काढा काटा काट्यानेच

निष्णात गुन्हेगारालाच जर समजा दंडाधिकारी बनवला तर तो नक्कीच बंदोबस्त करू शकेल. त्याचप्रमाणे तुमच्याच उत्सर्जनातील एक उत्सर्जित हिस्सा, औषध म्हणून वापरायला घेतला आहे. तुमच्या सगळया चुका पुसण्यासाठी, शरीरशुद्धी करण्यासाठी ज्याला आपण स्वमूत्र अर्थात शिवाम्बू म्हणतो. ज्यातून मानवी शरीराला दाद मिळाली आहे. काट्यानेच काटा काढावा, तसाच हा प्रकार आहे. उत्सर्जन संस्था निष्क्रिय झाल्यावरच शरीरातील पीडा, रोग माना वर करीत असतात. वृद्धापकाळातही उत्सर्जन संस्था निष्क्रिय झालेली असते. निसर्गोपचारच उत्सर्जन संस्थेला सक्रिय करण्याचा प्रयत्न करतो.

कोण-कोण, काय म्हणतो

या माझ्या सफाईच्या कामात एक नंबरला मदत करीत असते, ज्याचं त्याचं स्वमूत्र! त्याला तुम्ही लघवी म्हणता. ज्याला हिंदीत मपिशाबफ म्हणतात. ज्याला इंग्रजीत मयुरीनफ म्हणतात. यालाच कन्नडमध्ये मकालमडगीफ (उच्ची) म्हणतात. ज्याला धार्मिक भाषेत - लघुशंका म्हणतात. ज्याला संस्कृतमध्ये, उच्चभ्रू, सुसंस्कृत लोक - शिवाम्बू म्हणतात. जे विद्वान आहेत, भाग्यवान आहेत, जे अनुभवी आहेत, ज्यांनी ओळखले आहे, ते त्याला मअमृतफ म्हणतात, कुणी संजीवनी म्हणतो, कुणी आमरोली, कबीरासारखे संत मअमरीफ म्हणतात.

हेच तुमचं अज्ञान असावं

तुम्ही स्वतः काय म्हणता, मला तर माहीत नाही; पण तुम्ही ज्याला मशीफ म्हणता, घाण म्हणता, मूत्र म्हणता, तोच तुमचा मित्र असावा. तीच तुमची माउली असावी, तोच तुमचा खराटा असावा. तोच तुमचा खर्‍या दागिन्याचा सोनार असावा, तोच तुमचा सुतार असावा, तोच तुमचा धन्वंतरी असावा, तोच तुमचा सर्जनकर्ता सर्जन असावा, तो तुमचा विघ्नहर्ता असावा आणि हेच तुमचं अज्ञान असावं. जिथे डोळे उघडे पाहिजेत, तिथेच तुम्ही डोळे झाकलेले ठेवावेत, हाच आहे कर्मभोग. दुसरे काही नाही.

हीच ती भटकंती

ज्या राजवाड्याचे नऊशे नव्व्याण्णव दरवाजे बंद असावेत आणि एकच दरवाजा सताड उघडा असावा, तिथेच डोळे चोळत चोळत तुमचा प्रवास चालू राहावा, हीच आहे ती भटकंती ! हीच आहे ती शोकांतिका!

नाही... नाही म्हणतच, शिवाम्बूच्या प्रेमात

सुरुवातीला तुम्ही काय किंवा मी काय, प्रत्येकजणच नाही... नाही, मी नाही, असेच म्हणत शिवाम्बूच्या प्रेमात पडलेला दिसतो. प्रत्येक प्रामाणिक प्रयोगवीर, आधी स्वतःवरच प्रयोग करून खात्री  करतो. मग लक्षात घेतो की, अरेच्या! शिवाम्बू घाण नाही, वाईट नाही, ती आरशासारखीच पारदर्शी, निर्मळ आहे. जसे आम्ही  असू, तसेच आरशात दिसू. त्यात आरशाचा काय दोष? अगदी त्याचप्रमाणे जे आपण खातो, पितो, राहतो, विचार करतो, याचेच प्रतिबिंब शिवाम्बूत उमटते, मग ते वाईट कसे?

याचसाठी ‘आनंदकुंज’ आश्रम

जसे चुकीचे लिखाण आपण खोडरबरने घासतो, पुसतो, तसा चुकीचा भूतकाळ, शिवाम्बू उपचाराने चांगला पुसता येतो. पुन्हा पाटी कोरी होते व सुवाच्य पुन्हा लिहता येते. सर्वच धडे, धडाचे असतात. धड, ‘धड राहावे’ म्हणून, ‘धड’ धडपडू नये म्हणून. याचकरिता या आनंदकुंज आश्रमाची उभारणी झाली आहे.

काय असते साइंटिफिक?

लोक समजतात शिवाम्बू अजूनही साइंटिफिक नाही. मी तुम्हाला विचारतो काय असते साइंटिफिक? अहो, आमचे साइंटिस्ट मांजर, कुत्रा, ससा, उंदीर यांवर प्रथम प्रयोग करतात, त्यांच्या प्रयोगातून ती जगली बिचारी, तर मग माणसावर प्रयोग करतात, हेच ना !

पुरेसे नाहीत का पुरावे

पण मी म्हणतो, देवातला देव महादेव, प्रधानांतला प्रधान पंतप्रधान स्व. श्री. मोरारजीभाई देसाइर्ंंपर्यंत ज्याला इतिहास आहे, ॠषिमुनी, महात्मे यांच्या चरित्रग्रंथांत ज्याला स्थान आहे; इतकेच कशाला, चाळीस वर्षे जे काम मी केलं आहे - हा सूर्य हा जयद्रथ - हा  पेशंट हे रिपोर्ट, अशा आमच्याकडे दफ्तरी नोंदी आहेत. मग मधुमेह असो, बायपास असो, कॅन्सर असो, जाणकार या गोष्टी जाणू शकतात. हे पुरावे साइंटिफिक दृष्ट्या पुरेसे नाहीत का?

माझा हा वाचला असता, तो वाचला असता       

तुम्ही फक्त दोन पावले आत या, तुम्ही चित्ताड उडाल, तुम्हाला भटकंतीचे दुःख होईल, फोटोत जाऊन बसलेल्या लोकांची आठवण होईल, माझा हा वाचला असता, तो वाचला असता, असे कदाचित म्हणाल.

इतिहासाचे पण ठाम पुरावे

इतक्या लाभाची गोष्ट, तुम्हाला वाटेल सायन्सला कळली कशी नसेल? सामान्यांपर्यंत काही महत्त्वाच्या गोष्टी पोहोचूच नयेत, याकरिता काही मतलबी माणसे काम करीत असतात. महात्मेच फक्त रोगमुक्त जीवन जगून मी कसा यशस्वी झालो, याचे दाखले योगशास्त्रात, आयुर्वेदात, डामरतंत्रात काही कमी देत नाहीत. याला सारा इतिहास ठामपणे पुरावा देतो आहे, अनुभवी साक्ष देत आहे. माझ्याकडे जो तो मला लाभच कसा झाला, हे कळवितो आहे.

युद्धस्य वार्ता रम्या

लढाईच्या लोकांची कुंडली म्हणजेच आपला इतिहास. ‘ युद्धस्य वार्ता रम्या:’ सगळ्याच लढाया हत्यारांच्या, सामना हत्यारांचा हत्यारांशी. हत्यारं शूरांच्या हातात, हत्यारं दुश्मनांच्या  हातात, हत्यारं अतिरेक्यांच्या हातात, हत्यारं चोरांच्या हातात आणि हत्यारं देवाधिकांच्या पण हातात - परशीवाल्या परशुरामापासून, धनुष्य घेतलेल्या दशरथाच्या रामापर्यंत, सुदर्शन घेतलेल्या राधेश्यामापासून, गदा घेतलेल्या हनुमानापर्यंत, सगळ्याच पूज्य देवतांच्या हाती हत्यारं आम्ही पाहत आहोत. त्यांच्या कथा आम्हाला आवडल्या.

खडगबिना ढाल

पण गेल्या शतकाने या सगळ्याच इतिहासाला धक्का देणारी   एक विभूती दिली, तुम्ही-आम्ही  ती अनुभवली. साबरमतीचा संत,  ज्याने मखड्ग बिना ढालफ लढा दिला आणि आपली नोंद इतिहासात ठळक केली.

अधुरे स्वप्न

ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेला, इंपोर्टेड धारदार हत्यारांना, हातात काही न घेता बोथट केलं, त्या शूर वीर महात्म्याचे, मला नाव सांगण्याची गरज नाही; पण इथे त्यांचा उल्लेख एवढ्यासाठी करतो आहे. या विभूतीचे एक स्वप्न होते, जे अधुरेच राहिले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर, उर्वरित आयुष्यात सामान्य देशबांधवांच्या देहास आरोग्य लाभावे, त्यालाही स्वतंत्रता मिळावी. म्हणजेच विनाशस्त्रक्रिया, विना इंजेक्शन, विना गोळी, विना औषधं, विना रक्तपात. त्यांची संपूर्ण आरोग्यावर सत्ता राहवी. हे त्यांचे स्वप्न होते.  ही त्यांची मनीषा होती. ही त्यांची तळमळ होती; पण आम्ही त्यांच्या त्या स्वप्नाला साकार करायला, त्यांना उसंत दिली नाही.

स्वप्न साकार माझ्यापरीने

मी सुदैवी समजतो, स्वत:ला भाग्यवान समजतो, त्यांचं स्वप्न माझ्यापरीने, यथाशक्य मला साकार करता आलं. गांधीजी महाजिद्दी होते. त्यांच्या मनाची शक्ती प्रचंड होती. देश जसा पारतंत्र्यातून मुक्त झाला, तसंच देहाचं आरोग्यही  औषधांच्या, डॉक्टरांच्या, रोगांच्या जोखडातून, साखळदंडातून सोडवून घ्यायला ते समर्थ होते. त्यांनी हा सदसद्भाव, आत्मचरित्रात व्यक्त केला आहे. 

आरोग्य माझा सांगाती

मी गेली चाळीस वर्षे, सुमारे चाळीस हजार रुग्णांवर प्रयोग करून जी प्रात्यक्षिके अनुभवली. रुग्णांनी स्वानुभवांच्या नोंदी मआरोग्य माझा सांगातीफ या  बुकात नोंदविल्या आहेत, त्या वाचताना तुम्हाला निश्‍चितच आनंद होईल. 

तरतूद निसर्गाची

प्रत्येक रुग्णाचे, आरोग्याच्या आनंदकुंज पहाडावर चढताना घडलेल्या प्रवासाचे वर्णन, त्यांनी अभिप्राय बुकात नोंदविले आहे.  मी हा पुरुषार्थ माझा म्हणत नाही. ही मी माझी मर्दुमकी समजत नाही. निसर्गाचे वरदान म्हणा किंवा निसर्गाची तरतूद म्हणा; निसर्गाच्या संकेतांचा अनुभव म्हणा किंवा निसर्ग संकेतांचा आदर-कदर म्हणा ! काहीही म्हणा ! मी असं काहीच केलं नाही, जो राखेखाली निखारा दडून होता. त्या राखेला बाजूला केलं; बस्सं, इतकंच!

प्रतिकारशक्ती जन्माबरोबरच

प्रत्येक व्यक्ती जन्मताना त्याने शंभरी गाठावी, असाच हेतू, अशीच निसर्गाची तरतूद आहे प्रत्येकांच्या देहात प्रतिकारशक्ती असते. ती  जन्माबरोबर जन्मलेली असते. म्हणून तरी नाळतोडीची जखम चार-दोन दिवसांत भरून आलेली दिसते. तीच आहे, प्रतिकारशक्तीची पोच... तिला मी जागविली, तिलाच मी विकसविली, ज्यामुळे प्रसन्न आरोग्य प्रगटलं.

कपचा अवास्तव

हे जवळ जवळ असंच झालं. शिल्पकारानं म्हणावं, ममी तसं काहीच केलं नाही. आत मूर्ती तयारच होती. अवास्तव वाढलेला कपचा फक्त बाजूला काढला. ज्यातून मनोज्ञ असलेली मूर्ती बाहेर प्रगट झाली. या प्रकारे प्रतिकारशक्तीला विकसित करण्याची तंत्रे मी शोधली.

थोडक्यात इतकंच म्हणूया, निसर्गानुकूल होण्याने प्रतिकारशक्ती वाढते व अनैसर्गिक होण्याने प्रतिकारशक्ती खचते. हे याचे साधे इंगित (गणित) आहे.

होय, मी एकलव्य पंथी

मी, स्वत:ला तरी प्रयोगवीर (चिकित्सक) समजतो. मला स्वत:वर प्रयोग करायला आवडतात. तुमच्यात नि माझ्यात असा फरक तरी काय आहे ? मला काटा बोचला तर दुखते. तुम्हाला बोचला तर दुखणार. मला कोणाची शिवी ऐकताना वाईट वाटतं. तुम्हालाही वाटणार. ह्युमन सायकॉलॉजी हीच आहे. मी स्वत:ला एकलव्य पंथी मानतो. प्रत्येक ठिकाणी गुरु आणायचा तरी कोठून? गुरुंची सावली, गुरुंचा  आवाज, गुरुंचा आशीर्वाद, गुरुंची अक्षरं, गुरुंची स्मृती यांतलं काहीही पुरेसं आहे. शेवटी आत्म्यालाच गुरू मानून, मी माझ्या आत्म्याचा कौल घेत असतो. गुरूंचाच आदेश, संदेश प्रमाण मानतो आणि काम चालवितो.

शबरी पण प्रयोगवीरच

मी म्हणतो, रामायणातील शबरीही प्रयोगवीरच होती. प्रत्येक बोर, ती रामाला देताना मटेस्टेड फ द्यायची. आज आम्ही कॉक, बल्ब काहीही घेताना मटेस्टेड आय.एस.आय. मार्कफ पाहून खरीदतो. तशी तीसुद्धा प्रत्येक बोर चव घेऊन बोरात राम आहे की नाही? पाहायची. बोराचं आरोग्य ठीक आहे का नाही तपासायची? आणि मगच ती दशरथाच्या रामाला वाहायची आणि दशरथाचा रामही शबरीच्या दातांच्या खुणा बघून बिनधास्त खायचा. पूर्वीचे सगळेच ॠषी स्वत:वर प्रयोग करून, मग गुरुकुलातील  मुलांवर प्रयोग करून, मग तो प्रयोग, राजाच्या समोर राजाश्रयला यायचा. राजा प्रजेला वाहायचा.

स्वत:ची तब्येतच लॅब

आजचे संशोधक (प्रयोगवीर) उंदरा-मांजरावर, सशा-कुत्र्यांवर, कोंबड्या-घोड्यांवर प्रयोग करून ती जगली बिचारी, तर मग माणसांवर प्रयोग करतात. मी निसर्गोपचाराचा प्रत्येक प्रयोग स्वतःवर केला. स्वत:ची बॉडी काय जजमेंट देते, हा अंतिम निकष असायचा. स्वत:ची तब्येत लॅब समजणारा संशोधक मला अधिक संवेदनशील वाटतो. मी स्वत:वर तसे अनेक प्रयोग चालूच ठेवले, रोजचा आहारविहार बदलत निघालो. त्यातील मिक्सिंग बदलत गेलो. परिणाम समजत गेला. माझाच अनुभव, अनुमान अंतिम मानले अन् मग मनात भन्नाट विचार यायला लागले.

आरोग्य तर आपल्यालाच खेटून

आजअखेर आपल्या संस्कृतीने आरोग्याच्या संदर्भात घेतलेला वेध, शोध हा द्राविडी प्राणायाम वाटू लागला. इथेच आहे, पण दिसत (सापडत) कसं नाही? असे कोडे घालताना आपण पटकन हवेचा उल्लेख करतो; पण त्याचबरोबर तसाच आरोग्याचा उल्लेख करणे जरुरीचे वाटत आहे. कारण आरोग्य आपल्यालाच खेटून उभे आहे. आपण उगीचच भटकंती केली, भ्रमंती झाली, पैशाचा, वेळेचा, सहनशक्तीचा अपव्यय झाला, याची खंत हा प्रयोग करणार्‍या प्रत्येक प्रयोगवीराला झाल्याशिवाय राहत नाही.

थप्पड रोगाला

अथक 40 वर्षे, सर्वही रोगांना, एकच प्रकारचा उपचार देऊनही, रोग बरे होत होते, रोगाची तीव्रता कमी होत होती, उपचारांना दाद मिळत होती. आम्ही उपचार म्हणून शिवाम्बूसह उपवास, बस्ती (एनिमा), योग, प्राणायाम व काही काळासाठी पथ्यं, केवळ यानेच रोगाला थप्पड मिळत असेल व तो काढता पाय घेत असेल, तर मग  रोग आहेच काय ?

पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत, जो म्हणून, जीवरासायनिक प्रवाह वाहतो आहे, त्या प्रवाहाला जी यंत्रणा रोखते, तोच आहे रोग.

रोग विविध असतात का?

तसे आम्ही सगळे प्रयोगवीरच आहोत. तुम्हालाही हा अनुभव आल्याखेरीज राहणार नाही. विज्ञान आरोग्य तपासण्याची अनेक आयुधे शोधीत आहे. रोगनिदानाची अनेक तंत्रे आणीत आहे - स्कॅनिंग, एक्स-रे, स्कोपिंग, सर्जरी, लेसर, इ. सर्व प्रकार शुक्लकाष्ठ द्रविडी प्राणायाम वाटेल,  इतक्या  अनुभवानंतरही, रोग  विविध  म्हणायचे का ?

शिवाम्बू : खराटा

रोखणार्‍या अवरोधाला, विरोधाला, व्यत्ययाला, विजातीय द्रव्याला जर कचरा म्हणालो,  तर मग उपाय काय असायला हवा, उपाय हवा खराटा. शिवाम्बू खराट्याचे, झाडूचेच काम करते आहे.

सावधानता हाच उपाय

समजा, रोग आपण शत्रू मानला, मग मित्र त्याला म्हणूया, जो आपल्याला उभा करतो. मग शिवी देणारा शत्रू, हातात दगड घेतलेला शत्रू, काठी, तलवार, बंदूक - बॉम्ब घेतलेले शत्रू, हे सगळे वेगळे वेगळे असले तरी, सगळेच मला आडवे पाहू इच्छितात. हे ओळखून मी सावध होणे, हाच उपाय नाही का? तुमची सावधानता, सतर्कता हाच जबरदस्त उपाय ठरतो. शत्रू गोरा की काळा शोधू नये. मित्र, नकटा की धाकटा म्हणू नये. जो आपणाला उभा करील, तो मित्रच मानला पाहिजे. शत्रू तुमचे आप्त-इष्ट असू शकतील. मित्र परके, शेजारीही असू शकतील.

आरोग्याची गुरुकिल्ली

मित्रांना जवळ करा, शत्रूंना दूर ठेवा. बस्स ! हाच उपाय आहे. हाच उपचार आहे, हाच विचार हवा. मग तुम्ही मित्रांची व शत्रूंची लिस्ट करावी. तंबाखू तुम्हाला कालांतराने आडवा करणार असेल तर, तुम्ही दूर ठेवायला नको का? मग चहा आहे, दारू आहे, मटण आहे किंवा अ‍ॅलोपॅथीसुद्धा. जे म्हणून तुम्हाला आडवे करील, त्यापासून सावध राहायला पाहिजे. नजीकच्या काळाच्या परिणामापेक्षा दूूरगामी परिणाम पाहावेत. तंबाखूने त्वरित किक मिळते; पण कालांतराने मरणप्राय यातना असतील, त्याचा विचार करायला नको का? तुम्हीच तुमच्या अवतीभोवती वेगवेगळ्या टाइमबॉम्बची पेरणी करणार असाल, तर तुम्ही सुरक्षित कसे राहू शकाल? तुम्हाला कोणती अशी शक्ती, सुरक्षित ठेवू शकते? तशी अपेक्षा तरी कशी करता? तर वेळीच सावध होणे, यालाच उपचार म्हणतात. थोडक्यात, निसर्गानुकूलता हा मित्र आहे व अनैसर्गिकता हा शत्रू आहे, इतके ओळखले की पुरे आहे. शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध अन्न, शुद्ध विचार, युक्त श्रम व युक्त विश्राम ही आहे आरोग्याची गुरुकिल्ली

तुम्ही तुमचं मत देणार कोणाला? रोगाला की तुम्हाला? तुम्ही ज्याला मतदान करणार, तोच बाकी निवडून येणार.

क्रमश:

 डॉ. शशी पाटील यांनी अनेको वर्षे मोठ्या जोमाने स्वास्थ्य जनजागृतीचे कार्य केले आहे. त्यांनी अनेक शहरातून, गावोगावातून. खेडोपाड्यातून  'शिवांबू, योग व निसर्गोपचाराच्या ' प्रचारार्थ महाराष्ट्रातील गावोगावी फिरून स्वास्थ्य मोहीम राबवली. त्यांनी  या मोहिमेतून शकडो स्वास्थ्य सेवक व स्वास्थ्य प्रचारक निर्माण केले. प्रस्तुत लेख स्तंभातून, 'धडे धडाचे - गुद्दे मुद्द्याचे - आरोग्याचे ' या त्यांच्या मोहिमेतील व्याख्यानांचे संकलन, आम्ही क्रमश: प्रकाशित करीत आहोत..  

Previous Post Next Post