निरोगी माणूस शिवाम्बू घेऊ शकतो का?
मित्रहो, शिवाम्बू ही मुळात निरोगी तब्येत निरोगीच राहावी यासाठी शोधली गेली. निसर्गाने तशी तरतूदही केली. देहांतर्गत सफाईचे हे तंत्र आहे. अंतर-जग सतत साफ ठेवाल तर रोग शक्यच नाही.
बंदिस्त हॉलच्या एक्झॅास्ट फॅनचे काम एकवेळचे शिवाम्बुपान करू शकते, हे लक्षात ठेवा. शिवाम्बू देहाच्या उत्सर्जनाला गती देते. जावक सक्रिय करते. उपसा केलेली विहीर जशी ताजी ठरते, तशीच तब्येत शिवाम्बू ताजी ठेवते, हे लक्षात असू द्या. सात्त्विक आहार-विहार करणार्यांची प्रकृती एकावेळची पहिली सॅम्पल (मूत्र) प्राशन करीत राहिल्यास सुरक्षित राहू शकते.
शिवाम्बू प्राशन नव्याने करताना, स्वत:ची लघवीबिनधोक आहे की नाही हे पाहायला किंवा तपासायला नको का?
बिलकुल तपासायची गरज नाही ! लघवी तुमची कशीही असू द्या. ‘लोहा लोहे को काटता है, काँटा काँटे को निकालता है ।’ व्हॅक्सीनची संकल्पनापण तीच आहे. त्याच रोगाच्या जंंतूचे अर्धवट खच्चीकरण करून इम्युनिटी पॉवरला प्रशिक्षण देण्याची व्यवस्था नव्याने आपण सायन्समार्फत कृत्रिमरीत्या व्हॅक्सिनमार्गे उभी करीत असतो.
इथे शिवाम्बू पिण्याने तीच गोष्ट नैसर्गिकरीत्या सहज होते. पस-सेल्स असतील, लघवी पिवळी असेल, उग्र असेल, अल्प असेल, दुर्गंधित असेल. जशी असेल तशी घ्या. फार तर त्यात पाणी मिक्स करून प्या. पण ती आहे तशीच घ्या. चार-दोन मूत्रप्राशनाच्या आवर्तनांत लघवी आमूलाग्र बदलू लागते. अपेय-पेय बनत जाईल. नैसर्गिक शिवाम्बूमध्ये रुची निर्माण करण्यासाठी काहीही मिसळू नका ! माणूस जिथे पोचला आहे, तिथून निसर्ग पळाला आहे. म्हणून शिवाम्बूत काही मिक्स केल्यास मूळची गुणवत्ता राहणार नाही.
रुग्णसुद्धा शिवाम्बू प्राशन करू शकतात का?
होय! रोगग्रस्त, रोग हटेपर्यंत शिवाम्बू वारंवार घेऊ शकतील. अगदी ऊन दमतेे की रेडा दमतो पाहायचे आहे. सोबत गरम पाणी वारंवार प्यायचे आहे. रोगाच्या कारणाला शिवाम्बू गचांडी देत बाहेर काढेल. ‘षठम् प्रती षाष्ठ्यम्,’ ‘मेडके तसे नाळ’.
थोडक्यात ‘जशास तसे’ या उक्तीप्रमाणे शिवाम्बू सामना देईलच, तेच त्याचं काम आहे. ते तसं समजणं हे अॅडव्हान्स्ड नॉलेज आहे. कारण ऋषिमुनी यांना आपण अॅडव्हान्स्ड समजतो. मुक्तीच्या दिशेनं जाणारे मुमुक्षूसुद्धा... मुक्ती फक्त रोगाचीच नाही, तर जन्म-मृत्यू हा ज्यांनी महारोग मानला होता, त्या मंडळींनीसुद्धा यशस्वी होण्यासाठी शिवाम्बूला जवळ केले होते. ‘आरोग्यमाध्यं खलु धर्मसाधनम्।’ आरोग्य ठीक असेल तरच खरा धर्म मिळवू शकू.
शिवाम्बू कुणी घेऊ नये?
शिवाम्बू म्हणजे स्वमूत्र. स्वमूत्राची किमया केवळ देहातल्या मूत्रपिंडांनी घडविली आहे. अर्थात मूत्रात असलेली औषध संपदा ही किडन्यांची आहे. जेव्हा किडन्या आपण स्वत:च खराब झाल्याचे निर्देश देतात, तेव्हा फक्त त्या रुग्णांनी मूत्रपान करायचे नाही.
मूत्रात असणारे क्रियाटिनीन व युरिया हे आपले संतुलन सोडतील, कमी-जास्त होतील, तेव्हाच शिवाम्बू नवधारकानी शिवाम्बू घ्यावयाची नाही. बाकी कोणीही, कोणत्याही स्थितीत घेतली तरी विपरीत परिणाम होणार नाही. थोडक्यात, ज्याच्या किडन्या फेल आहेत किंवा फेल होण्याच्या मार्गावर आहेत, जर काही संकेत तसे मिळत आहेत, तर अशा मंडळींनी मूत्रप्राशन करायचे नाही.
मूत्र वेस्ट (टाकाऊ) नाही का?
मूत्र वेस्ट (टाकाऊ) नाही, तर ती एक्सेसिव्ह आहे. कुकरमधील अमर्यादित वाफ दबावाबरोबर बाहेर येते, तसेच प्रमाणाबाहेर झालेली घटकद्रव्ये मिनरल्स, हारमोंस, एन्झाइम्स, पाणी, इत्यादी घेऊन प्रत्येक वेळचे मूत्र बाहेर पडत राहते.
मूत्रप्राशनामुळे देहाला यातली मिळकत पुन्हा सहजच प्राप्त होते. टाकाऊ (वेस्ट) यांना तुम्ही ओळखताच. खरे टाकाऊ ते आहे, जे आपले आरोग्य उद्ध्वस्त करीत आहे. आरोग्य उद्ध्वस्त करण्यात, प्रतिकारशक्तीचे दिवाळे काढण्यात दारू, मटन, तंबाखू व चहा एक नंबरवर आहेत, इंग्रजी औषधंही आहेत. प्रमाणाबाहेर घेतलेला आहारही आहे; पण शिवाम्बू वेस्ट नाही हे आधी लक्षात घ्या. शिवाम्बू सजातीय आहे. बाकी सर्वच गोष्टी विजातीय आहेत.
हेच निकष मल म्हणजे शौच याबाबतसुद्धा नाही का?
नाही. देहाचा मल म्हणजे शौच. शौच म्हणजे परसाकडे यासाठी परसमार्ग आहे. मुद्दाम मागे ठेवला आहे. देहातील टाकाऊ पदार्थ व रोगपोषक द्रव्ये याच मार्गाने बाहेर काढली आहेत. मल हा आतड्याशी अर्थात अन्नाशी नाते जोडून आहे. मूत्र हे देहातील समग्र रक्ताशी नाते जोडून आहे. मलाचा व मूत्राचा तसा कार्यकारण संबंध नाही.
मग मूत्र देहाने फेकलेच का?
मित्रहो, मूत्रच केवळ फेकले आहे का? ही पृथ्वी सूर्याने फेकली असे सायन्स म्हणते आहे. मग ही पृथ्वी आपण खाली करणार का? झाडाने पाने, फुले, फळे व ऑक्सिजन फेकलेच आहे. मग त्यांनाही आपण हाती धरणार की नाही? श्वास तुम्ही घेणार की नाही?
मित्रहो! हा निकष बरोबर नाही. ज्याने मी आडवा होतो ते त्याज्य. ज्याने मी उभा होतो ते ग्राह्य. हा समज युक्त आहे. हा चांगुलपणा आहे. यातच आरोग्य आहे. यातच प्रतिकारशक्ती आहे. ज्यात प्रतिकारशक्ती आहे, त्यातच लवचिकता आहे. देहाने ही घटकद्रव्ये देहात एका क्षणी जादा झाली म्हणून बाहेर काढली आहेत. पुन्हा दुसर्या क्षणी ही घटकद्रव्ये देहाला उपलब्ध झाली तर त्याला ती हवी आहेत.
नाकाच्या श्वासाचे असेच अवागमन चालू आहे. एका क्षणी बाहेर पडतो तर दुसर्या क्षणी आपण तो पुन्हा आत घेत आहोत. या अवागमनाला आपण ‘जीवन’ म्हटले आहे.
मूत्र आपण रक्तात सोडत नाही, तर मुखात सोडत आहोत. त्यातली त्याज्य असणारी घटकद्रव्ये शौचामार्गे बाहेर निघणारी आहेत व उपयोगी असणारी घटकद्रव्ये देहाला रेडीमेड मिळतात. म्हणूनच सौंदर्य येतं, उत्साह येतो, स्फूर्ती येते आणि संयम राहतो.
महिला वर्ग शिवाम्बू घेऊ शकतो का ?
महिलांच्या जिज्ञासेतून शिवाम्बू नावारूपाला आली. महिलांमध्ये पार-वरती असलेल्या पार्वती देवीच्या निमित्ताने, शिवाम्बू अवतरली आहे.
‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी’ इतकेच नाही, तर ‘जिच्या हाती स्वयंपाक, तिचाच राहील रोगावरती धाक.’
आरोग्याची सुई जिथे हरवली तिथेच, अर्थात, स्वयंपाकघरात शोधा. ती तिथेच सापडू शकते. सत्ता स्वयंपाकघरात महिलांची, साफसफाईचा मक्ताही त्यांच्याकडेच. महिला म्हणजे गृहलक्ष्मी.
महिलांचे समग्र आरोग्य, आटोपशीर बांधा, पद्धतशीर केशसंभार, तेजस्वी कांती व निकोप सौंदर्य यांसाठी खरा दागिना पुरवायला शिवाम्बू केव्हाही सोनार होऊन तयार आहे. स्त्रियांची बरीच दुखणी मान, पाठ, कंबर ते मासिक पाळीपासून - बाळंतपणापर्यंत, कौमार्यकाळापासून - वृद्धापकाळापर्यंत, सर्व समस्यांना जवळून व जुळवून, सोबत राहून, पाठपुरावा करायला शिवाम्बूसारखी माझ्या मते दुसरी सखी नाही.
कोणत्या वेळेची शिवाम्बू घेणे उचित आहे?
दीर्घ विश्रांतीनंतर होणारे पहिले मूत्र एक पूर्ण सॅम्पल प्राशन केले तर पुरे आहे. शिवाम्बू प्राशन करताच त्यावर एक घोटभर पाणी मुद्दाम प्यायचे आहे. रोगग्रस्तांनी मात्र अधिक डोस रोग हटेपर्यंत घेण्याची गरज आहे.
महिलांनी पाळीच्या काळात, प्रसूतीच्या काळात व संभोगकाळात शिवाम्बू घेण्याचे काय करावे?
ज्या ज्या वेळी तांबडे-पांढरे धुपणे वाहत असते त्या दरम्यान एक तर, शिवाम्बू घेणे टाळावे. अन्यथा ती जागा साफ ठेवून मूत्रमार्गाने येणारे मूत्र कौशल्याने पकडून प्यावे. ज्या झर्याचे पाणी आपण प्राशन करणार, तो झरा सतत साफसूफ करण्याची जबाबदारी ज्याची त्याची, हे लक्षात असू द्या.
मूत्रप्राशन करताना पहिले दोन चमचे व शेवटचे दोन चमचे सोडण्याबाबत आपले मत काय?
सात्त्विक आहार घेत असाल, योग्य ठिबक पद्धतीने पाणी वारंवार पीत असाल तर थेंब नि थेंब शिवाम्बू पिण्यासाठी वापरू शकाल. दारू, मटन, तंबाखू, चहा, हॉटेल, पार्ट्या, मसाले, तिखट, मीठ, कांदा, लसूण व सतत तडस पोट भरणार्या मंडळींनी जरूर आधीचे व शेवटचे मूत्र दोन चमचे सोडून द्यावे.
रोग अनेक, उपाय एकच कसा?
प्रत्येक रुग्णाच्या शरीरातील भिन्न भिन्न रोगकारणांमुळे त्याच्या मूत्राचे स्वरूप बदलते. म्हणूनच तर लघवी तपासून रोगनिदान करतात. अर्थात तिचे रूप (घटकद्रव्य) भिन्न भिन्न असते. यामुळे शरीरात होणार्या अभावविभावांतून होणारे सर्व रोग (अपघातातील रुग्ण वगळता) ठीक करण्यास स्वमूत्र अत्यंत उपयोगाचे आहे.
या उपचाराचे चिकित्सक रोगांना विविध मानत नाहीत. रोग म्हणजेच कचरा, रोग म्हणजे व्यत्यय व शिवाम्बू म्हणजे झाडू, खराटा व उपचार म्हणजे सफाई. या कारणामुळे, या धोरणामुळे रोग विविध असले तरी उपचार हा एकच असतो.
मरणासन्न रोग्यांनी नेमके काय करावे?
मरण नजीक वाटणार्या कोणत्याही रूग्णाने युद्धपातळीवर उपचार राबवावा. प्राप्त शिवाम्बूचे प्राशन व मर्दन कौशल्याने करावे. पुन:पुन्हा करावे. प्राशन ताज्या मूत्राचे करावे व उन्हाच्या किरणांत ठेवलेले आठ-पंधरा दिवसांचे शिळे मूत्र मर्दनासाठी वापरावे. रुग्णास दिवसातून दोन ते तीन वेळा मालिश करावे. मर्दन सुखदायक व उबदार व्हावे. देहाचा तिळाइतकाही भाग मसाज न करता सोडू नये.
सायंकाळी विनासाबण घर्षणस्नान द्यावे. रात्रीसाठी टाकला जाणारा बिछाना हा उन्हाच्या किरणात दिवसभर टाकलेला असावा. घातलेल्या स्पेशल (उबदार) बिछान्यावर त्याला झोपवावे. झोपेची जागा आकाश किंवा झाडाचे दर्शन होऊ शकेल अशी असावी. अर्थात खिडक्या, दरवाजे उघडे असावेत. जागा शांत व प्रसन्न असावी. आहाराचे आयोजन सुपाचक असावे. अन्नाचे प्रमाण भुकेनुसार, भुकेइतकेच द्यावे. नैसर्गिक आहार कौशल्याने द्यावेत.
दरम्यान शौच, वांती यांचं स्वागत व्हावं. वेदनेच्या ठिकाणी ताज्या शिवाम्बूची घडी किंवा निर्देशित रुई चिकाचा प्रयोग समजून घेऊन करीत राहावे. हळूहळू मरणासन्न रोगी मृत्यूपासून दूर होऊ शकेल.
मरणासन्न रोग्यांनी व्यायाम कोणता करावा?
मरणासन्न रोगी किंवा वयस्क या कमकुवत मंडळींनी चालणे, रोजच्या रोज दहा-दहा पावलांनी वाढवायचे आहे. झोपून करावयाच्या निर्देशित व्यायामांना दाद द्यायची आहे. थांबला तो संपला हे त्यांच्या लक्षात आणू द्यावे.
मरणासन्न रोग्यांनी आहार कोणता व किती घ्यावा?
मरणासन्न रोग्यांनी अत्यंत सुपाचक आहार निवडावा. ताजे, अदमुरे, पातळ, गरम पाण्यात बनविलेले ताक, त्यात ताजे लाह्यापीठ भिजवून चावून चावून खावे. रोगी मधुमेही नसतील तर संत्री, मोसंबी, आदी मधुर फळे रस काढून द्यावीत. मुगाचे पातळ गरम सूप, पालेभाज्या यांचे काढे चालतील. भूक पाहून भुकेनुसार सुपाचक अन्न निवडावे.
शिवाम्बू उपासकांनी दारू, मटन, तंबाखू व चहा यांबरोबरच दुधाला पण का टाळायचे आहे?
शिवाम्बू उपासक निसर्गाच्या संकेतांचा आदर करील तर वेगाने त्याच्यात सुधारणा होते. दूध हे निसर्गात बाळ आहे तोवरच उपलब्ध होते. बाळ बालक होताच दूध आटते, म्हणजे बालकाने दूध घेऊ नये, असा स्पष्ट संकेत निसर्गाकडून मिळतो.
दूध हा फर्स्ट गिअर आहे. बाळ जमीन सोडावे म्हणून दुधाची रचना आहे. बाळाच्या विशेष हालचालींसाठी पूरक दूध आहे. विमानाचे इंधन समईसाठी जसे उपयोगी नाही, तसे प्रौढ माणसाकरिता दूध उपयोगी नाही. दूध टाईमबॉम्बसदृश कृती करील. दूध हे जरूर पूर्ण अन्न आहे; पण अपूर्ण देहासाठी, पूर्ण देहासाठी नाही.
इंग्लंडचा सर्जन डॉ. गॅहाम म्हणतो, पोटाच्या विकारात व अन्य रोग्यांना दुग्धाहार बंद करताच त्यांची प्रकृती सुधारली. ते अधिक सक्रिय, सहनशील व शक्तिमान झाल्याचे आढळले.
प्रथिनयुक्त आहारामध्ये दुधाने वजन वाढते. शरीराचे बाह्य स्वरूप चांगले दिसत असले तरी, आत जो अपाय होतो त्याकडे डोळेझाक करून चालणार नाही.
मूत्रपिंडाचे विकार हे प्राणिजन्य पदार्थाने, त्यातल्या त्यात दुधाने शिवाय इंग्रजी औषधाने होताना आढळले आहे. 25 % प्रथिनांची गरज माणसाला आहे. तो 25 % करताच वजन वाढतं; पण मूत्रपिंडे खराब होतात. 80 % प्रथिने देताच उंदरांचे हृदय आकस्मिक बंद पडले. किडन्या निकाम्या झाल्या. दुधामुळे मूत्रपिंडे आतडी व हृदय यांवर बोजा वाढला.
प्रथिने ही कष्टकर्यांना एकवेळ त्रास देत नाहीत; पण जी मंडळी व्यायाम करीत नाहीत, त्यांनी आवश्यक उष्माकांची प्रथिने 15 % पर्यंत आहारात घ्यावीत. शिवाम्बू उपासकांनी दीर्घायुष्याकरिता किडन्यांची सक्षमता वाढवली पाहिजे. तेव्हा आपली मूत्रपिंडे जपलीच पाहिजेत. इंग्रजी औषधे, दूध आणि सर्व प्राणिजन्य पदार्थ बंद केल्यास हे शक्य आहे.
‘साखरेचे खाणार त्याला देव देणार’ असे असताना शिवाम्बू उपासकांनी साखरही का बंद करायची ?
ब्रिटनमधील प्रोफेसर जॉन युरकीन म्हणतात, ‘साखर हे सफेद विष आहे. देअर इज नो फिजॉलॉजिकल रिक्वायरमेन्ट फॉर शुगर.’ म्हणजे, मानवाला शरीरशास्त्राच्या दृष्टीने साखरेची काहीच गरज नाही. माणूस खात असलेल्या अन्नातून, भाज्या-फळांतून शरीर आवश्यक तेवढी साखर तयार करीत असते. साखरेत तसे कोणतेच जीवनसत्त्व नाही. साखर जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे हायपोग्लासेमिया नावाचा एक नवा रोग अमेरिकेत सुरू झाला आहे. या रोगात अशक्तपणा असतो, खोटी भूक लागते, घाम येतो, काहीवेळा अंग तापते व रोगी बेशुद्ध होतो. शिवाम्बु उपासकांनी शक्यतो साखर टाळायची आहे.
शिवाम्बू उपचाराची शक्ती आम्ही कशी वाढवू शकतो?
निसर्गाच्या संकेेताचा आदर करून, अंगीकार करून आम्ही या उपचाराची शक्ती वाढवू शकतो. अर्थात ममु बजी व इशी ज्या त्या वेळेला करून दाद द्यायची आहे.
या उपचाराच्या प्रसाराकरिता आणखी काय करावे?
ज्यांना ज्यांना या उपचाराचा लाभ झाला आहे, त्यांनी खुलेआम आपले आप्त, इष्टमित्र यांना जाणीव करून दिली पाहिजे. त्यांचा संकोच दूर केला पाहिजे. उपलब्ध आध्यात्मिक, ऐतिहासिक व शास्त्रीय माहिती त्याने सामान्य माणूस, विद्यार्थी यांच्यासमोर आणली पाहिजे. महिलांच्या, वृद्धांच्या, बालकांच्या व युवकांच्या शारीरिक समस्यांसाठी, त्या त्या प्रसंगी हा पर्याय वेळीच ठेवला पाहिजे.
आपल्या आपल्या गावी या उपचारांची शिबिरे आयोजित करावीत. आम्हा तज्ज्ञांना प्रबोधनासाठी बोलावून घ्यावे. वीस-एक रुग्ण नोंद होताच आपण शिबिराच्या अटी एकमेकांस समजावून शिबिर यशस्वी करता येईल. ‘हा सूर्य, हा जयद्रथ’ आपणांस अन्य लोकांना दाखविणे सहज शक्य होईल.
मुले नसणार्या दांपत्यांना शिवाम्बूतल्या कोणत्या घटकामुळे मुले होऊ शकतील?
प्रोजेस्टेरॉन या स्त्रियांच्या मूत्रात असणार्या यौनग्रंथीच्या स्रावामुळे मुले नसणार्या दांपत्याला मुले होऊ शकली आहेत. त्यांनी रोज एक वेळ तरी दीर्घ विश्रांतीनंतर होणारी पहिली शिवाम्बू प्यायची आहे.
मूत्रातल्या कोणत्या घटकामुळे तजेला येतो, स्फूर्ती राहते व सौंदर्य वाढते?
यूरिया हाच मुळी जंतुनाशक आहे. युरियाच तजेला आणतो. ब्यूटी वाढवतो. अँटीएजिंगही आहे, मेलॉटॉनिन हा घटक त्याला आणखी मदत करतो.
शिवाम्बूतल्या कोणत्या घटकामुळे प्रसूत महिलेच्या अर्भकाचे संरक्षण होते?
मूत्रातील ह्युमन कोटिऑनिक गनोडोट्रफिन (H.C.G.) या हारमोन्समुळे गर्भवतीच्या गर्भाचे जतन होते. शिवाय रोगावाचून बालकाचा विकास नैसर्गिकरीतीने होतो. गर्भारपणात मूल अंगावर पीत असताना लघवीतून व्हिटॅमिन बी-1 जाण्याचे प्रमाण वाढलेले असते; म्हणून अशा अवस्थेत शिवाम्बू चिकित्सा सुरू ठेवणे श्रेयस्कर असते.
मूत्रातील कोणत्या घटकामुळे जखमा बर्या होत असतील?
मूत्रातील युरीयासारख्या घटकामुळे जखमा भरून येतात. यांचा वापर मलमात केला जातो. याखेरीज अॅन्टी निओप्लॅस्टिन्स हा आणखी एक जखम बरा करणारा घटक दिसला आहे.
शिवाम्बूत कॅन्सर बरा करणारा कोणता घटक आहे?
3-मेथॉइलग्लॉय ऑक्सील हा घटक, 1960 साली जेन्डज्योनी या शास्त्रज्ञाला सापडला. ज्यामध्ये कॅन्सर बरा करण्याची क्षमता आहे, असे त्याचे म्हणणे आहे.
युरिया व एंटी निओप्लॅस्टिन्स या मुत्रातील विशेष घटकामुळे कॅन्सरपेशी पूर्वस्थितीत येऊ शकल्या.
प्रसूतीतील सिझरिंग ही आजकालची समस्या शिवाम्बूतील कोणत्या घटकामुळे दूर होऊ शकेल?
फॉलिकल स्टिम्युलेटींग (F.S.H.) आणि ल्युटेनाजिंग हार्मोन (L.H.) यामुळे स्त्रियांचा मासिक रक्तस्राव, गर्भावस्थेतील अर्भकाचे संरक्षण, योग्य वेळी प्रसूती वगैरे गोष्टी नैसर्गिकरीत्या होतात. यामुळे सिझरिंगची वेळ येत नाही.
थायरॉईड ग्लँडची समस्या शिवाम्बूच्या कोणत्या घटकांमुळे सुटेल?
मूत्रातल्या थायरोट्रॉफिक (T.S.H.) नावाच्या हार्मोन्समुळे थायरॉईड ग्रंथी उत्तेजित होते. उत्तेजना मिळून शरीरातील शक्ती त्यामुळे नियंत्रित होते. म्हणजेच शरीरातील थायरॉईड ग्रंथीची समस्या या हार्मोन्समुळे सुटू शकली आहेत.
मूत्रातील कोणत्या घटकामुळे हृदयाच्या धमन्यांतील अडथळे वितळतात?
एन्झाइम व युरोकायनेस या मूत्रातील विशेष घटकामुळे रक्तात तयार होणार्या गुठळ्या विरघळतात. त्यामुळे रक्तदाब व हृदयविकार बरा होण्यास मदत होते.
देहात असणारेे मूत्र, देहात असते तेव्हाच का काम करीत नाही?
डॉ. व्ही. जे. आचार्य, मुंबईचे कॅन्सर सर्जन म्हणतात, काही विकारांत शरीरास उपयुक्त असणारी घटकद्रव्ये मूत्रपिंडातून मोठ्या प्रमाणात बाहेर टाकली जातात. प्रोटिनपासून तयार होणारा युरिया हा पदार्थ मूत्रात अधिक असतो व यामुळेच शिवाम्बू उपासकाच्या मूत्रप्रमाणात वाढ होते.
शरीरात तयार होणारे हार्मोन्स व क्षार मूत्रपिंडे आपल्याकडे साठवतात व जरूर तेव्हा उपयोगातही आणतात; परंतु ही उपयुक्त द्रव्ये साठविण्याची ग्रहणशक्ती संपल्यावर ती मूत्रातूनच बाहेर टाकली जातात. ती आपण पुन्हा मुखामार्गे घेऊन देहाला सहज उपलब्ध करून द्यावयाची आहेत.
मूत्रातील क्षार, हार्मोन्स, एन्झाइम्स, अँटीबॉडीज, अॅटोजिन्स, इत्यादी घटक लक्षात घेता, माझ्या संपर्कात आलेले स्वमूत्राने बरे झालेले लोक पाहता, मी इतकंच म्हणेन की, हा स्वास्थ्य मिळविण्याचा सर्वांत नजीकचा मार्ग आहे, असे डॉ. जयनारायण जयस्वाल निसर्गोपचारतज्ज्ञ म्हणतात.
सर्वसाधारण मूत्रात अशी कोणती घटकद्रव्ये आहेत?
मित्रहो, जे प्रमाण कणकेत तेच प्रमाण अलग केलेल्या गोळ्यात असते. जे तनात आहे तेच देहाच्या कणाकणांत आहे. जे कणाकणांत आहे तेच थेंबाथेंबांत आहे. प्रमुख स्थूल घटक म्हणाल तर... पाणी, मीठ, ग्लुकोज, युरिया, बायकार्बोनेट. सूक्ष्म घटक म्हणाल तर... नायट्रोजन, युरिया, क्रिआटिनिन, युरिक अॅसिड, अमिनो, अमोनिया, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सूक्ष्मतम घटक म्हणायचे झाले तर... हार्मोन्स व एन्झाइम्स हीच द्रव्ये प्रत्येकाच्या लघवीत सापडतात.