रोगाचे सारेच मित्र, आपले शत्रू 

जसं आपणाला एक पोट आहे, तसंच रोगालाही एक पोट आहे. आम्ही आमचं भरतो आणि तो त्याचं भरतो. रोग म्हणजे समजा आपला शत्रू आहे. जो आपल्याला आडवा करतो.  जे त्याचे मित्र आहेत, तेही आपले शत्रूच होत. चोराचा माल विकत घेणार्‍याला आपण चोरच म्हणतो. शत्रूला पोसणार्‍या  टोळीला आम्ही शोधायला पाहिजे, मी जेव्हा, ती शोधू लागलो, तेव्हा त्या टोळीचा नायक आहे, जीभ व अधाशी मन हे समजलं. शत्रूचे मित्रही, आपणाला शत्रूच आहेत. तेव्हा शत्रूंचा आहार, त्यांची रसद, त्यांचे मित्र हे सारेच आपण वेळेवर ओळखलं पाहिजे.

शत्रूचा मित्र छोटा असला तरी किंवा मोठा असला तरी, दुर्लक्ष करू नये. निखार्‍याचा ठिणगीला छोटा म्हणू नये. मोठा शत्रू म्हणायचा झाला तर, आपला आळस व अज्ञान यालाच म्हणायला हवे. दारू, मटण, तंबाखू, चहा यांना छोटे शत्रू म्हणण्यात अर्थ नाही. आपणाला आडवे करण्यात जे पुढाकार घेतात. ते आपणाला चांगले माहीत व्हायला हवेत.

आपण मरतो कसे? तुम्ही एकएक मतानेसुद्धा दिल्लीचे राज्य कोसळताना पाहिलं की नाही, तसंच तुम्ही पण, एकएक चुकांनी कोसळता.

अयोग्य अन्न 

भूक नसताना घेतलेला आहार किंवा भुकेपेक्षा अधिक घेतलेला आहार, हे दोन्हीपण आपल्याला बिछान्याकडे खेचीत असतात.  आरतीमध्ये असलेले तेल वातीमधून ज्योतीला पोहोचते, ज्योत प्रखर होते. तसं पोटात अन्न पोहोचताच, आपण प्रसन्न होण्याऐवजी ग्लानी येत असेल किंवा आहारानंतर पाणी खेचणारे जे अन्न आहे, ते अयोग्य समजले पाहिजे.

व्हाईट स्लो पॉयझन

मीठ, साखर, मैदा, दूध व तांदूळ हे पाचही पदार्थ सर्वसामान्य समारंभासाठी मान्य असले तरी, यांच्या सातत्याचा परिणाम आडवे (रोग) होण्यास मदत करीत आला आहे. मेदप्रकोप, बद्धकोष्ठता, हृदयदौर्बल्य, सांधेवाई, अस्थमा, ब्लड प्रेशर, मधुमेह, कॅन्सर या विविध रोगांच्या निर्मितीचे हेच कारण आहेत, उगमस्थान आहेत. देह स्थूल होण्यात, जड होण्यात यांचा समावेश दिसला आहे. मव्हाईट स्लो पॉयझनफ या संज्ञेखाली निसर्गोपचाराच्या विचारात यांचा उल्लेख आहे. तसं पाहिलं तर मीठ पृथ्वीचा सेंटर, साखर उसाचा सेंटर, मैदा गव्हाचा सेंटर, पांढरा तांदूळ भाताचा सेंटर या पाचही सेंटर्समध्ये तंतुमय अन्नाची योजना नाही. त्यामुळे आपल्या अवयवांचे व धडाचे सेंटर्स फुगून खराब होतात. ही निसर्गबाह्य बनावट आहे. हा गतानुभव लक्षात घेता, आहारामध्ये यावर नियंत्रणाची गरज आहे.

रोगमुक्तीतले अडथळे

आपल्या आरोग्यास धक्का देण्यास निमित्तमात्र होणार्‍या अन्नपदार्थांचा ओझरता कानोसा आपण घेतला. धगधगलेल्या चुलीमध्ये ओले लाकूड खपावे, याप्रमाणे ज्यांची शारीरिक हालचाल प्रचंड होत असते, उदा. कुमार, युवावस्था व काबाडकष्ट करीत असलेले लोक यांना या काळात कदाचित दुष्परिणाम जाणवणार नाहीत. प्राणिजन्य सर्वही अन्नपदार्थ अगदी दुधापर्यंत वर्ज्य आहेत. त्यामुळे रोगमुक्तीच्या कामात ते अडथळेच ठरतात.

अन्न हेच औषध

मानवी देहरचनेचा विचार करता, माणूस हा शाकाहारीच प्राणी स्पष्ट होतो. त्याचा मूळचा आहार म्हटले तर वनस्पतीच होत. पती म्हणजे पालक, पालन करणारा, सांभाळ करणारा. रोगातून स्वास्थ्याकडे जाताना तरी, किमान मूळ, प्राथमिक आहारावरून जाणेे, निसर्गोपचारात उचित ठरते. अन्न हेच औषध, यामार्गे जात असताना रोग्याचा आहारच महत्त्वाचा ठरतो. व्याधीच्या निर्मितीमध्ये, तनाचा व मनाचा आहार, याचे संतुलन बिघडल्यामुळेच रोगाची हजेरी लागलेली असते. तन व मन समतोल ठेवणे हेच चिकित्सकाचे व स्वास्थ्यसाधकाचे कर्तव्य आहे.

स्वास्थ्याचे दैवत हनुमान 

इतिहासकालीन पारंपरिक हिंदू संस्कृतीचा व धर्माचा कानोसा घेता, आपण हनुमान हे भक्ती, शक्ती व युक्तीचे दैवत मानतो. हनुमानाचा आहार स्पष्ट व्हावा म्हणून मुद्दाम हनुमानाचे मुख वानराचे ठेवले आहे. वानर म्हणजे वनात राहणारा मनर, कंदमुळं, फळं, पाला यांवर गुजराण करणारा प्राणी. हे वनस्पतिजन्यच आहे. उड्या घेणं व उड्या मारणं हाच त्यांचा उद्योग. उड्या म्हणजे आनंदाचे, प्रसन्नतेचे व स्फूर्तीचे प्रतीक, शक्तीची निशाणी अशा उड्या आनंदाच्या, शक्तीच्या, भक्तीच्या व युक्तीच्या सतत मारायच्या झाल्या तर, आम्हीपण त्यांना आनुषंगिक आहार निवडावा, हा संकेत पूर्वजांचा नसेल कशावरून?

जय हनुमान, नाही अनुमान

डार्विनही म्हणाला होता, ममाणूस हा वानराचा वारस आहे आणि वानर हा माणसाचा वंशज आहे.फ माणसाच्या देहाची विशिष्ट ठेवण लक्षात घेता, दात, नखे, जबडा, आतडी, बचाळ्या पाहता माणूस, वनस्पतिजन्य आहाराचा आहे. मला चिकित्सक या नात्याने, रुग्णाच्या आहारातील प्राणिजन्य पदार्थ व दुग्धजन्य पदार्थ बंद ठेवून, रुग्णांना आरोग्य मिळवून देण्यात, ते टिकवून ठेवण्यात, हनुमानी आहार-विहाराने सर्वस्वी यश आलं आहे. म्हणून निसर्गोपचाराचा पुरस्कृत देव म्हणायचा झाला तर मजय  हनुमानफ म्हणणेच योग्य आहे. निसर्गाची सोबत, नैसर्गिक आहार, कमीत कमी कपडे (परिग्रह) व सतत जागरूकता, ही आरोग्याची नांदी आहे.

बदला रुटिन रोग्याचे

निसर्गाच्या संकेतांचा पूर्वजांच्या इशार्‍यांचा व स्वत:च्या चिंतनाचा वापर करीत मी असाध्य ठरलेल्या रोग्यांवर प्रयोग करीत राहिलो आहे. रुग्णांच्या रुटिनला (दिनक्रम) बदलवले. त्यांची वैयक्तिक आवड बंद केली व मूळचा आहार चालू केला तर, ओरिजिनॅलिटी (स्वास्थ्य) मग आलीच असे समजा.

प्रयोग एक, रोग अनेक

आपल्याप्रमाणे मलाही याचे आश्‍चर्य वाटत होते. विज्ञान तर प्रत्येक अवयवाचा व रोगाचा तज्ज्ञ बनवीत आहे. अनुभवाने मात्र एकाच प्रकारच्या प्रयोगाने सगळ्या प्रकारचे रोग हटत असतील तर, मग रोग तरी अनेक आहेत काय? सर्वही रोग एकच म्हणायला हवेत. सर्दीपासून कॅन्सर, एड्सपर्यंत जे 110 रोग आहेत, त्यांचं फाऊंडेशन उद्ध्वस्त केले, की वरचे मजले  कोसळतातच. तुम्ही पाहिलं की नाही ? 110 मजली ‘वर्ल्ड ट्रेड’ ची अमेरिकेतील इमारत लादेनने एकच विमान धडकवून जमीनदोस्त केली. ते विमानही अमेरिकेचेच आणि इमारतही अमेरिकेचीच! अगदी याच लादेनच्याच धोरणाने, तंत्राने मी रुग्णाच्या रोगावर, उपचाराच्या निमित्ताने तुटून पडतो आहे. रोग्याचेच रोग व रोग्याचीच शिवाम्बू यांची परस्परांत भेट घालून, यशस्वी हमला करतो आहे.

सहयोगी मित्रच

मी मनाचा निर्धार केला आहे. जे जे म्हणून उभे व्हायला मदत करतात, ते सहयोगी मित्रच आहेत. तो मग मूत्र असला तरी! जो जो आडवा करतो, आपल्याला तुडवतो, तो शत्रू. मग दूध पांढरे असले तरी आणि मूत्र पिवळे असले तरी !

शिवाम्बू पवित्र मित्र

रोगाचा शत्रू हा आपला मित्र व्हायला पाहिजे. रोगाचा शत्रू तर शिवाम्बू आहे. शिव म्हणजे पवित्र अम्बू म्हणजे पाणी आणि ती ज्यांची त्यांची लघवी (स्वमूत्र) असावी. लघवीसारखा उत्सर्जक द्रवही जर रोगाला बाहेर खेचीत असेल तर, तो मित्र का ठरू नये?

धुलाई म्हणजे सफाई

रोग तर, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांपर्यंत जी जीवरासायनिक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यात अडथळा ठरतो आहे, व्यत्यय आणतो आहे. व्यत्यय दूर करणारी कोणतीही योजना, म्हणजे उपचार आणि उपचार म्हणजे रोगांवर करावयाची कारवाई व कारवाई म्हणजे रोगाशी दोन हात (सामना). ज्यामध्ये होणार रोगाची धुलाई. धुलाई म्हणजे सफाई (शुद्धी). निसर्गाने देहातील शुद्धीची प्रक्रिया उत्सर्जन संस्थेकडे दिली आहे. ती संस्था आम्ही उपचाराच्या निमित्ताने कार्यक्षम करतो इतकंच !

शुद्धी देहाची

मग आमच्या उपचारांत शुद्धी हवेची, म्हणजे श्‍वासाची. कशी? तर प्राणायाम करून, प्रदुषणमुक्त जागेत वास्तव्य वाढवून...!

शुद्धी अन्नाची कशी?

शुद्धी अन्नाची कशी? तर निकोप मलनि:सारण करून, मग ती कशी होणार? कोंडामिश्रित अन्नातून, नैसर्गिक तंतुमय आहारातून, शिवाम्बूची बस्ती (एनिमा), उपवास व गोमूत्रपान, इत्यादींतून

शुद्धी तरल द्रव्याची, कशी करणार? तर, नैसर्गिक निर्जंतुक पाणी मिळविण्याचा प्रयत्न करून, उकळून, ठिबक सिंचन...दर वीस मिनिटांनी मुखभर घेऊन.

शुद्धी मनाची

शुद्धी मनाची, कशी बरं करणार? मौन पाळून, ध्यानाने, स्थिरतेने, सत्संगाने, वाचनाने, मननाने.

युक्त श्रम

युक्त श्रम म्हणजेच युक्त व्यायाम, म्हणजेच प्रत्येक अवयवाच्या ठरलेल्या हालचालींचा कोटा अदा करणे, त्यांचा त्यांचा खुराक देणे.

युक्त विश्राम

युक्त विश्राम, म्हणजे योग्य वेळी विश्रांती. घामाचे दर्शन म्हणजेच रामाचे दर्शन. श्रमपरिहार, विरंगुळ्यासाठी शवासन. बस्स ! इतकं करून जर प्रत्येक रुग्ण रोगातून व गोळ्यांतून शंभर टक्के बरा होत असेल तर अन्य उलाढाली पाहिजेतच कशाला?

क्रमश:

डॉ. शशी पाटील यांनी अनेको वर्षे मोठ्या जोमाने स्वास्थ्य जनजागृतीचे कार्य केले आहे. त्यांनी अनेक शहरातून, गावोगावातून. खेडोपाड्यातून  'शिवांबू, योग व निसर्गोपचाराच्या ' प्रचारार्थ महाराष्ट्रातील गावोगावी फिरून स्वास्थ्य मोहीम राबवली. त्यांनी  या मोहिमेतून शकडो स्वास्थ्य सेवक व स्वास्थ्य प्रचारक निर्माण केले. प्रस्तुत लेख स्तंभातून, 'धडे धडाचे - गुद्दे मुद्द्याचे - आरोग्याचे ' या त्यांच्या मोहिमेतील व्याख्यानांचे संकलन, आम्ही क्रमश: प्रकाशित करीत आहोत..

Previous Post Next Post