सर्व स्तरांचे रुग्ण

मित्रहोमाझ्याकडे सर्व स्तरांचे रुग्ण येतात. वृद्ध येताततरुण येतातमहिला येतातबालके येतातव्यसनी येतातसज्जन येतातश्रीमंत येतातगरीब येतातशिक्षित येतातअशिक्षितपण येतातमरत असलेले येतातजगत असलेलेपण येतात. देशी येतातपरदेशीपण येतातपण प्रत्येक रुग्णाला मी सामुदायिक एकच प्रश्‍न विचारतो. काय आहे तो प्रश्‍न?

सामुदायिक प्रश्‍न...

रोगाला तुमच्या पत्त्यावर कुणी बरं धाडलंका तुम्हीहून त्याला मागवलात?’ थोडं बिचारे बुचकळ्यात पडतात. पुन्हा म्हणतातकोणाला रोग पाहिजे आहे साहेबकोण कशाला रोग मागवेलमग मी म्हणतो हे तरी नक्की कायमग मला सांगाआजचा दिवस चांगला यावा म्हणूनतुम्ही पूर्वतयारी काही केलीत कायेणार्‍या पुढील म्हातारपणासाठीस्वावलंबनासाठी पूर्व जुळवाजुळव व तरतूद म्हणून तुम्ही काही केले का?

अहोकुस्त्यांच्या तारखा ठरल्या. त्या तारखेला कुस्ती पाडायचीच म्हणूनदोन्हीकडील मल्ल मेहनत घेत असतात. म्हातारपणाचा काळ ठरला आहे की नाहीमग पूर्वतयारी नको का करायलाकुस्ती म्हातारपणाची कशी बरं जिंकणारजी नाव बिनवल्ह्याची स्मशानाकडे निघाली आहे. तिला दारू देऊनचहा पाजवूनतंबाखू देऊनपुन्हा वल्हे का म्हणून मारीत आहाततुम्हाला इतकी का घाई आहेघाईच आहे तर इकडे काय म्हणून वळलात?

सगळेच खड्ड्याकडे...

मग म्हणतात, ‘काय सांगू साहेब! संगतगुण- दुसरं काय?’ सगळीच निघाली ज्या वाटेनंमीही निघालो झालं! सगळेच खड्ड्याकडे निघाले आहेत.  गर्दी खड्ड्याकडेच निघाली आहे.

सुशिक्षिततो तरी कुठे सुरक्षित?

मित्रहो ! आपण मला सांगाआम्ही शिक्षण कशासाठी घेत आहोतउमेदीचं वयक्षण-क्षण शिक्षणात कशासाठी वेचतो आहोतशिक्षणाला काय बरं समजताशिक्षण म्हणजे ज्ञानशिक्षण म्हणजे बुद्धीशिक्षण म्हणजे विद्वत्ताशिक्षण म्हणजे शहाणपणाशिक्षण म्हणजे प्रगती. होय ना ! मग आमचा शिक्षितसुशिक्षित होऊनही आज सुरक्षित का नाहीतो दवाखान्यात जाऊनही का बरा नाहीघोटाळ्यात का सापडतो आहेजेलमध्ये का दिसतो आहेत्याचेच माय-बाप वृद्धाश्रमात का येत आहेततुमच्या प्रगतीची व्याख्या तरी सांगाल?

440 व्होल्टहात लावूच नका ! हा बोर्ड निरक्षराला वाचता आला नाही आणि म्हणूनच तो बिचारा वाचला नाही. म्हणजे तो जगला नाही. म्हणजेच तो त्या बोर्डला चिकटला. वाचणाराच मात्र वाचला म्हणता. मित्रहोअसेच बोर्ड पी. डब्ल्यू. डी. ने रस्त्याच्या कडेला टांगून ठेवले आहेतउभे केले आहेत. ‘मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. घाट वळणाचाअरुंद पूलगाडी सावकाश हाका. घरी वाट पाहत आहेत.’ वगैरे वगैरे... तरी आमच्या गाड्या त्याच बोर्डवर विस्कटत आहेत.  ड्रायव्हर निरक्षर म्हणता काबरंठीक आहे.

मनाचा ब्रेक

असेच बोर्ड आणि अशाच शब्दफिती ‘सिगारेट स्मोकिंग इज इन्जुरिअस टू हेल्थटोबॅको इटिंग इज इन्जुरिअस टू हेल्थ’ असे लिहिलेले तुम्ही वाचले आहे का?

 मग तुम्ही वाचला का नाहीतमग का मरता आहातयांचा वापर करणारे निरक्षर नाहीत ना?  मग हे वाचूनका वाचले नाहीतआज डॉक्टरवकीलइंजिनिअरशिक्षक सारेच उच्चभ्रू अज्ञानाचे साल सोलीत हे ओढतात कसेखातात कसेतर तुमच्या शिक्षणाचा आदर्श तुमच्या पुढच्या पिढीने काय घ्यावातुम्ही या आरोग्याचे मालक कसे होऊ शकताअहोपेरणार ते उगवणार की नाहीमग पेरा तुम्ही रानातमनाततनातआणि पेरा कणा-कणांत. पेराल तेच उगवेल ना !

विजेच्या प्रवाहित सोललेल्या वायरला स्पर्श करूनतुम्ही सुशिक्षित म्हणून किंवा सॉरी म्हणून सुरक्षित राहू शकणार कावीज तत्काळ आपले काम करीलच. मग तुम्ही कुणीही असा!

आम्ही सारेच देवाचे लाडके पुत्र आहोत. तुम्ही जी मागणी कराल ती ती मिळवालच. म्हणून म्हटले आहेइच्छा तसे फळ. भाव तसे बळ. दामदुप्पट परत करायला तयार आहे.  पण केव्हास्वतःच्या हातातल्या धान्यावरचा हक्क शेतकरी जेव्हा जमिनीत गाडायला तयार झालातेव्हाच जमीन त्यालात्याच्या सहस्र पटींत परत करायला तयार झाली. कारण निसर्ग तसा समृद्ध आहे.

नियम यमालासुद्धा

मित्रहो ! नियम प्रत्येकाला असतात. नियम यमालाही सुटले नाहीत. यम ‘यम’ असला म्हणून काय झालंकुणाच्याही गळपटीला धरून तो उचलू शकत नाही. तसं उचलणं शक्यही नाहीकारण निसर्गाचे नियम किंवा कायदे कुणीही हातात घेऊ शकला नाही. म्हणजे यमालासुद्धा नियम आहेत. तुम्ही निसर्गाचे कायदे हातात घेताच कसेबंदिस्त शरीरात तुम्ही शिरताच कसेहत्यारेअवजारे तुम्ही कोंबताच कसे?

नियमाशी खेळता कसे ?

अहोतुमच्या शाळेला नियम आहेत. ऑफिसला नियम आहेत. रस्त्याला नियम आहेत.  वाहतुकीला नियम दिसत आहेत. डोक्यावरच्या ढगालाही नियम आहेत.  नियम ग्रहाला आहेतग्रहमानाला आहेत. अणू-परमाणूला नियम आहेत. नियम तुमच्या खेळालापण आहेत.  पण नियमाशी कुणी खेळतात काखेळलात नियमाशी तर अंपायर ‘आऊटआऊट’ करून आकाशाकडे हात करीलच. मग तुम्ही कुणीही असानियमापुढे अपील नाही.

सर्व धडे धडासाठीच

 मित्रहोधडे शाळेचे घ्याखेळाचे घ्याधडे संस्कृतीचे घ्या किंवा धडे धर्माचे घ्या. सर्व धड्यांमागे आपला एकच उद्देश असतो. कायतर धड... धड राहावे. अधेमधे धड धडपडूच नये. हा इतका सामान्य हेतू असतोच की नाहीमग तुम्ही प्रत्येक ठिकाणी का धडपडत आहातका कोलमडत आहातदवाखान्यात गर्दीकोर्टात गर्दीपोलीस कचेरीत गर्दीरस्त्यावर गर्दीस्मशानात गर्दी. सर्वत्र मग गर्दी का दिसते आहे?

ढीग औषधांचा

तुम्ही ज्ञानाचा ढीग टाकत आहात. मुलांचा ढीग टाकत आहात. रोगांचाही ढीग टाकत आहात.  वैद्य- डॉक्टरांचा तर ढीग आहेच. औषधांचाही ढीग का टाकत आहात?

रोग अडथळे तर औषधे शस्त्रे

मित्रहोरोग रोग आहेच कायऔषधे - औषधे ही काय आहेतविचार कुणीकुठे केलाय?

माझ्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवालाजर विचारलात तर, 20 हजार रुग्णांवर केलेल्या प्रयोग-निष्कर्षाला जर जाणलात तरमी औषधाला म्हणेन ‘शस्त्र’ आणि रोगाला म्हणेन ‘अडथळे’. रोग आहेत केवळ अडथळे. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसाकेसापर्यंतआंतड्यापासून कातड्याच्या रंध्रारंध्रांपर्यंतजी जैविक प्रक्रिया चालू आहेजे प्रचंड दळणवळण चालू आहेजी उलथापालथ चालू आहेजी घालमेल होते आहेया त्याच्या नैसर्गिक चयापचयामध्ये जो अडथळा येतोतोच आहे रोग. चुकीचे विचारबेहिशेबी तणावबेहिशेबी खाणे-पिणेराहणे यांशिवाय दुसरे काही नाहीच. मग या अडथळ्याला तुम्ही काहीही म्हणू शकता?

दगड म्हणा - धोंडा म्हणापाला म्हणा - पाचोळा म्हणाजंतू म्हणा - व्हायरस म्हणाकुजला म्हणा - सडला म्हणा - शिजला म्हणाकाहीही म्हणा. हाच तुमचा रोग आहेहे आधी लक्षात घ्या.

रोग आमच्या हयगयीतूनआमच्या आळसातूनआमच्या अज्ञानातूनआमच्या बेहोशीतून आला आहेहे लक्षात घ्या. मगच रोगातून सुटू शकाल. कडीला कोयंडा की कोयंड्याला कडी आधी समजून तरी घ्या. 

मित्रहोऔषधंमग सारी सारी औषधं ही ‘शस्त्र’ आहेत. मग होमिओपॅथी असोआयुर्वेद असो किंवा आजीबाईच्या बटव्यातील काठ असो. शस्त्रं आपण हातात कधी बरं घेतो?

तडजोडीच्या वाटा संपल्यावरसमजुतीच्या आशा संपल्यावरसुसंवादाच्या दिशा संपल्यावर. मग माणूस ‘शस्त्र’ हाती घेईल. पहिलं शस्त्र म्हणून तो शिवी देईल. मग दगड हातात घेईल. काठीभालातलवारपिस्तूलबंदूकबॉम्बअणुबॉम्ब वगैरे वगैरे क्रमश:. ही केवळ लढाईचीच नीतिमूल्ये नाहीततर ती तशी आरोग्याचीही आहेत.

तुमची कबर तुम्हीच खोदताउगीचच जर तुम्ही अंगाखांद्यावर बसलेल्या डास-पिसवांना पिस्तूल- बंदुकीने डागत राहालही तुम्ही तुमची मर्दुमकी म्हणाल,  याला तुम्ही ‘प्रगती’ हे नाव द्यालतर तुम्हीच सांगातुमची कबर तुम्हीच खोदत नाहीये का?

तुम्ही काय म्हणून स्मशानाकडे गती घेत आहातजी अरिष्टे फुंकली तरी उडून जाणारी होती.  त्यांवर अग्निबाण कशाला सोडीत आहातआधीच माणूस मर्कट ! त्याला मद्य पाजवून त्याच्या हाती कोलीत कशाला देत आहात?

मित्रहोमी तुम्हाला आत्मविश्‍वासाने सांगतोअगदी सर्दी-पडशापासून खोकला-ठोकलामधुमेहरक्तदाबअल्सरकॅन्सरएड्सअन्थ्रेक्ससारे ज्ञात-अज्ञात रोगांना आपल्या अंगणात कोणी बरं बोलावलं?

मी तर म्हणतोआमच्या नव्या लाईफ - स्टाईलने यांना पाचारण केले आहे. आम्ही आमचं कुंपण उद्ध्वस्त केलं आहे. आम्ही आमच्या अंगणात खड्डा पाडला आहे. आम्ही आमचं सुरक्षाकवच तोडलं. वसुंधरेच्या भोवती असलेले कवचच नव्हेतर आपल्याभोवती असलेले प्रतिकारशक्तीचे कवचही तोडले. पाणी पातळीही जमिनीखाली खोल निघाली आहे.

सुंदर वसुंधरेचा टाईम बॉम्ब

पडक्या कुंपणावर पाय देत देतहे मोठमोठाले रोगआज मोठमोठ्या देशांनाशहरांना वाकुल्या दाखवित निघाले आहेतभिववत आहेत.

सुंदर वसुंधरेला बिघडवलंत. शेतालाकाळ्या आईला खराब केलंतशेतकर्‍याला खराब केलंतव्यापार्‍यांची मती भ्रष्ट केलीराज्यकर्त्यांची नीती उद्ध्वस्त झाली. हे सारं कशानं बरं झालं?

विज्ञानानं चैनीच्या वस्तू बाजारात आणल्या. वस्तूंनी आज वास्तू भरल्यावास्तूतली वास्तविक शांतता सिमेंटने समेटलीकधीकाळी लावले गेलेले टाईम बॉम्ब एकमेकांना थडकून फुटताहेत.  तुम्ही पेरलेलेच शेवटी उगवत आहे म्हणायचे !

मित्रहोनिसर्गात देर है मगर अंधेर नहीं है। उशिरा का असेनाजे होईल ते यापेक्षा काय असेल?

उपचार उपचार काय आहेत?

कशाला म्हणणार उपचार? काय आहेत उपचार?

उपचार म्हणजे मोडतोड नव्हे.

उपचार म्हणजे कापाकापी नव्हे.

उपचार म्हणजे टोचाटोची नव्हे.

उपचार म्हणजे दाबादाबी नव्हे.

उपचार म्हणजे रक्तपात नाही.

उपचारांत औपचारिकता कशाला?

हा षोडशोपचार पाहिजेच कशाला?

मित्रहो, उपचार म्हणजे सामोपचार.

उपचार म्हणजे तडजोड.

उपचार म्हणजे सुसंवाद.

उपचार म्हणजे चार गोष्टी समजुतीच्या.

उपचार म्हणजे बाह्य जग व अंतर जग यांचे मिलन.

उपचार म्हणजे अंतर जगताची विचारपूस.

उपचार म्हणजे सफाईची कारवाई.

उपचार म्हणजे चार गोष्टींची पूर्तता.

उपचार म्हणजे काय आहे, काय नाही? काय संपलं?

यांची चौकशी.

क्रमश:

डॉ. शशी पाटील यांचा स्वास्थ्य जनसंपर्क खूप मोठा होता. त्यांनी अनेक शहरातून, गावोगावातून. खेडोपाड्यातून  'शून्य बजेट आरोग्य' नावाची स्वास्थ्य मोहीम अनेक वर्षे राबवली. त्यांनी  या मोहिमेतून शकडो स्वास्थ्य सेवक व स्वास्थ्य प्रचारक निर्माण केले. आपल्या सारख्या आरोग्य प्रेमींसाठी,  प्रस्तुत लेख स्तंभातून, 'शून्य बजेट आरोग्य' या त्यांच्या मोहिमेतील व्याख्यानांचे संकलन, आम्ही क्रमश: प्रकाशित करीत आहोत...

Previous Post Next Post