दुसरी भेट ब्रिटिशांची
पाहुणचार, शिष्टाचार, सदाचार, प्रचार... ही अशी चार माणसे, एकत्र आली की सुरू झाला षोडषोपचार, चहा घ्या - चहा प्या, घोटभर तरी घेऊयाच की... चहात बुडाला सदाचार !
चहा भिनला आज हाडाहाडांत आणि अलोपॅथी भिनली रक्ताच्या थेंबाथेंबांत, कणाकणांत.
मेजॉरिटी यांचीच
चहाला व अलोपॅथीला नावे ठेवणार्यांची बाकी आता धडगत नाही; कारण मेजॉरिटी यांचीच, विद्वान यांचेच, श्रीमंत यांचेच, गरीब यांचेच, वृद्ध यांचेच, मुलेबाळे व कपबशा यांच्याच. यांची सकाळ कपबशांच्या आवाजांनीच होईल व हेच उद्याच्या भारताचे आधारस्तंभ असतील.
उरलेल्यांची मती भ्रष्ट
चहावाले गडगंज झाले. वृत्तपत्रांकडे पैसा देऊन उलट-सुलट, हवे तसे छापू लागले, ज्यामुळे उरलेल्यांची मती भ्रष्ट व्हायला सोपे झाले. चहा आपल्यामध्ये काय करतो? हे आज महत्त्वाचे आहे. चहा कसा विश्वासघात करतो आहे, गळा कापत आहे, हे एक शास्त्रज्ञ आम्हाकडे पत्र लिहून स्पष्टच कळवीत आहे.
अनेक रोगांचे घर
आजच्या घडीमध्ये, आपल्या देशातच नव्हे; तर विदेशातही स्फूर्ती देणारे, उत्तेजक पेय कोणते मानले जात असेल तर ते चहा आणि कॉफी हे होय. आपल्या कामामध्ये मरगळ आली असता, पुन्हा ‘रिचार्ज’ होण्यासाठी आपण चहा किंवा कॉफी घेतो; पण चहा-कॉफी प्यायल्याने, शरीर अनेक रोगांचे घर बनते. आजकाल चहा-कॉफी या पेयांचे इतके प्रमाण वाढले आहे की, चहा-कॉफी हे एक आदरणीय, सन्माननीय पेय झालेले आहे.
दुष्परिणाम
चहा-कॉफीमुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊन पचनक्रिया बिघडते, भूक मंदावते, आतड्यांत अल्सर होतो, मलावरोध व निद्रानाश यांसारखे दुष्परिणाम होतात.
लहान मुलांसाठी विष
लहान मुलांना चहा-कॉफी दिल्याने त्यांची आतडी करपतात, हृदय कमकुवत होऊन, हृदयरोग होतो. मेंदूत उष्णता वाढून, फेफरे, आकडी वगैरे रोग होतात. मुले-मुली अल्पायुषी होतात. तसेच गरोदर स्त्रीने चहा प्यायल्याने, अल्पायुषी, लुळी-पांगळी मुलंमुली त्यांना होतात. लहान मुलांना चहा देणे हे विष देण्यासारखे आहे आणि आजकाल चहा-कॉफीत कडकपणा आणण्याचे फॅड जास्त प्रचलित झाले आहे; परंतु हाच कडकपणा आरोग्यास हानिकारक ठरू शकतो.
चहा-कॉफीत दहा प्रकारची विषं
1) ‘टॅनीन’ नावाचे विष 18 % असते. ते पोटामध्ये अल्सर व गॅस निर्माण करते.
2) ‘थिनफ’ नावाचे विष 3 % असते. यामुळे मेंदूवर परिणाम होऊन वेडेपणा येतो, तसेच फुफ्फुसांत व मस्तिष्कात जडपणा येतो.
3) ‘कॅफिन’ नावाचे विष 1.5 % असते. हे शरीरामध्ये असिडिटी निर्माण करते व किडनीला दुर्बल बनविते.
4) ‘कॉलाटाइल’ नावाचे विष आतड्यांवर हानिकारक प्रभाव टाकते.
5) ‘कार्बोनिक असिड’ यामुळे असिडिटी वाढते.
6) ‘पैमिन’ मुळे पचनशक्ती दुर्बल होते.
7) ‘रिशेमोलिक’ आतड्यांवर हानिकारक प्रभाव सोडते.
8) ‘साइनोजन’ मुळे अनिद्रा व पॅरॅलेसिससारखे भयंकर आजार उत्पन्न होतात.
9) ‘ऑकसेलिक असिड’ शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते.
10) ‘स्टीनॉयल’ मुळे रक्तविकार व नपुंसकता उत्पन्न होते.
चहामुळे, मेंदूवर व ज्ञानतंतूंवर परिणाम होऊन नाडीचे ठोके वाढतात. श्वासोच्छवासचा वेग वाढतो. रक्तातील चरबीचे प्रमाणही वाढते.
चहा घेतल्याने रक्तातील चरबीचे हृदयवाहिनीच्या अंतःस्तरावर थर साचण्यास सुरुवात होते. परिणामी हृदयवाहिन्या टणक बनून, हळूहळू रक्ताचा दाब वाढू लागतो.
चहा प्यावा की नाही हे आपणच ठरवा
एखाद्याला घरी चहा-कॉफी न मिळाल्यास डोके दुखणे, बैचेन वाटणे, आळस येणे यांसारखी लक्षणे चहाअभावी नसून, त्या पेयाच्या सवयीच्या अधीन झाल्यामुळे दिसून येतात. कारण म्हणतात ना,‘ हॅबिट इज सेकंड नेचर’ म्हणजेच सवय ही मनुष्याचा दुसरा स्वभाव आहे. त्यामुळे आता, चहा-कॉफी प्यावी की नाही हे आपणच ठरविलेले बरे !
तसाच चहा शाप देणारा शत्रू आहे. शापाचे वळ नसतात; पण परिणाम असतात. कोणाचे पित्त वाढवील, कोणाची भूक थांबवील, कोणाची चव घालवील, कोणाच्या निकोप शौचकाळात बाधा पोहोचवील, कुणाची झोप उडवील, कोणाचा रक्तदाब वाढवील, कुणाच्यात तमस आणील; पण या सर्वांच्या मुळाशी चहा आहे, याचा मात्र चहा पत्ता लागू देणार नाही.
सामाजिक बांधीलकी
मी माझ्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत ब्रिटिशांच्या या दोन भेटींना, जबरदस्त पर्याय शोधू शकलो. धारदार ब्लेडशी किंवा तीक्ष्ण हत्याराशी मूल खेळत असलेले दिसले, तर पालक वेगाने धावतात. हळूच ते ब्लेड किंवा ते तीक्ष्ण हत्यार मुलाच्या हातातून अलगद सोडवून घेतात. ज्याने संभाव्य अरिष्ट टळतं. अगदी तसे समाजाच्या गळ्यातील ताईत झालेली ही दोन्ही विषं, अलोपॅथी व चहा सोडवून घेणे आवश्यक आहे. ही धारदार हत्यारे, सामाजिक बांधीलकी जपणार्या व्यक्तींनी, हळुवाररीत्या काढून घेण्याचे कौशल्य अदा करावे.
अलोपॅथीला पर्याय ‘शिवाम्बु निसर्गतंत्र विज्ञान’ व चहाला सुंदर पर्याय सोया कॉफी ठरू शकतो.
आरोग्याची व्याख्या
आज आरोग्य का बिघडले आहे? आज आरोग्य टिकवणे कठीण का जाते आहे?
आरोग्य समजून घेताना आधी आरोग्याची व्याख्या काय करूया?
आर + योग्य
अरे बाबानो, योग्य गोष्टींचा मेळ घाला. हे जर आरोग्य हा शब्दच सांगत असेल, तर मग आंधळ्यांना हवेच काय ?
आता योग्य म्हणजे युक्त, बरोबर !
अचूक धनुष्य लावायचा झाला, बंदूक झाडायची झाली, सूर पेटीतला सूर लावायचा झाला तर, त्याला आधी बरोबर लावून घ्यावे लागते.
आता आरोग्य पाहिजे कुणाला? मला हवं, तुम्हाला हवं, याला हवं, त्याला हवं. सर्वा सर्वांना हवंच.
ज्यांना आरोग्य हवे, त्यांनी स्वतःला लावून घ्यायला नको का? देहपिंडाची प्रकृती, ब्रह्मांड प्रकृतीला लावून घेतली पाहिजे, जुळवून घेतली पाहिजे, म्हणजे ट्यून केली पाहिजे.
नेमके काय करायचे ?
आपलं खाणं-पिणं, बसणं-उठणं, बोलणं-चालणं, वगैरे वगैरे यांना आपण लावून घेतलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, आपला संपूर्ण दिनक्रम चोवीस तास, आरोग्याचे भान ठेवून, समजावून घेतला पाहिजे हे ओघाने आलेच.
चुकले कुठे ?
आम्ही बहुसंख्यांना महत्त्व देऊन संस्कृती काय म्हणते, चाल-रीत काय म्हणते, लोक काय म्हणतात, राजा कसा वागतो, विद्वान कसा चालतो, श्रीमंत कसा राहतो, अगदी तसेच आम्ही अनुकरण करतो आहोत.
अनुकरण
राजा दारू प्याला, आम्ही पिणार; राजाने दासी ठेवल्या, आम्ही ठेवणार; राजा गाडीत बसला, आम्ही बसणार; राजा गादीवर लोळला, आम्ही लोळणार. म्हणजे थोडक्यात काय, आमचा मुखिया (बॉस) जे करील, तेच आम्ही करणार. बहुसंख्य जे करतील तेच करणार !
मेंढरांच्या कळपाप्रमाणे
एक मेंढरू खड्ड्यात पडलं - दुसरंही खड्ड्यातच. एका माकडाने टोपी टाकली - सगळी टोप्या टाकणार. एकाने घातली, तर सर्व घालणार. मात्र तो एक तर, नेता तरी हवा किंवा अभिनेता.
आरोग्याचा ताव
पै-पाहुणे, पैसा, बँक बॅलन्स, करीअर, नाव, गाव, भाव यांच्या नादातच याचा आरोग्याचा ताव गायब! विज्ञानाने माणसाच्या पोटातले पाणी हलूच नये, अशा सुविधा पुरवायच्या ठरविल्या आहेत. सर्व काही हाताजवळ, चव जिभेजवळ, गंध नाकाजवळ. त्यामुळेच माणूस बेभान झाला, आळशी झाला, जड झाला, तापट झाला, तर्हेवाईक झाला, कुरूप झाला, बेढब झाला, दुःखीकष्टी, विकलांग झाला आणि रोगी झाला. त्याने आरोग्य गमावले आणि वैभव संपवले.
आम्ही प्राकृतिक होऊच नये की काय? संस्कृतीने आम्हाला करकचून बांधले आहे. त्यामुळेच आज आम्ही रांगत आहोत, खेळत आहोत... ठो... ठो... ठोकत आहोत, टाचा घासीत आहोत.
जिथे आम्ही हरवलो तिथेच आम्ही अजूनही सापडू शकतो. आम्ही शोधतोय डॉक्टरच्या खिशात, विज्ञानाच्या परीक्षानळीत, आम्ही शोधत आहोत आम्हालाच. मात्र अजूनही आम्ही सापडलो नाही.
माझा अनुभव सांगतोय, शोधा तुम्ही, तुम्हालाच, स्वयंपाकघरात, शोधा तुम्ही तुमच्या एकांतात, शोधा तुम्ही तुमच्या विचारांच्या गाभार्यात, तुम्ही सापडल्याशिवाय राहत नाही, ‘आनंदकुंज’ आश्रम काम तेच करतो आहे. तुम्हाला तुमचीच गाठ घालून देतो आहे.
सर्व काही आरोग्यासाठीच
जी गोष्ट दुर्मिळ होते, तिलाच महत्त्व येतं. सोनं तरी महाग का? अहो, ते दुर्मीळ आहे. आज आरोग्य महाग का? तर ते आज भारंभार पैसा खर्चून मिळाले का? म्हणून आरोग्य महत्वाचे झाले, मोलाचे झाले. आरोग्यासाठी तुम्ही काय बरं नाही केलं?
उद्देश
जसा प्रत्येक प्राणी जीव वाचवू इच्छितो, जगू इच्छितो, आपण पण क्षण-क्षण खपवून शिक्षण घेतो, पै-पैसा मिळवून श्रीमंत होतोय, घाम गाळीत कुटुंब व्यवस्था उभी करतोय, संस्कृती विणतोय, या सगळ्यांचा उद्देश काय...?
सुशिक्षित सुरक्षित
तर... आपला उद्देश जीवनप्रवास सुखरूपपणे पैलतीर गाठावा, हाच आहे ना? मग मला विचारावे वाटते, सुशिक्षित माणूस आज सुरक्षित तरी आहे का? श्रीमंत निर्वेध आहेत का? आपली संस्कृती प्राकृतिक राहिली का? स्फोट-घटस्फोट आमच्या कुटुंबव्यवस्थेला टिकवून ठेवीत आहेत का? मला जरूर याचे आश्चर्य वाटते. एका बाजूला संस्कृती म्हणते, शहाण्यांनी दवाखान्याच्या व कोर्टकचेरीच्या पायर्या चढू नयेत, मग या पायर्यांवर याशिवाय गर्दी कोणाची दिसते?
रोग सुविधेच्याच ठिकाणी
ज्याच्याकडे ज्ञान आहे, शिक्षण आहे, धन आहे, पद आहे, सत्ता आहे, त्यांच्याकडे रोगांची गर्दी कशी? सुविधेच्याच ठिकाणी रोगांची गर्दी होत आहे. सुशिक्षित सुरक्षित नको का? रोगाचे वास्तव्य, वास्तविकता अडाण्याकडे, गरिबाकडे, वेड्याकडे, मूर्खाकडे, भटक्याकडे जरूर शोभले असते; पण ही मंडळी मजबूत दिसतात.
प्रतिकारशक्तीने पुष्ट
आपण गंमत पहा, शेटजीपेक्षा शेतकरी, दलालापेक्षा हमाल, साहेबापेक्षा शिपाई, शेतकर्यापेक्षा धनगर, पोलिसापेक्षा फरारी (वीरप्पन), मला मजबूत व प्रतिकारशक्तीने पुष्ट दिसले आहेत.
सगळी माया आम्ही मिळवली, ती रोगप्रतिकार शक्ती पुष्ट व्हावी म्हणून. तीच आपण गमावत असू तर... बाकी सार्यांचे प्रयोजन काय ?
स्वास्थ्याचे कॉन्ट्रॅक्ट
या पॅथीकडे एच. आय. व्ही.चे रुग्ण येतात, त्यांनाही मी बोलून बोलून जाग आणतो. काही शब्दच आमचे औषधाचे काम करतात. एच. आय. व्ही. रुग्णांना आकाशाखाली या, आकाशच विनाअवकाश रोगप्रतिकारक शक्ती बहाल करते. पांघरुणे, इमारती, पेहराव, बंदोबस्त व सुविधा यांनीच आम्ही नाजूक व कमकुवत, क्षीण, अगतिक, हवालदिल होताना दिसतो आहे. महिलावर्ग अधिक करून बंदिस्त राहत असल्यामुळे, त्यांची आज केविलवाणी स्थिती झाली आहे. आधीच सिमेंटची जंगले, त्यात सूर्यकिरणांचा पत्ताच नाही, जो एकटाच सूर्य स्वास्थ्याचे कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतो.
डॉ. शशी पाटील यांनी अनेको वर्षे मोठ्या जोमाने स्वास्थ्य जनजागृतीचे कार्य केले आहे. त्यांनी अनेक शहरातून, गावोगावातून. खेडोपाड्यातून 'शिवांबू, योग व निसर्गोपचाराच्या ' प्रचारार्थ महाराष्ट्रातील गावोगावी फिरून स्वास्थ्य मोहीम राबवली. त्यांनी या मोहिमेतून शकडो स्वास्थ्य सेवक व स्वास्थ्य प्रचारक निर्माण केले. प्रस्तुत लेख स्तंभातून, 'धडे धडाचे - गुद्दे मुद्द्याचे - आरोग्याचे ' या त्यांच्या मोहिमेतील व्याख्यानांचे संकलन, आम्ही क्रमश: प्रकाशित करीत आहोत..