कारण दूर करा

मित्रहोकारणं कशाला नसतातकारणं प्रत्येकाला असतातच. मग अंगावर तिळाइतका फोड यायचा झाला तरी कारण लागतं.

झाडाचं पानदेखील कारणाशिवाय हलत नाहीअसं आपण म्हणतो. तुम्ही तरी इथे कारणाशिवाय कुठे आलातमीसुद्धा इथे कारणाशिवाय आलेलो नाही. सार्‍याच घडामोडी कारणाबरहुकूम चालत आहेत. मग ते कारण काहीही असू दे. आत किंवा बाहेर कुठेही. देहात किंवा ब्रह्मांडात कारणे दूर होताच परिणाम दूर होतील. परिणाम आहेत रोग. कारण आहे मूळ. रोग तोडायचा तर मूळं तोडा. तोडताच मूळ रोग कोसळेल.

जर रोग आपण कचरा मानलाअडथळा मानलाव्यत्यय समजलातर उपचार म्हणून काय असणार?

उपचार म्हणजे कचर्‍यावर कारवाई

सफाई - सफाई... अंतर्बाह्य कारवाई सफाईची. करू सफाई नखा-नाकाचीकरू सफाई तना-मनाचीकरू सफाई कणा-कणाची. कशी करणार सफाईकशी करणार कचर्‍यावर कारवाई?

उत्सर्जन संस्था हाच कचरा उपसणारा कॉन्ट्रॅक्टर

हे पहाअंतर्गत सफाई कशी करूयाबंदिस्त देहात देहांतर्गत हस्तक्षेप आपणाला करता येत नाही.  अन्यथा वाहिन्याआतडीफुफ्फुसे साफ करून निरपून ठेवली असती. बचाळीघसाजिभेपर्यंत आपण नाहीतरी हातानेच साफ करतो. पण आतल्या बंदिस्त शरीराची सफाई कशी बरं करणार?

आपण असं करूया काआपण आतली सफाई उत्सर्जन संस्थेकडेच देऊया. जी संस्था नैसर्गिकरीत्या तेच काम करते आहे. त्यालाच आणखी मदत करता येते का पाहूकशी बरं मदत करता येईल उत्सर्जन संस्थेलामलमूत्रथुंकीबेडकाघामलिचडीउलटी आणि उच्छ्वास यांनात्या त्या मार्गे बाहेर काढायला आणखी गती देऊया. ज्याने आतलं जग साफसूफ होऊ  शकेल.

साबण सफाईचे काममूत्राकडे द्या !

आतल्या सफाईसाठी झाडू म्हणूनसाबण म्हणून आपणाला काय बरं वापरता येईलज्यामुळे नसानसांत आणि रंध्रारंध्रांपर्यंत आपल्याला सफाईसाठी पोचता येईल. बाहेरून केमिकल म्हणा किंवा कुठली औषधं म्हणाशरीरात सफाईसाठी पाठवायचं म्हटलं तरीते अतिक्रमणच होईल. मग काय बरं करूया?

देहातून आलेले मूत्रच आपण सफाईसाठी साबण म्हणून वापरूया की ! कशी वाटते कल्पनाआपलंच बोट-आपल्याच डोळ्यात. आपलेच ओठ अन् आपलेच दात. आपलेच मूत्र आणि आपलेच मित्र.

मित्रहोतुम्हाला माहीत आहे कामूत्र हे रेचक आहे. मूत्र हे विरेचक आहे. तेव्हा यासाठी याचा मुद्दाम वापर करूया. सर्वत्र अन्य वन्य प्राणी या मार्गाचा अवलंब करताना दिसतात.  शिवाय मूत्र सजातीय आहे. पाणी भरपूर पीत रहा आणि निघणारे मूत्रही घेत रहा.

दुष्काळग्रस्त भागात आपण ऐकतो की नाही, ‘पाणी अडवा आणि पाणी जिरवा’ तसं रोगग्रस्त व भयग्रस्त माणसासाठी ‘मूत्र अडवा आणि मूत्र जिरवा’ ही मोहीम उघडली तर काय-काय बरे होऊ शकेल?

आतड्यापासून - कातड्यापर्यंतनखापासून - केसापर्यंतअणूपासून - परमाणूपर्यंत आपल्याला साफसफाई करता येईल. स्थूल अडथळ्यापासून सूक्ष्म अडथळ्यापर्यंत बारीक सारीक गोष्टी आपल्याला साफ करता येतील.

मित्रहोमूत्र हेच काम करीत आहे. त्याचं हेच काम असतं. ते देहातीलच असल्यामुळे बेमालूमपणे देहाच्या अणू-परमाणूपर्यंत ते स्वत:च आत उतरते. अडथळ्यांनाव्यत्ययांना घेरत आणि त्यांना गचांडी देत बिचारं बाहेर काढतं. ऑटोमोबाईलमध्ये पेट्रोलडिझेल यानेच गाड्यांचा आतील भाग साफसूफ करतात आणि तो उत्तम साफ होतोही. तद्वत ऑटोयुरीन उपचाराची ही पद्धती आहे.

सारे अरिष्टच कचरा

कचराकचरा किंवा अडथळाअडथळा तरी काय असतोआपण दिवसभरदुसर्‍यांची व आपल्या जिभेची मर्जी सांभाळत चुकीचं खात राहतो व सतत ठोकत राहतो. तेलमीठमैदामसाले-फसालेतिखटसाखरतांदूळ व प्राणिजन्य पदार्थांपासून अगदी दुधापर्यंत जे म्हणून खातोमग कधी जिभेसाठी खातोकधी कंपनी म्हणून खातोसंस्कृती म्हणून खातोकधी आग्रह म्हणून खातोते जातं कुठे?

तेच मित्रहोइतस्तत: अडकत राहतंफुगत राहतंकुजत राहतं. ठणकत राहतंदुर्गंध देत राहतं. हेच आमच्यात वाजत राहतं. आम्हाला वाजवतही  ठेवतं. आम्ही संस्कृतीच्या नावाखाली सारं काही निष्ठुरपणे सहन करतोकारण देश तसा वेशजग तसा मीअसंही म्हणतो.  कळून तरी काय करणारजीभ वळली पाहिजे ना?

बुक्का होऊया गिनीजबुकासाठी !

एक बाजूला पेट्रोलच्या गाडीत पेट्रोलच घालणारशाईच्या पेनमध्ये शाईच घालणाररिफीलिमध्ये रिफीलिच टाकणारकारण यात दुसरं काही घालताच येत नाही. यात दुसरं काही घालून चालतही नाही. तशी सुविधाही त्यात नसते;  पण आपल्या पोटात घालायला धरबंद नसतो.

गिनीज बुकात जायचं तर मगचला.... मातीकाचावाळू काहीही खाऊया. संस्कृती आपली म्हणते काय आहे? ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे.’ गिनीज बुकात उरण्यासाठी ऊर फोडून घेत असतात.  बुक्का स्वत: होत असतात.

रोग हीच थकबाकी

हे असेच खेळ सर्वत्र कमी-जास्त प्रमाणात चालू असतात. त्याची बेरीजच तुमच्या नावे थकबाकी सदरात निघत असते. ज्याला आपण रोग म्हणतोकुरूपता म्हणतोदुर्गंध म्हणतोदु:ख म्हणतो.

 मते ज्याला तोच सत्तेवर

सर्व दु:खांमागे अशीच बेहिशेबी बेहोषी लागलेली असते. जसे बैलाच्यामागे गाडीचं चाक लागावं तसं.

व्यवहारामध्ये तुम्ही चोराचा माल घेतलातचोराला चोरीसाठी संमतीसहानुभूती दिलीततर आपण चोरच समजले जातो. इकडे तुम्ही रोगाला इतके बळ पुरवत असतातेव्हा तुम्हीसुद्धा रोगच ठरता. ज्यांना तुम्ही मते देणारतेच निवडून येणारदुसरं काय होणार?

छोटे रोगच गबरे-खबरे

छोटे रोग प्रारंभी-प्रारंभी तुमचे मित्र असतात. तुम्हाला जाग देत असतात. सर्दी वारंवार होऊ लागली की मागून दम्याचा साहेब येत असतो किंवा ते साहेब येण्याची तयारी करीत असतात. मामलेदारकलेक्टर या साहेबांपुढे जसे त्यांचे पट्टेवाले असतातअगदी तसे पुढे काही रोग पूर्वसूचना देत येत असतात,  खबर्‍याचे काम करतात. पण आम्ही गबरे बेहोश असू तर मग कायइतक्या छोट्या-मोठ्या सूचनेवर जो मालक बंदोबस्त ठेवून गस्त घालेलतो शहाणा ठरत असतो. म्हणजे काय करायचे?

प्रत्येक रोगास कारण

देहात तिळाइतका फोडदेखील विनाकारण नसतो. त्याला समर्थ कारणे असतात. घरात कोळीष्टके नाकातोंडावर लोंबकळू लागली तरत्यालाही समर्पक कारणे असतात. आम्ही लगेच लांब काठी घेणारत्याला झाडू बांधणार. लख्ख  झाडून काढणार. मग दिवाळी असो किंवा नसो. घरातील सौंदर्याचे दिवाळे निघू नये याची काळजी घेतो. अगदी तसे देहाच्या घराचेपण आहे.

तिळाइतका फोड आला तरी देह झाडून घ्या. सर्दी आली तरीताप भरला तरीखोकलाबेडके आले तरी. कचर्‍याचा डबा भरून बाहेर कचरा डोकावतो आहे असे समजा. त्याला कोंडाळ्यात पालथा करून या.

म्हणजे काय करायचंमोठमोठी दुकानंकधी कधी स्टॉक चेकिंग म्हणतात व खरेदी-विक्री बंद म्हणून बोर्ड लावतात. तुम्ही वाचलं असेल. अगदी तसंतुम्ही खाणे-पिणे व बोलणेसुद्धा बंद करून उपवास करायचा. शर्टावर ‘इन सायलेन्स’ म्हणून लिहा हवं तर !

क्रमश:

    डॉ. शशी पाटील यांचा स्वास्थ्य जनसंपर्क खूप मोठा होता. त्यांनी अनेक शहरातून, गावोगावातून. खेडोपाड्यातून  'शून्य बजेट आरोग्य' नावाची स्वास्थ्य मोहीम अनेक वर्षे राबवली. त्यांनी  या मोहिमेतून शकडो स्वास्थ्य सेवक व स्वास्थ्य प्रचारक निर्माण केले. आपल्या सारख्या आरोग्य प्रेमींसाठी,  प्रस्तुत लेख स्तंभातून, 'शून्य बजेट आरोग्य' या त्यांच्या मोहिमेतील व्याख्यानांचे संकलन, आम्ही क्रमश: प्रकाशित करीत आहोत..

Previous Post Next Post