मुळनक्षत्री : एक प्रेरणादाई जीवनधारा : भाग - 11
एड्स संस्कृती, शिवाम्बु व माझ्या धारणा
आजकाल तब्येत उतरायला लागली. औषधे दाद देईनाशी झाली की, प्रत्येकाच्याच मनात एक अनाहूत भीती वाटायला लागते. अनके वैद्य बदलले, तज्ज्ञ संपवले, औषधे खाल्ली आणि तरीसुद्धा रोग लक्षणे मजल दर मजल करीत आगेकुच होत राहिली, तर एक अनामिक खंत वाटायला लागते. एक हूरहूर लागायला लागते.
मला..., तो म्हणतात ‘तो’ नवीन एड्स तर नसेल?
कारण एड्स आमंत्रित करायला, धंदेवाईक वेश्येजवळ जायला पाहिजे. असं आता नाही राहिलं! कोणाला एड्स झालाय यापेक्षा कोण एड्सशिवाय उरलाय, याची चाचणी युद्ध पातळीवर कुठेतरी केली पाहिजे. शिवाय या चाचण्या तरी कुठे सुया मारण्यावाचून होणार आहेत? तांदळात खडे की खडयात तांदूळ मिसळलेत, म्हणजे उपस्थिती कोणाची अधिक? हे पाहूनच बाजूला काढावयाची अल्पसंख्यांक गोष्ट बाजूला काढली पाहिजे. ज्याने कष्ट कमी होतील.
इथं असलेल्यांपैकी तुम्ही आणि मी सुद्धा. एड्स व्हायरसने बाधीत असू शकतो म्हटलं! म्हणजे एड्ससाठी दुर्जनता हा एकच निकष आता राहिलेला नाही.
कारण सर्वच गतिशील आहेत. धावत आहेत. खडा व लगोरी एकमेकांसोबत धावत आहेत. छोटे मोठे अपघात सतत चालूच आहेत.
ड्रेसिंग, इंजेक्शन, सर्जरी, स्टिचेस, इमर्जन्सी चालूच आहेत. चार भिंतीच्या बाहेर पडायचे नाही, असे जरी ठरवले तरीसुद्धा आपले समृद्ध जीवन कुठेतरी आम्हाला ओरखडेलच.
मऊ अंगावरून न्हाव्याची भादरत जाणारी हत्यारे आहेत. डेंटल विभागाची टोकदार हत्यारांनी चालू असलेली परीक्षणे आहेत, नखे खुरडताना जिव्हारी लागणारे नेलकटर्स आहेत. ब्लेड्स, सेव्हींग आहेत. टेलरिंगच्या दुकानात हातघाईने होणारी हात शिलाई आहे. बटणे लावताना अनेकदा टोचणार्या सुया आहेत. शेतवाडीतून जंगलातून पाऊल वाटेनं जाताना अनेकांना तेच ते ओरखडणारे काटे आहेत. फोडया-फुंगशीसह परस्पर हातांनी केलेले हस्तांदोलन आहे.
सहकारातून केल्या जाणार्या श्रमदानाच्या वेळी वारंवार होणार्या परस्पर जखमांचा संसर्ग आहे. एड्सग्रस्त देहावरून नुकताच नाश्ता करून उठलेला टपोरा डास, मी माझ्या अंगावर मारला, त्यातल्या रक्ताचे शिंतोडे त्याच्या नजीक असलेल्या माझ्या उचकटलेल्या खपल्यांच्या जखमा इत्यादींचे काय?
इतका संशय... इतका संकुचितपणा, तुम्हाला नक्कीच ठीक नाही वाटणार. पण करणार तरी काय? ...धुतल्या तांदळासारख्या कुटुंबात एड्स शिरलाय म्हंटल्यावर विचार करायला नको का? आता यातले काय डिस्पोज करणार? कुठे म्हणून काळजी घेणार? का इथूनं आपणचं डिस्पोज व्हावं असे वाटणार...!
अहो, एड्स तुम्हालाच डिस्पोज करतोय. अर्थात या जगातून काढून फेकतोय आणि तो तसा आपल्याला फेकू नये म्हणून तर, रक्ताशी संबंध आलेली अवजारं आम्ही फेकू लागलो आहोत, होय की नाही? मुलगा, बाप, भाऊ, बहीण हे संबंधित रक्ताचे लोक नव्हेत हो, यांना तर आमच्या नव्या संस्कृतीनं केव्हाच फेकलं आहे... परंतु, हम मिया बीवी और राजपुत्र, फेकले जाऊ नये म्हणून काळजी घ्याल की नाही? जेंव्हा आभाळ फाटत तेंव्हा कुठं दडायचं? मग शेवटी आहेच हो, सगळयांच्या बरोबर ‘काय होईल ते, होऊ द्या तिकडं!’
आज तरी वल्ली एड्स तज्ज्ञ म्हणत आहेत. चुंबन घ्यायला काळजी नको, परस्परांची पांघरूणे ओढायला चिंता नको. एकमेकांच्या तोंडातला घास खायला फिकीर नको, एकमेकांना अलिंगन द्यायला हयगय नको वगैरे वगैरे...
पण चुंबन म्हटल की तोंडावर तोंड आलचं. ओठावर ओठ व दातावर दात घासू लागलेत. जीभ जीभेला ढकलू लागली, अशी लढाई आरंभल्यावर मग कोण होशमध्ये असणार तरी? मग कुठे कुठे हात सरकत जातील. त्यांचे पत्ते कोण देणार तरी? कोणाचे म्हणून दात, जीभ जखमी नाही आहेत? कोण एड्सचा नाही? याचे सर्टिफिकेट कुठल्या रिकाम्या हातात असणार तरी?
आधीच शारीरिक विषयात निरक्षर अशी आंधळी मंडळी... पुन्हा त्यांची मतीही बधीर करून सोडत आहेत झालं! हे एड्स तज्ज्ञ, काय साधतात तरी?
एकतर म्हणे, एड्स व्हायरस तकलादू आहेत. देहाच्या बाहेर येताच म्हणे मृत होत आहेत! एकतर एड्स म्हणजे प्रतिकार शक्तीचा र्हास म्हणता! तर मग सुया सिरींज डिस्पोजेबल जे काही आहे ते ऑक्टोक्लेव्ह मध्ये का जाळता बरं?
माझ्याकडे या उपचार दालनात एड्स बाधित लोकही या उपचाराकरिता, मार्गदर्शनाकरिता आशा घेऊन येऊ लागले आहेत. तथापि, एड्स बाधित लोकांना, स्वसंरक्षणासाठी वैद्य हकीमांच्या दारोदार फिरत राहणार्या लोकांना मी नेहमीच एक प्रश्न विचारतो.
“तुम्ही गोठयातले पाळीव प्राणी व जंगलातील मोकाट असलेली जनावरे पाहिली आहेत का?”
“या दोन प्रकारच्या प्राण्यांमध्ये अधिक पुष्ट, अधिक सक्षम, अधिक प्रसन्न कोणती जनावरे असतात हो?”
“गारूडयाच्या जवळच्या बुट्टीतला साप व रानोमाळ सळसळणारा साप... यात चपळता, चकाकी, तेज कोणत्या सापात दिसते हो?”
साहजिकच त्यांची उत्तरे असतात. रानोमाळी दिसणारे साप व जंगली जनावरे अधिक बलवान, तेजस्वी व चपळ असतात. या उत्तरानंतर त्यांना थोडं अंतर्मुख व्हायला अवधी देतो.
पुन्हा प्रश्न विचारतो...
“जंगली, आदिवासी किंवा रानोमाळी भटकणारा धनगर मेंढपाळी व ऐषारामात लोळणारा, समृद्धीचा आस्वाद घेणारा, महालातला मनुष्य, यात भक्कम, शक्तिशाली कोण?” याचेही उत्तर अपेक्षितच देतात कि, “रानोमाळचा जंगली मनुष्य भक्कम व शक्तिशाली असतो.”
मग मी त्यांना विचारतो, “त्यांनी किती औषधे वगैरे खाऊन भक्कमता मिळवली?” तर नाही म्हणे, “त्यांना वातावरणानचं तसं बनवलंय...!”
“...मग, तुम्हाला आज इथं काय हवं आहे? निसर्गाकडून सुरक्षितता अर्थात आरोग्य हवे आहे ना?” इतका अंगुलीनिर्देश करून त्यांना मी शब्दात पकडण्याचा प्रयत्न करतो. “तुम्ही जंगली व्हा...! आदिमानव व्हा आधी बघू...”
मला वाटतं, तुम्हाला एड्स होण्याचे कारण कळले व तो दूर होण्याचा उपायही कळला. मग प्रयोग का करत नाही? करून तरी बघा! येथूनच नैसर्गिक उपचाराची एकेक दालने कांद्याच्या पातीप्रमाणे उलगडायला लागतात. बलवान शक्ती तुम्हालाच तर हवी आहे ना? तर मग असा नैसर्गिक प्रयोग का करत नाही? खेडयात एक वाक्यप्रयोग आहे. आपणही ऐकलं असेल. ‘उपजलेलं रेडकू, खांद्यावर घेऊन चालत रहायचं’- हळूहळू ती म्हैस होईलचं, म्हणजे तोवर म्हशीचा बोजा उचलून वाहून नेण्याचं बळ आपल्याकडे आलेलं असतं... संपलं. इतक कळलं तरी पुरेसं आहे.
मग... त्यांना मला स्पष्ट बोलावं वाटतं, तुमच्या तथाकथित बेगढी संस्काराने तुम्हाला या स्टेशनवर आणलं आहे. द्या झुगारून त्या संस्कृतीला. व्हा चार भिंतीच्या चौकटीच्या बाहेर... चला आकाशाच्या खाली... राहा दर्याखोर्यात, गुहेत... बिलगा धरणी मातेला... जोडा हात अथांग आकाशाला... उतरा पाण्याच्या तळागाळात... तोडा पाश आळसाचे... द्या लोटून व्यसनी कळसांना... ज्यानं नरडयावर पाऊल टाकलयं, उखडा पाय त्या विज्ञानाचे, कुठवर कुरवाळणार तरी विज्ञानाला? याच विलासी जीवनाला कवटाळून सुरक्षितता, सुरक्षितता म्हणत स्वतःच कसे असुरक्षित होऊन गेलात? परवा गुजरात भूकंपात काय साधलतं? मनुष्याचे अस्तित्त्व राहते की जाते? हा संभ्रम निर्माण झाला होता. कुठवर वाट पाहायची? हे पालुपद आवेशाने, अगदी नाटकांत खडग् उगारून बाजीप्रभू बोलावा तसा मी एड्सच्या व्यक्तीसमोर बोलायला लागतो.
मग एड्स रोग्याच्या अंगात शिरशिरी येते, एक उधाणं येतं. समरांगणात बिगुलाचा नाद आवेश आणतो ना, तशी त्याच्या आत वीरश्री कोंडलेली दिसते. राखेखाली धगधगणारा निखारा तावायला लागतो. मग मी म्हणतो, “मार फुंकर आवेशानं... सरकेल ती राख दाही दिशेला, उगीच भडव्या चिंता कशाला? तुमच्या आंधळया बेगडी संस्कृतीनं, तुम्हाला या एड्सच्या स्टेशनवर आणून पोहचवलयं. एड्सचा राक्षस जमीनदोस्त करायचा झाला तर जमिनीलाच जामीन ठेवून आकाशाला तारणहार मानून एकवेळ उभं तरी राहा, जमीन सर्व काही सांभाळून घेईल. इतकं सारं आपल्या पाठीवर जी वाहते आहे. तुम्हीच का तिला जड व्हावेत?” इतकी हिंट त्यांना बाजी मारायला पुरेशी होते... काळयाकुट्ट अंधारात इतका काजव्याचा कवडसा पुरा होतोय. मग त्यांनाच, मला विचारावं वाटतंय, “आता तुम्हीच सांगा डॉक्टर, पुढे करू तरी काय?”
नकळत शरीरात शिरलेल्या रोगाच्या व्हायरसचं निदान होऊन अचूक औषध मिळवणं ही आज सोपी गोष्ट राहिली नाही. केवळ रोग निदान करून आजार घोषित करणारी यंत्रणा..., अत्याधुनिक तंत्रानी युक्त, बारीक-सारीक चाचण्या... आज उदंड झाल्या आहेत. विज्ञान एक पाऊल टाकेपर्यंत, निसर्ग दहा आव्हानं उभी करतोय, त्याचं काय? इवलासा माणूस, क्षितीज पकडण्याचा नुसता प्रयत्न चालवला आहे!
विराट विश्वाच्या पसार्यात तसा माणूस किती यःकश्चित प्राणी! पण नाही, प्रत्येक माणूस स्वतः सेंटरला राहून, अखंड विश्वाला परिघावर उभा करून, सर्कशीतल्या रिंग मास्टरप्रमाणे, सर्व शक्तींना घुमवू इच्छितोय, फिरवू इच्छितोय, फक्त स्वतःला सोडून, म्हणे इतरांनी त्याच्या भोवती पिंगा घालावा, गोफ धरावा, ही मनिषा प्रत्येक माणसाची आहे आणि मी म्हणतो तो हाच अहंकार!
अहंकार!! अहंकार यापेक्षा दुसरा काही नाहीच आहे. अर्थात प्रत्येकालाच सेंटरला राहून कृष्ण व्हायचं आहे व अन्य सर्वांना राधेच्या भूमिकेत त्याला पाहायचं आहे. पण हेच प्रत्येकाचे स्वप्न असल्यामुळे, मला कृष्ण का करीत नाही? तुम्ही सर्वच का राधा होत नाही? ही वासना आहे आणि मी म्हणतो हाच इथला गोंधळ आहे.
मित्रहो, ‘यथा पिंडे, तथा ब्रह्मांडे’ हा शब्दप्रयोग आपण ऐकला असेल. जे पिंडात तेच ब्रह्मांडात हाच त्याचा अर्थ. आपल्या पिंडात अनेक पेशी, अनेक जंतू, अनेक व्याधी, अनेक उपाय, सारे काही पूर्वनियोजित व स्वयंचलित अशी यंत्रणा स्वयंभूच आहे. तसेच ब्रह्मांडातही आम्ही मानव, पशुपक्षी, प्राणी, वनस्पती, कीट-पतंग हे सारेच पूर्वनियोजित, स्वयंभू, स्वयंचलित पेशीवत यंत्रणा आहेत.
पीडितांची देहातील कुठली तरी सजातीय यंत्रणा, विजातीयतेशी हातमिळवणी करते, तेव्हाच रोग लक्षणसदृश रूप घेतो. तसे ब्रह्मांडात आम्ही मानव मंडळीसुद्धा ब्रह्मांडाचे एक पेशीस्वरूप किट-पतंगच आहोत. पण मानव जेंव्हा या ब्रह्मांंडालाच सुरूंग लावून बह्मांडावर गदा आणू लागला तेंव्हा... अर्थात नद्या खराब करून टाकणे, डोंगर-पर्वत बोडकी करणे, पृथ्वीच्या भोवती असलेल्या वायुकोषाचे कवच फाडणे वगैरे जे काही विज्ञानाच्या नावाखाली बर्याच गोष्टी तो करू लागला, तेंव्हा मनुष्य हाच या ब्रह्मांडाचा एक रोगग्रस्त कीड (व्हायरस) ठरला. मग त्या ब्रह्मांडासही ‘काही औषधे खाऊन ही कीड नष्ट करून टाकावी एकदाची’, असे का वाटू नये? अन् मग हा जो एच. आय. व्ही. व्हायरस, इबोल व्हायरस, डेंग्यू किंवा परवाचा भूकंप असेच आणखी काही जे अघोषित व्हायरस, दुष्काळ, प्रलय असतील, ती त्याचीच परिणती असे का म्हणू नये?
ब्रह्मांडास ही असली कीड नष्ट केल्याशिवाय तरी तरणोपाय नाही. एकतर मनुष्याने विराटाचा प्रहार एड्सच्या रूपाने, भूकंपाच्या रूपाने बिनशर्त झेलावा. विराटाचे आपण एक यःकश्चित पेशीवत रूप आहोत. ‘कुठे इंद्राचा ऐरावत व कुठे शामभट्टाची तट्टाणी’ असे असताना त्याच्याबरोबर इर्षा करण्यात, कुरघोडी करण्यात काय अर्थ?
सृष्टीची असलेली संपूर्ण घडी, अर्थात कालचक्र, हे कुठे तरी समयबद्ध असले पाहिजे. जसे, दिवस-रात्र, अमावस्या-पौर्णिमा, नक्षत्रे इ. सर्वांच्याच अस्तित्त्वाला त्या-त्या विशिष्ट काळाचे बंधन हे असते... त्याचप्रमाणे जीवसृष्टीच्या उत्थापनात देखील आपणाला नवी वाटणारी कोणतीही घटना, कुठेतरी किंवा कशाची तर पुनरावृत्तीच असली पाहिजे. याला सबळ पुरावा इतिहास संशोधक किंवा पुरातत्त्ववादीही आता देऊ लागले आहेत. कधी ना कधी घडलेल्या भूतकालीन घटना, पुन्हा वर्तमानात घडताना आढळत आहेत. घटना काही फरकांनी त्याच असल्या तरी त्याची नोंद घेणारा समाज मात्र बदललेला असतो इतकेच. ‘पृथ्वी गोल आहे’ कदाचित या अर्थाने सुद्धा असू शकते...
उदय, विकास व लय या त्रिकुटांचा प्रवास, वस्तुमात्र जीवसृष्टीला टाळता आलेला नाही. दरम्यान घडणार्या प्रवासामध्ये सृष्टी, जीवन व्यवहार इ. मग आपण जे म्हणू ते रामायण घडत असते.
काळयाकभिन्न अंधारानंतर उषःकाल अवतरतो. ही केवळ उषःकालाचीच परंपरा नाही, तर मानवी उत्क्रांतीच्याही अंतिम क्षणी, एड्स किंवा तत्सम रोग उदंड उदय पावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अमिबापासून माकड व माकडापासून माणूस आणि माणसाकडूनच शास्त्रज्ञ हा जरी मानवी जीवनाच्या उत्क्रांतीचा लाभदायक स्तंभलेख असला तरी घी देखा मगर बडगा नही देखा या उक्तीची इथेही प्रचिती आल्याखेरीज राहत नाही. कारण प्रत्येक उत्क्रांती ही समस्या, अपेक्षा व प्रयत्न यांच्या सातत्यातून घडली आहे.
विद्यमान सायन्सकडून गेल्या शे-दीडशे वर्षात, रोगजंतुंना दिलेले आव्हानच आजच्या रोग जंतूमध्ये उन्नयन घडवीत आहेत. सृष्टीच्या या रिवाजानुसार मानवी परंपरेच्या अंतिम क्षणी अनेक प्रकाराने शेवट घडविताना, एड्स हा एक जबरदस्त रोग पुढे आला आहे किंवा काय? बेसुमार होणारी मानवी संख्यात्मक वाढ ही वेगाने जमात नष्ट होण्याचीच प्रतिपूर्ति तर नसेल? कारण पृथ्वीवर अशा अनेक विशिष्ट जाती नष्ट होताना हे असेच घडले होते, असे म्हणतात.
आजही पृथ्वीवर आपल्या बरोबर असणारे दुर्मीळ प्राणी व त्यांची जमात नष्ट होऊ नये म्हणून, प्राणी संग्रहालयात त्यांचे वारस आपण जतन करीत आहोत. तशी ‘माणसांची नस’ देखील सांभाळून ठेवावी लागेल काय?
कारण, पृथ्वीच्या पाठीवर सामावू न शकलेला असा, अबब! नावाचे डायनासोर, महाकाय प्राणी, कळपच्या कळप होते म्हणे. आज एकही दाखवावयास उरलेला नाही. असे मानव प्राण्यांचेही होऊ शकेल काय? का होणार नाही?
एड्सचा एन्ड, ह्या थोडया फरकांनी उच्चारल्या जाणार्या शब्दातील कार्यकारण भाव, त्याच्या अर्थाशी काही संबंध जोडून असेल का? मानवी जीवन मूल्यांचे भवितव्य त्याच्याशी निगडीत असेल का? हा भयानक विचारही एड्स रोग व रोगी समजावून घेताना होत आहे.
खरे तर ‘एड्स’ हे आहे एका रोगाच्या लक्षणाचे संक्षिप्त नाव. ज्याला आपण ‘स्वाभाविक रोगप्रतिकार शक्तीचा र्हास’ म्हणू शकतो. ‘अॅक्वायर्ड इम्यूनो डिफिशियन्सी सिन्ड्रोम’ या अर्थाच्या शब्दाचे एड्स हे संक्षिप्त रूप आहे. शब्दशः अ.ख.ऊ.ड. यांची फोड केली तर -
‘ए’ म्हणजे अॅक्वायर्ड. अर्थात एका व्यक्तिकडून दुसर्या व्यक्तीने मिळविलेला उपद्रव.
‘आय’ म्हणजे इम्यून अर्थात शरीराची रोगप्रतिकारशक्ती.
‘डी.’ म्हणजे डेफििशियन्सी. अर्थात अभाव, दुबळेपण, विकलांगता वगैरे.
‘एस’ म्हणजे सिंड्रोम. अर्थात लक्षण समूह (विविध रोगांचे प्रदर्शन).
जिथे मूळ असलेल्या प्रतिकारशक्तीचा नाश... पण त्यामुळे मग होत काय? जसे कुठेही सांडलेले पाणी उताराकडे वहावे, खड्डयात साचावे, तद्वता नैसर्गिक रोगप्रतिकार शक्तीच्या अभावाचा खड्डा झाल्यामुळे देहात अनेक रोग आकर्षित होऊन, ठाण मांडून देहाचे अस्तित्व संपवून टाकतात.
लोखंडासारख्या लोखंडी शक्तीला देखील गंज हा कालांतराने का असेना, अस्तित्वहीन करून टाकतो. तसेच हे नेमके आहे. या सर्व घटना अगदी हळूवारपणे घडतात. म्हणूनच यास, ‘स्लो व्हायरस’ म्हणतात.
व्हायरस हा तसा लॅटीन शब्द... लॅटीन भाषेत याचा शब्दशः अर्थ विष असाच आहे. ‘ह्युमन इम्यून डिफिशियन्सी व्हायरस’ असे याचे नाव असून संक्षिप्त नाव एच.आय.व्ही असे आहे.
‘एच’ म्हणजे ह्यूमन. मानवावर आक्रमण करणारे.
‘आय’ म्हणजे इम्यून डिफिशियन्सी अर्थात रोगप्रतिकारक शक्ती नष्ट करणारा असा.
‘व्ही’ म्हणजे व्हायरस. व्हायरस म्हणजे विषाणू.
क.ख.त. हा शब्द, लक्षणाच्या कार्यकारण भावाशी तो जुळवला आहे.
या विषाणूने देहात एकदा प्रवेश मिळविला कि, वर्षानुवर्षे संधी शोधत सुप्तावस्थेत राहू शकतो. त्यामुळे या धावत्या विस्मृतीजन्य जगात हा रोग केव्हा व कसा प्रवेश करू शकला, हे ओळखणे म्हणजे आणखीन एक दिव्य आहे.
‘एड्स’ हा रोग बदफैली किंवा आवारा शौकिनांनाच होतो असा समज करून घेणे गैर होईल. वेश्यागमन अर्थात लैंगिक देवघेवीतून या रोगाचा प्रसार होतो, हे जरी खरे असले तरी, हा एक रोग प्रसाराचा उपविभाग म्हणावासा वाटतो.
अन्यथा... हा रोग झालेल्यांच्या चारित्र्यावर अनिर्बंधतेचे शिंतोडे पडतील... आधुनिकतेचा संसर्ग असलेल्या संत-महात्म्यांना देखील या रोगाचा उपसर्ग होऊ शकतो. अगदी ब्रह्मचार्यांना सुद्धा... का होणार नाही? कारण...
अॅलोपॅथीच्या उपचार पद्धतीशिवाय अनेकांचे जीवनपट आज हलू शकत नसतील. इंजक्शन्स, ऑपरेशन, इन्फेक्शन्स, ब्लड ट्रान्सफ्युजन्स अशा अनेक प्रकारच्या अत्याधुनिक चाचण्या, उपचाचण्या, देहांतर्गत अंतःप्रवेशित या उपचार पद्धतीमुळे देखील हा रोग वेगाने पसरू शकणार आहे. दवाखान्यात होणार्या प्रचंड गर्दीची काळजी एक सामान्य डॉक्टर कितीसा घेऊ शकेल? मग गुजरात भूकंपासारख्या प्रसंगी, ‘मानवी रक्त’ रक्तापासून किती काळजी घेऊ शकेल? हाही आजचा प्रश्न आहे.
आज क.ख.त. या विषाणूचे बीज, शरीरातल्या 85% असलेल्या द्रवीभूत पदार्थाशी संलग्न असलेमुळे रक्त, वीर्य, लाळ, जखम, अश्रू, मलमूत्र, मातेचे दूध, घाम, मासिक स्राव, धुपणी, थुंकी, बेडका, शेंबूड, मेकूड इ. सर्वही उत्सर्जित शरीरातील घटक येनकेन प्रकाराने आपल्या द्रवीभूत पदार्थाशी सरळ संबंध साधतील तर याचा प्रादुर्भाव होऊ शकेल. कारण क.ख.त. चे विषाणू देहाच्या बाहेर येताच तग धरू शकत नाहीत. हे जरी एकीकडे खरे असले तरी हे विषाणू कालांतराने अजुनही उन्नत होत जातील काय? हा असा परकाया संपर्क कसा टाळता येईल? पुन्हा वैदिक काळातील सोवळे आणणे योग्य वाटेल. पण हेही या मनुष्य संख्येत, या मतलबी जगात अशक्यच आहे.
परस्परांचे टॉवेल्स, कपडे, धोब्याकडील सामूहिक धुलाई, चुकून बदलणारे टूथब्रश, केशकर्तनालयातील हत्यारे, हॉटेलमधील चमचे, दवाखान्यातील साधी इंजेक्शन्स् या सर्वही गोष्टी ऑपरेशनची पूर्वतयारी समजून निर्जंतुक करवणे शक्य आहे का? डिस्पोजेबल निडल्स किती रूग्णांना वापरल्या जातील?
चुंबन घेणे, शिंकणे, खोकणे, अलिंगन देणे, हस्तांदोलन, संडास मधील कमोड स्पर्श, डास इत्यादी या समान घटकाच्या माध्यमांनी अजूनतरी डायरेक्ट एड्सग्रस्त व्यक्तीशी संपर्क आला तरी एड्स होत नाही म्हणे.
एड्स विषाणू अतिशय तकलादू असल्यामुळे उपद्रव देऊ शकत नाहीत. हा हवामानाच्या अंदाजाप्रमाणे अंदाज की त्रिकालबाधित सत्य हे नजीकचा काळ ठरवेल.
आजचे तर्क, वितर्क, निष्कर्ष, अनुमान उद्या बदलेलही. कारण हा रोग अद्याप बालावस्थेतच आहे. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, लकवा, कॅन्सर इत्यादी स्वल्पविरामी रोगांनी सभासदत्व मिळवले असले तरी, लवकरच एड्स हा रोग पूर्णविरामाच्या हेतूने प्रत्येक कुटुंबात हजेरी लावेल किंवा काय? या भीतीने शास्त्रज्ञ आपल्या कामात व्यस्त आहेत. क.ख.त. हा विषाणू व त्याचे सतत बदलणारे बाहेरील आवरण, यामुळे लस बनविण्यात व्यत्यय येतो आहे. मानवी प्रयत्न लस शोधून काढतीलच. तथापि, क.ख.त. हा विषाणू तोपर्यत वेगळया फॉर्ममध्ये जाईल.
उपजत असलेल्या नैसर्गिक संरक्षण फळीचा आधार संपुष्टात आल्यामुळे, शरीराचा आधार कोसळू लागतो. महिनोन्महिने ताप येत राहतो. ज्याचे काहीही निदान होऊ शकत नाही. काहींना एक महिन्याहून अधिक काळ चार-पाच जुलाब रोज होत राहतात. अशक्तपणा येणे, खूप घाम येत राहणे असे वारंवार होत राहते. हाता-पायावर, मानेवर लसिका गाठी येणे, जर उठणे इत्यादी स्थूल लक्षणे स्पष्ट होऊ लागतात. ज्याच्यावर औषधांच्या मात्रा काम करू शकत नाहीत. इथे हा रोग लागण झालेल्या काळापासून, वर्ष सहा महिने किंवा काही वेळेला दहा वर्षांपर्यत देखील तो मनुष्य खंगत जातो.
अद्याप हा रोग थोपविण्यासाठी किंवा विमुक्तीसाठी आधुनिक शास्त्राने आपणाकडे समर्थ असा उपचार नसल्याचे वर्तविले आहे. तोपर्यत अमेरिकेतूनच युरीन थेरपीने एड्सला दिलासा!
एड्सला शिवाम्बू उपयोगी- गरोदर स्त्रीचे मूत्र एड्ससाठी उपयुक्त अशा बातम्या वृत्तपत्रात झळकत आहेत. गाढवपणा केलेल्यालाही गाढव मदतीचा हात देऊ शकते. कारण, मध्ये गाढवाचे मूत्र महाग अशी बातमी होती. गरोदर स्त्रीचे मूत्र म्हणजे... सेक्समधून गरोदरपण व गरोदरपणातून पुन्हा औषध.
तथापि, अजून कायदेशीर वाच्यता व्हायला तयार नाही? का बरे असे घडावे? या मागे काय राजकारण लपले असावे?
तर... या दुनियेत जशा फिल्मी इंडस्ट्रीज् आहेत, तशा बर्याच बलवान ड्रग इंडस्ट्रीज्ही आहेत. त्यांच्या भवितव्याचा, सरकार चालवण्याला मदत करणार्या महाशक्तीचा विचार विश्वधुरंदरासमोर आहे किंवा काय? असामान्य अशा वाघाची शिकार यशस्वीपणे करणारे जबरदस्त हत्यार, बाजारात लोकांच्या हाती सहज लागेल तर, मग दुबळया सशा मांजराची, हरणांची राखण तरी कोण करणार? जर एड्ससारख्या महादुर्धर रोग शिवाम्बूने बरा झाला किंवा होतो म्हटले तर, इतर रोगांचे काय? अर्थात मग अख्ख्या सायन्सचे काय होणार? आजपर्यत झालेली वाटचाल जणू उधळवून लावणे होईल. असाही एक समज शक्य आहे.
एकीकडे दारू, तंबाखू, विडी, चहा या अग्निद्वारे सरकारला मिळणारे उत्पन्न, बातम्याद्वारे दूरदर्शनला फायदेशीर असले तरी बरेच मोठे असते म्हणे, म्हणून त्यांचा पाठपुरावा सरकार करते आणि दुसरीकडे चित्रविचित्र रोग आटोक्यात आणण्यासाठी आपली तिजोरी सरकार गहाणवट ठेवीत असेल तर आपण सांगा, या विश्वधुरंधरांना किंवा सरकारला काय म्हणणार?
ही अशी जीवघेणी व्यावसायिकता काय कामाची होईल? तोपर्यंत एड्स ही टांगती तलवार सर्वांच्या शिरावर सतत लोंबकळत मात्र राहणार आहे.
हा रोग वंशपारंपारिक म्हणायला नुकताच जन्मलेला असला तरी, त्याचे रक्ताशी एकदा नाते स्पर्श जुळले की मग संपले. इतका महासांसर्गिक अशी त्याची ख्याती आहे. म्हणून रक्ताचे नाते जोडणार्यापुढे समोरचा पाहुणा एड्सग्रस्त तरी नाही ना? याच्या शिफारसपत्राची आवश्यकता निर्माण झाली आहे. पाहुणा कोणत्याही जातीचा असला तरी एकवेळ चालेल. पण, तो एड्सग्रस्त असता कामा नये. अशी केवळ पाहुण्यांचीच काळजी घेऊन भागणारे नाही. तर रक्तदाता, इंजेक्शनच्या सुया, रक्ताशी संपर्क ठेवले जाणारे डे्रसिंग, ऑपरेशन्स्ची आयुधे यांच्या अनिर्बंध वापरावर व गाफिलतेवर आता बंधनेही आलीच, म्हणजे एड्स संसर्गक्षम उपसर्ग आहे, हे लक्षात येईल.
अलीकडच्या या अर्ध्या शतकात आधुनिक सायन्सने मानवी समाज व्यवस्थेमध्ये शोधापोटी प्रगतीच्या नावाखाली कृत्रिम अॅन्टीबायोटिक्सचा, स्टिरॉईडस्चा बराच अनिर्बंध वापर करत रोग प्रतिकार शक्तीशी स्पर्धा केली. औषधांना लंपट होत गेलेली मानवी प्रकृती, हळूहळू उपजत रोग प्रतिकार शक्तीचा र्हास आहे. तर मग... अशी शंका का येऊ नये? स्वाभाविक रोग प्रतिकार शक्तीचा अनादर झाला किंवा काय?
एड्स तसा मानवी स्वास्थ्याला लागलेला गंज आहे. हळूहळू पसरतो आहे. कुणी सज्जन सोवळे नेसून वाचू शकेल काय? हा प्रश्न आहे. कारण दुर्जनांची इतकी गर्दी खांद्याला खांदा भिडवून आज उभी आहे. गर्दी ही केवळ आता मुंबईच्या लोकल पुरतीच मर्यादित आहे असे समजू नका, तर सर्वत्र त्याचे उदात्तीकरण झाले आहे. त्यामुळे माणसाचे नाक किंवा देहाचा एखादा अन्य भाग किंवा अवयव, केवळ संभोगाच्याच वेळी जवळ येतात असे नव्हे, तर ते आता वेळोवेळी जवळ येतात. म्हणजे इतका समाज निकट आला आहे. सांसर्गिक रोगांना, जंतुंना, विषाणूंना तुमचे सानिध्य इतके पुरे आहे. त्यांचा तुमच्या वासनेशी तसा काय संबंध?
यामुळेच की काय, गर्दीच्याच शोधात या रोग्यांची संख्यात्मक वाढ होत असलेली दिसते आहे. एकटया मुंबईत या रोग्यांची संख्या 50 लाख इतकी असून आपल्या देशात ती 2 कोटी इतकी आहे. आणि सर्व जगात याची संख्या अभूतपूर्व इतकी झाली आहे. अज्ञात आणखीन किती...? हे नजीकचा काळच सांगेल. रोज एक हजार नवीन संसर्ग झालेल्या व्यक्तींची भर पडत आहे.
क.ख.त. हा आता जागतिक चिंतेचा प्रश्न झाल्यामुळे एक डिसेंबर हा ‘एड्स दिन’ म्हणून सर्वत्र पाळला जात आहे.
पुन्हा तुम्ही आम्ही एड्सग्रस्त तर नाही ना? याची खात्रीही आधुनिक शास्त्राच्याच अंतःप्रवेशित आयुधांनी होणार...? म्हणजे हा आणखीन संकटांना वाट मिळवून देण्यातला प्रकार आपल्याला वाटेल! वैद्यकीय क्षेत्रातला आळस... आपल्या जीवनावर उठू शकतो.
शी ऽऽऽ करणारे बाळ, शी करीत करीतच सारवत असते. पण जेव्हा पालकांचा ‘शीऽऽशीऽऽ...’ हा कर्कश आवाज मूल ऐकतं, तेव्हा ते भांबावून जातं आणि त्याच बरबटलेल्या हातांनी शी पुसायला जाऊन अन्यत्र ‘शी’ लावतं. असचं काहीसं होईल काय? याची भिती बाळगण्याचे कारण मी दूर करू इच्छितो.
या अशा उन्नत पराक्रमी विषाणूंचा जन्म केव्हा झाला? हे कळाले नसले तरी 1981 मध्ये अमेरिकेेत अमीरांमध्ये प्रथम निदर्शनाला आला हे नक्की. हा रोग उद्या ज्या समूहात आढळला. तो समूह म्हणे समलिंगी संभोग घेणारा होता. अंमली पदार्थ सेवन करणारे ते युवक होते. याशिवाय अमेरिकेत येऊन राहिलेले हैतियन लोकांत ते आढळले की जे रक्ताचा व्यापार करीत. त्यांच्यातही या विषाणूंचा प्रादुर्भाव आढळला. तपासाअंती लक्षात आले की सर्वांची रोग प्रतिकार शक्तीच संपली आहे. त्यामुळे हा समूह अनेक रोगांचे प्रदर्शन प्रतिबिंबित करीत होता.
पण जेव्हा हॉिलिवुडचा प्रसिद्ध सिनेस्टार रॉक हडसन व इंग्लंडमधल्या एका लॉर्ड अॅरन या मंत्र्याला या रोगाने मृत्यू आला. तेंव्हा या बातमीने अख्ख्या युरोप खंडाची झोप उडाली आणि जगभर या रोगाचे कुतूहल निर्माण झाले. सुरूवातीला हडसनचे उतरणारे वजन हडसनच्या ब्युटीमध्ये भर घालीत आहे असा समज झाला. पण तो एड्सचा पाश होता.
लगेच फ्रान्स येथल्या महत्त्वाच्या प्रयोगशाळेत संशोधन सुरू झाले. मिगॅलो व त्याचे सहकारी यांनी 1983 साली, अमेरिकेत माँटगॅनियर व इतर संशोधकांनी 1984 मध्ये पॅरिस येथे एड्स रोग ज्या विषाणुमुळे होतो त्या विषाणूला क.ख.त. असे नामविधान केले.
क.ख.त. हा दिसतो तरी कसा...?
स्थूलतः प्रत्येक व्यक्तीला क्षय, मुदतीचा ताप, हे रोग जीवाणुंमुळे होतात हे माहीत आहे. हे जीवाणू प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शक यंत्राखाली दाखवता तरी येतात, परंतु विषाणु जीवाणूहुन अतिशय सूक्ष्म असतात. अर्थात एड्सचा विषाणू इतका लहान आहे कि, एका टिंबामध्ये तेवीस कोटी क.ख.त. चे विषाणू बसू शकतील. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शकाखेरीज हा नजरेच्या टप्प्यात येत नाही. एड्स या चाचणी प्रकाराला ‘एलायझा टेस्ट’ म्हणतात. ज्या गाळण्यातून जीवाणू जाऊ शकत नाहीत. त्या गाळण्यातून मात्र विषाणू आरामात सरकतात. एड्स विषाणू ज्या द्रव पदार्थात असतील तो द्रव, तर 60 सेंटिग्रेड तापमानात ऑटोक्लेव्हमध्ये अर्धा तास ठेवल्यासच ते अंशतः नष्ट होतात अन्यथा नाही.
या विषाणूंचेही दोन गट पडतात. पैकी एड्स हा विषाणू दुसर्या गटातील म्हणजे ठ.छ.अ. (रिबोन्युक्लिइक अॅसिड) या गटातला आहे.
या विषाणूची जाडी अर्थांत व्यास म्हणाल तर... शंभर नॅनोमीटर 100×10.9 इतका आहे. त्याच्या केंद्रस्थानी ठ.छ.अ. नावाचे अॅसिड असते. या विषाणूला बाहेरून एक आवरण असून वेळोवेळी ते बहुरूपी आकार घेते. त्यामुळे त्याला पटकन ओळखणे दुर्लभ होते. त्यामुळे एलायझा चाचणीचे निणर्र्यही चुकू शकतात.
क.ख.त. हा विषाणू रक्तातल्या टी-फोर नावाच्या पेशीवर आरूढ झालेला असतो व या टी-फोर म्हणजेच पांढर्या पेशी होत. तीच रोग प्रतिकार शक्तीची केंद्रे आहेत.
प्रथमतः रोग्याची स्वाभाविक प्रतिकार शक्ती या रोगात का व कशी कमी होते? हा प्रश्न सर्व संशोधकांना भेडसावीत होता. प्रत्येक माणसाच्या रक्तात तांबडया व पांढर्या पेशी म्हणजेच श्वेत पेशीकडेच रोग प्रतिकार करण्याचा मक्ता असतो. या श्वेत पेशीत (लिम्फोसाईटस्) व एक केंद्रीय पेशी (मोनोसाईटस्) असे प्रकार आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीनुसार अन्य प्रकारही त्यात पडतात. त्यातले प्रमुख ‘टी’ व ‘बी’ लसिका पेशी होत.
कोणताही जीवाणू किंवा विषाणू विजातीय घटक देहात प्रवेश करताच, ‘टी’ व ‘बी’ यांची अगदी अनुसरीत असलेल्या कोळिष्टकाप्रमाणे हालचाल सुरू होते. या पेशींमार्फत बृहत्भक्षी (मॅक्रोफाज) नावाच्या पेशीमार्फत हल्ला करण्यास, प्रतिकारास आरंभ होतो. शत्रू बलवान असल्यास त्याच्या मागोमाग टी-फोर हेल्पर किंवा त्यासोबत प्रसंगी टी (किलर) यांचीही मदत घेऊन रोग जीवाणू किंवा विषाणू नष्ट केला जातो.
‘बी’ लसिका पेशीकडे प्रतिद्रव्ये तयार करण्याचे काम सोपवलेले असते. शत्रूपक्षाच्या संहारात्मक हालचालीनुसार त्या प्रमाणात, ‘बी’ लसिका पेशी अनेक हेल्पर्स व किलर्स पेशींना जन्म, देण्याचे म्हणजे प्रतिद्रव्ये तयार करण्याचे काम करीत असते. अशा रीतीने सर्व बाजूंनी आपली फौज सुरक्षाफळी उभी करून नाकेबंदी करण्यात ती व्यस्त राहते.
आणीबाणीचा प्रसंग टाळून पूर्वापार स्थिर स्थिती येईपर्यंत, राबणार्या या सर्व पेशी समूहाला, ‘टी.टी. सेप्रेशर पेशी’ म्हणतात.
जेंव्हा एड्सचा हा विषाणू येनकेन प्रकारे देहात प्रवेश मिळवतो तेव्हा याच लसिकापेशीमध्ये तो सुप्तावस्थेत राहतो. दरम्यान या व्यक्तीला कोणतीच लाक्षणिक जाणीव होऊ शकत नाही. तज्ज्ञांनाही याच काळात रोगाचा मागमूस लागत नाही. या विषाणूंची प्रतिद्रव्येही तयार होत नाहीत. पण ‘झ-24’ नावाच्या विषाणू परिक्षणाची खास चाचणी परीक्षा केली तरच रक्तात हा रोग दिसू शकतो. म्हणजे हा विषाणू ‘छुपा रूस्तम’ ठरतो.
सर्व प्रथम तो हल्ला चढविताना ‘ढ-4’ या पेशीवरच म्हणजे आपल्या संरक्षण यंत्रणेवरच प्रहार करतो. साहजिकच पेशींची संख्या घसरू लागते. गल्फ युद्धात अमेरिकेकडे स्कड क्षेपणास्त्र जे अत्याधुनिक अस्त्र होते, तसेच या विषाणूने आपणच प्रभावी अस्त्र शोधलेले दिसते. चाणक्यनीती अवलंबलेली दिसते. त्यामुळे लवकरच आपली सुरक्षा फळी दुबळी होऊ लागते. याउलट एड्सच्या विषाणूंची संख्यात्मक वाढ मात्र आपल्या पेशींपेक्षा बरीच अधिक आहे. अशा तर्हेने रोग प्रतिकार शक्ती नाईलाजास्तव कोलमडली जाते.
‘ढ-4’ या लसिकापेशींचे प्रमाण दिड ते तीन वरून 0.5 पेक्षाही कमी होते. त्यामुळे ‘ढ-4’ यांचा आकडा जेव्हा 400 मि.मि. 3 पेक्षा कमी होतो, तेंव्हा एड्सचा प्रभाव वाढलेला दिसतो.
रक्तातील प्रथिनांपैकी ग्लोब्युलीनच्या प्रमाणात वाढ झाली तर, नेहमीच्या रक्तद्रव्यात मिलीग्रॅम लिटरला 4,000/15,5000 इतके असते. एड्सच्या वेळी त्याचे प्रमाण 500/2300 पर्यंत उतरते. अॅलर्जी पेशींच्या व त्वचेतील पेशींच्या मध्यस्थीबाबतची प्रतिकार क्षमता कमी होऊन जाते.
क.ख.त. चे अनेक विषाणूसमुह एकाचवेळी प्रवेशले तर दोन सप्ताहात झ-24 या चाचणी परीक्षेत हा, प्रतिजन्य शरीरात स्पष्ट दिसतो.
याचे कुतूहल सर्वांनाच आहे. प्रत्येक देशातील ‘तज्ज्ञ’ मात्र म्हणायचे की हा विषाणू परदेशातून परमुलुखातून आम्हाकडे आला असावा. शेवटी या रोगाचा उगम शोधताना लढवलेल्या तर्कात आफ्रिका हा देश पक्का केला, म्हणे आफ्रिकन ‘मॅकव्कस’ माकडाकडून एड्सची ठिणगी पडली.
माकडाकडून एड्स होणे कदापि अशक्य. झालाच असेल तर माणसाकडून माकडांना एड्स झाला असला पाहिजे. कारण निसर्ग नियमांत जीवन व्यतीत करणार्यांना निसर्ग, ही शिक्षा देण्याइतका तो कद्रु खासच नाही!
माकडांपासून माणूस उत्क्रांत होत गेला, म्हणून काय झाले? माकडांकडूनच हा विषाणू उन्नत होत आला हा तर्क अयोग्य होईल.
ज्या समाजाला कशाचे म्हणून आदर्श राहिले नाहीत ! संभोगासाठी ना केवळ काळाचे भान आहे, ना केवळ प्रजनन उद्देश आहे ! केवळ करमणुकीसाठीच...!! निरूद्देश...!!! नर-मादीबरोबरच नव्हे... तर... समलिंगी संभोगसुद्धा...! हा असा ज्यांचा निसर्गबाह्य आदर्श आहे ! पुरूष हा पुरूषाबरोबरच केवळ नव्हे ! तर स्त्री-पुरूष, माणसाळलेल्या सोबत शेळी, कुत्रा, मांजर, म्हशींबरोबर देखील विकृत लैंगिक संबंध जोडून आहेत. ही किती जीवशास्त्रीयदृष्टया लांच्छनास्पद गोष्ट आहे ! बलात्कार, ब्ल्यू फिल्मस्, हनिमून, एंजॉयमेंट हा त्यांच्या प्रगतीतला, पर्वणीचा शब्द...!!!
कामटेेहळेपणा, स्वलिंग दर्शन, अश्लिल फोन, संडास-मुतारीतील अश्लिल साहित्य, समलिंगी, परपीडन-स्वपीडन, पशुसंभोगी, बालकसंभोगी, प्रेतसंभोगी, मुखमैथुनी, आप्तस्वकीय संभोगी, लिंग बदलेच्छू, भिन्नलिंग पोषाखेच्छू, बलात्कार इत्यादी या मानवी विकृतींना, समृद्ध मानवी जीवन कसे म्हणता येईल? प्राकृतिक तरी म्हणता येईल का? या अधाशी कामपिपासू प्रवृत्तींनी एड्स या भयंकर रोगाला आमंत्रित केले आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार तेही केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतात सर्वत्र पाच-सहा वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार घडताना दिसतात. अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवला तर म्हणे गुप्तरोग बरा होतो ! बालकापर्यंत एड्स नेऊन पोहचवणारे महाभाग सर्वत्र आज हजेरी लावून आहेत.
उपलब्ध माहितीनुसार मार्च, 1981 च्या जनगणनेनुसार आपल्या शीलवान भारतातही एक कोटी समलिंग संभोगी असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आजपर्यंत त्याचे कदाचित आणखीन उदात्तीकरण झालेले असावे. हे सर्व एड्सचे एजंट का ठरू नयेत?
बरेच रक्तविक्रेते गर्द, सिगारेट, वेश्या, हॉटल्स इत्यादी रंगेल जीवनासाठी पैसा उभारावयाला स्वरक्त विकतात. नकळत क.ख.त. प्रसाराचे माध्यम बनतात. त्याकरिता रक्ताची इलायझा टेस्ट पाहणे अगत्याचे आहे.
व्यावसायिक ‘रक्त-दाता-संघ’ (महाराष्ट्र) या नावाची एक संघटना 1990 मध्ये मुंबईत काम करीत होती. त्यामध्ये तीनशेहून अधिक लोकांना क.ख.त. चा उपसर्ग आढळून आला होता.
पाश्चिमात्य देशांनी हेरॉईन व इतर अंमली पदार्थ विरूद्ध जोरदार मोहिम उघडल्यामुळे जागतिक आयात निर्यातीचे व्यापारी शांतताप्रिय भारताचा आश्रय घेऊ पहात आहेत. मणिपूर हा सध्या हेरॉईन मुक्तपणे मिळवण्याचा अड्डा झाला आहे. शिरेतून इंजेक्शनद्वारा वापर करणार्यांमध्ये 60% लोकांना एड्स झाला आहे. तोच अमेरिकेत 69% पर्यंत गेला असून आपल्या भारतात 1986 साली तामिळनाडूकडून आला. प्रथम दहा वैश्यांमधल्या एकीस याची बाधा होती. आता मुंबईमध्ये हा उपसर्ग झपाटयाने वाढतो आहे.
1988 पासून 90 पर्यंतच दीड टक्क्यावरून पंचवीस टक्क्यापर्यंत पोचला होता. म्हणजे जवळ जवळ शंभर पैकी पंचवीस वेश्या मिळेल त्या महाराष्ट्रीयन व्यक्तीला यमसदनापर्यंत एकसारख्या पोचवत आहेत. असे म्हटले तरी ते वावगे होणार नाही.
पाश्चात्यांच्या अनुकरणप्रिय भारतीय नारीला मुक्त-सेक्स किंवा स्त्री स्वातंत्र्य म्हणून घोषणा करताना आता जड जाईल... आता संभोगाच्या अनैतिक करमणूकीत केवळ गर्भ पोसणार नाही तर परस्परांत एड्स हा दुर्धर रोगही पोचणार आहे. भय कशाचे...? आणि किती?
अमेरिका एका एड्सच्या रोग्यापासून इतरांचा बचाव करण्यासाठी पस्तीस लाख रूपये खर्च करीत आहे. भीक नको पण कुत्रा आवर असे आपल्या जिवलगांना म्हणण्याचा प्रसंग. आता प्रत्येक विचारकर्त्या महिलांपुढे एड्समुळे आला आहे. कारण एकदा जरी एड्सग्रस्ताशी शारीरिक संबंध आला तर रोगांचा परस्परांत प्रवेश होतोच म्हणतात. असा कोण जीवलग जीवाजवळ येण्याआधी एड्स नसल्याचा दाखला तुम्हाला दाखवू शकणार आहे?
म्हणे, अमेरिकेत एकूण बलात्कारापैकी दहा टक्के बलात्कार हे पुरूषांवर पुरूषांकडूनच झालेले असतात. शरमेची गोष्ट ही की, महिलेप्रमाणे पुरूषही ही तक्रार करून पुरूषत्व दाखवीत नाहीत, तर शरमतात.
एड्सग्रस्त बाप असेल तर आईही एड्चीच... व त्याचे होणारे अपत्यही एड्सचेच. या सर्वांना कसे वाचवाल?
गर्भधारणा होताच साधारण 15 आठवडयानंतर गर्भवतीस तपासले की कळू शकते. क.ख.त. चे विषाणू व त्याची प्रतिद्रव्ये दरम्यान नवजात बालकाच्या शरीरात सरकलेले असतात. ज्या मुलाचे डोके लहान असते व कपाळ पुढे आलेले असते अशी, पहिल्या सहा महिन्यातच न्युमोनिया होऊन संपतात. गर्भाशयात अर्भकाची वाढ अपूरी झालेली असते. रक्तक्षय, जुलाब, न्युमोनिया यातच मुले पहिल्या तीन वर्षात प्राण सोडतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीवरून क.ख.त. या विषाणूचा पंधरा ते वीस लाख स्त्रियांना संसर्ग झाला आहे, पैकी दहा लाख महिला अफ्रिकेत आहेत. त्यांच्या 80 हजार मुलांना एड्स आहे. ज्यांचे आयुष्य दोन-तीन वर्षाचे राहणार आहे. मातेच्या वारेतून, दुधातून या रोगाचा मुलामध्ये हा प्रवास घडतो.
एड्सचा केंद्रबिंदू म्हणजे महिला होत व वाहक म्हणाल तर पुरूष होत. कारण जन्म देण्यापासून भोग देण्यापर्यंत काम त्या करतात. त्यामुळे लवकरच एड्स आटोक्यात आला नाही तर... भोग देणार्या व जन्माला घालणार्या या संस्था भयग्रस्त होतील. कदाचित परस्पर टेस्टटयूब बेबीमध्ये आपला वारस उभा करतील. काचेतून काचेसारखाच वाढवतील व पुन्हा काचेतच ठेवतील. काचेतूनच त्याचे पापे घेतील. त्यांचे संपूर्ण जीवन काचेसारखे असेल. त्यामध्ये सहनशक्तीसुद्धा असणार नाही.
थँक्यू द्यायलाही हात आता कचरतील. एड्स विरोधी केवळ विरोधच नाही, तर ग्लोव्हजही घालतील. मास्कही बांधतील. नको नको तितकाही स्पर्श... ‘आति तेथे माती’ काय खोटे आहे? आता कुटुंब नियोजनच कसलं घेऊन बसलाय? जनसंख्या नियोजन अर्थात- सामाजिक अनुभव परिवर्तन आपोआप होईल. एकंदर निसर्ग कूस बदलू पाहात आहे हेच खरे, जिथे स्त्रीसत्ताक समाज आहे. तो एड्ससत्ताक होतो आहे. एड्स, प्रश्न बराच व्यापक होऊन राहिला आहे. राहणार आहे.
ब्रम्हचारी, सद्वर्तनी हिंदू संस्कृतीला नक्कीच आता पुन्हा तेजी येईल. प्रजापिता ब्रम्हकुमारी सारख्या विश्वव्यापी ब्रम्हचारी संस्था आधारभूत होतील.
जात्यातले जे दाणे आसेजवळ येतील त्यांचेच जाते जतन करेल. अन्यथा परीघावरील धान्यांना भरडावेच लागेल.
कदाचित शक्यता आहे हे असेच निसर्गाचे कालचक्र असावे. उत्क्रांतीच्या परमोच्च टोकाकडून, अधोगतीकडे, म्हणजेच पुन्हा माकड, बेडूक, मासा व नंतर पुन्हा अमीबा अशी परतीच्या प्रवासाची ही पूर्व तयारी असावी. अन्यथा ही अशी वासना तरी का उफाळावी?
म्हणूनच की काय?... जनावरांमध्ये माणूस सदृश अवयव असलेले वासरू व माणसांमध्ये जनावर-सदृश्य असलेले बाळ जन्मू लागले आहे. अशा विचित्र वार्ता ‘विचित्र विश्व’ या सदराखाली वृत्तपत्रात रकानेच्या रकाने भरताना दिसत आहेत. ‘संकर’ तोही कोणी कशाशी करायचा? याचा ताळतंत्र सोडणार्यांनी कदाचित एड्स हा राक्षस जन्माला घातला नसेल कशावरून? आजचे जग ‘संकर-युग’ ही म्हणता येईल.
एड्सच्या नैसर्गिक प्रसारात अनैसर्गिक संभोग हे प्रमुख कारण ठरले आहे. त्यामुळे दुधाने तोंड भाजले म्हणून ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. मानवी जीवनातून मैथुन हा विषयच वंचित होईल काय? कारण आता युगुलांना मैथुन काळी एड्स रोग्यांची दृश्ये दिसू लागतील. भयग्रस्त अवस्थेत केलेला संभोग, ‘अंत्यमति सो गति’ या उक्तीनुसार एड्सग्रस्त वारसांना तर जन्म देणार नाहीत ना?
मानवाची जीवनावश्यक कामे शारीरिक शक्तीशिवाय आज यंत्राकरवी होत राहिल्यामुळे माणसांची एकंदर क्रयक्षमता कामुकतेकडे खेचली जात आहे. आपण पाहा, गोठयात सतत बांधून राहिलेले सांड मस्तावून जातात. तसा प्रगत माणूस यातही कमालीची प्रगती करू इच्छित आहे. सेक्स म्हणजेच सर्वस्व ! जीवनाचे जणूू इति कर्तव्यच...! त्याची क्षमता वाढविण्यासाठी नाना प्रकल्प (व्हॉयग्रा) चालू आहेत. निग्रो आफ्रिकन मैथुनकाळातील प्रदीर्घ आस्वादासाठी लिंगावर माकडाच्या रक्ताची धार धरतात म्हणे... ज्याने वासना वाढते. हे सर्व जर खरे असेल, तर ही अशी चाल एड्सच्या मुळाशी का असणार नाही? एड्सकडून मृत्यूची झळ पोहचलेला देश म्हणाल... तर, सध्या इंग्लंड आहे.
दोन व्यक्तीच्या देहातील परमोच्च जवळीकता संभोगकाळीच शक्य आहे. जेवढे म्हणून सांसर्गिक रोग आहेत, त्यांची देवाण-घेवाण याद्वारे जरूर होणार...!
कोणाच्यातरी सचेतन लिंगावयवाच्या सहयोगातून योगायोगाने उपजलेले तुम्ही आम्ही, पुन्हा अशाच परस्पर लिंगाकर्षणानी व्यथित होऊन, अख्खे जीवन अशाच लिंगाच्या पुनर्मिलनासाठी आसुसलेले राहतो. जीवनातील प्रत्येक उद्दिष्टांचा केंद्रबिंदू शोधावयाचा झाला तर, प्रत्येक हालचालीच्या केंद्रस्थानी रोवलेली मुलगामी कामुक प्रवृत्ती, हीच निखार्याखाली उब धरून असते. लिंगदर्शन, स्पर्श किंवा मैथुन यांच्याभोवती अशा साधन शुचितेची किती जुळवाजुळव चालू असते? योग्य संधी येताच आपापले अस्तित्त्व विसरून एकात्मरूप होताना कोण किती शुद्धीवर असतो? हा खरा प्रश्न आहे. एकतर्फी काय? जेवढे खून, मारामार्या व आत्महत्या जगाच्या पाठीवर झाल्या असतील त्यात हाच विषय प्रमुख होता. हे कोर्ट अहवालावरून व इतिहास शोधून सापडू शकेल.
स्त्री-पुरूषांचे लैंगिक संबंध ही नेहमीच्या जीवनातील अत्यंत खाजगी बाब असली तरी व ती आज सहज असली तरी... ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ ही बाब एड्सला तरी मान्य नाही.
कुत्रा नसतानाही ‘कुत्र्यापासून सावध’ हा फलकही काम करतो. तरी ‘एड्स निवास’ ही पाटीही निर्जन, शांत अशी जागा सुलभपणे करायला समर्थ होईल. विवेकी मंडळींना विवाहपूर्व व विवाहबाह्य असे लैंगिक संबंध... एक ‘काळ सर्प’ लपलेल्या अंधार कोठडीतला ‘तो’ प्रवेश वाटेल.
हा एक टोकाचा असुरी शाप मानवी जीवनाला लागला असतानाही... अमूल्य अशी देणगी याच लिंग माध्यमानी वाहिली आहे. ज्याला आपण मूत्र म्हणतो. विवेक चतुर लोक याला ‘शिवाम्बू’ म्हणतात.
ज्याच्या नित्य सेवनाने महत्त्वाचे असे जर काय घडत असेल तर...
स्वाभाविक प्रतिकार शक्ती वाढते... निर्मळ व निकोप मल विसर्जन होते, कमी झोपेत अधिक झोपेची अपेक्षा पूर्ण होते. उत्साह वाढतो, प्रखर नैसर्गिक भूख लागते. मनुष्य आत्मसंतुष्ट, प्रसन्न राहतो, सहनशक्ती वाढते. ज्याच्यामुळे कोणत्याही रोगास जवळपास येण्यास थारा उरत नाही. समजा, त्यातून तो आलाच तर खोल शिरत नाही, अर्थ...
मनुष्य अमर होतो असा नव्हे... म्हातारपण असते तरी... त्यात कुतरपण असत नाही. मृत्यू असेल पण त्यात क्लेश असणार नाही.
पडद्याआड होतानाही काही गमवतोय ही चिंता नसून त्यामध्ये नवजीवन मिळवतोय हा भाव जतन होईल. म्हणजे शिवाम्बूधारक हे धैर्यवान असतात. नसलेले बनतात. मग धैर्याचा वापर कोणत्या हेतूने करणार? हा तुमचा विवेक ठरवेल. आजपर्यंत समाजात मुक्तीमार्गी मुमुक्षूंनी, पण त्याचबरोबर गुन्हेगारी प्रवृत्तीचा विकृत पाठ गिरवणार्यांनी केवळ धैर्यासाठी हा शिवाम्बूपानाचा पाठ गिरवला होता.
उपजत अशा प्रतिकार शक्तीच्या विकासाचा विचार ज्या आहार-विहार व विचाराने परिपुष्ट होतो, याचा मागोवा न घेता, म्हणजे आली सर्दी की घ्या इंजेक्शन! डोकं दुखतयं, तर घ्या गोळी! दात ठणकतोय, तर घ्या काढून! ताप आला, तर मग पळा दवाखान्यामध्ये! आज कालचे बाळ-बाळंतीण तर काय औषधावरच चालतात! पोटातले अर्भकही औषधातच तरंगते आहे! अशा प्रकारचे संस्कार गेल्या ज्या अर्ध्या शतकाने सांभाळले आहेत, यातल्या ‘कारणा’ चा शोध न घेता, केवळ ‘परिणाम’ केंद्रस्थानी मानून, जी वाटचाल घडली, औषधाला लंपट झालेले शरीर ज्यामुळे औषधांच्या मात्रा वाढवून किंवा त्यातल्या पोटेन्सी वाढवूनही आता गुण येईनासा झाला आहे. केमिकल खतामुळे जसे जमिनींना मीठ फुटले. जमिनी क्षार-पड झाल्या. आज नैसर्गिक शेती आवश्यक वाटू लागली. जमिनी निकस झाल्या. तसा माणूस अप्रतिकारक्षम झाला. यामुळे लवकरच अॅलोपॅथी भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहे, असे अॅलोपॅथीचे शास्त्रज्ञ म्हणतात. म्हणून पुन्हा होमिओपॅथी, आयुर्वेद, निसर्गोपचार, काष्ठौषधे यांच्या कार्यालयात जमणारी वाढती गर्दी हा याचा पुरावा आहे. नैसर्गिक शेती, नैसर्गिक धान्य, गूळ, नैसर्गिक उपचार ही आजची लोकरूची दिसते. पण तोपर्यंत उपजत प्रतिकार शक्तीचा र्हास करणार्या कर्दनकाळ रोगाला तोंड फुटले आहे.
न्यूयॉर्कमध्ये एक 600 जणांचे शिवाम्बू उपचारांचे समर्थन करणारे मंडळ आहे. त्यांच्यातले बरेच लोक एड्सच्या बाधेने तिकडे वळले आहेत. शिवाम्बू उपचारांनी एड्ससारख्या रोगावर बराच प्रभाव पडल्याची तिथेे कित्येक उदाहरणे आहेत. एका शिवाम्बू उपचाराच्या पुरस्कर्त्याला त्याच्या एड्सच्या लक्षणांमध्ये खूपच सुधारणा झाल्याचे जाणवले.
एड्स या मानवजातीला काकुळतीला आणणार्या भीषण रोगावर निश्चित स्वरूपाचे गुणकारी औषध अद्याप अस्तित्त्वात नाही. आणखी काही वर्षे त्याची शक्यता पण नाही. अशा अवस्थेत आंतरराष्ट्रीय विकास विषयक अमेरिकन (युसेड) संस्थेने या रोगाचा नाटयमयरित्या प्रादुर्भाव कमी करणारे तंत्र विकसित केल्याचा दावा केला आहे.
पाच वर्षे पथदर्शी प्रकल्प चालवल्यानंतर जर माणसातली लैंगिक सवयी बदलल्या नाहीत, तर चालू शतक बदलताना 4 कोटी लोकांना, त्या कधीच बर्या न होणार्या रोगाची लागण होऊ घातली आहे. त्याचे प्रमाण संथ करणे आजही शक्य आहे, असे ‘युसेड’ ला वाटते.
युसेडने दिलेल्या आकडेवारीनुसार एच.आय.व्ही. हे एड्सला कारणीभूत होणारे विषाणू, दर 24 तासात, नव्या पाच हजार लोकांच्या शरीरात प्र्रवेश करतात. म्हणजे हे प्रमाण महिना 1 लाख 50 हजार आहे. मध्ययुगात काळया प्लेगची महामारी होती. त्याच्याशी या रोगाची तुलना करता येईल.
त्यातून युसेडने विकसित केलेल्या या तंत्राची तीन उद्दिष्टे आहेत. लैंगिक आचरणातील जोडीदाराची संख्या घटवा. सिपलिस यासारखे रोग एड्सला कारणीभूत होत असल्याने या रोगाचे निदान व उपचार वाढवा. कंडोमचा (गर्भनिरोधक रबरी फुगे) वापर जास्तीत जास्त करा. संपूर्ण जागतिक पातळीवरील अभ्यासाचे संगणक प्रणित निष्कर्ष काढले आहेत. त्यातील कोणतेही उद्दिष्ट आचरणात आणले तर एड्स होण्याची शक्यता संपते.
या कार्यक्रमाचा मुख्य भाग शिक्षण आहे, पण या बाबींची माहिती असलेल्या लोकांमध्ये आचरणात फरक पडतो व त्यांच्यातील एड्सची भीती कमी होते असे युसेडच्या या पथदर्शी कार्यक्रमामध्ये आढळून आले. मात्र एड्सचा प्रसार होण्याला, कारणीभूत असलेले तरूण मुलांतील स्वैरवर्तन रोखण्यासाठी संस्कृती वगैरेचे आवरण फेकून देणारे कणखर राष्ट्रीय नेतृत्त्व त्यासाठी हवे आहे. हा पथदर्शी कार्यक्रम ज्या 15 देशात सुरू आहे, त्या देशावर या कार्यक्रमाचा ओघ राहणार आहे. ते देश आहेत ब्राझील, होंडूरास, अमेरिका, हैती, डॅमिनिलम, रिपब्लिक, थायलंड, फिलीपाईन्स, भारत, इंडोनेशिया, युगांडा, मालवी, इथोपिया व टांझानिया याचा समावेश आहे.
या संस्थेच्या एड्स विभागाच्या प्रमुख डॉ. हेलेन गोयल आहेत. त्या म्हणतात कि, या रोगाविरूद्ध जागतिक पातळीवर सुरू केलेल्या लढाईला सौम्य प्रमाणा यश मिळाले आहे.
रक्त देताना त्याची चाचणी घेणे हे प्रमाण विस्तृत बनले आहे. जगातील बहुतेक रक्तपेढया सुरक्षित बनल्या आहेत. युसेड व संयुक्त राष्ट्रांच्या युनिसेफद्वारे एकदाच इंजेक्शन म्हणून वापरात येणार्या 14 कोटी हायपोडर्मिक निडल्स (सुया) उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दूषित सुयांद्वारे या रोगाचा प्रसार होण्याचा धोका कमी होईल.
युसेडच्या संशोधन व विकास विभागाचे प्रमुख डॉ. रिचर्ड बिसेल म्हणतात, एड्स रोगावर कामचलाऊ औषध उपलब्ध होण्याची शक्यता नाही तर डॉ. गोयल म्हणतात अशी एखादी चंदेरी गोळी समजा तयार झालीच तर ती इतकी महागडी असेल की, एड्सचा जास्तीत जास्त प्रसार असलेल्या सबसहारा देश किंवा आग्नेय आशियात ती उपलब्ध होण्याची सुद्धा शक्यता नाही.
आजकाल स्वास्थ्याच्या रक्षणासाठी बाजारात किती प्रकारची आमिषे दाखवली जात आहेत, ते दूरदर्शनवर दृष्टिक्षेप टाकताच लक्षात येण्यासारखे आहे.
पोट चालवण्यासाठी भरमसाठ मुनाफा कमविणार्यांची जाहिरातबाजी, त्यामध्ये दिलेली आश्वासने व वास्तवता याचा सुतराम संबंध नसतो. तरीसुद्धा जाहिरातीचा ढोल सतत कानावर टाकून समाजाला संमोहित करणे शक्य झाले आहे. पण आता सुज्ञ ग्राहक अशा उत्पादकांना ही संधी पुढेही अशीच मिळवून देतील याची शक्यता कमी आहे.
‘बाप दाखव अन्यथा श्राद्ध घाल’ अशी म्हणणारी, बंड करून उठणारी, नवी वैज्ञानिक तरूण शक्ती विकसित होत आहे, ज्यातून ग्राहक दक्ष समिती किंवा अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे जो नवा आवाज आहे, तो त्याचाच एक सूर म्हणावा लागेल. शिवाम्बू हा एक आता श्रद्धेचा विषय राहिला नसून तो आजकाल परीक्षा नळीतही चमचमत आहे.
शिवाम्बू म्हणजे मूत्र, पण त्याचा स्वास्थ्याशी असलेला घनिष्ठ संबंध लक्षात घेता त्याची होत असलेली जाहिरातबाजी, ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ राहून आता चालणारी नाही. भारतीय तत्त्व प्रणालीतील पौराणिक ठेव परकीयांच्या मुखातून ऐकताना आम्हावर नेहमीच प्रभाव टाकत आली आहे. दर्याखोर्यात राहणारे ऋषीमुनी व आजचे पदवीधर संशोधक यांचे विचार जेव्हा एक होतात तेव्हा आमच्यातील श्रद्धेला उधाण येते.
एकंदर चालू मानवी जीवनाकडे पाहता प्रत्येकानेच आपल्या स्वास्थ्यासाठी ‘सुरक्षा कक्ष’ उभा करण्याची गरज आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस वाकुल्या दाखविणार्या एड्स या समस्येला सामुदायिकपेक्षा वैयक्तिक काळजी घेणे हितावह होईल.
हिंदू संस्कृतीच्या पुरातन सदाचाराची वासलात थांबवली तरच ‘एड्स’ हा काही मानवी मूल्ये शिल्लक ठेवल.
एड्स केवळ भयग्रस्त आजार नाही, तर... प्राणीमात्र जीवनसृष्टीचे संहारक स्कड क्षेपणास्त्र आहे. त्याने मानवी विज्ञानाची मनगटे केव्हाच तोडली आहेत.
विज्ञानाच्या अंगाई गीताने तुम्हाला झोपविलेल्या शास्त्रज्ञांची झोप आज उडाली असून, सावधानतेच्या इशार्यांनी ते तुम्हाला आता जागवत आहेत.
एड्स या रोगाने मानव उगमाची प्रजनन केंद्रे व प्रतिकार शक्ती या तशा मोक्याच्या जागा हिरावल्या आहेत. आपण आता झोपलो तर ती काळझोप ठरेल.
गरीबाला आजार परवडेना की आजाराला गरिबी मानवेना अशा दुष्टचक्रात भारतातील वैद्यकशास्त्र आज अडकले आहे.
एड्स झालेले दुर्दैवी व न झालेले सुदैवी या सर्वाच्या भविष्यातील भाग्य तुमच्याच सदाचारात आहे. तेव्हा... स्वास्थ्यप्रेमी मित्रहो, विसाव्या शतकाच्या आरंभाला मानवी समाज एड्समुळे विसावेल अशा एड्सने भयप्रद वाकुल्या दाखवल्या असल्या तरी, भयभीत होण्याचे कारण नाही. तेव्हा प्रत्येक एड्स बाधित व्यक्तीने मनापासून आधी निधार्र्र करावा. विकृतीच्या एका टोकाला आल्यानंतर आता आपण प्रकृतीच्याही एका टोकाला जायला पाहिजे. सरहद्दीवरील जवान असे ‘जिंकू किंवा मरू’ म्हणून पावले उचलत असतात, तसेच प्रत्येक पाऊल जिंकू, जिंकू व जिंकूच या निर्धाराने उचलायचे आहे. गत आयुष्याकडे, परंपरेकडे पाठ करून, नवा जन्म, नवा प्रांत लक्षात घेऊन, निसर्गाचा पुरा अनुयायी बनायचे आहे. निसर्ग नियमांचा आदर कदर करायचा आहे. देहातील बारीक सारीक संवेदनेबरोबर राहायचे आहे. झोपेबरोबर, भुकेबरोबर, भावभावनेबरोबर असायचे आहे. ‘आदिमानव’ बनण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुविधा, सुबत्ता याकडे पाठ करायची आहे.
खुले आकाश, खुली जमीन, खुले मन यानेच खुले तन होऊ शकते. रक्तातल्या कणाकणाला खुलू द्या. आपण जनावरांना दावे बांधतो. बंधन त्यांच्या क्षमतेला असते. बंधन पंगू करते. तद्वत माणूस दाव्याला बांधलेला जरी दिसत नसला तरी, अनेक दृश्य-अदृश्य बंधनाने बेगडी संस्कृतीला असाच बांधलेला आहे. मुलाबाळांना, व्यवसायाला, प्रतिष्ठेला, जातीला, पै-पाहुण्यांना, शिक्षणाला, पोषाखांना, परंपरेला करकचून बांधला गेला आहे. ही सर्व बंधने त्याला तोडायची आहेत अन्यथा ही बंधनेच त्याला तोडीत आहेत, तोडणार आहेत. या बंधनानेच एड्सपर्यंत पोहचवले आहे. दोरा जसा गुंतला गेला तसाच तो सोडवायला हवा. पुन्हा तोच दोरा उपयोगाचा होऊ शकतो. यासाठी चौफेर दक्ष व्हायचे आहे.
फक्त पोटाच्याच कोठयाची जाणीव घेऊन चालणार नाही. प्रत्येक अवयवांची, प्रत्येक सांध्यांची, प्रत्येक ग्रंथीची, प्रत्येक कणाकणांची, मनामनाची नोंद घेऊन त्याच्या जीर्णोद्वारासाठी शिकस्त करायची आहे. म्हणजे नेमके काय करायचे?
सर्व अवयवांचा, ठरलेल्या हालचालींचा कोटा देऊन टाकायचा आहे. कोणावरच अन्याय होऊ द्यायचा नाही. सर्वांना समान लेखून सर्वांना समान न्याय द्यायचा. ही चतुराई, ही सतर्कता हाच एड्स एच.आय.व्ही. व्हायरसवर प्रहार होऊ शकतो व हा प्रहारच विजय देऊ शकतो. तेव्हा पिंड एकदाचा ब्रह्मांडात घेऊन चला. खुल्या निसर्गात, दर्या कपारीत निर्जन स्थळी, कोलाहल शून्य शांत स्थळी, जिथे वाहते अहोरात्र शुद्ध कातळ पाणी, झाडे, वने, पशु-पक्षी यांच्या कलकलाटात, जा विसरून त्यांच्या भावविश्वात, ज्यांच्यातून विकसित झालात, जा परत त्यांच्याच बाहुपाशात. जेथून जीव मिळाला तिथेच जीवदान का मिळणार नाही? तिथेच जेवण व जीवन उभे आहे.
एक पालापाचोळयांची झोपडी घाला. पूर्वेकडे मुख करून झोपडी असू द्या. गाईच्या शेणाने जमीन वरचेवर सारवून घ्या. लिंबपाल्याची गादी करा. लिंबपाल्याची शाल पांघरा. जुन्या पारंपारिक परिवाराला, संस्कृतीला काही काळासाठी विसरा व नव्या निसर्ग परिवाराशी मैत्री जोडा. उन्हाची कोवळी किरणे मुक्तपणे अंगावर घ्या. पाच-दहा मिनिटांनी कूस बदला. अतिरेक कुठलाच होऊ द्यायला नको. प्राप्त मूत्र म्हणजेच शिवाम्बू म्हणजेच ‘जीवनजल’ अन्न, औषध, पाणी व संजीवनी म्हणून सततच पीत रहा. तासातून 2/3 वेळा अधूनमधून मुख भरून स्वच्छ ताजे गाळलेले पाणी ठिबक तंत्रानुसार पीत रहा.
पानं, फुलं, फळे, खोड व मूळ ही झाडाची पाच अंगे यथाशक्ती त्याच फॉर्ममध्ये खाण्याचा, पचविण्याचा, चर्वणाचा प्रयत्न करा. निसर्गाचा ढळलेला बॅलन्स निसर्गानेच सावरायचा. अन्न भुकेशिवाय खायचे नाही. पाठ झोपेशिवाय टेकवायची नाही. जेव्हा जेव्हा डुलकी येईल तेव्हा डुलकी घ्यायची आहे. अन्याय कुठेच होऊ द्यायचा नाही. उन्हाच्या किरणात बरेच दिवस राहिलेल्या शिळया शिवाम्बूने सर्व अंगास मॉलिश करायचे. कणाकणात सुखावेल असा सुंदर स्वतःचा स्वतः मसाज करीत रहायचे. आपल्या कामात सतत हात व्यस्त ठेवून मन सदा मस्त ठेवायचे आहे. एच. आय. व्ही. व्हायरस मधून सही सलामत सुटका होऊ शकते व्हायरसमधून जोवर सुटका नाही, तोवर हीच वाटचाल, हाच निर्धार. मग शेंडी तुटो की पारंबी, निसर्गाला लोंबकळणे अविरत चालूच ठेवायचे आहे.
प्राणायाम, विपश्यना, सुदर्शन, सूर्यनमस्कार व काबाडकष्ट अर्थात युक्त श्रम व युक्त विश्राम, युक्त आहार, युक्त विहार या सर्व युक्त मार्गांनी युक्तासक्त असे सशक्त जीवन उभे राहू शकते. हे त्रिकालाबाधित सत्य लक्षात ठेवावे. हाच एक संकटकाळचा जीव सोडवणारा चोखंदळ असा मार्ग आहे.
आजपर्यंत इतके सोसले आहे. आता पुनर्जन्मासाठीही तितकेच सोसू या. पण आता चूक होणे नाही. दुधाने तोंड पोळले आहे, तर चला आता आपण ताकही फुंकर मारून पिऊ या म्हणजेच काही पथ्ये कायमचीच ठेवू या! निसर्ग माऊलीच्या बंधनात राहायचे हीच ती पथ्ये आहेत. ठेविले अनंते तैसेचि राहावे. ते हेच म्हणायचे दुसरे काय?
एच. आय. व्ही. बाधित रूग्णांनी याच बंधनानी स्वतःला बांधायचे आहे.
1. लवकर झोपून लवकर उठा.
2. प्रभातीचे शिवाम्बूपान करून तुम्ही तुमच्याभोवती काठी फिरवित एक
‘सुरक्षा कवच’ तयार ठेवा.
3. उषःपानाच्या निमित्ताने दीड-दोन लिटरपर्यंत शुद्ध पाणी घ्या.
4. एक तासभर तरी रोज चालत रहा. सुरक्षित जागी तरी पाय अनवाणी
राहू देत.
5. आधुनिकतेच्या झगमगाटापासून शरीराला अलिप्त ठेवण्याचा
प्रयत्न करा.
6. भूक लागेल तर... खा, तहान लागली नाही तरी पाणी देत रहा,
मलमूत्र येईल तेंव्हा जा, झोप आलीच तर घ्या. तात्पर्य- सर्वातील
अवरोध व अतिरेक टाळा.
7. सूर्यस्नानाकरिता उघडया शरीरास पहुडलेल्या स्थितीत 40 मिनिटाचे
सूर्यकिरण शरीरावर सर्वत्र समान पडतील अशी, योजना ठेवा. म्हणजेच
दहा मिनिटांनी कूस बदला. (सप्ताहातून दोन वेळा तरी आवश्यक)
8. साबणाशिवाय, औषधांशिवाय, इंजेक्शनशिवाय, ऑपरेशनशिवाय,
भोगप्रवृत्तीशिवाय काही दिवस निघतील तर पाहा. अन्य पर्याय शोधा. शोधा म्हणजे सापडेलच. सतर्कतेची गरज एड्स मुक्तीसाठी आहे.
9. स्वतःचे कपडे स्वतःच धुवा.
10. सप्ताहातून दोन वेळा तरी शिवाम्बूने सर्वांगास मसाज करा.
11. दाढी किंवा केस स्वतःच्याच उपकरणाने कापा.
12. हॉटेल व सामूहिक आहार पूर्णतः टाळा.
13. पानं, फुलं, फळं, खोडं, मूळं अशी वनस्पतीची पाचही अंगे समाविष्ट होतील अशा सुपाचक आहारांचा मेळ घाला. वापरण्याआधी त्याला पोटॅशियम परमॅग्नेटच्या योग्य द्रावणात धुुऊन घ्या.
14. बिछाना गादीशिवाय पण नरम अशा हिटलॉन किंवा जानवर भागवा. वायुवीजन योग्य होत असेल अशाच जागी विश्राम करा. ऋतूचे भान ठेवा.
15. आपले लिंग व जीभ स्वच्छ ठेवण्याची काळजी घ्या. एकाच लंबक रेषेत असणार्या दोन बिनहाडाच्या अवयवावर अगदी ध्यान ठेवून अंकुश ठेवा. हा केवळ सन्मार्ग नसून आज ही काळाची गरज झाली आहे.
16. सप्ताहातून एक दिवस लंघन करा. ज्या देहाकडून सप्ताहभर सर्व्हिस घेतलीत, त्याला विश्राम देत केवळ उपलब्ध शिवाम्बू देत देत उपवास करा. अर्थात त्यालाही परत सर्व्हिस द्या.
17. झोपताना 20 मिनिटे तरी, विपश्यना ध्यानाकरिता अंतर्मुखी व्हा. आता जगाच्या काळजीपेक्षा तुम्ही तुमचीच काळजी वहा. जगाची काळजी वाटू शकणारे समर्थ असे ‘दूरदर्शन’ पण जगाची विचारशक्तीच भ्रष्ट करीत आहेत. सामाजिक परिवर्तनाचा कोणताही वैयक्तिक किंवा सामूहिक प्रयत्न ‘दूरदर्शन’ पुढे निष्प्रभ होतो आहे.
एड्सची संभाव्य लक्षणे दिसत असली तरीही ती या विचाराने व या प्रयोगाने नाहीशी होतील.
आज मी आव्हान करतोय, जसं देवीचा पेशंट दाखवा आणि दोन हजार रूपये मिळवा अशी सरकारी घोषणा होती. तसाच आज फक्त तीन आठवडे इमानदारीने याप्रमाणे दिनक्रम ठेवा, अन् तुमची दुखणी दाखवा असे मी आवाहन करू लागलो आहे. शेवटी जगण्याचे पण नियम असतात, वाहनाचे नियम असतात, रस्त्याचेही नियम असतात, बसण्याचे नियम आहेत, उठण्याचे नियम आहेत आणि आमच्या खेळालाही नियम आहेत. नियमांशी खेळलात तर मात्र खेळ-खंडोबा ठरलेला. अम्पायर आऊट करणारचं, मैदानाच्या कडेला बसवणारचं.
मी अनेक दिवसापासून म्हणत असायचो, कोणीतरी, कधीतरी विद्यमान उपचार पद्धतीला त्या विशेष तज्ज्ञांना एकत्र करावं आणि एखाद्या जाणकार कमिटीनं स्पर्धा लावाव्यात. जो कमीतकमी दिवसामध्ये कमीतकमी खर्चामध्ये माणसाच्या स्वास्थ्यामध्ये जास्तीत जास्त भर घालू शकेल. त्या उपचार पद्धतीचा व त्या उपचार कर्त्याचा पुरस्काराने जर गौरव होईल, तेंव्हा ती उपचार पद्धती, निदान त्या वर्षाला, तरी चलतीचे दिवस येतील व मानाचे स्थान मिळेल. ती उपचार पद्धती अग्रेसर राहील व तिला सर्वसामान्य लोक जाणतील. जसं तुम्ही ऑलिम्पिकमध्ये विश्वविजेता त्यालाच म्हणतात ज्याने सर्वांना हरविलेले असेल.
या माझ्या उपचार पद्धतीकडे विज्ञानाने ओवाळून टाकलेल्या रोग्यांची म्हणजेच जवळ-जवळ स्क्रॅप माल, जीर्णरोगी, असाध्यरोगी, ज्या उपचार पद्धतीकडे वळतात किंवा जी उपचार पद्धती स्वीकारल्याने बरी होतात, याचा अर्थ काय?
विनाशक क्षेपणास्त्राशिवाय, बॉम्ब गोळयाशिवाय, औषध गोळयाशिवाय, चिरफाड केल्याशिवाय, नैसर्गिक मार्गाने जर समझोता होत असेल तर मोडतोड कशाला करायची? तडजोड करूया की!
डार्विन शास्त्रज्ञ म्हणाला होता, माणूस हा अमिबापासून होत माकड झाला. काही माकडांनी शेपटीचा वापर न केल्यामुळे त्यांची शेपूट झडली. त्याच माकडांना पुढे माणूस म्हटलं गेलं. गेली अनेक शे-दीडशे वर्षे आम्ही लोकांनी गोळया औषधांचा मारा करून बसता-उठता औषध घेण्यामुळे स्वाभाविक प्रतिकारशक्ती हीचा अनादर केला. स्वाभाविक प्रतिकार शक्ती हळू-हळू शून्य झाली. त्या शून्य झालेल्या स्वाभाविक प्रतिकार शक्तीच्या माणसाला आपण ‘एड्स’ ही संज्ञा दिली.
तुम्ही कशाला काय म्हणता याचा विचार नियती करत नाही, ज्याचा वापर तुम्ही करत नाही, ती तुम्हाला आवश्यक नाही असे समजून सदरील व्यवस्था बाजूला होते आणि तुम्ही निकामी होता. याचाच अर्थ मागणीनुसार पुरवठा, भावनेनुसार भोगवठा, चार विचारानुसार अॅक्शन असचं होत. असाचं उत्क्रांतवादाचा विकास झालायं. मनुष्य उन्नत व्हायचा झाला तर पुन्हा निसर्गाकडे जाण्याची आवश्यकता आहे. जे दाणे जात्याच्या आसनाजवळ येतात म्हणजेच कण्याजवळ येतात ते वाचतात, कडेला राहतात, ते भरडले जातात, दळले जातात. म्हणूनच मराठीत आसपास हा शब्द जन्मला असावा. निसर्ग हा स्वर्ग माणणार्या वर्गालाच फक्त ह्या गोष्टी कळणार. कमीतकमी काळामध्ये जास्तीत जास्त समस्येपासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग, अजूनही कुठे सापडल्यास आम्ही गुलदस्त्यात बसवायला माझं आयुष्य नेहमीच तयार राहील आहे. मी त्यासाठी नेहमीच तत्पर आहे. धन्यवाद!
क्रमश: