ्यास होता असे नाही तर ते एक उत्तम हस्त कुशल उपचारक होते. मॉलिश व ॲक्युप्रेशर यासारख्या उपचार कलेमध्ये ते निपून होते. ते एक उत्तम लेखक व कवी सुद्धा होते. त्यांनी आरोग्य विषयक अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. ते आरोग्याचा गहन विषय रुग्णांना दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे देऊन सहजपणे पटवायचे.त्यांचे आपल्या वाणीवर चांगले प्रभुत्व होते. प्रस्तुत ‘मुळनक्षत्री - एक प्रेरणादाई जीवन-धारा’  या लेख मालिकेतून आम्ही  डॉ. शशी पाटील यांचे  ‘जीवन चरित्र’ क्रमश: प्रकाशित करीत आहोत. आज हजारो लोकांसाठी त्यांचे जीवन, नव-प्रेरणेचा स्त्रोत आहे.
Previous Post Next Post