मुळनक्षत्री : एक प्रेरणादाई जीवनधारा : भाग - 10

कॅन्सरशी तोडमोड नको, तडजोड करा... युद्ध नको माघार घ्या...

आजकाल कॅन्सर हा सर्वांच्या परिचयाचा शब्द झाला आहे. मग तो साक्षर असो वा निरक्षर. मग तो श्रीमंत असो वा गरीब. बालक असो वा वृद्ध. किंवा स्त्री असो वा पुरूष. या रोगाने कुठेच पार्सिलिटी केलेली दिसत नाही. प्रत्येक वर्गात त्यानं आपलं अधिष्ठान मांडलं खरं!

तुम्हाला आश्‍चर्य वाटेल! तुम्हाला हा रोग व्यसनी, दुराग्रही, बदफैली वगैरे लोकांना फक्त होतो, असेही नाही. तर प्रभु रामकृष्ण परमहंसाना, रमण महर्षी, तुकडोजी महाराज यांनाही त्यानं सोडलेलं नाही. प्रभु प्रिय, लोकप्रिय, कला प्रिय सर्व वर्गातील लोकांना कॅन्सरनं घेरलं आहे. नर्गिंस देखणी म्हणून तिला सोडलं नाही, किंवा शरद पवार पंतप्रधानाचा उमेदवार म्हणून पकडलेला नाही. सामान्यापासून असामान्यापर्यंत सर्वांवर त्यानं सम्यक नजर ठेवलेली दिसते.

मला आश्‍चर्य वाटतं नामांकित, धनवान कॅन्सरग्रस्त मंडळी ज्या पॅथीकडून ते हारतात त्यातच ते मरतात सुद्धा. पण त्यांचे अनुयायी त्यांचा असलेला पैसा, त्यांच्या स्मृतीपित्यर्थ, त्याच पॅथीच्या विकासाकरिता, त्याच रोगाच्या निर्मूलना करिता, त्याच विज्ञानाच्या हवाली करतात. हेतू वाईट नाही पण परिणाम वाईट आहे. ‘तुकडोजी महाराज रिलिफ कॅन्सर सोसायटी’ किंवा ‘नर्गिस कॅन्सर हॉस्पिटल’ असे कोटयावधी रूपये कॅन्सरवर संशोधन करायला ही मंडळी धन लावत आहेत. जर रोगाचे मूळच सापडले नाही तर रोगी कुठे पाठवून तरी काय होणार?

वेळीच रोग निदान झाले व उपचार केले गेले, तर अशा रोगापासून रूग्णाला वाचविता येते, अशी जाहिरात सुद्धा केली जाते. टाईम्स ऑफ इंडियाच्या 1 डिसेंबर 1974 च्या अंकात अमर चोप्रा या वार्ताहराचे अपू एुश्रिरपरींळेप या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेले पत्र अगदी बोलके आहे.

 “जे मुंबईतील ख्यातनाम तज्ञ डॉक्टरांचे नुकतेच निधन झाले. डॉक्टर व वकील असलेले सुप्रसिद्ध कार्डियालोजिस्ट पण त्यांचा मृत्यू, हृदयविकारानेच, डॉ. गिंडे मेंदूविकारावरील सुप्रसिद्ध तज्ञ पण त्यांचे मरण मेंदूच्या टयुमरनेच, कर्करोगाच्या बाबतीत परदेशातही ज्यांचे नाव आहे, ते कर्करोगतज्ञ डॉ. बोरजीस यांना कर्करोगानेच नेले.”  परवा परवा ख्यातनाम कार्डियोलॉजिस्ट डॉ. नितू मांडके हृदयविकारानेच कालवश झाले. अशा तज्ञांना देखील आपले रोग प्राथमिक स्थितित कसे कळाले नाहीत? मग सामान्य लोक आपल्या तब्येतीची काळजी कशी घेतील?

मित्रहो! मी तसा सामान्य माणूस. मला कॅन्सरबद्दल लिहिण्याचा अधिकार काय? पण मी तुम्हाला सांगतो, नामवंत कॅन्सर स्पेशालिस्ट यांचेकडे जितके रूग्ण आले असतील, त्याही पेक्षा रूग्ण संख्येने अधिक असा संबंध कॅन्सर रूग्णांशी माझा आला. आणखीन तुम्हाला सांगितलं तर आश्‍चर्य वाटेल, मी कुणी सर्जन नाही की, मी कोणी औषध तज्ज्ञ नाही. मी जरूर एक चिकित्सक आहे. एक प्रयोगवीर आहे. ‘औषधाशिवाय आरोग्य’ हा प्रयोग करीत राहिलो. प्रयोग, प्रयोगशाळेतच होतात, असे नाही. प्रयोग अख्या विश्‍वात ते चालूच आहेत. विश्‍व प्रयोगाचेच आहे.

माणसाचं चुकलं कुठे? विज्ञान निघालं कुठे? माणूस पोहोचला कुठे? या सर्वांची चिकित्सा, या सर्वांचे पोस्टमार्टम मनातनाचे, कणाकणाचे सतत मी करतोच आहे. तीस हजाराच्या वर कॅन्सर रूग्णाची माझ्या दफ्तरी आज नोंद झाली आहे. अध्यापक, प्राध्यापक, कुलगुरू, वकील, इंजिनिअर, शिपाई, साहेब, अधिकारी, शेतकरी, मजूर, नेता, अभिनेता, बाल-वृद्ध सर्वप्रकारच्या वर्गातून लोक फाशी माफ होण्यासाठी माझ्या निसर्गाच्या कोर्टात निर्वाणीचा प्रयत्न करायला, माझ्या तंत्राकडे येत असतं. येत आहेत. यामुळे आला अनुुभव कथन करण्याचा अधिकार पाहोचतो. या मुळेच मला अनके प्रयोग करता आले, अनेक विचार करता आले. अनेक अनुभूती घेता आले.  मीही काही मग अनुमान काढली. माणूस आशावादी असेल, प्रयत्नवादी असेल त्याची चौखूर सम्यक नजर असेल, असा जो जो माणूस आहे तो माझ्या विचाराचा, माझ्या प्रयोगाचा, माझ्या अनुमानाचा आजही निश्‍चित विचार करू शकतो. तरच त्याच्या लक्षात येईल. देहाच्या कोणत्याही समस्येकरिता हाच निर्वाणीचा, निकराचा प्रयोग म्हणता येईल. विचार म्हणता येईल.

माझी विचार करण्याची प्रवृत्ती समस्येच्या उगमाकडे जाण्यात आहे. मी कॅन्सरच्या रूग्णाच्या मनाचा, तनाचा, त्याच्या दिनक्रमाचा व स्वभावाचा देखील बारकाईने अभ्यास करत आलो. त्याचबरोबर निसर्गाच्या शक्तीचे, ऋतुचे, हवामानाचे, रूग्ण सानिध्यातल्या वातावरणाचे व चालू चालीरितीचे दिनमानाचे पण भान ठेवत आलो आणि या सर्वांतून माझ्या लक्षात आलं, त्यासं प्रमाण मानून पुढच्या रूग्णांना आदेश, संदेश, उपदेश, उपचार, उपवास या अनंत गोष्टींना एकत्र करत आलो.

मला प्रथम प्रथम आश्‍चर्य वाटायचं, कॅन्सर सुशिक्षितांना, पण कसा काय होतोय? कॅन्सर श्रीमंताना तरी का बरं व्हावा? कॅन्सर अ‍ॅथलिटिक चॅम्पीयन यांना सुद्धा का होतो? कॅन्सर गुणवंतांना होतोचं कसा? ज्यानं क्षण क्षण शिक्षणासाठी वेचला, शिक्षण ज्यानं रक्षणासाठी घेतले, रक्षण देशाचं, कुटुंबाचं, स्वतःच्या जीवाचं मग का नाही केले? सुशिक्षितही असुरक्षित कसा? श्रीमंत, पैसा झाला की, काय नाही खरेदी करू शकत? मग आरोग्य त्याला का नाही खरेदी करता आलं? कॉट-गादी, गाडी-माडी, गोड-धोड, लोड-कमोड ही सगळी सुबत्ता तुमच्या हाताशी असताना सुद्धा कॅन्सर होतोच कसा? इतक्या बंदोबस्तातूनही तो शिरतोच कसा? इतके अभेद्य सुरक्षा कवच तो तोडतोच कसा? या सर्वांवर मी तुमच्याच सारखा खूप विचार केला. पडक्या कुंपणावर पाय असं ग्रामीण वाक्य्प्रचार आहे. पण इथे पक्के कुंपण असताना, चांगली तटबंदी असताना हा रोग शिरतोच कसा?

मित्रहो! पूर्वी निसर्गात भाषाच नव्हती. केवळ संकेत असायचे, संकेताचे इशारे परस्परांकडून परस्परांना मिळायचे. जशी भाषा आली, वाणी आली. तसे संकेताचे इशारे देणारे घेणारे जाणकरही कालवश झाले. संकेत चराचर चराचराला देऊ शकायचा. सर्वच संकेत संवेदनेतून, दृश्यातून, स्पर्शातून, गंधातून, ध्वनीतून मिळायचा. मग एखादी साथ यायची असो, किंवा एखादे अवर्षण यायचे असो, किंवा एखादा भूकंप व्हायचा असो किंवा एखादं वादळ यायचं असो. अन्यथा कॅन्सर व्हायचा असो. ही अरिष्ट जन्माला यायच्या आधी, पूर्वसूचना हा संकेत आधी सावधानतेसाठी दिला जात असे. हे संकेत घेऊनच पशुपक्षी, वनचरे, सावध व्हायची. अन्य वन्य प्राणी अजूनही सावध होतात व आश्रयाला ते जायचे, पूर्वतयारी करायचे, पर्याय शोधायचा. ज्यामुळे जीवहानी कमीत कमी होत होती. मोठे साहेब येण्याआधी कसा शिपाई पट्टेवाला येतो. पट्टेवाला हा साहेब येत असल्याचा इशारा आहे. चौकाचौकात बंदोबस्त दिसताच कोणीतरी मंत्री येतो आहे, असा सुद्धा आम्ही तर्क करतोच. रोगाला रोग तुम्ही म्हणता, हे रोगाला तरी माहित आहे का? खरं कुठल्यातरी संवेदनांच्या समूहाला आम्ही रोग नाही का म्हणत? रोग नसतोच! हे रोग दुःखद अप्रिय संवेदना आहेत. या संवेदना तुम्हाला संकेत देत असतात. इशारे करत असतात. जाग आणत असतात. लक्ष वेधत असतात. पण तुम्ही दुर्लक्ष करता. तेव्हा पुन्हा त्या संवेदना संतप्त (तीव्र) होतात. खाज, कंड, फुग, सुज, संताप, ताप, मलावरोध, अनिद्रा, खोकला, सर्दी, भुकबंद, बेचैनी वगैरे वगैरे यांपैकी तुम्ही काहीतरी त्याला म्हणीत बसता. पण या जरी सार्‍या दुःखद संवेदना असल्या, अप्रिय वाटल्या तरी पण त्या हव्यातचं. अन्यथा तुम्हाला कळणार तरी कसं?

घर पेटताना एकदम पेटत नाही. आधी किनारा कुठेतरी धुमसत असतो. वास, गंध, धूर दूरपर्यंत काही जळत असल्याचा संकेत देत असतो. धुराचा वास सावधानतेचा इशारा असतो. पण घर मालक झोपला असेल, बेहोश असेल, पगडया पचास बँकेत गोळा करण्यात चूर असेल, मग कोणीतरी त्याला काय करावं? फोन, रेडिओ, टी.व्ही, फटाके, गाडया-घोडया या आवाजांच्या हलकल्लोळात हे इशारे घेणार तरी कोण? सावधान होणार तरी कसे?

माझं स्पष्ट मत आहे. विज्ञानानं, प्रगतीनं आम्हाला बधिर केलं. भोगासाठी आम्हाला अधिर केलं. त्यातल्या त्यात इंग्रजी औषधांनी आणखीनचं कहर केला म्हणायचा. कारण प्रत्येक संवेदनेला त्यांनी आम्हाला गोळया पुरविल्या, आपण आम्ही त्या डागल्या.

दुखलं डोकं गोळया खां.

तटलं शौच गोळया खा.

मिटलं नाक गोळया खा.

फुटलं फोड गोळया खा.

फुटलं नशिबही यानेच, असे मला म्हणावं वाटतं.

तुम्हाला कधी ते वाटायचं, ते वाटू द्या. पण जे दिसतं ते बोलायला काय बिघडलं. त्यानं काय झालं माहीत आहे का? डोक्याने जो दुखून संवेदनेचा संकेत सोडला होता. शौचाने तटून जी फिर्याद केली होती. नाकाने पाकळया मिटून काही संदेश दिला होता. फोडाने तोंड फोडून जे गंतव्य ओकलं होतं. यांचं कोणी ऐकाल की नाही ते काय म्हणत आहेत? काय सुचवत आहेत? त्यांचे म्हणणे तरी काय आहे? तुमची प्रगती झाली म्हणून यांचे काहीच ऐकायचे नाही का?

तुम्ही जेव्हा दोन महिन्याचे होता. घर नवीन होतं. माणसं अनोळखी होती. तरीपण तुम्ही आईला ओरडून हाक दिलीत. आईचं नाव माहित नाही. तरी हाकेला आईनं दाद दिली. अय्या! माझं बाळ म्हणाली. ताणावलं म्हणाली. भुकावलं म्हणाली. आणि मनमुराद तिनं पाजलं. तेव्हा तुम्ही शांत झोपलात. तसं तिनं न करता तुम्हाला दवाखान्यात पळवलं असतं, द्वाड का रडतय कळतच नाही म्हणाली असती, डॉक्टर तरी काय करणार? झोपेची गोळी देणारं, दुसरं काय करणार? तुमची आज झाली अशी सर्वांगीण वाढ तरी झाली असती का? संकेताची भाषा खुणखुणेला पटावी म्हणूनच असतात. कळलं!

अवयवांची हाक तुम्ही ऐकणार कधी? त्यांना तोंड कुठे आहे? त्यांनी ऐकणार कधी? त्यांनी तुमच्या नावाने हाक तरी कशी द्यावी? तुम्ही अर्धांगिनीच्या अबोलातून तिची नाराजी ओळखता. तिचं रूसणं, फुगणं, फुसफुसणं जाणता. मुकी अवयवं यापेक्षा आपली नाराजी कशी व्यक्त करणार?

दुखणार, खुपणार, खाजणार, फणफणणार, तापणार, सुजणार आणि वाहणार त्यास इतक्या चॅनलमधून यावं लागलं, पण तरीसुद्धा तुम्ही त्याला एका शब्दानं देखील विचारत नाही. काय रे बाबा! काय झालं? काय माझं चुकलं? का काळे झेंडे दाखवता आहात? कोण नेता तुम्हाला असा भेटला तरी? काहीच विचारत नाही. सरळ उठता आणि गोळया काय खाता? इंजेक्शन काय घेता? एक्स रे, सोनोग्राफी काय काय? हे सारे पैसे आहेत म्हणूनच ही मिजास. दुसरं काय?

मग तो एखादा त्यांचा आंतर जगताचा प्रतिनिधी तुमची प्रत्यक्ष स्वतःच गाठ घ्यायला, गाठ (टयूमर) घेऊ न येतो. मग त्याला तुम्ही कॅन्सर म्हणणार, होय ना! हा खरा तर देहाने मारलेला निर्वाणीचा शंख आहे. मालकं-मालकं आता उठा नाहीतर, आपलं संपलं.

दुधाला ऊतु येण्या आधी, गृहिणीला दूध देखील फुगून फसफसून संकेत करीत असते. हुशार गृहिणी लाख कामे सोडून क्षण दोन क्षण भांडयाजवळच थांबते. असं तुम्ही थांबलात का? असं भांडं तुम्ही उतरवलंत का? असं हुशार मालक आहात का? हो तुमची लाख कामे आहेत, कबुल आहे, पण या अवयवांच्या सहयोगाशिवाय ती झाली का?

शरीर तर तुमचा नजीकचा सोबती ना! अर्थात अवयव तुमची लंगोटी यार. जन्मापासून ती मरेपर्यंत तुमच्या सांगाती, होय ना! मग    का नाही प्यार? शासकीय घटनेला इंडियन पिनल कोड म्हणता, जाणणार्‍यांना वकील म्हणता, नेचर पीनल कोड जाणलात का? गुन्ह्याला प्रवृत्त करणारे वकील तरी कसले? नवनव्या रोगाला उभे करणारे डॉक्टर तरी कसले?

जो वकील तडजोडीने प्रश्‍न मिटवेल, सामोपचाराने घेईल, सुसंवाद घडवेल, तोच खरा निष्णात वकील म्हणायला हवा. लढा तुम्ही, मी तुमचे कपडे सांभाळेन. मी तुम्हाला सोडवून पण आणीनं. गोळया गिळा, अन् काहीही खा, काहीही करा. तुमचा पैसा आणि माझा खिसा. हा उपदेश कोणी डॉक्टर किती दिवस करेल?

‘कॅन्सर’ हा शब्द इंग्रजांनी आणून इंग्रजाळला. पण कॅन्सर हा शब्द आज माणसाळला. पूर्वी याला कर्करोग म्हणत असतं. कर्करोग हा शब्द सुद्धा चिकित्सकांनाच माहित असायचा. अन्यथा हा शब्द देखील परिचित नव्हता. पापी, दुराचारी लोकांनाच हा रोग होता, अशी एक समज होती. कॅन्सर म्हणजे कॅन्सलचं. कॅन्सल म्हणजे गोळया कॅन्सलचं. ही नैसर्गिक शिक्षा म्हणजे चार दोन महिन्याचाच सोबती. हा अनुभव, पण... नाही. तसं आता मुळीचं नाही. जरूर आपलं अज्ञान आपला आळसं या कॅन्सर मागे मला उभा दिसतो आहे. काय आहे आळस व काय आहे अज्ञान? यावरच हा लेख प्रकाश टाकेल.

कॅन्सर म्हणजे यमाकडील पकड वॉरंट नोटीसचं. अशी इतकी प्रगती होऊनही, आजही लोकांची समज आहे. कारण तथाकथित उपचार करूनही ही मंडळी सेकंडरीज म्हणतील, फोर्थ स्टेज म्हणतील. आणि हातातल्या रोग्याला राम राम ठोकतील.

आजही कॅन्सर तज्ञ आपल्या परिचिताला. होय कॅन्सरच आहे. हे विधान सांगताना त्यांची जीभ जड जाते. कारण त्याला माहीत आहे, त्याच्या मागे किती शुक्लकाष्ट उभे राहातं? कॅन्सरच्या रूग्णांचे पुनर्वसन किती टक्के झाले? किती दिवस त्यांना वाढवून मिळाली? प्रगतीने कॅन्सर रोगी गेल्या शंभर वर्षात वाढवला की घटवला? जो तो आपल्या पायातील वाळू सरकू नये, म्हणून लक्ष ठेवून आहे. ही मापे कोण काढेल? काटछाट करणार तरी किती? कुरूप-विद्रूप होणार तरी किती? मानवी जीवनाची इतिश्री करणारे म्हणून हे प्राणघातक रोग झालेत. त्यात कॅन्सर हा अग्रगण्य जरूर आहे. आज जगभर याचे थैमान चालू आहे. सुधारलेल्या देशात निम्म्याहून अधिक लोकांना त्याची बाधा होते आहे. बुद्धिवादी म्हणवणार्‍या सुधारलेल्यांना, जीवनपद्धती आणखीन विकसित करू पाहणार्‍या मानवाला, हा रोग म्हणजे मोठा शाप राहणार आहे. याची कारणे न कळणारी असली, तरी पण हे खरे नाही.

हा रोग होण्याची कारणे अगदी सुस्पष्ट आहेत. जीवात जीव असेपर्यंत ज्याने आपलं आयुष्य बेमुरवतपणे घालवलं. किसका फाटया किसका तुटया? कि वा खाल्लं तेवढं आलं, कोण संगं नेल? म्हणजे चार्वाक दृष्टि ठेवून ज्यानं कृतार्थता मानली. त्यांच्यासाठी परमेश्‍वर म्हणा किंवा निसर्ग म्हणा. हा रोग देहांत शिक्षा आहे. असा अनुभव असला, तरी सुद्धा हा रोग असाध्य नाही. पण सहज साध्य पण नाही. हा नक्कीच अटीतटीचा सामना आहे. अक्कल हुशारीचा मामला आहे. कारण संपूर्ण प्रगतीच्या नावाखाली लांबचा प्रवास चुकीच्या वाटेवर इतका दूर झाला आहे. थोडक्यात आमचा प्रयोग म्हणजे आदिवासी होण्याची प्रक्रिया आहे. आकाशाखाली निराधार व्हायचं. निसर्गालाच पुन्हा शरण जाण्याची ही प्रक्रिया आहे. उन्हाळयात वळीव कोसळतो तेव्हा, वातावरण आधी तापतं. विस्कटलेले हळूहळू ढग काळे होत एकत्र येतात. विजा होतात व गडगडून ढग गळू लागतात. यालाच वळीव पाऊस म्हणतात. अगदी असेच छोटे मोठे शरीरातील संचित झालेली विजाती द्रव्ये (ढेुळपी) एकत्र होतात व पार्टनरशिप मध्ये दुखण्याचं दुकान खोलतात.

एकजुटीने माल खरेदी करून दुखण्याच्या दुकानाचा विस्तार वाढवतात. त्यांचा माल काय आहे? ढग काय आहेत? यावर फोकस कोणाचाच दिसत नाही. तज्ज्ञांचा तर नाहीच, रूग्णांचा कोठून येणार मग? बुद्धिवादांचा डिमडिम, उर्ध्वस्वरांने वाजत असलेल्या आधुनिक विज्ञानवादी जगात, रूढवैद्यक शास्त्राचा, अ‍ॅलोपॅथीच्या गुणावगुणांचा, शास्त्रीय कसोटीवर पुर्वग्रह दृष्टी विरहीत, निर्लेप मनाने विचार करण्याची नव्हे, तर एकदा सोक्षमोक्ष करून घेण्याची वेळ आली आहे.

माणसालाच नाही तर सर्व जीवमात्रालाचं आपला जीव प्यारा आहे. पण त्याच बरोबर हेही खरे आहे की, मनुष्य एकमेव असा प्राणी आहे की, अन्न ग्रहण करण्यापूर्वी आपल्या हाताने त्यात विष पेरतो. नकळतपणे आत्मघात करून घेण्यापर्यंत, जगण्याबद्दल बेफिकीर असलेला, असा माणूस हा एकमेव प्राणी म्हणायला पाहिजे. आजारपणात फक्त जागा होतो, अन् थोडा विचार करायला लागतो. मी बर्‍याच रूग्णांना प्रश्‍न विचारला, अहो! हा रोग तुम्हाकडे कोणी पाठवला? की, तुम्ही मागवला? आ बैल मुझे मारके जा म्हटल्यावरच, बैल कामधंदा सोडून आला किंवा कसा? की आपणहून तो आला?

ते मान्य करतात, आम्हीच मागवला आमच्या पत्त्यावर. लोकांना कळतं पण वळत नाही. माणूस फक्त रोगातून मुक्त होऊन भागणार नाही, तर तो औषधातून व व्यसनातून ही मुक्त झाला पाहिजे. असे शास्त्र विकसित करण्याची आज नितांत गरज आहे.

रोगांची सध्या लाटच येत आहे. आपण म्हणूनच वृत्त पेपर, दैनिके कधी नव्हती, इतकी आरोग्याचे खिरापत वाटून, वाचकांचे लक्ष वेधित आहेत. नवे शोध, नवे तर्क, नवी अनुमाने उलटसुलट लिहून वाचकांना कर्तव्यमूड बनवत आहेत. भ्रमिष्टाना आणखीन गोंधळून सोडत आहेत. उदा. एकदा म्हणायचे चहाने कॅन्सर होतो, एकदा लिहायचे चहाने कॅन्सर जातो. वगैरे वगैरे ज्यांच्या हातात काठी, बाकी त्यांची म्हैस. जसा त्यांच्या हातात पेपर त्यांचाच गोंधळ. पेपर म्हणजे शास्त्र नव्हे, पैशासाठी वाटेल ते करणारे, पेपर सुद्धा एक बनियाच आहे. मग चहा कंपनीवाले सुद्धा बातमी वजा आपली जाहिरात देतील. यापेक्षा तुम्हाला चहा पचतो किती? तुम्ही पिता किती? त्याचा काय परिणाम होतो आहे? किती दिवसांनी होतो आहे? झालेला रोग चहाशी संबंध जोडतो किंवा काय? वगैरे वगैरे विचार करायला, आपल्याला ते कळायला होशमध्ये आम्ही कोणीच नाही आहोत. वाचणार्‍यानं ऐकणार्‍याला वाचून पुरावा द्यायचा आणि झोडत र्‍हायचं. चहा पीत रहायचं. तीन वर्षाचे मूल हे आई इतकेच चहा पिते.

तुम्हाला मी सांगितलं तर आश्‍चर्य वाटेल, अनेक छोटया मोठया रोगाला चहा एक जबरदस्त कारण आहे. गर्दी घेते म्हणून आम्ही घेतो. मेजॉरिटीचे राज्य ठीक आहे. पण मेजॉरिटीचा प्रवाह तुम्ही तुमच्यावर लादता कशाला? गर्दीकडे डोकं नसतं. गर्दी होशमध्ये नसते. गर्दीला हृदय नसतं. गर्दी मेंढयांचा कळप असतो. तुम्हाला चहा मानतो का? चहा दिशाभूल करीत नाही ना? झालेला रोग चहा सोडून दिल्यास किरकोळ रोग शिथिल होतात का? पाहायचं तरी होतात. पाहिलंत का? तुम्हाला आश्‍चर्य वाटेल! रोगाला रसद पुरवण्याच्या हिटलिस्टमध्ये दारू, तंबाखू, मटण या यादीतच चहाला पण आम्ही पकडलं आहे.

चहा आणि अ‍ॅलोपॅथी एकाच कालखंडात ब्रिटीशांच्या वास्तव्यातून आम्ही भारतीयांनी हस्तगत केला. त्यांनी आपली भेट आम्हाला सुपूर्द केली. चहा व औषधं माणसांच्या हाडापर्यंत अगदी जिन्समध्ये पण जाऊन भिनली. प्रेमाचा, चांगुलपणाचा, जिव्हाळयाचा, आपुलकीचा चहा आज वारस झाला आहे.

मी गेली 40 वर्षे माणसाच्या रोगमुक्ती बरोबर चहा व औषधे यातूनही माणूस मुक्त करावा यासाठी झुंझतो आहे. चहा व औषध यांना पर्याय देतो आहे. औषधांना पर्याय सम्यक अन्न अर्थात, ‘अन्न हेच औषध’ व चहाला पर्याय, ‘सोया कॉफी’ अगदी चपखल बसला आहे. मरता क्या नहीं करता? वाट अडली तेव्हा करणार तरी काय? अडला नारायण या तंत्राचे पाय धरी.

मित्रहो! आम्ही उपचारामध्ये असं करतो तरी काय? केवळ सफाई, मग सफाई मनाची, सफाई तनाची, अगदी कणाकणाची, कानाकोपर्‍याची, कानानाकाची, नसानसाची. ज्याने सगळेच रोग भुईसपाट होऊ शकतात. मात्र रूग्णांकडे हवी, जिद्द, तरच ते ओलांडतील रोगाची हद्द, अन्यथा नाही. विज्ञानाच्या बंद झालेल्या दरवाज्यातून, अर्थात सर्व तज्ज्ञ डॉक्टरांकडून परतलेला रूग्णच या पर्यायी उपचारासाठी पात्र असतो. आणि म्हणूनच कॅन्सरचे रूग्ण एखाद्या कॅन्सर तज्ज्ञांपेक्षा मजकडे ज्यादा आले आहेत, कारण तेच उपचार घेताना, भक्ती, शक्ती व सक्ती या तंत्राचा वापर करीत. कारण त्यांना दरम्यान अन्य वाटा   बंद असतं.

40 वर्षाची वैद्यकीय रूग्णसेवा करून मी आज ठामपणे सांगू शकतो की प्रत्येक रोग हा मालकाला अर्थात धन्याला त्या रूग्णाला जाग आणण्यासाठी रोगालाच हाक (आवाज) देतो आहे. हळूहळू त्याच्या हाकेची तीव्रता जेव्हा उग्र होत जाते. तेव्हा जाग येण्यासाठी वेदना, ताप, फुग, सुज, अनिद्रा, भुकमंद, मलावरोध करीत करीत शेवटी शंख मारून तरी हा धनी उठतो का? ते पहायला कॅन्सर प्रतिनिधी गाठ बांधून, गाठ घ्यायला हजर झालेला असतो. कॅन्सर म्हणजे शंखध्वनी होय. धनी उठला तर धन्य पावला म्हणायचा. अन्यथा शंखाला शंख जोडलेलाचं. राम नाम सत्य है। निसर्ग तरी आणखीन काय करणार हो?

बरेच लोक आम्हाला विचारतात. निरागस बालकाला मग कॅन्सर का व्हावा? प्रभुचरणी लीन होणार्‍या सत्शील संताना पण कॅन्सर का होतो? घर धरून असलेल्या गृहिणीला कॅन्सर का?

याला माझं स्पष्ट उत्तर आहे. गेल्या अनेक वर्ष टाईमबॉम्ब चं दृष्य कॅन्सर बॉम्ब अर्थात लोकांचे खान-पान, रहन-सहन यातुन निर्माण झालेला वारस. ही पुर्वजांची परंपरा, रक्त, रंग, रूप, नाक, आकार यांनाच घेऊन नव्हे तर, याचबरोबर मूळ रोग संस्कारही जिन्सच्या डिझाईन मध्ये कोरले गेलेले असतात. त्यांना अनुकूल वातावरण मिळताच ते रोग त्या त्या वेळेत, त्या त्या पिढीत पुढे येत आहेत. कॅन्सरचा बाजार भरवायला दोन-चार पिढ्याचा काळ निमित्त असू शकतो.

तुमची गाफिलता, तुमचा चंगळवाद, तुमची सुबत्ता, तुमची चैन, तुमची प्रगती, तुमची विद्वता उद्याच्या पिढीसाठी सुद्धा खतरनाक पण होऊ शकते. हे लक्षात असू द्या, तुम्ही हुतात्मा व्हायला तयार ही असाल पण उद्याच्या सत्शील निरागस पिढीला नरक यातना सहन कराव्या लागणार आहेत. आज ज्या यातना कॅन्सरच्या नावाखाली, मधुमेहाच्या नावाखाली, हृदय विकाराच्या नावाखाली आणि जे म्हणून भोगत आहेत, जे म्हणून झेलत आहेत, या सर्वाला मागची पिढीही तितकीच जबाबदार आहे. मग तुमच्या प्रगतीत, तुमच्या सुबत्तेत केमिकल खतं असू शकतील, अज्ञान असू शकेल, चंगळवाद असू शकेल किवा अहंकार सुद्धा असू शकेल. समाजाच्या या सर्व दर्जाचे पोस्टमार्टम करणार तरी कोण?

विज्ञानाकडून किंवा तत्त्ववेत्याकडून गेल्या दोन शतकापूर्वीचा आपला समाज, त्याची दुखणी, त्यांच्या समस्या व आजची दुखणी व समस्या, तेंव्हाची प्रतिकारशक्ती व आजची प्रतिकारशक्ती, परस्परात असलेला भाईचारा व आजचा सलोखा आज माणूस समग्रतेनं सर्व बाजूकडून आपला दर्जा घसरत आहे, उपभोग्य वस्तु मजबुत बनवित आहे, पण उपभोक्ता दुर्बल होतो आहे. पगडया अनेक पण शिर मात्र सलामत होत राहात नाही. ही अवस्था मात्र सर्वत्र होत आहे.

अ‍ॅलोपॅथी शिवाय इतर वैद्यकशास्त्रानुसार उपचार करून अनेक कर्करोगी बरे झाले आहेत. अगदी मरणाच्या दारात उभे असलेले रोगी परत फिरल्याची उदाहरणे थोडीथोडकी नाहीत, असे छातीठोकपणे सांगणारे अ‍ॅलोपॅथीक रोग विशारद व शल्यकारही आहेत, की ज्यांनी मनाच्या मोकळेपणाने आपले अनुभव नमूद केले आहेत.

कॅन्सरवरच्या संशोधनाच्या नावाखाली जनतेच्या खिशातूनच नव्हे, तर सरकारच्या तिजोर्‍यांवर भार टाकून जगभर इतका पैसा खर्च होत आहे की, त्यापासून मानवाला मिळालेला तद्दंश फायदा लक्षात घेता, ती अक्षरशः वारेमाप असलेली उधळपट्टी म्हणावी लागेल. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए। या म्हणीप्रमाणे कर्करोगाचे जंतु व प्रतिबंधक उपाय सापडणे आता फार लांब नाही, अशी जाहीरातबाजी करून नरबळीचे अग्निहोत्र अखंडपणे धगधगते कसे ठेवले जात आहे? याचे यथातथ्य दर्शन घडेल.

एळश्र ॠ. गेपशी यांनी आपल्या उरपलशी या ग्रंथात ठणकावून सांगितले आहे की, चाकू हा कॅन्सरवर उपाय नव्हेच. कारण अशा प्रकारे शस्त्रक्रिया या झाल्यावर पाचा पैकी चार रोगी दगावतात. हा कसाईखाना जितक्या लवकर बंद करता येईल तेवढा बरा. कारण, माझा गेल्या 40 वर्षाचा अनुभव असा आहे की क्ष-किरण, रेडिअम, कोबाल्ट, शस्त्रक्रिया इत्यादी साधनांनी कॅन्सर कधीच बरा झालेला नाही. उलट रोगाच्या मुळाला कुठेही स्पर्श न होता, वरवरची फक्त काटछाट होते. कर्करोग ही शारीरिक विकृती नव्हे तो भूतकालीन प्रकृतिशेप आहे व प्रकृतीच्या कार्याला चाकू स्पर्शच करू शकत नसतो.

खुद्द इंग्लंडसारख्या सुधारलेल्या व पुढारलेल्या देशात गेल्या 50 वर्षात या रोगाने मृत्यू पावलेल्यांची संख्या साडेचार पटीनी वाढलेली आहे. 1890 साली अमेरिकेत या रोगाचे बळी 18,536 होते अशी नोंद आहे, तर त्यानंतर 10 वर्षानी 1900 साली, हाच आकडा 29,229 पर्यत वाढला; आणि आजच्या गणनेप्रमाणे जवळ जवळ 50,000 कर्करोग-ग्रस्त आज एकटया अमेरिकेत आहेत.

भारतात असे आकडे कधीच जमविले जात नाहीत; व औषधोचारा बाबतीत तर सगळाच आनंद(!) आहे. परंतु फिलाडेल्फिया येथील मेडिकल सोसायटी पुढे वाचलेल्या एका अहवालात असे जाहीरपणे सांगण्यात आले आहे, कि दर 11 मृतांत 1 मृत्यू कॅन्सरमुळे झालेला असतो. दर 9 स्त्रियांमध्ये एक स्त्री कॅन्सरची बाधा होऊन मृत्युमुखी पडलेली असते. शस्त्रक्रिया करून मरण पावलेल्या एकंदर मृत्यूसंख्येत एक तृतीयांश मृत्यू केवळ कॅन्सरवर झालेल्या शस्त्रक्रिया पीडितांचे असतात. या रोगाची आक्रमक धाव एवढी भयकारी आहे, कि जागतिक आरोग्य संघटनेच्या जिनिव्हा येथून नुकताच प्रसिद्ध झालेल्या पत्रिकेत म्हटले आहे कि, प्रतिवर्षी कर्करोगाने 50 लाख लोक मृत्यू पावतात,  तर 60,000 लोकांना कर्करोग झाला असल्याचे तपासणीत आढळून आले आहे.

अनेक औद्योगिक राष्ट्रांतील आयुमर्यादा गेल्याकाही वर्षात कमी झाली असून कर्करोग हे त्याचे प्रमुख कारण आहे. तरीसुद्धा शेवटी हे म्हणायला ती आरोग्य संघटना विसरलेली नाही, की कर्करोगावरील उपचारात दिवसेंदिवस सुधारणा होत असून काही दशकांचे आत या रोगावर यशस्वीपणे मात करणारे उपाय सापडतील अशी आशा करण्यात येत आहे. तसे झाले तर उत्तमच परंतु, आतापर्यंत याबाबत इतकी आश्‍वासने दिली गेली आहेत; व प्रत्यक्षत अनुभव व तज्ज्ञ म्हणवणार्‍यांनीच जाहीर केलेली मते इतकी सुस्पष्ट आहेत, की या आश्‍वासनांवर किती विसंबून राहायचे हा खरा प्रश्‍न आहे.

ऊी. थ. अ. ऊशुशू मिशीगन विद्यापीठाचे पूर्वीचे औषधीविज्ञान शिकवणारे प्राध्यापक म्हणतात,  “माझ्या 45 वर्षाच्या वैद्यकीय व्यवसायात माझ्या पाहण्यात असा एक ही कर्करोग पीडित रूग्ण आढळला नाही, कि जो-क्ष-किरण, रेडियम नि शस्त्रक्रियेने बरा झाला.”

असा हा सर्व दुनियेला व्यापून दंशामुळे उरला, असे म्हणण्यासारखा, आधुनिक विज्ञानवादी सुधारलेल्या जगाला आव्हान देणारा हा रोग होतो कशाने? त्याचे खरं-खुरं स्वरूप काय? तो वंशपरंपरेने येतो की तो संसर्गजन्य आहे? त्यावर खरेच का काही सुद्धा उपाय नाही? असे प्रश्‍न वाचकांच्या मनात उभे राहणे सहाजीकच आहे.

या रोगाबद्दल सर्वसाधारण जनतेमध्ये असलेली भिती घालवून त्याला हायसे वाटण्यासारखी खरी गोष्ट सांगायची म्हणजे कर्करोग हा एक असा चमत्कारिक रोग आहे की त्याची उत्पत्ती कशी होते हे सहज लक्षात येत नाही व त्यावर उपाययोजना नाही, अशी जी समजूत करून दिली आहे ती प्रथमतः मनापासून काढून टाकली पाहिजे. हा रोग वंशपरंपरेने येत नाही आणि तसे सिद्धही झालेले नाही; व तो संसर्गजन्य तर नाहीच नाही. ही त्या रोग्याच्या सर्व दुःखात एकच समाधानाची गोष्ट म्हणायची!

कॅन्सर होण्याचे कारण पोटॅशियमसारख्या महत्वाच्या क्षाराचा आवश्यक तेवढा साठा शरीरात नसणे. आधुनिक विद्यानिष्ठ यांत्रिक बनलेल्या जीवनात, माणसाच्या शरीराप्रमाणे मनावरही जो अतिरिक्त ताण पडतो तोही कर्करोगासारख्या व्याधींना उत्तेजित करण्यास इतर अनेक कारणांना साहाय्यभूत होतो.

माणसाला चिता जाळत नाही तेवढी चिंता जाळून टाकते, असं म्हणतात. प्रेम-वैफल्य आत्यंतिक दुःख, अपयश, आर्थिक संकटे, निराशा इत्यादी मनःक्षोभ उत्पन्न करणार्‍या घटनांनी एका रात्रीत काळयाचे पांढरे केस होतात असे म्हटले जाते. जीवनरसायनशास्त्राच्या आधारे या घटनेचा विचार केला तर, ते खरेच आहे. मेंदूत राखी रंगाचे मूलद्रव्य असते. त्याचे नियंत्रण पोटॅशियम हा क्षार करीत असतो. मानसिक क्षोभ असह्य होऊन माणूस जेंव्हा थकतो, तेंव्हा हे मूलद्रव्य कमी पडून डोक्यावर परिणाम घडवते. पोटॅशियम हा क्षार दिला की या मलद्रव्याचे मेंदूच्या पेशीतून ढळलेले संतुलन सुस्थापित होते व मेंदू कार्यक्षम बनतो.

परिवारात अचानक एखादी व्यक्ती अपघातात मृत्यू पावते, तेव्हा शोकाच्या धक्क्यांनी त्या व्यक्तीवर अवलंबून असलेल्या चिंतातूर व्यक्तीस कँन्सर झालेले मी पाहिले आहे.

कर्करोगाबाबत असे समप्रमाण सिद्ध झालेले आहे की, ज्याची बद्धकोष्ठाची तक्रार नाही असा अपवादानेही कर्करोगी सापडत नाही. हे रोगी एक मांसाहारी तरी असतात, अगर त्यांच्या आहारात इतरांपेक्षा मिठाचे प्रमाण जास्त असते. कर्करोगी म्हंटला की त्याचे पोट साफ राहत नसल्याची तक्रार आढळायचीच. स्त्रियांमध्ये बद्धकोष्ठाच्या तक्रारी जास्त प्रमाणात आढळतात, म्हणून कर्करोग्यामध्येही स्त्रियांचे प्रमाण पुरूषांच्या तुलनेने जास्त असते.

मूत्रातच विपूल प्रमाणात पोटॅशियम आहे. या पोटॅशियमच्या उपायाने कॅन्सर नैसर्गिकरित्या बरा होतो. त्यामुळे कॅन्सरचा मुळासकट नायनाट होतो व पुन्हा उद्भवण्याचे भय राहात नाही.

तुम्हाला सांगायची गंमत अशी की पोटॅशियम हा घटक मूत्राचे सेवन केल्यामुळे देहास पुन्हा प्राप्त होतो. कारण 100 मि.ली. मूत्रामध्ये 137.00 या प्रमाणात आहे.

आतापर्यंतच्या चर्चेवरून हे स्पष्ट झाले असेल की, खाण्यापिण्याचे पथ्य ही या रोगा बाबतीत एक अत्यंत आवश्यक बाब आहे. मीठ व मीट म्हणजे मांसान्न पूर्णतः वर्ज्य करावे.

पोटॅशियमचा पुरवठा होण्याकरिता शिवाम्बूने, शिवाय प्राणवायूचा पुरवठा होण्याकरिता प्राणायाम, आधुनिक विज्ञान युगात उद्योगप्रवण बनलेल्या, स्वतः अत्यंत सुधारलेले म्हणवणार्‍या मानवाला वरदान आहे. अन्यथा मिळालेला कर्करोग एक शाप आहे. एक हाक आहे.

मनुष्य जन्माला येऊन, आपली बुद्धी, विवेक, सारासार बुद्धी गहाण टाकून, मनःपूत जीवन जगणार्‍याला, परमेश्‍वराने म्हणा अथवा निसर्गाने म्हणा, दिलेली देहांताची शिक्षा म्हणजेच, अशा प्राणघातक रोगाच्या स्वाधीन मानवाला करणे योग्य यावर वरिष्ठ न्यायालयात केलेले अपील म्हणजेच अशा अपराध्यांची वाढवलेली आयुमर्यादा!

रूढ अथवा इतर वैद्यकांनी काविळ अपयशं असं म्हणून जिथे हात टेकले तिथे शिवाम्बू उपचार तज्ज्ञांनी अत्यंत आत्मविश्‍वासाने, धीमेपणाने व आपली सर्व वैज्ञानिक व प्राचीन बुद्धिमत्ता पणाला लावून अशांच्या आयुष्याची दोरी वाढवली आहे. कित्येकांना कायमचे बरे केले         आहे. डोळे विस्फारित करणारे व मती गुंग करणारे रोग निवारणाचे चमत्कार शिवाम्बूसह योग निसर्गोपचाराने घडवून आणल्याची उदाहरणे थोडी नाहीत.

म्हणूनच, प्रौढी मिरवायची म्हणून नव्हे तर, आत्मविश्‍वासाने मुंबईचे डॉ. खरे (च.ड) न्युरॉलोजिस्ट यासारखे जाहीरपणे म्हणतात,  “कर्करोग शिवाम्बूने बरा होतो ही मोठी नाविन्याची अथवा अद्भुत गोष्ट नव्हेच मुळी!”

डॉ. बर्नेट छातीठोकपणे सांगतात की,  “चाकूने शस्त्र क्रिया करणे हा कॅन्सर बरा करण्याचा उपाय नव्हे.”

तुम्हाला जर शिवाम्बूसह उपचार विज्ञानाचे यथायोग्य ज्ञान असेल व मनाचा समतोलपणा ढळू न देण्याचा धीरगंभीरपणा तुमच्या स्वभावात असेल तर कुठलाही व्रण मग तो कॅन्सरसारखा प्राणघातक का असेना, शिवाम्बूनी बरा होऊ शकतो. रूढ वैद्यकाच्या उपचारानुसार शस्त्रक्रिया एकदा झाल्यावर पुन्हा रोग उत्पन्न झालेला रोगी जरी तुमच्याकडे आला तरी अगदी गडबडून जाऊ नका. असाध्य म्हणून पळवाट काढणे हे खर्‍या रूग्णविशारदाचे ब्रीद नव्हे.

सर्वसामान्य जनतेला या शिवाम्बू उपचारपद्धतीची जाणीव नाही. कारण अ‍ॅलोपॅथीसारखा या उपचारपद्धतीचा गाजा बाजा नाही, असलाच तर तो हेटाळणी करण्यापुरताच आहे. शिवाय या उपचार पद्धतीतील या जीनांचे सेवाशुल्क अर्थात उपचारांना लागणारा खर्च इतका कमी आहे की, त्यामुळेच की काय या उपचाराकडे दुर्लक्ष होते. परंतु लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की मानवाला जगवणार्‍या पेशींना जिवंत ठेविण्याचे, त्यांना अत्यंत सूक्ष्म प्रभावी रसायन पुरविण्याचे, विषद्रव्यांचा निचरा करण्याकरिता पेशींना समर्थ करण्याचे, फार काय, पेशींवर आक्रमण करणार्‍या द्रव्यांचा बिमोड करून शरीराचे रक्षण करण्याचे म्हणजेच रोग होणार्‍या कारणांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचे कार्य एकमेव शिवाम्बूसह निसर्गोपचारच करू शकतात.

सांगायचा सारांश इतकाच की, कर्करोग होण्याची कारणे स्पष्ट आहेत व ती म्हणजे आधुनिक खान-पान, व राहणीतील आरोग्यकाराक सवयी, पोट साफ न राहण्याची सवय व त्यावर घातक औषधांचा मारा. हा रोग असाध्य खास नाही; कष्टसाध्य आहे, नैसर्गिक उपचारांनी बरा होण्यासारखा आहे. तो परंपरेने चुकीच्या जीवनशैलीतून येणारा आहे, मात्र संसर्गजन्यही नाही. जरा अंतर्मुख बनलात, मनशांत ठेवलेत, चित्तक्षोभ टाळलेत, माफक व्यायाम, पोषक साधा-सुधा नैसर्गिक आहार, व शहरी जीवनापासून काही दिवस मोकळया हवेत निसर्गसानिध्यात राहिलात तर कर्करोग पुन्हा होण्याची भीती बाळगायलाच नको. 

मित्रहो! गेली 40 वर्षे कोल्हाूपर येथील साने गुरूजी वसाहतीमध्ये, घरगुती स्वरूपात जीर्ण-शीर्ण व असाध्य अशा रोगांवर उपचार प्रयोग करत राहिलो. यामध्ये निम्म्याहून अधिक कॅन्सर रूग्णच होते. उपचार प्रयोग तो काय होता तरी, नगर पालिकेचा सफाईचा माणूस जसा असतो, तसाच निसर्ग पालिकेचा मीच सफाई माणूस होय. घासणे व पुसणे केले. ज्याने रोग पुसला गेला. तुम्हाला आश्‍चर्य वाटेल! पण ही वस्तुस्थिती आहे. आपले लाडके दिवंगत पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्रीजी जेव्हा अमेरिकेला गेले होते. पॅटर्न रणगाडे शास्त्रज्ञ, कुतूहलाने शास्त्रीजींना विचारित होते. तुम्ही आमचे रणगाडे पाकिस्तान युद्धात फोडलेच कसे? तेव्हा शास्त्रीजींनी त्या निर्लज्जांना स्पष्टपणे म्हणाले,  “आमच्या इथल्या दगडांनी ते फुटले.”  म्हणजे आमच्या देशातील दगड इतका कठीण आहे, मग आम्ही काय असू शकू विचार केलेला बरा. ज्या देहात रोग आहे, त्याच देहात औषधही आहे, असं म्हणायचं आहे.

मी रूग्णांची केवळ आंतरबाह्य सफाई केली, व रोग साफ झाला. ही न पटणारी गोष्ट, पण मी सफाईला काय घेतलं? रूग्णांनी पुढे काय सांगितलं, हे मी तुम्हाला सविस्तर सांगितल्याशिवाय, तुम्हाला कळणार तरी कसं?

मित्रहो! रोगस्थिती हा मानवी जीवनात अटळ असा येणारा अपघात तरी नव्हे! हे जर खरे, तर मग काही रोगी तसा कोणताही उपाय न करता, बरे कसे होतात? तर काही अनेक उपाय करूनही, मरणाची वाट सुधारत असतात. याचं स्पष्टीकरण कोणी काय द्याव? रोग स्वभावताच उग्र, कष्टसाध्य, असाध्य किंवा मारक असता तर, त्या रोगापासून एकातरी रोग्याची सुटका मग कशी होते? तेव्हा रोगाचे मारकत्व हे रूग्णाच्या प्रकृती दोषात असते, हेच खरं.

खरे तर! औषधाचे काम फक्त एवढेच असायला हवे होते की, रोग्याच्या शरीरातील प्रकृती दोष दूर करणे, हे कार्य, रूढ वैद्यकाने साधले का? हा खरा प्रश्‍न आहे. रोगी दगावण्याचे आणखी कारण म्हणाल तर, विज्ञानाच्या संशोधनाच्या नावाखाली औषध विज्ञानाचे बाह्य जग विस्तृत, रौद्र व क्रौर्य झाले आहे की त्याच्या नुसत्या कल्पनेनेच रोगी आप्त इष्ट स्नेही व हितैषी पुरे असे भांबावून जातात की काही विचारूच नका.

हल्ली सभोवताली जी आरोग्य रक्षणाची दुनिया उभी झाली आहे.

अवयवागणिक स्पेशालिस्ट यांत्रिकी साधने ती सर्व सामान्य समाजाला जितकी अपरिचित त्यापेक्षा प्रत्यक्ष त्या दुनियेत वावरणार्‍या डॉक्टर्सनाही भांबावून चक्रावून सोडतात. रोज नवीन अगदी स्वतःला हरवण्यासारखे वाटण्याइतके भव्य-दिव्य फाफट पसार्‍याचीच आहेत.

घरात एक कॅन्सरग्रस्त जर घोषित झाला की कर्त्या पुरूषांचेच नव्हे, तर सगळयाचे धाबे दणाणलेले असते. सगळयांचे हात-पाय गळालेले असतात. तुम्हाला सांगितले तर आश्‍चर्य वाटेल. हा रोग सुद्धा कर्त्या आदर्श माणसालाच पकडत असतानाच दिसतो. जो दुसर्‍यासाठी आपल्या जीवाची कुरवंडी करीत असतो. खूप-खूप मेहनत करीत असतो. कारण मी अनेक कॅन्सरग्रस्त प्रौढ माणसांचा भूतकाळ हा मनुष्य असा असा होता, कष्टाळू होता असे म्हणताच बाकीचे सर्व त्यांचे आप्त इष्ट लगेच एकमुखी आवाज देऊन मान हलवून मान्यता देत असतं.

जो उपलब्ध नावाजलेला अत्याधुनिक व अत्यावश्यक उपचार होता तो सर्व करून झाला तरी रोगी दगावला-काय करायचे? असे म्हणून रोग्याचे आप्त इष्ट ही गप्प बसतात. आमचे रोग निदान बरोबर पण रोगी मात्र वाचला नाही असे म्हणून डॉक्टरही बाजू काढतात.

परवा-परवा सध्या मी महाराष्ट्राचा काना नि कोपरा शिवाम्बू निसर्गोपचाराच्या प्रचारासाठी व निवासी दहा दिवसाच्या शिबीरासाठी टिम घेऊन पोहोचत असतो. वाशिमला नुकतेच एक दहा दिवसाचे शिबीर झाले. त्यामध्ये जे बारा-पंधरा असाध्य रोगी दाखल झाले होते, त्यामध्ये एक बावीस वर्षाची कु. शाश्‍वत नागपूरची कन्या तिचा मामा तिला घेऊन शिबिरात दाखल झाला होता. तिला थायरॉईड कॅन्सर झाला होता.

तिच्यावर दोन लाख खर्चून तिचा मामा मुंबईचा उपचार देऊन हताश होऊन परतला होता. त्या नागपूरच्या चिमुरकर मॅडमनी मुलीच्या मामाला कोल्हापूर येथील शिवाम्बू केंद्राचा पत्ता दिला व माझा मोबाईल फोनही दिला. मामाने मला फोन केला. तेव्हा मी वाशिम येथे शिबिराचा पहिला दिवस साजरा करत होतो. त्यांना मी म्हणालो, कोल्हापूर पेक्षा वाशिम जवळ आहे. आज-उद्या पर्यंत शिबिरात दाखल व्हा. इथे मी तुम्हाला चोवीस तास मिळणार आहे. तेव्हा विना विलंब याचा लाभ घ्या. बिचारा मामा भाचीला घेऊन दुसर्‍या दिवशी वाशिमला हजर झाला.

घसा बंद होत आला होता. तज्ज्ञ मंडळी एकत्र येऊन या मुलीचा रोग इतक्या झपाटयानी वाढतोच कसा? यावर विचार करायला एकत्र झाले होते. शेवटी ऑपरेशनही केलं. रोग मात्र वाढतच होता. नाजूक मुलगी चापटून गेली होती.

मी तिला पाहिलं मी एकच सांगितलं,  “तू माझं ऐकशील तर आश्‍चर्यचकित होशील. फक्त दहा दिवस माझ्या पाठोपाठ ये, वेळ काळ उपास-तपास काही करू नको. तू मी सांगेन तसं वाट तुडवं, तुझी आवड निवड काही आणू नको.”

मित्रहो! जिद्दी मुलीने फक्त चारच दिवस सारं काही उत्तम केलं. रोज सकाळी उठून म्हणू लागली डॉक्टर काका, गळा लाकडासारखा होता किती मऊ झाला बघा. पाचव्या दिवशी तिचा आनंद गगनात मावेना. ती मला म्हणू लागली,  “तुम्ही सांगाल तसे उपचार पूर्ण करते. पण मला लवकर घरी जाऊ द्या, माझ्या घरच्या आप्त इष्ट मित्रांना दाखवून सांगू द्या. साधासुधा उपचार महा पिडेला कसा रितवू शकला?”

आपला कंठ दाखविण्याची तिची उत्कंठा माझ्या लक्षात आली. शिबिरचं दहा दिवसाचं होतं. दोन दिवस अगोदरच लेट आली आणि दोन दिवस आधीच डिसचार्ज घेतला. तिनं जो अभिप्राय लिहीलाय तो वाचण्यासारखा आहे. केवळ तिने तसा सहा दिवसाचाच उपचार घेतला.

मित्रहो! उपचार तरी काय दिला-निश्‍चित तुम्हासाठी उत्कंठा लागली असेल, तिच्या कंठासाठी केलतं काय?

नेहमीचाच उपाय-जो आम्ही आमच्या कोल्हापूर उपचार केंद्रात योजतो तोच. तर-एक म्हणजे उपलब्ध शिवाम्बू मग थेंब नि थेंब पीत राहायचं. दुसर काहीच मुखात टाकायचे नाही. तिचं वजन 38 किलो, त्यामुळे तिला उपवास फक्त बाहत्तर तासाचाच दिला. दरम्यान ती भल्या पहाटे सर्वां बरोबर ठीक रात्री 3 वाजता उठत होती. अनवाणी चालायला म्हणजे मॉर्निंग परेड करायला येत होती. चांगला एक तासाचा परेढ व्हायचा.

जमिनीवर पाऊल आदळताना नाकानी श्‍वास धक्का देऊन सोडायचा होता. बस्स! एक तास अखंड पायाला चालवायचं होतं. बिचारी चालत होती. नंतर एका पटांगणात लुजनिंग व्यायाम घेतला जायचा. श्‍वासाच्या उच्छवासाचा धक्का त्यातही ठळक होता, ज्यामुळे प्रत्येक काम सहज असूक व्हायचं, देहाचा काना नि कोपरा व्यायामासाठी यायचा.

वेदना, सूज, फुग मुक्त होत होती. अवयवे बेडया मुक्त होत होती. आम्ही कौशल्याने विचार करून याचा क्रम बनवला आहे. या राजवाडयाच्या पायर्‍या तास-दीड तास चढून झाल्यावर, मग एक तास प्राणायाम चालायचा, ज्याला आम्ही राज्याभिषेक म्हणायचो. या व्यायामाच्या प्रकारामध्ये शारीरिक व्यायामाबरोबरच बौद्धिक खुराकही दिला जायचा. डोळे मात्र बंद असायचे. कान उघडे असायचे.

तोवर सकाळचे आठ-साडे आठ वाजत होते. यानंतर कोवळया उन्हाच्या किरणात कपडे कमी करून सूर्यस्नान दिला जायचा. डोकं साई बाबांसारखं बांधण्याची सूचना महत्त्वाची होती. कारण हेड ऑफीस गरम होऊन भागणार नव्हतं. चांगलं कणीस भाजल्यासारखं चारही बाजूला झोपून उन्हाची किरणे अंगावर घ्यायचे हा दंडक होता.

यानंतर या तापवलेल्या अंगावर लगेच शिळया मानव मूत्राने मॉलिश केलं जायचं. मॉलिशला मूत्र रूग्णांचं असेल तर ठीक. शिवाय हे मलमूत्र हवाबंद असणे आवश्यक आहे. ज्याला पंधरा-वीस दिवस आकाशाखाली, ठेवून ऊन- वारा- पाऊस दिलेला असायचा. बाटल्या आकाशाखालीच आडव्या ठेवलेल्या असायच्या.

मसाज पायाकडून डोक्यापर्यंत एक तिळाइतकी जागा दुर्लक्षित न करता अंग-अंगास मॉलिश केला जायचा. केसा-केसात, नसानसात मॉलिश पोचायचा, त्यामुळे रूग्ण प्रसन्न व्हायचा. त्याला चैन वाटायची, रोगाची बेचैन नाहीशी होत होती. या मॉलिश नंतरही अल्प असं सूर्यकिरण दिले जायचे.

कधी माती-चिखलाचा लेप, कधी बाष्पस्नान, कधी भूगर्भ प्रयोग असायचे. एकूण दहा दिवसात, दहा मसाज, दहा सूर्यस्नान, तीन-चार बाष्पस्नान, तीन-चार चिखल स्नान व दोन-तीन भूगर्भ स्नान हे प्रयोग व्हायचे.

लंघन मात्र वजनावर अवलंबून असायचे. प्रत्येक दहा किलोस 24 तास याप्रमाणे असायचे. तसेच सायंकाळी चार नंतर जनरल अ‍ॅक्युप्रेशर पॉईंट जाणकाराकडून दाबले जात. सायंकाळी सत्संग वगैरे व्हायचा. शेवटी झोपण्यापूर्वी दुखर्‍या रोगग्रस्त भागावर गरम वारूळाच्या मातीच्या पट्टया लपेटून त्यावर उलन पट्ट्या बांधून झोपविले जायचे. कधी डोकं, कधी पोट, कधी गळा, आम्ही लोक चिकित्सक सुचवू तसं बांधलं जायचे.

उपवासाचा काळ हा 3, 4, 6 किंवा 8 दिवस असा असायचा. उपवास काळ संपला की मग त्यांना, एकदम पातळ, सौम्य पातळ, थोडे घट्ट व पूर्ण घट्ट असे मूग सूप, माल्ट, कण्या, कच्च्या भाज्या, लाह्या, ताक, फळं इ. रोगाच्या तीव्रतेनुसार व रोग्याच्या भुकेनुसार कमी अधिक प्रमाणात दिले जात होते.

जाताना नऊ महिन्याची आचार संहिता दिली जायची, इतक्या सर्व प्रकारच्या उपचाराची त्यात सक्ती असायची. शिवाम्बू मात्र दोन-चार वेळाच घेण्याचा आग्रह असे. सप्ताहातून एक दिवस लंघन केलचं पाहिजे व हा दंडक असायचा. दुखर्‍या भागावर दिवसा शिवाम्बुच्या घडया व रात्री गरम चिखलाचा पोटीस वेदना सूज असेल तरच, रूई चिकाचा (नैसर्गिक अ‍ॅक्युपंक्चर) प्रयोग व्हायचां. बस्स इतकंच.

घरातला जो आहार असायचा त्यात विमान नं. 1, विमान नं. 2, विमान नं. 3 असे विभाग असतात. जे रोगी त्वरित गुण मागायचे किंवा जे मरणाच्या दाढेत असायचे. त्याने विमान नं. 1 सोडू नका असा माझा आग्रह असायचा. विमान नं. 1 मध्ये सर्व माकड आहारच असायचा. जंगलातल्या माकडाला जे सहज उपलब्ध होते त्यावरच राहायचे. दात नसलेल्या रूग्णास विमान नं. 2 दिला जात असे. ज्यामध्ये पातळ रस, सूप, माल्ट, कण्या, ताक यावर जोर असतो. मात्र भुके शिवाय खायचे नाही व भूक असताना गप्प राहायचे नाही. बस्स!

इतका दंडक पुरे आहे. झोपायची-निवासाची खोली, स्वच्छ हवा वायुविजन होत असलेली, आकाश स्पष्ट दिसत असलेली अशी हवी. अंगावरचे कपडे, अंथरूण पांघरूण स्वच्छ धुतलेले मन प्रसन्न होईल  असे असावे.

झर्‍याची जागा, अर्थात लिंगाची सफाई इत्यादी काटेकोरपणे सांभाळण्यासाठी आदेश असायचा. तेल नाही, तिखट नाही, मीठ नाही, मैदा नाही, तांदूळ नाही, ब्रेड नाही, बिस्किट नाही, चहा नाही, दूध नाही, मटण नाही किंवा तंबाखूही नाही, दारू तर नाहीच नाही.

ज्याने आपले स्वघर पेटेल अशी एकही वस्तु नाही. ज्याने रोग जन्मतो. त्यानेच तो पोसतो सुद्धा. जसे मातेच्या पोटात बाळ नऊ महिने, नऊ दिवस मातेच्या मर्जीवरच अवलंबून असते. तसेच उपचारानंतर चिकित्सकांच्या मर्जीवरच कॅन्सरचा रूग्ण नऊ महिने, नऊ दिवस राहील तरच, त्यांचा पुनर्जन्म होतो. हा अनेकांचा अनुभव.

मग कॅन्सरच नाही तर एड्स सुद्धा किंवा हार्ट यासाठी बायपासला बायपास करायचं असेल तरी हीच योजना राबवली जाते.

या एकूण प्रयोगात सर्व अवयवांना स्वातंत्र्य मिळते. सर्व अवयवांवरचे जुलूम संपत. कितीतरी मोठी मोठी अरिष्टे पण इलाज किती सोप्पा. अगदी गरिबांनी सुद्धा लीलया करावा. जगण्याची इच्छा मात्र उत्कंट पाहिजे. रोग अनेक पण उपचार मार्ग एकचं. विज्ञानाच्या (रूढ उपचार) चौकटीला थडकून टेंगुळासह रोगी मजकडे येत होते व ते अंशतः जिद्दीने बरेही होत होते. मोठमोठया मातब्बर डॉक्टरांना त्यांच्या हत्यारांना बोथट करून रोग्याच्या जीवावर बेतलेला रोग, रोगी सोबत घेऊन    येत असतं.

मी मात्र सर्कशीतल्या रिंगमास्टरप्रमाणे या संपूर्ण तंत्राला नखशिखांत चढवून शिवाम्बू हंटर हाती घेऊन, कॅन्सर, एड्स, मधुमेह, हृदयविकार सब घोडे बारा टक्के या मापात मोजित होतो. सर्व हिंस्र रोगांना पळताभुई थोडी होत होती.

पण मित्रहो! हा बंदोबस्तच रोग पुन्हा येऊ नये म्हणून गस्त घालायचा, अन्यथा झाडावर चढलेली भूते पुन्हा वाकुल्या दाखवायची खांद्यावर, उरावर उडयाही घ्यायच्या, मी त्यांना गस्त चालूच ठेवा म्हणायचो. तुमची इथली इहं लोकातली सर्व कामे संपली, की मग गस्त बंद करा म्हणायचो.

काय आहे हा सर्व प्रयोग? तुम्हाला हे उलट होणं वाटतं की सुलट होणं? आधीच आम्ही आमच्या प्रगतीनं, समृद्धीनं, सुबत्तेनं उलटं झालेलो आहोत. त्यामुळे आमच्या खिशातून प्रतिकार शक्ती सांडत आहे, आमची सोबत सोडत आहे. तुम्ही उलटे आहात हे कबूल जरी केलात तरी सुलटे व्हायला सुरू झालात समजा. पण मरता क्या नही करता?

माझ्या क्लिनिक मध्ये औषधाविना उपचार करणार्‍या उपचार पद्धती वापरतो. मजकडे येणार्‍या प्रत्येक रूग्णाला आहाराचं मार्गदर्शन केलं जातं आणि त्याच्या जोडीला व्यायाम. शिवाय शिवाम्बू पानाचा वापर. मला यातून मिळणारे परिणाम समाधानकारक आहेत.

फूड फार्मसी हे शास्त्र लवकरचं विकसित होईल. जसजसं 21 वं शतक पुढे येईल, तसतसं डॉक्टरांच्या प्रिस्किप्शन वर आहारविषयक मार्गदर्शनाचे स्थान औषधाच्या वरच लिहिलं जाईल. त्यात कुणी कोणता व्यायाम करावा? हे ही असेल हे दिवस आता दूर राहिलेले नाहीत.

नैसर्गिक अन्नामध्ये असलेले औषधी गुण हे खर्‍या अर्थात ताज्या (ॠरीवशप ऋीशीह) आणि नैसर्गिक अवस्थेतील अन्न पदार्थातच असतात. जसजसा त्याचा ताजेपणा कमी होतो आणि जसजसे त्यावर संस्कार केले जातात. उदा. वाळवणं, धूणं, शिजवणं, तळणं, सुकवणं, घोळणं, पाखडणं, सोलणं इत्यादी शुद्धीकरणाच्या आणि इतर प्रक्रिया करण्यामुळे अन्नाचेच आरोग्य दायित्व कमी होत जाते.

रोजच्या आहारातच नैसर्गिक अवस्थेतील पदार्थ पुरेशी असतील. मानव पेशीवर होणारे दुष्परिणाम या आहारातून सौम्य होऊ शकतात. कर्करोगाच्या उपचारात आहाराला विशेष महत्त्व आहे, पण याच गोष्टी लोकांना फारशा माहीत दिसत नाहीत.

न्युट्रिशन हा विषयच रूढ वैद्यकीय अभ्यासक्रमात अंतर्भूत नसल्यामुळे, डॉक्टरामार्फत हे संशोधन लोकांपर्यत पोचत नाही आणि लोक आहाराच्या फायद्यापासून वंचित राहतात.

कधी सोय म्हणून, कधी धावपळीत वापरायला सुटसुटीत म्हणून, कधी टीव्ही. समोर बसून, सोईस्कर म्हणून, कधी सणा-समारंभात वाढदिवस म्हणून, विविध रंगीबेरंगी स्वादाचा चवीच्या आकर्षणातून आपण समारंभ साजरा करतो. नंतर हात, पाय, जीभ, डोळा, गाल, आतडे, कातडे कापून किमोथेरपीने केस झडून कुरूप झालो समजून लोकांच्या आडोशाला राहतो. आधीच त्या पदार्थाना आडोशाला ठेवला असतात तर... पण आज चंगळवादी संस्कृतीनं देशोदेशीचे खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणार्‍या उपहारगृहांची संख्याही दिवसें दिवस वाढत आहे. धाबा आहे, गाडा आहे, नाडा आहे, रगाडा आहे.

प्रश्‍न आहे आपलं आरोग्य आणि जिभेचं सुख यांचा मेळ घालण्याचा. आरोग्य टिकवण्यासाठी खायचं म्हणजे काहीतरी बेचव अन्न पोटात ढकलायचं. हा एक मोठाच गैरसमज आहे. अशा आहारातही रूची विचित्र्य विविधता, भरपूर असू शकते. आहारात बदल करताच आपल्या शरीरात आरोग्यकारक बदल होऊ शकतात.

मुळात कर्करोग म्हणजे शरीरातील एकेका पेशींची अनिर्बध व अमर्याद वाढ असते. कर्करोग म्हणजे टयुमर किंवा गाठ हेही पूर्णसत्य नाही. कर्करोग ही संथ गतीने आणि टप्प्याटप्प्याने होणारी शरीरातील शस्त्रक्रिया असते. टयुमर हा त्या प्रक्रियेचा परिपाक असतो. संशोधनात हेही स्पष्ट होत आहे की प्रक्रियेतल्या वेगवेगळया टप्प्यांवर अन्न पदार्थातील वेगवेगळे घटक कर्करोगाच्या प्रादुर्भावाला प्रभावीपणे अटकाव करू शकतात. कसे करू शकतात म्हणाल तर...?

आज रूढ वैद्यकाचं लक्ष कर्करोगाची गाठ व त्याची व्याप्ती हेच विशेष करून असते. ज्यामुळे कर्करोगाचा पुन्हा पुन्हा उद्रेक होतो. शिवाय उपचाराचे दुष्परिणामही खूपच गंभीर असतात. आहाराची याला योग्य जोड दिल्यास या प्रक्रियेलाही जोड घालता येईल.

1. पेशीच्या केंद्रातील डि.एन.ए. मध्ये होणारे कर्करोगकारक बदल, युक्त अन्नाने आम्ही रोखू शकतो.

2. केंद्रातील अँकोजिन (रपलेसशरप) याच्या कार्यावर नियंत्रण ठेवून सर्वसाधारण पेशींचे रूपांतर कर्करोगात होण्यामध्ये आपण रोखू शकतो.

3. इस्टोजिन हे स्त्री हारमोन्स आणि टेस्टीस्टिरीअ‍ॅन हे पुरूष हारमोन्स शरीरात संतुलित राखून कर्करोगकारक बदल टाळू शकू.

4. कर्करोगाच्या प्रादुर्भावात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या फ्री रेडकल्स या अस्थिर पदार्थांचा नाश करून त्यामुळे होणारे नुकसान टाळू शकतो व झालेले नुकसान भरून काढू शकतो.

5. गाठ येण्याआधी ती येऊच नये म्हणून पूर्व तयारी या अन्नाकडूनच शक्य आहे.

6. साधारण पेशी कर्करोगात रूपांतर होण्याची प्रक्रिया ही एक परव्हसबल (झीर्शींशीीरलश्रश) प्रक्रिया असते.

युक्त आहार विहारांनी त्यात बदल होतोच. यावर आपला विश्‍वासच बसत नाही व कर्करोगाचं निदान म्हणजे मृत्यूचं आमंत्रण असचं सर्वसाधारण समजलं जातं.

आहारातील योग्य ते बदल शरीरभर पसरलेला कर्करोग नाहीसा करायला हे तंत्र कसे उपयोगी पडते आपल्या लक्षात आले असेल. शरीरातील अंगभूत कर्करोग प्रतिबंधक यंत्रणा कशी कार्यक्षम होऊ शकते हे लक्षात आले असेल.

रोग प्रतिकार शक्तीचं याने वाढते. उपस्थिच्या वरच्या भागाच्या मागे असलेली थायमस नावाची छोटी ग्रंथी रोगप्रतिकार यंत्रणेचा एक मोठा भाग आहे. याच ग्रंथीमध्ये रक्तातील पांढर्‍या पेशींना आपलं व परकं याचा भेद जाणण्याची अर्थात शत्रू व मित्र यांना ओळखण्याचं प्रशिक्षण दिले जाते. अशा प्रशिक्षित पेशींना टी पेशी म्हणतात. यांची रक्त प्रवाहात फिरती गस्त असते. शरीरात वेळोवेळी तयार होणार्‍या कर्करोगी पेशींना ओळखून नाहीसं करायचं बेमालूम काम सतत त्याच करत असतात. या योजनेलाच कर्करोग पर्यवेक्षा योजना म्हणतात. योग्य आहाराच्या साहय्यानेच ही योजना कार्यक्षम राहते.

गंभीर दुष्परिणाम करण्याची शक्यता असलेल्या नव नव्या औषधांचा वापर जर कर्करोगाच्या उपचारात केला, तर मग आहाराची विशिष्ट योजना सुद्धा उपचाराचा महत्त्वाचा भाग का होऊ शकणार नाही? ज्यामुळे कर्करोगाला खीळ बसू शकेल व दुसरीकडे उपचारांचे दुष्परिणाम सौम्य होऊ शकतील.

रोग्याच्या स्वार्थ आणि संशयीवृत्ती हट्टी आणि महत्त्वाकांक्षी स्वभाव, खाण्यापिण्यातली मनमानी, व्यायामाचा अभाव, चंगळवाद, खाल्लं तेवढं आल्लं हा स्वभाव कर्करोगाच्या योगदानाला पुरेसा असतो.

यातल्या अनेक गोष्टीच, आधुनिकतेच्या अनुषंगानं माणसाच्या जीवनाचा स्थायी स्वभावच बनत चाललेल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या विकासानं स्नायुची कामे यंत्र करू लागल्यामुळे जीवनक्रम बैठा झाला आहे. इंद्रियजन्य सुख उपलब्ध करून देणार्‍या वस्तूंनी बाजारपेठ भरून गेली आहे. चंगळवादानं समाजावर पक्की पकड घेतली आहे.

ज्याने ज्याच्या हव्यासानेच स्पर्धा, इर्षा, भ्रष्टाचार, व्याभिचार या चार पराकोटीच्या स्वार्थी प्रवत्तीनेच गुन्हेगारी, व्यसनासक्ती, हिंसाचार याला पोषक ठरतो आहे. हेच अन्नपदार्थ दुसरीकडे करूणा, प्रेम, क्षमा, संयम, संवेदनशीलता चांगल्या मूल्यांबद्दल आदर यापासून माणसाला दूर नेतो आहे.

कपडे, सौंदर्य प्रसाधनं, गृहशोभा आणि इतर बाबतीत माणूस अधिकाधिक नावीन्याच्या आहारी जाऊ लागला आहे. एकूण जगणचं त्याचं निसर्गापासून दूर झालं. असे अनैसर्गिक खाणे-पिणे, वागणे. कृत्रिम खते, रासायनिक जंतुनाशके, कृत्रिम धाग्याचे पोशाख, रासायनिक सौंदर्य प्रसाधने, साबण तेल, अत्तर (परफ्युम) इत्यादी वस्तू कर्करोगाच्या प्रादुर्भावाला पोषक होतात.

‘वापरा आणि फेका’ या संस्कृतीमुळे उधळपट्टी अपरिहार्य ठरते. उघडा निसर्ग ओरबडला जात आहे. पर्यावरण प्रदूषित होत आहे.

तंदुरूस्त रहायचं असेल तर, कृत्रिमतेकडून नैसर्गिकतेकडे जायलाचं हवं! निसर्गाशी सहकार्य करणं, निसर्ग नियमांचा आदर करणं सुद्धा धार्मिक होणचं आहे. अखंड धान्य, ज्याच्या मोडी त्याच्या घुगर्‍या, अखंड फळे, अखंड भाज्या, जात्याचं चाकूच्या पोत्याचं काम दाताकडे देऊन, अखंड आरोग्य तुम्ही कोणत्याही क्षणी आणू शकता. तुमचं आतलं अखंड निसर्ग, नैसर्गिक खायला, नैसर्गिक व्हायला केव्हाही तयार आहे.

कर्करोग म्हणजे जणू काही आपला कट्टर शत्रू. अशी एक सर्वसाधारण समजूत आहे. त्यामुळे तो झाला की काढा कापून किंवा रेडिएशन देऊन मग जाळा तरी किंवा किमोथेरपीत देऊन मारा तरी. पण होतं काय, त्याचा नाश करायला जाऊन आपण आपलाच क्रमाने नाश करून टाकतो. झाडं डेरेदार होण्यासाठी माळी झाडाच्या फांद्यांना छाटणी करतो. अगदी तसचं रोगाची चौखूर वाढ होण्यासाठीच हे सर्व अनैसर्गिक प्रयोग होतात.

औरंगजेबाच्या ताब्यातील संभाजीचे डोळे काढताना जे झाले, तेच काही फरकाने चूक-भुल, फूल देऊन जे करवले जाते. नैसर्गिक सुंदर बाळ पण असुंदर होऊन वास मारू लागते. चुकीचं खाणं हे वाईट आहेचं, पण आवश्यकतेपेक्षा जादा खाणं हे महावाईट आहे.

जास्त उष्मांकाचे, मेदाचे पॅकेट शरीर आपणाकडे साठवतं, कारण आजच्या बैठया जीवनशैलीमुळे कर्करोगाची थैली नजीक होते. गुणधर्म विरहीत उष्मांक शरीराला पुरवणार्‍या यादीमध्ये साखर एक नंबरला आहे. मैदा, पांढरा तांदूळ, दूध व मीठ हे देखील येतात. म्हणूनच निसर्गोपचार याला, ‘व्हाईट स्लो पॉईझन’ म्हणतो. आजकाल याचे वाढते प्रमाणच शरीर कमजोर बनवीत आहे. याने शरीर प्रदुषित होत आहे.

उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, बद्धकोष्ठ किंवा एकाएकी जुलाब, दमा, स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारी, अंगावरून पांढर जाणं, पुरूषांना प्रोस्टेटचा त्रास या सूचना, या याच अन्न-    पदार्थाच्या आहेत.

सध्या कर्करोग तरी असंतुलन निर्माण झाल्याचा परिपाक आहे   व हेच संतुलन आम्ही आमच्या उपचार माध्यमांनी औषधाशिवाय साधत असतो.

मोठमोठया शास्त्रशुद्ध संशोधन करणार्‍या जगमान्य संस्थेतील शास्त्रज्ञांनासुद्धा चक्रावून सोडणर्‍या कर्करोगाच्या समस्येचं इतकं सोपं उत्तर कसं असू शकतं? असं तुम्हालाच नाही कोणालाही वाटतं.

कर्करोगावर मात करण्यासाठी आज जगभर कोटयावधी डॉलर्स खर्च केले जात आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे विकसित होत आहेत. आणि आम्ही लंघन, मर्दन, मूत्र प्राशन, एनिमा, युक्त आहार, युक्त विहार अर्थात युक्त श्रम, युक्त विश्राम केवळ यानेच जर लढाई आम्ही जिंकत असू तर, सशाची व कासवाचीच ही शर्यत नव्हे काय?

आमचा प्रत्येक कर्करोगी हा केवळ रोगमुक्तच होतो असं नाही, तर तो चिकित्सक बनतो आहे व त्याचा त्याच्या परिसरात प्रभावही पडतो आहे. कारण मरता मरता वाचला. हे त्याचे सर्टिफिकेट होय. बर्‍या झालेल्या रोग्याला खूपच वाटत असतं की, हा शॉर्टकट मार्ग आधीच माहीत झाला असता तर, इतका रोग वाढण्याआधीच आलो असतो. किंबहुना यापूर्वी मयत झालेले माझे आप्त इष्ट मित्र, तेही हा उपचार घेऊन वाचले असते. अब पचताये क्या होगा, जब चिडिया चूँग गई खेत.

बरे झालेले रोगी या उपचाराच्या प्रचारांची धुरा सांभाळीत असतात. व्याख्याने देत असतात. पुस्तके लिहित असतात. ‘कॅन्सर माझा सांगाती’ डॉ. अरविंद बावडेकर, ‘आहारातून कर्करोगावर विजय’ डॉ. विजया साठे, ‘द जॉय ऑफ कॅन्सर’ हे अनुप कुमार इत्यादी. प्रत्येक कॅन्सरग्रस्तांनी ही पुस्तके वाचायलाच हवीत. ज्यातून बरे होण्याची प्रेरणा मिळते व हिम्मत येते.

आज जगात अमीर लोक अमेरिकेतच व रोग्यांची मोठी संख्याही अमेरिकेतच. दरवर्षी आठ लाख लोक अमेरिकेत हृदयविकारानी        मरत आहेत व कर्करोगाची बाधा निम्म्याहून अधिक लोकांना आज जाणवतचं आहे.

माणसाची मुळात पचनसंस्थाच मांसाहारापेक्षा, शाकाहार पचवायला उत्क्रांत झाली आहे. मांसाहारी प्राण्यांची सर्वांगीण रचना, बाहेर, आत, बालपणाची सुद्धा आमूलाग्र वेगळीच आहे.

सर्व मांसाहारी प्राण्यांच्या पिल्ल्यांचे जन्मताच डोळे बंद असतात. जिभेने उडवून पाणी पितात. दात, सुळे हुकसारखे असतात, जबडा दाढेच्या शेवटपर्यत उघडा होतो. आतडे कण्याच्या सहापट असते, म्हणजे शाकाहारापेक्षा निम्याने कमी असते. पायाची-हाताची नखे अणकुचीदार असतात. अशी कोणतीच ठेवण माणसासाठी नाही. तरीसुद्धा तो मांसाहार करतो, म्हणजे निसर्गाच्या नियमाचा भंग करतो. कायदाच हातात घेतो म्हणा की! निसर्गाचं शासनही कायदा हातात घेणार्‍याचे मग गय करीत नाही.

निसर्गाकडून देहाची बंद होऊन आलेली पेटी, या ना त्या कारणांनी सारखी हस्तक्षेप करून उघडी करणे किंवा काहीतरी हत्यारे सारखी कोंबत राहणे, स्टिल, प्लॅस्टिक इत्यादी तत्सम् अवयवे टाकणे, म्हणजे हा निसर्ग नियमाचा अनादरच आहे. याचे परिणाम त्या रूग्णावर आणि त्यांच्या वारसावर झाल्याशिवाय राहातच नाहीत.

1971 मध्ये त्या वेळेचे अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड विल्सन यानी कॅन्सर अ‍ॅक्ट केला. कर्करोगविरूद्ध लढाईस आरंभ केला. उद्देश होता 1976 पर्यंत कॅन्सरचे समूळ उच्चाटन करावे.

1976 हे वर्ष म्हणजे प्रजासत्ताकाच्या 200 व्या वाढदिवशी कॅन्सरमुक्त अमेरिका पाहावी पण... झालं काय? समारंभ उत्सवात ही गोष्ट झालीच नाही. दुर्लक्षित राहिली. परिणामी करोडो डॉक्टर्स कर्करोगावर उपचार शोधण्यासाठी खर्च करीतच राहिले. पण फलनिष्पत्ती म्हणावी तशी नाहीच.

शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, कोबाल्ट ट्रिटमेंट यांच्या साहाय्यानं कर्करोगाचं आयुष्य काही प्रमाणात लांबवता आलं तरी, अनुभव घेतलेले लोक सांगतात यापेक्षा मेलेले बरे! असे म्हणत ते जगण्याचे वर्ष जगत असतात.

खरं तर 1950 नंतर कर्करोगाच्या उपचारात होत असलेल्या रूग्णांच्या अवस्थेत खास काहीच फरक अजूनही पडलेला नाही. अमेरिकेत कोणत्याही वर्षात दहा लाखावर लोक कर्करोगावर उपचार घेत असतात, दरवर्षी त्यात 7 लाखाची भर पडत असते. दरवर्षी 20 मिलियन डॉलर्स कर्करोगाच्या उपचारात खर्च होत असतात. असा हा रूग्णाच्या आणि शासनाच्या दृष्टीने अत्यंत खर्चिक, दुर्धर, वेदनामय सर्वांनाच हतबल करून टाकणारा विकार झाला.

शरीर, मोठया दुखण्याच्या आधी बरेच काही सांगत असते. प्रत्यक्ष हृदयविकाराचा झटका येण्याआधी सुद्धा धोक्याच्या सूचना शरीर देत असतं.

उदा. पटकन थकवा येणं, उच्च रक्तदाब, एंजायना, हृदयाची स्पंदनं वाढणं, घाम येणं, धाप लागणं या गोष्टी संकेत स्पष्ट करतच असतात. पण माणसाचं अज्ञान व त्याचा आळस त्याला भोवत असतो.

मोठया मनाचा डॉक्टर तो असतो, जो आपले डोळे, कान सदैव उघडे ठेवतो. आपल्या मनाची कवाडही खुली ठेवतो, पुर्वग्रह दूषित न राहता आपल्या पुस्तकात न दिलेल्या कोणत्याही परिस्थितीशी सामना द्यायला, विचार करायला, काहीही समजून घ्यायला सदैव तयार असतो. असे डॉक्टरच आज दुर्मीळ झालेले आहेत. असे डॉक्टर देव असतात, देव म्हणजे, देतो तोच देव! जीव लावतो प्रसंगी जीव देतो! पण घेत नाही, तोच देव!

कर्करोगग्रस्त व्यक्तीने त्या कर्करोग पेशींशी गप्पा मारल्या, त्यांची क्षमा मागितली, आपल्या झाल्या चुका कबुल केल्या. त्यांना आपल्याशी मैत्रीनं वागण्याचं अभिवादन दिलं. तुझ्याशी भांडणार नाही बाबा. म्हणून ग्वाही दिली.

तुम्हीही निसर्ग असता, रोगही निसर्गच असतो. पण निसर्ग शासन कोर्टाचा तो बेलीफ असतो. तो वॉरंट घेऊन आलेला नोकरदार असतो. त्याचबरोबर रिमांड घेणारे पोलीस फौजही असते. झाल्या चुकीची कबुली व नव्या चुका न करण्याची हमी. इतकी गोष्ट फाशी माफ व्हायला, माफीचा साक्षीदार व्हायला पुरेशी होते. नेमके तेच काम आम्ही आमच्या उपचारामार्फत करीत असतो. चिकित्सक वकील झालेला असतो. त्याच्या प्रार्थना जबाबदारीची प्रात्यक्षिके चाललेली असतात.         त्या प्रार्थनेला जरी घोटत राहिलात तरी, शिक्षा कमी होेते. केस निकालात निघू शकते.

काही प्रसंगांचे, काही घटनांचे परिणाम इतक्या खोलवर जाऊन होतात की त्याचा अविष्कार व्याधीच्या रूपाने कितीतरी काळाने पुढे बाहेर येतो. काळ देखील डूख धरतो की काय? कळत नाही. काळ म्हणजे आपली गतकर्मे एकत्र होऊनच फळे घेऊन आलेली असतात. देर हैं, मगर अंधेर नहीं!

एकमेकात गुंतलेल्या भूतकाळातील घटनांमुळे कर्करोग शरीरात कुठेतरी खोलवर जन्म घेतो. काही काळाने त्याचे अस्तित्व नक्की झाल्यावर तरी सकारात्मक दृष्टिकोनाचा अवलंब करा. स्वतःला अव्हेरू नका, स्वतःचा स्वीकार करा. नव्यानं स्वतःवर प्रेम करा. बरे होण्याच्या मार्गावरील या पहिल्या पायर्‍या आहेत. कर्करोगाच्या लढाईतील हार-जीत यावरच अवलंबून असते.

माझ्या कर्करोगाला फक्त मीच जबाबदार आहे. मीच तो बरा करू शकतो. हेच सत्य रूग्णाने स्वीकारायला हवे. काहीही करून ही नियती मला बदलायची आहे. कर्करोगालाच माझ्या फक्त नसातून, रक्तातून हद्दपार करायचे नाही, तर माझ्या मुलाबाळांच्या त्यांच्या पुढील पिढयांच्या नियतीतूनही त्याला कायमचे निपटून टाकायचे आहे.

पुर्वी किल्ल्याच्या भोवती तटबंदी असे. खंदकही असे, शत्रूपक्षाच्या घोडयांना ज्यामुळे प्रवेश करणे अशक्यच होई.

माझ्या वडिलांना, भावाला, चुलत्यांना हार्ट अ‍ॅटॅक आला. एकसष्टी त्यांची होऊ शकली नाही. आज त्यांना आम्ही फोटोतच पाहातो. मी पण अकाली फोटोत जाऊन थांबू नये म्हणून मला काळजी घ्यायला नको का? माझ्या भोवती तटबंदी खंदक नको का?

ज्या दगडी चौकटीला थडकून बापजाद्यांची खोक फुटली, रक्त बंबाळ झालं. त्याच चौकटीला मी काय म्हणून थडकायचे? मी का वाकून जाऊ नये? मी का कडेने चालू नये? पुढच्यास ठेच मागचा शहाणा फक्त म्हणायचं कशाला? तुम्ही आम्ही सारेच शहाणे होऊ या की.

विज्ञानाच्या चौकटीला आज समाजातली मोठी व्यवस्था थडकित आहे. रक्त बंबाळ होेते आहे आणि प्राचीन मार्ग भुयाराचा का असेना शोधला आहे. पुनर्वसनासाठी भुयार तर भुयार, काय बिघडलं? नाही तरी आईच्या पोटात अंधार कोठडीत आम्ही होतोच की.

आईच्याच मर्जीला प्राधान्य देऊन तुम्ही आपली मर्जी शून्य ठेवली होती. तस्सचं तुम्ही सर्वजण आता सुद्धा आमच्या मर्जीला प्राधान्य देऊन तुमची शून्य ठेवून पुन्हा नव्याने नऊ महिने, नऊ दिवस काढू या व नव्याने आहे त्याच घरात, आहे त्याच मुलाबाळात, आहे त्याच देशात पुन्हा एकदा जन्मू या.

मी माझा, परिवार माझा, समाज माझा, देश माझा, निसर्ग माझा, स्वर्ग माझा. अनुभव माझा, नव्यानं घेऊ या. तुम्हीच या कर्कयुद्धाचे सर सेनापती आहात. शरीर तुमचे, आरोग्य तुमचे, पैसा तुमचा, बाकी सर्व मदत भाडयाची आहे लक्षात ठेवा.

कर्करोग माणसामाणसातील फरक ओळखत असेल का? काही लोक बरे होतात अन् काही वाचतच नाहीत, तर याचा संबंध मानसिक ताणाशी आहे. आत्मशांती हे कर्करोगाच्या पेशींविरूद्ध उत्तम शस्त्र आहे. एकदा का रोगाचा स्वीकार केला, म्हणजेच प्राप्त परिस्थितीचा सहज स्वीकार. त्याबद्दल जागरूक राहिले की बरे व्हायच्या मार्गावर तुम्ही चालू लागता.

घरचे बरेच लोक रोग्याला कर्करोग झाला आहे हे सांगतच नाहीत. कारण तो धास्तावेल, पण माझा अनुभव असा, ज्या खोलीत विषारी साप गेला आहे. ज्यांनी पाहिला आहे. त्यांनी खोलीत प्रवेश करणार्‍याला सांगायचे नाही म्हणजे काय?

अहो, तो जागरूक होईल, सतकिर्तीने पाऊल टाकेल आणि संभाव्य सापापासून वाचेल. लोकांना खतरनाक आजाराची कल्पना न दिल्यामुळे रूग्णांचा हवा तितका सहयोग मिळत नाही. पथ्यात व उपचारात चालढकल होते व रोगी पंथाला लागतो. त्यापेक्षा त्याला प्राप्त परिस्थिती सांगून, शिकारीची जय्यत तयारी ठेवून त्याच्याबरोबर आपली मोठी टिम उभी करून बळ दिलं तर, तो बाजी मारू शकतो. असा माझा अनुभव आहे. रूग्णांकडून जेव्हा असहकार असतो तेव्हा मी वस्तुस्थिती सांगून टाकतो. बिचारा रूग्ण हे मला आधी का नाही सांगितलं. मी काळजी घेतली नसती का? मग मी म्हणतो, अजूनी घे, वेळ गेली नाही.

कर्करोगाचे निदान माणसाला समूळ हादरवून टाकते ही गोष्ट खरी आहे. पण बरे झालेले रूग्ण भेटवले, फोनशी संपर्क दिला की त्यांना उभारी येते. त्यांना हिम्मत येेते. त्यांच्याकडे मुळात वेळ कमी असतो, प्रत्येक दिवस उपचारात कसा घेता येईल? ही कसोटी असते.

उपचाराची पद्धती निवडून ती चालू करून, त्यात तनाने मनाने सहभागी होत पुढे जायचे असते. मग ठरवलेल्यात संभ्रम आणायचा नाही. अगदीच तशी वेळ आली तरी, बदलही करावे लागतील. आणि बरे होत आहोत की नाही? हे शरीराला चांगले कळतही असते. डॉक्टरांना कदाचित नीठपणे समजणारी नाही. शरीर, मन, कर्करोग सगळे काही तुमचे आहे, ही लढाईही तुमची आहे. म्हणून ती कशी जिंकायची याची व्यूहरचनाही तुमचीच हवी.

तुम्ही आणि मी एक होऊन परस्परांना मदत केली, तर आशेचा सूर्य रोज उगवेल. नाहीच केली... तर तो दुःख सागरात बुडून जाईल.

निसर्ग इतका बलाढय आहे त्याचे नियम ठरलेले आहेत. वर्षानुवर्षे त्या नियमाच्या चौकटीत जीव वाढत असतो. निसर्ग नियमांच्या अचुकतेवर हे अवाढव्य विश्‍व सुरळीतपणे चालू आहे. वर्षानुवर्षे शतकानुशतके त्यात बदल घडत नाही. नियम जसे मला आहेत तसे ते नियम यमालाही आहेत. यम, यम झाला म्हणून कोणाच्याही गळपट्टीला धरून तो उचलू शकत नाही. नियमाचे उल्लंघन वारंवार उल्लंघून झालेवरच, कर्करोग आला आहे, याला मी निमित्त आहे. माझी परंपरा निमित्त आहे.

कर्करोगाचे पेशी झाले तरी त्यांना नियम आहेत. नियमांच्या अचूकतेतच तेही वाढतात, आम्ही नियम न पाळण्याचे धैर्य दाखवले. त्यात आम्ही यशस्वी झालो म्हणूनच ते आपली संख्या वाढवत नेतात, कोर्टात कोर्ट म्हणतो ना, पुन्हा बोलाल तर, दंड शिक्षा वाढू शकते.

इथेही आम्ही बळजबरी केली, कापाकापी केली, छेडा छेडी केली तर आपली संख्या ते वाढवत नेतात. शरीरामध्ये उलथापालथ घडवतात. प्रक्षुब्ध होऊन वेडयावाकडया त्या वाढत एकेक अवयव काबीज करतात. त्यांच्याशी आपली तर गाठ आहे. त्यांच्यावर मला जर नियंत्रण मिळवायचं आहे. त्यांच्या नाठाळ वागण्याला मी कसे वठणीवर आणावे? माझ्या आयुष्याची सूत्रे त्यांच्या हातून कशी हिसकावून घ्यावीत? मला या युद्धात जिंकायचे असेल तर... मला गनिमी कावा वापरायला हवा म्हणजे काय करायचे? आपणच त्याच्यावर हल्ला करून, मधमाश्यांचे पोळे उठवायचे नाही. त्याच्यासारखेच वेडे वाकडे लढून वागून त्याला जिंकणे शक्य नाही. कारण डावपेचात त्या पेशी आपणापेक्षा तरबेज आहेत. त्यांना ठाऊक नाही. अशाच पद्धतीने चढाई करायला हवी.

त्याला डिंवचायचं नाही, का तुकडा काढायचा नाही, की खडा मारून जागं करायचं नाही. देहात त्याला पोहोचणारी रसद बंद करायची, बाहेरून आत नवीन जाऊ नये. याची काळजी घ्यायची व पूर्वी आता अज्ञाताकडून संचित झालेली रसद एकसारखी बाहेर काढीत राहायचं बस्सं! आपोआप कॅन्सरच्या नाडया आवळायला लागतात. कितीही खतरनाक अतिरेकी देवळात लपलेला. कितीही खतरनाक उंदीर गणपतीच्या मागे दडला, तरी दडू दे. त्याला आता बुजवू नका. आता त्याचे फक्त रेशनिंग बंद करा. आपोआप एक दिवस उताणा पडेल. कारण त्याच्या पोटातलं मोजकं रसद त्याला किती वेळ पुरवणार आहे? किती दिवस तो पोसणार आहे. हाच तो गनिमीकावा आम्ही आमच्या उपचारात चालवतो.

कितीही जीवनरस कर्करोगाने शोषून घेतलेला असला तरी, आणि एक सारखे जर ‘जीवनजल’ पीत गेलो तर हे असे होणार, जसे दुर्योधन दुर्दैवाने द्रौपदीची साडी सोडत होता. पण साडी काही संपत नव्हती. कारण इकडे कृष्ण साडीला साडी जोडीत होता. तसेच आणि ‘जीवनजल’      पीत गेलो की झाले! जीवाला जीव जोडत जाईल. हे ‘जीवनजला’ चे  वैशिष्टय आहे.

तुम्हाला दुर्गा देवीची कथा माहीत असेलच. विश्‍वातल्या दानवांना अर्थात राक्षसांना संपवायचं तिनं ठरवलं. हातात धारदार हत्यार घेऊन एकेक राक्षसाच्या खांद्यावर, गळयावर घाव टाकू लागली. तसं रक्त सांडू लागलं. रक्त जमिनीला लागताच पुन्हा राक्षस उभा व्हायचा. देवीची मेहनत वाया चालली. मग तिने आपली लांब लचक जीभ बाहेर काढली. राक्षसाला घाव मारता क्षणी रक्त जमिनीवर पडण्याच्या आधी जिभेवर ती खेचू लागली. एक थेंब रक्त पडेना झाला आणि राक्षसांचा खच पडला, राक्षस संपले.

अगदी अस्सच आपणही उपलब्ध ‘जीवनजल’ मुखाने खेचत राहायचे. कॅन्सरच्या पेशीखेरीज संपूर्ण देहाची देखभाल ‘जीवनजल’ च घेईल. याची मी हमी देतो. प्रयत्न करा. निसर्गानं आपल्याला अशी कुंजी दिली आहे. संकटकाळचा मार्ग, छोटा का असेना पण दिला आहे. मांजर विशेष प्रसंगाला छोटयाशा जागेतूनही लांबडे होऊन अंग चोरून निघून जाते. आपणही असं निघू शकतो. एस.टी. बस मध्ये बसतानाच संकट काळचा मार्ग समजून न घेतल्यामुळे हा गोंधळ झाला आहे.

खरचं ‘जीवनजल’ म्हणजे काय? तुम्हाला माहीत आहे काय?

‘जीवनजल’ म्हणजे जगावयाचे पाणी, जिवंत पाणी. कल्याणकारी पाणी, ज्याला संस्कृत मध्ये म्हटलं गेलं शिवाम्बू. शिव म्हणजे पवित्र व अम्बू म्हणजे पाणी. हे असलं अमृत पाणी आणणार तरी कोठून? तुमच्या जांघेजवळून एका हाताच्या अंतरावर ते वाहात आहे. देह सावरायला, लिंग पाणी सोडत आहे. महादेव तुम्हीच, देहही तुमचाच. लिंगातून येणारं पाणी हेच औषध. घ्या-प्या व लागलेली आग विझवा. रोग देहाचा, औषधही देहाचेच, त्याचीच बोटं त्याच्याच डोळयात कोंबायची. आपलेच ओठ आणि आपलेच दात विचार कशाला करायचा?

उंदीर माझ्या घरात मरून पडलाय, सडलाय, कुजलाय, वास मारू लागलाय. नगरपालिकेच्या माणसास आत येऊ द्या ना. उगीचच तू कोण? कुठला? आडनाव काय? विचारित बसू नका. जाती-पातीचा तपास लावत उगीच मागं काढू नका? त्याला आत येऊ द्या. अलगद शेपटीला तो पकडेल आणि तुमचं अरिष्ट अर्थात दुर्गंध घेऊन जाईल. त्याला पगार द्यायचा नाही, चहा द्यायचा नाही, की त्याला घोंगडंही टाकायचं नाही. आलाच दिवाळीला तर काही खुशी त्याला द्या. बिचारा त्यानं तुमची घाण उपसली आहे. उपसत पण आहे आणि उपसणार     पण आहे. अगदी असाच निसर्ग पालिकेचा माणूस, ‘शिवाम्बूच्या’ नावाने औषधाच्या रूपात प्रवेश होऊ द्या. तुमच्या उंदरापेक्षा तो नक्कीच वाईट नाही.

मित्रहो! कर्करोग हा तुम्हीच ओढवून घेतलेला रोग आहे. तेंव्हा आणखीन तणावाखाली जाऊ नका. पेशी वेडयावाकडया वागायला उदीप्त होतील. वेडेवाकडे खाणे अर्थात तंबाखू, दारू, चहा, मटण, तेल, मीठ, साखर, मैदा, दूध, सफेद तांदूळ यांना सोडून द्या. निसर्ग माउलीच्या काखेत जा. माउलीच्या गालाचे चावे घेणे बंद करा. तिचे जरूर स्तनपान करा.

आपली आई म्हणजे धरणी माता.

धरणी माता म्हणजेच काळी आई.

झाडे-झुडपे म्हणजेच तिचेे स्तन.

रस, ज्यूस म्हणजे तिचेे दूध.

हिरवे अन्न फिरवे रक्त

धडे धडाचे माउलीकडून

गिरवू चला

धडे आपले,

धड राहावे म्हणूनच,

कदम कदम चालू चला

दिवस दहा मांडीवर

तिच्या काढू चला-

आले आरिष्ट आपुले टाळू चला.

कॅन्सरची बोलणी करू तहाची, वेडयावाकडया वागण्याला मनावर न घेता त्यांच्याशी तडजोडीने, शांतीपूर्ण संवाद साधू या. अगदी चौथ्या अवस्थेतील कर्करोगी बरे झाल्याचेही चमत्कार झाले आहेत. बरे होणे याची सुरूवात आतूनच होते.

माणुस मृत्यू विरूद्ध आपली सर्व शक्ती एकवटतो आणि त्याला परतवून लावतो. हे कर्करोगाचे निदान झाल्यापासून हा विश्‍वास जर बाळगला तर, बरे होण्यासाठी सर्व बळ आणि स्वतःच उपचाराचा एक भाग बनतो.

कर्करोगच नव्हे, तर कोणताही रोग लहानसा बिघाडही आपल्या शरीराचे व मनाचे संतुलन बिघडवतो. जो राज्य जिंकतो तो महान आहेच पण स्वतःला जिंकतो, तो सर्व शक्तीमान आहे. राग व निराशा या सर्व नकारात्मक भावना कर्करोगाच्या वाढीला पूरक ठरतात.

एका क्षणापुरतेही रोगाला स्वार होऊ देऊ नका. वेदनेमुळे येणार्‍या निराशेला आपल्याजवळ फिरकू देऊ नका. आपल्यापैकी प्रत्येक जण, एकच पंख असलेले देवदुत आहे. एकमेकांच्या हाती हात गुंफून, आधार दिला घेतला. तरच आपण आकाशात अवकाशात विहार करू शकतो.

कुटुंबातील एका सदस्याला झालेला कर्करोग सर्वांच्या आयुष्याला बदलवतो. कर्करोग वेडयावाकडया मार्गाने, वेडयावाकडया लोकांनाच शोधतो.

या उसळलेल्या सागरामध्ये आपण नौका उतरवली आहे. वारा वाहिल तशीच ती हाकारू या किंवा आपलं असलेले साहस तरी विसरून जाऊ या!

डोळयावर एक बोट आडवे धराल तर सूर्य झाकला जातो. बोटाचे फक्त एक पेरही चंद्र झाकू शकतो. देवही असाच झाकला आहे. एका लहानशा बिंदूमागे विश्‍व लपवता येते. एका काडीने सूर्याला ग्रहण लाऊ शकता. ओठ शिवून आपल्या अंतरातला सागर न्याहाळा. प्रत्येक रोगासाठी योग्य असा सागर देवाने तिथे निर्मलेला दिसेल.

भविष्यकाळात डॉक्टर औषध देणार नाहीत. रोग्यांना त्यांच्या देहाची काळजी घ्यायला. ते मदत करतील. अयोग्य अन्न हेच रोगाचे कारण असेल. योग्य अन्न रोगाला प्रतिबंध करते. याकडे ते रोग्याचे लक्ष वेधतील. आजचे आहार तज्ज्ञ उद्याचे डॉक्टर असतील. थोडे थोडे अन्न तासातासाला खा म्हणतील... आहार शाकाहारीच ठेवा सांगतील, त्यात भरपूर प्रथिनं असू देत म्हणतील. नेहमीचा नाश्ता आणि दोन वेळचे जेवण हा ढाचा रोग्याला बदलवायलाच लावतील. शरीरात रोग वस्तीला आला की, अन्नाच्या सवयी बदलणे अपरिहार्य आहे.

स्वयंपाक करायच्या पद्धतीही बदलाव्या लागतील. आणि जी निरोगी जीवनशैली म्हणतो ती, फार वेगळी अशी कठीण नाही. मी गेली वीस वर्षे स्वतः याच मार्गाचा अवलंब करतो आहे. मला कुठलाच रोग नाही, पण मला रोगी व्हायचे नाही. ज्या अन्न पदार्थांनी आडवा माणूस उभा झाला, तोच अन्न पदार्थ खाऊन मी उभा माणूस उभाच राहू इच्छितो ही शुभेच्छाच नाही का?

रक्तामधील विषारी द्रव्ये (टॉक्सिन्स) काढून टाकायचे कार्य यकृत करते. त्याचे काम आम्ही वेडेवाकडे खाऊन वाढवतो. तेव्हाच ते थकते. तेव्हाच विषारी द्रव्ये देहात संचित होऊ लागतात, तीच परत शोषली जातात, आपल्या घरात तीन कोपर्‍यातला कचरा, चौथ्या कोपर्‍यातच साठवला व तो टाकलाच नाही. तर वर्षाच्या शेवटी काय दिसेल?तिथे काय होईल? तेच देहाचे होत आहे.

पित्ताशय, स्वादुपिंड, मोठे आतडे तंदुरूस्त असेल तरच मल विसर्जन नीट होत असते. अंतर्गत अवयव मुळात चांगले असतील, तर आमच्या उपचाराचा परिणाम अधिक चांगला व्हायला लागतो. तरच निरोगी पेशी पोसल्या जातात. यामुळे कर्करोगी पेशी उपाशी राहतात. त्यामुळेच कर्करोगाची गाठ किंवा डाग आकसत जाते.

किमोथेरपी सारखेच आमच्या या उपचारानेही उलटया, मळमळ, जुलाब इत्यादी काही रूग्णांना सुरू होते. कधी कधी काहींना खाज येते. पण हे फार काळ टिकत नाही. कचरा संपताच ती आपोआप थांबते सुद्धा.

शरीराचा एखादा भाग कर्करोगग्रस्त होतो, तेव्हा तो वाढीचे नियम स्वतःच बनवतो. अन् त्याप्रमाणे अनिर्बंध वाढतो. तसे पाहिले तर, प्रत्येक कर्करोग हा एकमेव आहे. इतरांची पर्वा न करता, स्वतःचे नियम बनवून पेशी बेशिस्त वाढतात. त्यासाठी त्या, अन्य निरोगी पेशींचा जीवनरस वापरतात. सूक्ष्म आकाराची निरोगी पेशी, बिचारी संसर्ग नियमानुसार कार्य करीत असते. ज्या क्षणी कर्करोग बाधीत पेशीचा संसर्ग तिला होतो, तेव्हाच ती बेताल वागते-वाढते.

अशा तर्‍हेने कर्करोग अधिकाधिक पेशींना आपल्या कळपात/जाळ्यात ओढतो. शरीराच्या ज्या भागात तो वाढतो त्या अवयवांचे, ग्रंथीचे वा स्नायूंचे कार्य बिघडवतो. ज्याने शरीराची हानी सुरू होते. त्याच्या वाढीचा स्वतःचा असा वेग असतो. अवयवातील बिघाडामुळेच त्याचे अस्तित्व समजते. तो बरा व्हायचा झाला तरी, स्वतःच्या वेगाने तो बरा होतो. म्हणजेच तो माघार घेतो.

कर्करोग प्रतिकारशक्ती दुर्बल करणारा रोग आहे. गरीब कामकरी लोकांपेक्षा कर्करोग सुखवस्तु लोकांमध्ये जास्त आढळतो. कर्करोग, विषाणू, जीवाणू, जंतु संसर्ग यामुळे होत नाही. प्रचलित रूढ पॅथी माणसासाठी निर्माण केलेली, पण तेच सर्वात जहाल औषध कर्करोगावर वापरतात. प्रत्येक कर्करोग्यास आणि त्याच्या कुटुंबियास ही अत्यावश्यक माहिती मिळणे, शुश्रुषा सेवा मिळणे आवश्यक आहे. प्रत्येकाला आपले आयुष्य अर्थपूर्ण वेदनारहित जगायचा व सन्मानाने मरायचा हक्क आहे. कर्करोग्याच्या लवकर निदानासाठी मोफत शिबीर व्यवस्था व्हावी. फिरते कर्करोग निदान केंद्र आम्हा सामान्यामार्फत ती यावीत. तुम्ही तुमची कर्करोग चिकित्सा लांबणीवर टाकूच नका. कारण इतरांचे जीवन तुम्हावरच अवलंबून आहे.

कर्करोगाची सुरूवातीची लक्षणे क्षुल्लक असतात. कर्करोग आहे हे तुम्हाला पटणारही नाही. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की कर्करोग नेहमी दुसर्‍यांनाच होतो असं नाही.

• तुमची जखम चिघळत असेल, ती बरी होत नसेल.

• घशात नेहमी खवखवत असेल, आवाज घोगरा बसलेला असेल.

• अपचन किंवा गिळताना थोडातरी त्रास असेल.

• अंगावरील तीळ, चामखीळ किंवा एखादा डाग यामध्ये बदल झाला

   असेल.

• छातीवर व अन्य ठिकाणी वाढलेली गाठ दिसत असेल तर.

• मलमूत्राची सवय एकदम बदलल्यास.

• रक्तस्त्राव व इतर स्त्राव कारणाशिवाय पाझरत असेल तर.

• भूक लागतच नसेल तर.

यावरील लक्षणाची एकसुद्धा बाधा झालेल्या व्यक्तीने कॅन्सर आहे किंवा नाही हे कॅन्सर तज्ञांकडून तपासून घ्यावा.

कर्करोग बरा होण्यासाठी आम्हाकडे निश्‍चित मार्ग आहे. कोणीतरी यायला वेळ करतो व बरी होण्याची संधी गमवतो तेव्हा अतिशय दुःख होते.

• रूग्णाला त्याच्या प्रकृतीबद्दल बोलायला प्रवृत्त करा. आशावादी बोला,

   चेष्टामस्करी तिथे करू नका.

• रूग्णाला स्वावलंबी बनवण्यासाठी मदत करा. प्रेम आंधळ नको,

   डोळस करा.

• त्याच्या कुटुंबातील मूळ भूमिका तशीच ठेवा. त्याला विचारून जा-या.

   घरातील कारभारी वा ज्येष्ठ व्यक्ती असेल तर रोज सकाळी नमस्कार

   करून कामाला जा.

• रूग्णाची मनोवृत्ती लहरी असणारं, तेव्हा समजूतीने वागा. मानसिक

   लाड नको व दुर्लक्षही नको.

• पैशाची गरज ओळखून मदतीचा हात पुढे करा. झालेला खर्च किंवा

   पैशाची ओढाताण त्याच्या कानावर शक्यतो येऊ देऊ नका.

• कुटुंबातील अन्य व्यक्तीची विचारपूस करा. कारण त्या घरचे इतर

   सदस्य मनाने उध्वस्त् झालेले असतात.

• कर्करोग झाल्याचे कळताच भेटून हिंमत द्या.

• तिथे बसून रेंगाळू नका. झोप लागली असेल तर,

   तिथं कुजबूज करू नका.

• त्याच्या खोलीत वा समोर धूम्रपान-तंबाखू खाऊ नका.

• त्याच्या उपस्थित बरे झालेल्या लोकांचे तपशील द्या.

   निर्वतलेल्या लोकांची चर्चा नको.

• त्याचा अपमान न करता नेहमीच आत्मसन्मान करा. घरच्या किंवा

   संबंधितांच्या अपघाताच्या बातम्या अर्थात प्राणहानी व वित्तहानी  

   रूग्णास देऊ नका. नुकसान-तोटा, तूट-फूट कळवू नका.

• तो बरा होत असता पटकन अलिप्त होऊ नका.

• उपचार काळात मॉलिश, सूर्यस्नान, व्यायाम किंवा आहार विहार वेळेत

   द्या. देताना फळे, पाणी किंवा आहार प्रसन्न चेहर्‍याने व अदबीने द्या.

• त्याला लाजवू नका. दुर्गंधी आल्यास नाक मोडू नका.

   तिरस्कार दाखवू नका.

• त्याचे शौच्चकूप, बाथरूम आपण जाऊन अडवू नका.

• त्यास सर्व उपचाराची अनुकूलता द्या.

क्रमश:

डॉ. शशी पाटील एक महान सेवाभावी चिकित्सक होते. 'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' हे त्यांच्या जीवनाचे ब्रीद होते. ते नेहमी निस्वार्थ व निर्मळ भावनेतून रुग्ण उपचार करायचे, त्यामुळे त्यांच्या फक्त हातालाच नव्हे तर त्यांच्या वाणीला ही गुण होता. त्यांच्या अनुभवसिद्ध उपचारांमुळे अनेक रुग्ण दुर्धर रोगातून मुक्त व्हायचे. मूलतः डॉ. शशी पाटील हे एक आध्यात्मिक साधक होते. प्रत्येक औषधोपचाराचा प्रयोग, ते प्रथम स्वतःवर करून पाहायचे. त्यांचा शिवांबू, योग, निसर्गोपचार व आयुर्वेदाचा फक्त प्रगाढ अभ्यास होता असे नाही तर ते एक उत्तम हस्त कुशल उपचारक होते. मॉलिश व ॲक्युप्रेशर यासारख्या उपचार कलेमध्ये ते निपून होते. ते एक उत्तम लेखक व कवी सुद्धा होते. त्यांनी आरोग्य विषयक अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. ते आरोग्याचा गहन विषय रुग्णांना दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे देऊन सहजपणे पटवायचे.त्यांचे आपल्या वाणीवर चांगले प्रभुत्व होते. प्रस्तुत ‘मुळनक्षत्री - एक प्रेरणादाई जीवन-धारा’  या लेख मालिकेतून आम्ही  डॉ. शशी पाटील यांचे  ‘जीवन चरित्र’ क्रमश: प्रकाशित करीत आहोत. आज हजारो लोकांसाठी त्यांचे जीवन, नव-प्रेरणेचा स्त्रोत आहे.

Previous Post Next Post